Saturday 21 May, 2011

१ मे २०११, उद्योग विशेष- भाग २

कमर्शियल लॉयर - नितीन पोतदार

कॉरपोरेट या शब्दाबरोबरच येतं चकचकीत-भव्य देखणेपण. आपल्या सर्वसाधारण जगापेक्षा काहीशा वेगळं भासणा-या या भव्य, बलाढय जगाला उभं राहण्यासाठी मदत करणा-या व्यक्तींमध्ये आहेत कॉरपोरेट लॉयर नितीन पोतदार. करिअरचा विचार करताना वकीलच व्हायचं पण काळा डगला घालून कोर्टात उभं रहायचं नाही हे ठाम ठरवलेल्या नितीन पोतदार यांच्यासाठी कॉरपोरेट लॉ. कायद्यामधल्या फारशा ओळखीच्या नसणा-या क्षेत्राची दारं खुली झाली आणि आज त्यांनी साम्राज्य उभं केलं आहे.

त्यांनी ज्या वेळी वकिली करण्याचा निर्णय घेतला त्या वेळी तर कॉरपोरेट लॉ ही संकल्पनाच आपल्यासाठी नवीन होती. तर कॉरपोरेट लॉ म्हणजे नक्की काय आणि त्यांना या क्षेत्रात का यावसं वाटलं विचारता ते म्हणतात,

‘‘कॉरपोरेट लॉयर किवा कमर्शिअल लॉयर प्रकार आपल्याकडे १९९१ मध्ये जेव्हा त्या वेळचे वित्तमंत्री आणि पंतप्रधान मनमोहन सिग यांनी खुली अर्थव्यवस्था आणून परदेशी कंपन्यांना ५१ टक्के गुंतवणूक करण्याची परवानगी दिली. तेव्हापासून आपल्याकडे ही संकल्पना रुजू लागली. तशी ही संकल्पना किवा कायद्याचा हा भाग काही नवीन नव्हे. परदेशात विशेषतः अमेरिकेत कमर्शिअल लॉ अनेक वर्ष अस्तित्वात आहे. म्हणजे आपल्याकडेही हा लॉ होता पण त्याच्या वापराचं प्रयोजनच नसल्यानं हा प्रकार फारसा या क्षेत्रात लोकप्रिय झाला नव्हता.‘‘

या कायद्यार्तंगत काय बाबी येतात ?

कायदा आणि व्यवसायाकरिता याची सांगड घालणारं हे क्षेत्र आहे. एक व्यवसाय उभा राहण्यासाठी ज्या कायदेशीर बाबींची गरज असते त्या सगळया या अंतर्गत येतात. जसं संपादन आणि विलीनीकरण (अॅक्विझिशन अॅण्ड मर्जर) परकीय गुंतवणूक, जॉईंट व्हेंचर्स, फॉरेन कोलॅबरेशन, प्रायव्हेट इक्विटी फंट या सगळ्याच बाबींमध्ये आमची गरज असते. म्हणजे एखाद्या परदेशी कंपनीला जर भारतात पाऊल टाकायचं असेल तर त्यासाठी कमर्शिअल लॉयरची आत्यंतिक आवश्यकता आहे. मग तो खाजगी भागभांडवलाचा प्रश्न असो वा कंपनीचे संपादन विलीनीकरण असेल. प्रत्येक पावलाला कमर्शिअल लॉयर गरजेचा आहे.

पण... ते पुढे सांगतात, माझी कामाची पद्धत जरा वेगळी आहे. मुळात कमर्शिअल लॉयरची कामाची पद्धत फारशी माहिती नसल्यानं त्यांच्या कामाच्या पद्धतीतलं वेगळेपण समजणं कठीण, तेव्हा आधी कमर्शिअल लॉयरची जबाबदारी काय असते ? हे त्यांच्याकडून जाणून घेणं गरजेचं आहे.

मी माझी पद्धत वेगळी आहे म्हणण्यामागचं कारण म्हणजे मी माझं काम फक्त कायदेशीर बाबींपुरतं मर्यादित ठेवलेलं नाही, तर मी बिझनेस अॅडव्हाईस ही देतो. म्हणूनच मी फक्त कॉरपोरेट लॉयर न राहता कमर्शिअल लॉयर झालो आहे.

इथे म्हणजे काय ? हा प्रश्न उरतोच, तो विचारण्याआधीच श्री. पोतदार पुढे म्हणतात.

‘‘म्हणजे एक व्यवसाय स्थापित करण्यासाठी किवा

सहका-याचा करार करण्यासाठी भागभांडवलापासून दोन्ही कंपन्यांची आर्थिक क्षमता, त्यांचे ब्रॅण्ड्स, पुढची उद्दीष्ट्य, लक्ष्य, गरजा, उलाढाल, गुण-दोष, कंपनीच्या निर्णय प्रक्रियेतील दोघांचा सहभाग, भविष्यात उद्भवणारे प्रश्न, त्यावरील उत्तरं या सगळ्या बाबींचा विचार केला जाते. कित्येकदा आपली संस्कृती, सणवार याचीही माहिती मला परदेशी कंपन्यांना द्यावी लागते.

एच.आर. मार्केटिग, ब्रॅण्डिग हे सगळंच या कायद्यांतर्गत येतं. मला बहुतेक कंपन्यांची स्ट्रेंथ माहिती असल्यानं त्याचा फायदा दोन्ही कंपन्यांना होऊ शकतो. जसं एक भारतीय कापड बनविणारी कंपनी होती. त्या कंपनीनं परदेशातील एका औषध कंपनीशी जॉईंट व्हेंचर करायचं ठरवलं, तेव्हा खरं तर मला आश्चर्य वाटलं होतं आणि मी ते बोलूनही दाखवलं. पण मला कळलं की त्यांना जोडीनं आणखी दुसर्‍या व्यवसायात पाऊल टाकायचं आहे. पण काही काळानं त्या नव्या व्यवसायात नव्यानं पाय रोवणं कठीण आहे म्हणून अंग काढून घेतलं. अशा वेळी दोन्ही कंपन्यांना नुकसान सासावं लागतं. ते टाळावं यासाठी माझा सल्ला असतो. जसं जेव्हा फियाट कंपनीला आपल्याकडे यायचं होत, तेव्हा मी इटलीला जाऊन त्यांना पुढच्या योजनेबाबतचा सल्ला दिला होता.

यात धोका खूपच असणार ?

नक्कीच, यात रिस्क फॅक्टर असतोच. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला दोन्ही कंपन्यांच्या क्षमतेचा पूर्ण अंदाज असला पाहिजे, तसंच दोन्ही कंपन्यांचा ताळमेळ काय असेल, उद्या कसा असेल याचा विचार करावा लागतो. ज्या ज्या वेळी कंपनीत काही प्रश्न किवा समस्या उभी राहील, तेव्हा माझं अॅग्रीमेंट काढून त्यावर सगळ्यात पहिल्यांदा विचार केला जाईल. हे लक्षात ठेवून मला काम करायचं असतं. त्यासाठीच मी ज्यांना आपण डिसीजन मेकर्स म्हणतो अशा महत्त्वाच्या व्यक्तींबरोबरच पूर्ण चर्चा करतो, त्यांच्या प्रोजेक्टवर रिसर्च करतो आणि मगच सल्ला देतो.

आज नितीन पोतदार यांनी भारतात आलेल्या बहुतेक परदेशी कंपन्यांसाठी काम केलं आहे, हे म्हणणं अतिशयोक्ती होणार नाही. या त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात कशी झाली सांगताना ते म्हणतात, मी काही वकिली पार्श्वभूमी असणार्‍या कुटुंबातून आलेलो नाही. पण मला अगदी शाळेत आल्यापासून या क्षेत्राचं आकर्षण होतं. पुढे बारावी सायन्स झाल्यावर वकिलीच करायची, या मतावर ठाम झालो. त्याचबरोबर आधीच म्हटल्याप्रमाणे मला कोर्टात जाणारा वकिलही व्हायचं नव्हतं, हेही मी तेव्हाच ठरवलं होतं. पुढे रुईया कॉलेजमधून बी.ए. केलं, गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून एल.एल.बी. केलं.

इतकंच नाही तर त्यांनी सॉलिसिटरची परीक्षाही दिली. या काळात त्यांना कमर्शिअल लॉ बाबत समजंल...

एकीकडे मी ब-याच चौकश्या करत होतो. तेव्हा मला कमर्शिअल किवा कॉरपोरेट लॉ या क्षेत्राविषयी समजलं जे भारतात तितकसं ओळखीचं नव्हतं आणि विशेष म्हणजे त्याचवेळी भारतीय अर्थकारण बदलू लागलं होते. अशा परिस्थितीत पुढे कमर्शिअल लॉचं महत्त्व किती वाढेल हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नव्हती आणि मी याच क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला.

जे करायचं ते सर्वोत्तम असलं पाहिजे हा त्यांचा कटाक्ष होता. त्यानुसार त्यांनी अत्यंत प्रतिष्ठीत कॉफर्ड आणि बेली फर्ममधून आर.ए. शहांकडे काम करायला सुरुवात केली. तिथे नऊ वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी या क्षेत्रातले सगळे बारकावे समजून घेतले. त्यानंतर त्यांना कधी मागे वळून बघावंच लागलं नाही, त्यानंतर टॉपवर असणा-या अमरचंद-मंगलदास फर्ममधून मला बोलावणं आलं. त्या वेळी त्यांनी मला एक वर्ष काम केल्यावर पार्टनर करु म्हणून सांगितलं. पण नऊ वर्षांच्या उमेदवारीनंतर मला परत तेच करायचं नव्हतं. तेव्हा त्यांनी मला सरळ पार्टनर म्हणून घेतलं. पण हे माझं ध्येय नव्हतं. आता मला लीडरशीप दाखविण्याची संधी हवी होती, जी मला जे सागरया २०० लॉयरची टीम असणा-या फर्ममध्ये मिळाली. जिथे आज मी सिनियर पार्टनर म्हणून काम करतो आहे.

नितीन पोतदार यांचा हा प्रवास नक्कीच कौतुकास्पद आहे. आपल्याला पाहिजे ते मिळविण्याची जिद्द असली पाहिजे की आपोआप रस्ता मिळत जातो म्हणतात ते अगदी खरं आहे. कॉरपोरेटसारख्या ग्लॅमरस पण अतिशय कठीण क्षेत्रात आज ते भक्कमपण उभे आहेत. फ्युचर ग्रुपचे किशोर बियाणी असोत वा तानाजी मालुसरे सिटीला फंडिग करणारी लंडनची कंपनी असो. त्यांचा श्री.नितीन देतील त्या सल्ल्यावर १०० टक्के विश्वास असतो.

जर्मनीची बायर, फ्रान्सची टोटल, इटलीची फियाट, अमेरिकेची प्रॉक्टर अॅण्ड गॅम्बल, ऑस्ट्रेलियाची कुकीमॅन कुक्कीज्, जॅगवार लॅण्ड रोअरसाठी खुद्द इंग्लंड सरकार त्यांच्या सल्ल्यावर अवलंबून असतं तर दुसरीकडे फ्युचर ग्रुपचा विस्तार, अँकरनी जपानला पॅनॅसोनिकबरोबर केलेल्या २००० कोटींच्या कराराचे ते सक्रिय साक्षीदार असतात. या इतक्या सगळ्या महत्त्वपूर्ण कामांमधला कायम स्मरणात राहील, असा अनुभव ? विचारता ते पटकन म्हणतात,

लता मंगेशकर यांच्याबरोबर काम केल्याचा. काही वर्षांपूर्वी शिवउद्योग सेनेसाठी मुंबईत मोठा शो झाला होता. त्याचा सोनीसाठी करार करण्यासाठी मी सोनीचा वकील म्हणून त्यांच्याकडे गेलो होतो. त्या माझ्यासमोर येताच मी वकील वगैरे सगळं विसरुन पहिल्यांदा त्यांना वाकून नमस्कार केला होता. हा सगळा अनुभव मी कधीही विसरणार नाही.

व्यावसायिक दृष्ट्या यशाचं शिखर गाठल्यावर आता पुढे काय? हा प्रश्न जणू त्यांना पडलाच नाही असं त्यांचं एकातून दुसरं काम होत राहिलं. ते सांगतात, मी विविध वृत्तपत्रांतून विविध विषयांवर लिखाण करतो. त्याचबरोबर कॉरपोरेट लॉविषयी विद्यार्थ्यांना माहिती व्हावी. यातील वेगवेगळ्या विषयांवर लेक्चर देतो. त्यासाठी इंडियन अॅकॅडमी ऑफ कॉरपोरेट लॉही संस्था स्थापन केली आहे. पुण्याच्या आयएलएस लॉ कॉलेजबरोबर टायअप करुन तिथे लेक्चर द्यायला जातो. आपण जे ज्ञान मिळवलंय त्याचा पुढच्या पिढीला उपयोग व्हावा, हा शुद्ध हेतू यामागे आहे. त्याचबरोबर आपण मराठी उद्योजकांचाही विचार करता ?

नव्हे मी करतोय... गेल्या दोन-तीन वर्षांपासून मी मुद्दाम मराठी उद्योजकांना सल्लापर लेक्चर देतो. त्याचा मला इतका छान प्रतिसाद मिळतो की, माझा उत्साह वाढतो. माझे वृत्तपत्रातून येणारे लेख वाचून संपूर्ण महाराष्ट्रातून सर्वच स्तरातून उद्योजकांचा मला मिळणा-या प्रतिसादातून मला खूप बरं वाटतं. मराठी माणूस हुशार आहे, मेहनतीदेखील आहे. आता तर सव्र्हस इंडस्ट्रीजच्या रुपाने एक मोठी संधीही आपल्यापुढे उभी आहे. तेव्हा त्याचा योग्य लाभ घेण्याची हीच संधी आहे.

असाच एक खूप मोठा समाज आहे जो आपल्याच समाजाचा भाग आहे, पण आपल्या समाजात न राहता परदेशात वास्तव करुन आहे. त्यांना तुम्ही काय सांगाल ?

परदेशी वास्तव्य करणा-यांच्या बाबतीत एक फायद्याची गोष्ट म्हणजे त्यांना खूप मोठ्या विश्वाचा अनुभव आहे. आज परदेशातील अनेक उत्पादनं किवा सेवा अशा आहेत की ज्यांना भारतात मार्केट आहे. आज तिथे जे नोक-या करतात त्यांनी इथे जाऊन आपला व्यवसाय सुरु करावा, आम्ही त्यांच्या मदतीला आहोत. आपल्याकडे हातातली नोकरी सोडून व्यवसाय सुरु करण्याचं धाडस व मानसिकता आजही नाही. पण हे फार कठीण नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. जसं एखादा ऑटोमोबाईल इंजिनिअर असेल तर त्याची तिथे या क्षेत्रात ओळख झालेली असते. आज सगळ्याच ऑटोमोबाईल कंपन्या भारतात आलेल्या आहेत. त्यांना नेहमीच ऑटोकंपोनन्ट्स सप्लायरची गरज भारत असते. त्याचा फायदा घेऊन तो इथे येऊन ऑटोमोटिव्हमधला एखादा पार्ट तयार करण्याचा व्यवसाय करु शकतो किवा या परदेशी गाड्यांसाठी आवश्यक असणारी सव्र्हस सेंटर सुरु करता येतील. फार काही नाही तर निदान भारतात कोलॅबरेशन करु इच्छिणा-या परदेशी कंपनी आणि भारतीय कंपनीला जोडणारा दुवा तर नक्कीच होऊ शकतो. त्यासाठी तिथली नेाकरी सोडली पाहिजे असंही नाही, आज जग तुमच्या हाताच्या बोटावर आहे, या टेक्नॉलॉजीचा उपयोग करुन घेत तिथे राहून किवा जाऊन-येऊन ही व्यवसाय करता येईल. फक्त जिद्द आणि इच्छा हवी !

परिश्रम आणि सत्वशिलतेचे प्रतिक दादासाहेब परुळेकर

सिधुदुर्ग - रत्नागिरी म्हणजे श्रीदेव परशुरामाची भूमी.नररत्नांची खाण, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील अनेक क्षेत्रांत बुद्धिमान व कर्तृत्वान माणसे या जिल्ह्याने दिली. वेंगुर्ले तालुक्यातील अशांपैकीच एक आपले दादासाहेब परुळकर. शून्यातून वैभव निर्माण करणारी माणसं अवती-भवती असतात. परंतु शून्यापेक्षा कमी अशी ऋणावस्था असतांना स्वकर्तृत्वाने यशाचं शिखर गाठणारी माणसं फार कमी.

गाव तुळस. तालुका वेंगुर्ले येथे दि. २३ सप्टेंबर १९३४ रोजी जन्म झालेले सदाशिव गणेश तथा दादासाहेब परुळकर एक प्रगत उद्योजक व उद्योगश्रीपुरस्काराचे मानकरी आहेत. तुळस जैतिराश्रीत संस्था, मुंबईचे ते अध्यक्ष आइेत. त्यांना भूतपूर्व सावंतवाडी संस्थानचे अधिपती पुण्यश्लोक श्रीमंत बापूसाहेब महाराज यांच्या नावाचा पहिलाच जीवन गौरवपुरस्कार मिळाला आहे. अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेले दादाअभिमानाने कधी फुलून गेले नाहीत. त्यांची मान सदैव विनम्रच राहिली. कोकणामध्ये कर्तबगार, बुद्धिमान मनुष्यबळ आहे. पण त्यांना आपल्या बुद्धिमत्तेचे व कर्तृत्वाचे पाणी दाखविण्याकरिता कोकणची हद्द ओलांडावी लागते. आपले तुळस गाव सोडून १९५२ मध्ये दादासाहेब कोकणातल्या मुंबईत दाखल झाले. डोईवर एका ट्रंकचा बोजा होता.

मराठी माणसात व्यावसायीकपणाचा अभाव असतो. कोणताही धोका पत्करण्याची त्याची तयारी नसते. त्यामुळे तो चांगला उद्योजक बनू शकत नाही अशी टीका केली जाते. परंतू दादासाहेबांनी या टीकेला छेद दिला आहे. आज ते एक यशस्वी उद्योजक आहेतच, त्यात त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी वडाळा, लोअर परळ - मुंबई आणि वाशी-नवी मुंबई येथे प्रिटिग उद्योग आणि वेंगुर्ले येथे हॉटेल, तेंडोली येथे शेती-बागायती यामध्ये एक आदर्श निर्माण केला आहे.

दादासाहेबांनी कोणतीही पदवी किवा उद्योगाविषयी ज्ञान मिळविले नव्हते. होती ती वडिलोपार्जित खंडाची शेती-बागायती, नारळ काढणे, झाडांची मशागत, शेती ही घरची कामे करुन शाळेत जाणे असा त्यांचा दिनक्रम असायचा.पुढे काय?प्रश्नच होता.

घरच्या आर्थिक दुःस्थितीमुळे दादा लहानपणीच नोकरीसाठी मुंबईत आले. मास्टर कार्लेकर वॉच कंपनी, नलिनी प्रिटिग प्रेस, मिरॅकल प्रिटर्स, रॉयल प्रिटर्स प्रेस इत्यादी ठिकाणी लहान मोठी कामे करीत अमर प्रिटर्समध्ये ते फोरमन पदापर्यंत पोहोचले. अशा प्रकारे जवळपास १५ वर्षे काम करुन त्यांनी बराच अनुभव घेतला. एका मोठ्या प्रेसच्या मालकाने एकदा एका कामगाराला त्याचा काही दोष नसतांना दुपारच्यावेळी धक्के मारुन कंपनीच्या बाहेर काढले. ते पाहून दादासाहेबांच्या मनात कामगारांबद्दल एकजुटीचे विचार घोळू लागले व संप करुन ते यशस्वी झाले. त्यांनी प्रिटिग क्षेत्रातील कामगारांची संघटना बांधण्यासाठी चळवळ सुरु केली. पण त्यांना त्या कंपनीतून बाहेर पडावे लागले.

उद्योग व्यवसायाची कोणतीही पार्श्वभूमी नसतांना केवळ मिळविलेल्या अनुभवातून आणि आत्मविश्वासातूनच राष्ट्रसंत प. पू. पाचलेगांवकर महाराज यांचे आशीर्वाद डोळ्यासमोर ठेवून त्या काळात दादासाहेबांनी स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला. १९६७ साली परेल-मुंबई येथे प्रेस भाड्याने चालवायला घेतला. त्यामध्ये जम बसल्यानंतर थोडे कर्ज काढून त्यांनी जस्मिन आर्ट प्रिटर्सया प्रेसची स्थापना केली. जीवापाड मेहनत केली आणि काही वर्षातच कर्ज फेडले.

नेहमीच्या उद्योग व्यवसायाच्या मागे न लागता इतरांपेक्षा वेगळं करण्याची दादांची जबर इच्छा. जस्मिन आर्ट प्रिटिग प्रेसमध्ये त्यांनी कमर्शियल व पॅकेजिग लेबलसारखी इतरही कामे सुरु केली. परिश्रमांच्या जोरावर आणि अल्पावधीतच पॅकेजिग आणि कमर्शियल प्रिटिगमध्ये जस्मिन आर्ट प्रिटर्स हे नाव एक मानदंड बनले.

१९८२ साली पश्चिम जर्मनी येथे जागतिक पातळीवर भरलेल्या आधुनिक प्रिटिग प्रेस यंत्रांच्या प्रदर्शनाला दादासाहेब आपला नुकताच इन प्रिटिग प्रेस टेक्नॉलॉजीचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेला मुलगा चि.गणेश उर्फ प्रमोद याच्यासमवेत भेट देऊन आले. त्याबरोबर त्यांनी लंडन, फ्रान्स, ऑस्ट्रिया, हॉलंड, पोलंड, स्वित्झलँड, युरोप असा दौरा करुन अत्याधुनिक प्रिटिग इंडस्ट्री पाहिली. २००२ मध्ये श्री. प्रमोद हे इंग्लंडला बर्मिगहॅम येथे प्रिटिग मशिनरी खरेदीसाठी जाऊन आले. तसेच अमेरिकेला जाऊन तेथूनही आधुनिक मशिनरी खरेदी केली.

दर चार वर्षांनी भरणा-या या प्रदर्शनात प्रिटिगची अद्ययावत मशिनरी व त्या संदर्भात वापरली जाणारी सामुग्री यांचे हजारो स्टॉल्स असतात. हे प्रदर्शन पाहण्यासाठी व नवीन माहिती मिळविण्यासाठी जगाच्या कानाकोप-यातून लोक येतात. या प्रदर्शनास भेट देऊन श्री. प्रमोद यांनी ब-याच गोष्टींची माहिती करुन घेतली व आपल्या उद्योगात त्याचा उपयोग केला आहे.

आज दादासाहेबांची मुले व कुटुंब स्नुषा सौ. सुप्रिया या प्रिटिग व्यवसायात त्यांना मदत करीत आहेत. दादांचा दुसरा मुलगा निळकंठ आणि स्नुषा सौ. लिना ही उभयता सुद्धा परदेशातील प्रिटिग इंडस्ट्री पाहून आली आहेत. दादांची सुकन्या सौ. वंदना ही एम.कॉम. असून याच उद्योगात आपल्या दोन्ही बंधूंना अकाऊंटस विभागात पूर्ण वेळ मदत करीत असते. दादांच्या यशामागे त्यांची धर्मपत्नी सौ. सरोचना यांचेही अथक परिश्रम आहेत.

दादांच्या घराण्यात वारकरी परंपरा होती. त्याचे संस्कार दादांवर झाले. त्यामुळे संतांच्या साहित्याचे वाचन करण्याचा त्यांना सतत योग आला. संत ज्ञानेश्वर, राष्ट्रीय संत प.पू.पाचलेगांवकर महाराज आणि जीवनविद्येचे प.पू.वामनराव पै यांचे विचार अंमलात आणले आहेत आणि इतरांनाही सांगतात, माणसानं संसार करुन देवाचे नाव घेत मन देवाकडे एकाग्र केले तर मनःशांती मिळते. साधू-संत हे सामान्य माणसापेक्षा परमेश्वराच्या अधिक जवळ गेलेले असतात. म्हणून सामान्य माणसाने त्यांचे मार्गदर्शन घ्यावे. जनतेची अंतःकरणे प्रकाशमान करण्याचे व त्यांना प्रगतीचा मार्ग दाखविण्याचे कार्य संत पाचलेगांवकर महाराजांनी केले. म्हणूनच दादा त्यांचे शिष्य बनले. त्यांच्या श्रमदान यज्ञाचा प्रभाव दादांच्यावर पडला.

तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकारही जीवन विद्येची सद्गुरु वामनराव पै यांनी दिलेली शिकवण त्यांनी अंगिकारली आहे. निव्वळ पैसा,पद असून उपयोग नाही. समाजासाठी, गावासाठी, गरीबांसाठी दान करणे महत्त्वाचे आहे. सामाजिक, शैक्षणिक तसेच सांस्कृतिक कार्यासाठी दादासाहेब बराच खर्च करतात.

दादासाहेबांचा मित्रपरिवार फार मोठा आहे. मग क्षेत्र कोणतेही असो. ते आपल्या या प्रचंड यशाविषयी बोलतांना सांगतात, मी जे हे सारे निर्माण केले ते एका दिवसात तयार झालेले नाही. प्रचंड मेहनत आणि आलेल्या प्रत्येक संधीचा अचूकपणे घेतलेला फायदा व उत्पादनाचा दर्जा टिकविण्यासाठी सतत केलेली धडपड, कामगारांशी सतत साधलेला सुसंवाद आणि प्रेमाचं नातं यामुळेच मला हे शक्य झाले. नोकरी ही आर्थिक गरज असते. पण नोकरी एके नोकरी न करता मराठी तरुणांनी उद्योग व्यवसायाकडे सुद्धा लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांना आपण विश्वास आणि प्रोत्साहन दिले पाहिजे. तरुणांना, उद्योगामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर आळस आणि उधळपट्टी करुन चालणार नाही. सुरुवातीच्या काळात दादांनी पंधरा ते वीस तास मेहनत घेतली आहे. दुस-याचे दुःख कमी करुन त्यांना कसे सुखी करता येईल त्यासाठी ते प्रयत्नशील असतात. श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती श्रेष्ठ व भौतिक सुखापेक्षा मानसिक समाधान श्रेष्ठ असे ते मानतात.

शून्यातून विश्व निर्माण करणा-या या उद्योगी व्यक्तिमत्वाचा आदर्श युवा पिढीला मार्गदर्शक ठरेल.

प्रमोद आणि निळकंठ

दादांचे कर्तृत्ववान सुपूत्र श्री. प्रमोद आणि श्री. निळकंठ हे दोघेही आपल्या प्रिटिग इंडस्ट्रीचा व्याप समर्थपणे सांभाळत आहेत. नवी मुंबईत महापे येथे स्वतःच्या भव्य इमारतीत जस्मिन आर्ट प्रिटर्स प्रा. लि. हा अत्याधुनिक मशीनरींनी युक्त असा परदेशी कंपन्यांसाठी ही दर्जेदार छपाई कामे करीत आहे. प्रेसच्या वाढविस्ताराची कल्पकता प्रमोद यांनी दाखविली आणि आज मुंबईच्या मुद्रण विश्वात जस्मिनचे एक आगळे-वेगळे स्थान निर्माण केले आहे. निळकंठ यांचीही त्यांना समर्थ साथ लाभली. जस्मिनच्या दोन पिढ्यांचा हा गौरवशाली वारसा आणि त्याची वाटचाल नव्या पिढीने समजून घेण्यासारखी आहे.

कल्पवृक्षाच्या छायेत

रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील मु. पाचारळ या डोंगराळ खेडयातील गरीब निरक्षर अशा शेतकरी कुटुंबात श्री. मनोहर बाबाजी घोसाळकर उर्फ ताते यांचा दि. ८.६.५१ रोजी जन्म झाला. नळीच्या कौलांनी शाकारलेले त्यांचे घर आणि त्यात घासलेटच्या टेभ्यांचा प्रकाश असे. संसाराचा गाडा ओढण्यात आई गुंतलेली असायची, पण वर्षाला पुरेल एवढे धान्यसुद्धा शेतात पिकायचे नाही. त्यामुळे वयाच्या १० वर्षापर्यंतच आईच्या सोबत खेडयात त्यांचे वास्तव्य होते.

गावची शाळा म्हणजे चार भिती आणि एकच हॉल, त्यात चार वर्ग, मातीच्या शेणांनी सारवलेली जमीन, ती पण मुलांनीच सारवायची. दप्तराचा पत्ता नाही. दगडी पाटी व खडूंने लिखाण करीत ४ थी पर्यत पाचरळ आणि ५ वीला मु. पाले असे जेमतेम ५वी पर्यत शिक्षण घेऊन मुंबईला ६ वी साठी रवाना झाले. शहराची वाट धरण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. खेळण्या बागडण्याच्या वयातच आपल्या सवंगडयांना सोडून, आपले थोरले बंधू कै. हरिश्चंद्र (नाना) घोसाळकरांच्या सोबत मुंबईला येऊन लॉर्ड हॅरीस स्कूल काळबादेवीला ६ वी मध्ये प्रवेश घेतला. हरीश्चंद्र घोसाळकरांची स्वतःची अशी खोली नसल्यामुळे खानावळीत जेवायचे व तेथेच रहायचे. गिरगांव झावबावाडीत गर्दीची चाळ वस्ती होती इमारतीचे व्हरांडे (गॅलरी) मोठे असत त्यात झोपायचे आणि सार्वजनिक नळाखाली न्हायचे. गॅलरीतली रिकामी जागा देखील चाळीत घरकाम करणार्‍या रामागडयांची हक्काची असे. त्यामुळे तेथे देखील वावरताना त्यांची मर्जी सांभाळणे ओघाने आलेच. जसा मातीला आकार द्यावा तसा किशोर वयातच स्वावलंबनाचा कित्ता तात्यांना गिरवावा लागला. या वयात आवडी निवडीला मोल आणि मर्यादा नसतात असे ते वय असते. पण ज्यांचे छत्र हरपलेले असते त्यांना ते केविलवाणेपणे अनुभवावे लागते व मनातच झुरावे लागते, असा नशीबाचा खेळ होता. गिरगाव म्हणजे अस्सल मराठी खवय्यांचे माहेर घर होते. टेंबे, कुलकर्णी, विरकर, पणशीकर अशी नामांकित मराठी हॉटेल होती. मनोहर घोसाळकर हॉटेलचे बोर्ड वाचायचे पण साधी २० पैशाची उसळपावसुद्धा परवडणारी नव्हती. खिशांत गरजेपुरतेच आणे असायचे त्यामुळे मनाला मुरड घालणे हा खास गुण आपोआपच जोपासला गेला.

पुढे ८ वी करीता मराठा मंदीर हायस्कूल ठाकूर द्वार येथे प्रवेश घेतला. पण थोरल्या बंधूनी बिर्‍हांड हलविले. ते आंबेवाडी कुरारगांव मालाड पूर्वला. स्टेशनपासून अर्धातास पायवाट आणि रेल्वेप्रवास सुमारे २५ कि. मी. असा प्रवास करताना दमछाक व्हायची पण ऐकतो कोण? जेमतेम ८ वी पास झाले. इंग्रजी शिक्षण काय असते याची तोंडओळख झालीच नाही. त्यामुळे अखेर शाळेला राम राम केला. ताते तुटपुंज्या शिक्षणाद्वारे पदवीधर झाल्यासारखे नोकरीच्या शोधांत निघाले. आता बेकार माणूस झाल्यामुळे थोडीफार होती ती सहानुभूती सुद्धा गमावून बसले. आईची आठवण यायची. पण गावी जाण्यासाठी एस.टी. प्रवास देखील स्वप्नासारखा वाटे.

दिवसामागून दिवस नोकरीच्या शोधात भटकतांना बालकामगार म्हणून दीड रुपया रोजावर जोगेश्वरी येथे स्टोव्हच्या पीना बनविण्याच्या कारखान्यात काम मिळाले. पुढे ओळखी वाढत जाऊन मालाडबॉम्बे टॉकीज मध्ये फर्निचर फिटिगच्या कारखान्यात साडेतीन रुपये रोज मिळाला. पगारातील १०० टक्के वाढ बघून आनंदाने भारावून गेले. तसे स्वस्ताईचे दिवस असल्यामुळे छानछोकी नसेल तर सामान्यांना ते पैसे खूप वाटायचे. दोन पैसे साठू लागले व दिवस बदलू लागले. अचानक ओळखीने लार्सन ट्युब्रो सारख्या जगत् विख्यात कंपनीत स्वीचगीअर खात्यात हेल्परची नोकरी मिळाली. तेथील अजस्त्र यंत्रसामुग्री, पहायला मिळत होती. चांगला पगार मिळायचा. दिवस सुगीचे सुरु झाले होते. पण वेळेच्या अगोदर आणि नशीबापेक्षा जास्त भाग्यात नव्हते. कायमस्वरुपी कामगारांच्या संपात तात्यांची नोकरी गेली. त्यामुळे असे घडणे हे शाप आहे की वरदान असा प्रश्नच त्यांच्या समोर आ वासून उभा होता. बॉम्बें टॉकीजच्या पूर्वीच्या कारखाना मालकाकडे पुन्हा गेले. त्या मालकालाही आनंद झाला. काबाडकष्ट, नियमीतपणा, सदानंदी स्वभाव व मुलापेक्षा जास्त प्रामाणिकपणाचे प्रमाणपत्र पूर्वीच मिळाले होत. त्यामुळे त्यांना आग्रहानेच ठेवून घेतले.

आता वारंवार नोकर्‍या बदलत होत्या. खास पगार नव्हता आणि वय वाढायचे थांबणारे नव्हते. भोळया भाबडया आईला त्यांच्या लग्नांची भ्रांत पडलेली होती. तिने थोरल्या बंधुच्या मार्फत एक संबंधातीलच ओळखीचे वधू स्थळ पहिले ते पण प्राप्त परिस्थितीशी गरीबींशी तडजोडीने घेणारे. मु. दुधेरे, ता. मंडणगड येथील कै. राजाराम मोरे यांची मुलगी मात्र लक्ष्मीचा वारा होता. मे १९७२ मध्ये शुभमंगल होऊन मनोहर घोसाळकर लग्नाच्या बेडीत अडकले. गुलाब मोरे आता लक्ष्मीच्या पावलाने सौ. रोहीणी मनोहर घोसाळकर झाल्या. घरी उत्तम स्वागत झाले. संसार सुरु झाला पण मुंबईला राहायला खोलीच नव्हती. मुळातच तात्यांचा प्रेमळ रांगडा स्वभाव त्यामुळे आंबेवाडी कुरारगावातील आदिवासी बांधवांकडे त्यांची मैत्री झाली होती. तेथील गावंरान पडीक जागेत आदिवासी पाडयात (वस्ती) शंभर रुपये अनामत रक्कम आदिवासी जमिन मालकाला देवून कुडाची भित असलेली ४ फूट उंचीची शंभर चौरस फूट झोपडी तयार केली. त्याकाळी महानगरपालिकेचे स्वच्छता विभाग कामगार गावठाण भागात फिरत नसत, तसेच पायवाटेशिवाय दुसरे रस्तेच नव्हते. पण वस्ती तेथे कचरा आलाच त्यामुळे कचर्‍याचे ढीग साठायचे. ताते तसे नवीन झोपडीवाले पण मुळातच स्वावलंबी स्वभाव असल्याने ते स्वतः सर्व परिसराचा कचरा काढून झोपडपट्टी स्वच्छ ठेवायचे. आज शासन गावोगावी स्वच्छता अभियान राबवत आहे ते त्यांनी पूर्वीच अंगीकारुन झोपडपट्टीत सर्वासमोर एक आदर्श घालून दिला तसेच एक उत्साही मंडळ स्थापन केले.

आंबेवाडीत मालकीचे झोपडे झाले पण साडेतीन रुपये रोजाच्या नोकरीत बिर्‍हाडाचा खर्च परवडत नव्हता. सतत आर्थिक ओढाताण आणि ताणतणाव असे. नवीन नवीन लग्न झालेले त्यामुळे नातेवाईकांच्या पाहुणेचारा करीता आग्रहाचे आमंत्रण असे. पण प्रवास आणि खाऊ ही खर्चाची बाब खिशाला परवडणारी नव्हती. पत्नीला अंगावर काळे मणी, डोरले गळसरी शिवाय दागिने नव्हते ते दागिने सोडाच पण पण साधे झूळझुळीत नेहमीचे कपडे सुद्धा मिळत नव्हते. सर्वच बाजूंनी कुचंबणा होत होती. परिस्थितीला कोणाचा हातभार नाहीच पण नाक मुरडण्याची आणि खिजवून बोलण्याचा मात्र जवळच्या नातेवाईकांचा अनुभव पदोपदी येत होता.

आता मात्र कसोटीचे कष्टाचे दिवस आले. नोकरी सोडून कंत्राटी काम घरी आणून सौ. रोहिणी आणि ताते उभयतानी दिवस रात्र ते पूर्ण करायचे. हा कंत्राटी माल वेळेवर पोहोचवावा लागे. त्या मिळणार्‍या मजुरीत जेमतेम दोघांचा खर्च भागत असे. दरम्यान दोन वर्षाच्या फरकाने या झोपडीत दोन नशीबवान सुपुत्र चि. विलास आणि चि. विजय खेळू, रांगू लागले, पण त्यांचा वाढीव खर्च परवडेना. बाळ हट्ट पुरवीणे कठीण झाले. कधीतर स्वयंपाकासाठी वेळेला स्टोव्ह मध्ये घासलेटही नसे. पण सौ. रोहीणी हिमत हारत नव्हती, किंवा नाराजही नव्हती. परिस्थितीला सामोरे जाण्याचे तिच्याकडे इलाजही अगदी नामी असत. उन्हाळयाच्या दिवसात म्हशींच्या गोठयातील शेणांच्या गोवर्‍या वाळवून वार्षिक सरपणाची ती पूर्तता करीत असे. खर्च परवडेना आणि कंत्राटदार मजुरीचा दर वाढवून देईनात. अशा आर्थिक कात्रीत उभयता सापडले होते. पण शांत संतोषी स्वभावाचे ताते विचलीत झाले नाहीत.

दांडगा आत्म-विश्वास, जिद्द, कोणतेही काम करण्याची चिकाटी, धमक, मनगटात ताकद आणि स्वाभिमान अशा सद्गुणांचा मिलाफ त्यांच्या प्रकृतीत होता. त्यामुळे मागे हटण्याचा प्रश्नच नव्हता. कठोर परिश्रमास पर्याय नाही हे ब्रीद त्यांना तंतोतंत पटले होते. त्यांना जणू अगोदरच कळले होते की प्रतिकुल आर्थिक परिस्थिती हीच त्यांच्या प्रगतीत पायरी ठरणार आहे. इतक्या वर्षाचे कंत्राटी काम सोडण्याचा धोका त्यांनी पत्करला. कामातील निपुणता, अचूकता, दर्जेदारपणा आणि प्रामाणिकपणामुळे ते सर्वाना बॉम्बे टॉकीजमध्ये परिचित झाले होते. त्यांनी कंत्राटदारासारखीच ग्लासरनर ही वस्तू स्वतःच बनवून विकण्यास सुरुवात केली. शेवटी हे त्यांचेच कौशल्य होते. ताते व सौ. रोहीणी या उभयतांची एकमेकांना पक्की साथ होती. ज्यावर व्यवसायाचा डोलारा उभा करायचा तो मेहनतीचा पाया पक्का भक्कम केला तो केवळ एकमेकांवरील अढळ निष्ठेमुळेच.

टाकाऊ मधून टिकाऊ हा मंत्र त्यांनी जपला आणि पूर्वीचीच ग्लासरन ही वस्तू त्यांनी भंगारातील निवडक पत्र्यामंधून बनविणे सुरु केले. लहान लहान

व्यापार्‍-यांना ती किफायतशीर / फायदेशीर वाटू लागली. त्यामुळे मागणी सतत वाढू लागली. मागणी वाढल्यामुळे काम उभयतांच्या आवाक्या बाहेर जाऊ लागले आणि शेवटी एक आदिवासी कामगार बंधू सोबतीला घेतला. तात्यांना त्या श्री. वामनभाऊ या कामगार बंधूचा खूप अभिमान वाटतो. वामनभाऊंची निष्ठा, प्रेम, सचोटी आजही कायम असून तो त्यांच्या पाठीशी सावली सारखा असतो. आज त्यालाही तात्यांनी स्वावलंबी होण्याकरीता स्वतंत्र कामाची व्यवस्था केली आहे.

तात्यांनी आता कामाची जागा बदलून जवळच्या पिपळाच्या झाडाखाली शंभर चौरस फुटाची छपराखाली नूतन कारखान्याची स्थापना केली. ताते व सौ. रोहीणी या उभयतांना या शुभ सुरुवातीने सात्विक समाधान वाटले होते. म्हणून की अन्य कारणामुळे महानगरपालिकेच्या मुकादमाने ते छप्पर उध्वस्त केले. शेजारीपाजार्‍यांनी बघ्याची भूमिका घेतली पण कोणीही त्यांना थांबविना. कारखान्याची यंत्रसामुग्री म्हणजे हॅडप्रेस, ऐरण, हातोडी इतर सामान उघडयावर पडले. तात्यांचे नशीब की ते सामान जप्त झाले नाही. उभयता शुन्य नजरेने पहात होती. गहीवरुन आले. पैन पै जमा करुन उभारलेले छप्पर तुटले गेले. नवीन छप्पर उभारणीसाठी शिल्लक शून्य होती.

पण त्या शून्यातूनच वर्ष १९८३ मध्ये विजय प्रॉडक्टचे विश्व आकार घेऊ लागले. कुरारगांव आंबेवाडीतील आदिवासी बांधव तसे प्रेमळ त्यांनी आपल्या वतनदारीचा आधार दिला आणि रितसर परवान्याचे त्याच पिपळाखाली झोपडे बांधून दिले. आता कामकाज नव्या उमेदीने चालू झाले. वामनभाऊच्या सोबतीत तात्यांची मु. सापे. गावची मावस बहीण सौ. ताई व वंदना सावंत (बनीअक्का) त्यांच्या मदतीस येऊ लागली. सौ. रोहीणीचा फौजाफाटा वाढतच होता. शेजारी पाजारी विरंगुळा म्हणून उठबस करु लागले. सुरक्षितता वाटू लागली तसे ताते परदेश मंत्र्यासारखे सतत बाहेर ऑर्डर आणण्यासाठी हार्डवेअर मार्केटमध्ये धाऊ लागले. जागेची कमतरता भासू लागली. खर म्हणजे पुढे दुकान मागे मकान ही संकल्पना तात्यांनी राबवताना शेजार्‍यांना देखील प्रेरणा दिली. जागेचा पुरेपूर उपयोग होत होता. सोबत हातखर्चाला पैसे देखील खुळखुळू लागले. घराघरात छोटी छोटी हातयंत्रे बसवून मागेल त्याला काम हे तंत्र राबवून उत्पादन घेण्यास सुरुवात झाली.

वस्तीमध्ये बंधूभावाचे आनंदी वारे वाहू लागले तात्यांना *मुखी राम हाती काम* असा गुणगुणण्याचा भजनाचा छंद असल्यामुळे रात्री सवंगडयांसोबत भजनात दंग असत, तोपर्यंत सौ. रोहीणीताई घासलेटच्या टेंब्यासमोर यजमानांची वाट पहात ऐरणीवर सोनारी हातोडीने ग्लासरनरला बेअरींग फीटींगचे काम करीत असत. तिला झोपडीत सोबत फक्त दोन सुपुत्रांची चि. विलास, विजय. शेवटी ताते व सौ. रोहीणीच्या मेहनतीचा विजय होऊ लागला. व्यापारी ऑर्डर दिवसागणिक वाढल्यामुळे वस्तूचा वेगळेपणा दिसावयास हवा होता. म्हणून उत्पादनाला नाव दिले विजय प्रॉडक्ट.

वस्तीमध्ये कौटूंबिक वातावरण तयार होऊन कामानिमित्त सर्व एकमेकांशी साखळीने जोडले गेले पण ही कुटुंबकर्त्याची जबाबदारी तात्यांवर येऊन थांबली, कोकणातील ताते नावाचे नाते बंधुभगिनीनी आणि लहान थोरांनी तात्यांवर प्रेमाने लादले. सुखदुःखात सदासर्वकाळ ताते आहेत म्हणजे काळजी नाही, असा सूर सर्वत्र घुमू लागला. लहान थोरांना कुवतीप्रमाणे काम देणे नित्याचे झाले. घरबसल्या व्यवसाय धंदा मिळाल्यामुळे प्रत्येकजण आज सुखावत आहे, पण वाढत्या व्यापाराबरोबर संवेदनशिलता व भिडस्तपणा व्यवहारात परवडणारे नसते हे तात्यांनी वेळीच हेरले आणि स्वतंत्र वेगळया जागी कारखाना उभा करण्याचे ठरविले.

आता कामकाजाकडे लक्ष ठेवण्याएवढे चि. विलास आणि चि. विजय मोठे झाले होते. त्यांच्या शिक्षणासाठी खास शिक्षकांमार्फत शिकवणी ठेवली होती. परंतु व्यवसायाचे बाळकडू त्यांना वेळेपूर्वीच पचनी पडून दोघेही बंधू व्यवसायात आनंदाने समरस झाले. मुलांची जोड मिळाल्यामुळे तात्यांची जिद्द वाढली होती. आजूबाजूच्या रिकाम्या होणार्‍या खोल्या खरेदी अगर भाडे तत्वावर घेऊन कामकाज चालू होते. कामगारांची भर पडत ती शंभराहुन अधिक गेली आहे. हात यंत्राना उत्पादनाच्या मर्यादा आल्यामुळे स्वयंचलीत यंत्राच्या शोधात ताते धावू लागले. व्यावसायिक आत्मविश्वास जागा झाला होता. धंद्यात जम बसला होता. हार्डवेअर बाजारात श्री. मनोहर घोसाळकरांचे आदराने मनोहरभाई नावारुपात येत होते तर कधी कधी त्यांना गरीबदास म्हणून प्रेमाने बोलत होते, आता वाढत्या उत्पादनाची व्यवस्था करण्यासाठी आर्थिक उलाढाल करुन स्वयंचलित प्रेस व ट्राॅंब मशिन खरेदी केल्या आहेत. मालाड ते गोरेगांव विभागात कच्या मालासाठी योग्य अशी वेगवेगळया आठ ठिकाणी इंजिनिअरिग डिझाइनिग, प्रेसशॉप, टूलरुम, बेअरिग मॅन्यूफॅक्चरींग, पावडर कोटींग, इलेक्ट्रोप्लेटींग, पॅकेजिग अशी अत्याधुनिक यंत्राने कामे चालू केली पण त्यांची सर्वस्वी जबाबदारी मात्र नात्यातील घरच्याच व्यक्तीकडे सोपविली आहे. त्यामुळे आज उत्पादन, दर्जा, सर्व कसोटीत उजवा ठरत आहे.

आज विजय प्रॉडक्टचे दर्जेदार उत्पादन देशाच्या कानाकोपर्‍यात पोहोचलेले आहे, या व्यावसायिक चढत्या कमानीच्या आलेखाकडे पाहताना त्यांना आवर्जून आठवण येते ती त्याचे व्यावसायिक मार्गदर्शक कै. जानी उभयताची. या जानी कुटुंबाकडे धंद्याचे पहिले धडे गिरविले होते. कै. जानीनी त्यांच्यावर मुलासारखे प्रेम करुन मार्गदर्शन केले होते. ते त्यांना आज दिपस्तंभासारखे वाटते. कै. जानी उभयता प्रत्येक दिवाळीला श्रीमान ताते व रोहिणीताई यांना रु.११ भेट देऊन उभयतांना प्रामाणिकपणाचे, कष्टाळुपणाचे, आज्ञाधारकपणाचे, सचोटीचे आणि कठोर परीश्रमाचे कौतुक करायचे, अजुनही ते पहिले अकरा रुपये जपून ठेऊन त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाची शिदोरी जतन केली आहे.

आज स्पर्धेचे युग असुन सुद्धा विजय प्रॉडक्टच्या उत्पादनाला प्रचंड मागणी देशाच्या कानाकोपर्‍यातून येते. तरीसुद्धा व्यापार्‍यांशी परिचय व्हावा व व्यापारी संबंध वाढावा म्हणुन संधीप्रमाणे दौर्‍यांची आखणी करुन उत्पादनाचा दर्जा, पुरवठयातील नियमीतपणा व व्यापार्‍यांच्या अडचणींचे निराकरण करण्यात ते फार जागरुक असतात. विविध शहरांमध्ये म्हणजेच मुंबई, दिल्ली, हैद्राबाद, चेन्नई व बेंगलोर येथे व्यापारी स्नेहसम्मेलने आयोजीत करीत असतात.

गेल्या पंचवीस वर्षांच्या व्यावसायिक प्रवासामध्ये त्यांनी अनेक आर्थिक, कौटुंबिक चढउतार पाहिले. पाण्यातल्या माश्यांचे अश्रू जसे दिसत नाहीत तसे त्यांच्या बाबतीत घडत असते. या सर्व परीस्थितीत त्यांचे निर्विकारपणे कामकाज चालू असून उद्योगाचा बहर वाढतच आहे. आता हातयंत्रे जाऊन स्वयंचलित अजस्त्र यंत्रे कंपनीत धडधडू लागली. त्या मार्फत निर्माण होणार्‍या विजय प्रॉडक्ट ब्रँड ची गुणवत्ता सांभाळण्याकरीता आपले मुलगे चि. विलास, चि. विजय, भाचे चि. वैभव सांवत, अशोक सुर्वे आणि पुतण्या चि. संदेश या कर्तबगार तरुणांची फळी तात्यांच्या मार्गदर्शनाखाली कित्ते गिरवीत कार्यरत आहे.

जीवनाची अशी यशस्वी वाटचाल चालू असताना २००४ ची कोजागिरीच्या रात्री त्यांच्या गाडीला ड्रायव्हरच्या चुकीमुळे पनवेल सायन रोडवरती जीवघेणा अपघात घडला. गाडी पाहून यातून कोणी वाचले असेल यावर विश्वास बसत नव्हता. त्या भयंकर अपघातातून अनेक परिवारांचा पोषिंदा असल्यामुळे ते नशिबाने आणि सौ. रोहीणीच्या सौभाग्याच्या लेण्याने वाचले हा परमेश्वरी साक्षात्कारच होता.

पेरलेले उगवते आणि दीनदुबळयांचे आशीर्वाद कसे कामाला येतात या सत्कृतीची अनुभुती होऊन ते अंतर्मुख झाले. आज आपल्या धनसंपत्तीचा काही अंश गरजूंना कामी यावा या करीता ते स्वतः खर्ची पडून इतरांना प्रोत्साहन देतात. खास उल्लेखनीय बाब म्हणजे पूर्वी वस्तीमध्ये सार्वजनीक सत्यनारायण पूजा, गणेशोत्सव तसेच आबालवृद्धांना आर्थिक मदतीत अग्रभागी असणार्‍या तात्यांची सामाजिक बांधिलकी अधिकच वाढली आहे.

१) स्वतःला पुरेसे शिक्षण न मिळालेले ताते शैक्षणिक बाबतीत अग्रेसर असतात. वस्तीतील होतकरु तरुण मुलामुलींना मार्गदर्शन करुन आर्थिक पुरस्कार देत असतात. तसेच प्रतिवर्षी सुमारे दोनशे गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना वहया व पुस्तके वाटून आर्थिक हातभार लावत असतात.

२) त्यांनी २६ जुलै २००५ रोजीच्या मुंबईतील अतिवृष्टी पूरप्रसंगी वस्तीतील लोकांना चादर वाटप केले व सुमारे १५० माताभगिनींना साड्यांचे वाटप केले.

३) ग्रामीण विकासाचा ध्यास घेणार्‍या तात्यांनी आपले मु. पाचरळ या जन्मगावी मराठा विकास मंडळाच्या मार्फत बांधलेल्या राजे शिवछत्रपती भव्य सभागृहाचा मोठा आर्थिक भार उचलला. या सभागृहाचा उद्घाटन सोहळा त्यांच्या अध्यक्षतेखाली माननीय आमदार सूर्यकांत दळवी यांच्या हस्ते व मराठा महासंघाचे अध्यक्ष मा. शशिकांत पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

या उद्घाटन प्रसंगी खर्‍या अर्थाने पाचरळ पंचक्रोशी व मंडणगड तालुक्यातील समाज बांधवांना, राजकर्त्यांना ताते यांचा अल्प परिचय झाला. उपस्थितांना आपला मनु एवढा मोठा आहे हे ऐकून अवघे सभागृह भारावून गेले.

४) याच सभागृहात ६ मे २००७ रोजी सामाजिक बांधिकीचा वसा घेतलेल्या तात्यांनी सुमारे ३०० माता भगिनींना मा. आमदार सूर्याकांत दळवी यांच्या हस्ते साडी वाटप करुन माता भगिनींचा सन्मान केला.

५) दि. १३ जानेवारी २००८ रोजी मु. पाचरळ ता. मंडणगड येथे आरोग्य धनसंपदा या संकल्पनेतून तज्ञांच्या मार्फत चष्मा शिबीराचे आयोजन करुन सुमारे ४०० गरजूंना चष्मे पुरविले.

६) अशी सामाजिक कामे चालू असतानाच आंतरराष्ट्रीय हार्डवेअर प्रदर्शन इंडेक्स २००४ ब्रांदा-कुर्ला संकुलात विजय प्राँडक्ट सहभागाने जागतिकीकरणाच्या युगात आपल्या ब्रँड ट्रेडमार्कचे निशाण उंच फडकविण्याची भरीव कामगिरी केली.

७) ४ मे २००८ रोजी झालेल्या गर्जतो मराठी या प्रदर्शनात भाग घेऊन मराठी माणूस हार्डवेअर क्षेत्रात आघाडीवर आहे. हे अवघ्या महाराष्ट्राला दाखवून आपल्या कर्तबगारीचा ठसा उमटविला.

८) विशेष म्हणजे आज मराठा चेंबर आँफ काँमर्स चे संलग्न सभासद असून संस्थेच्या सर्व कार्यक्रमात सहभागी असतात.

९) उद्योग व्यवसाय चालविताना नेहमी वेगवेगळे परवाने, ना हरकत पत्र, कायदयाची पूर्तता अशा अनंत अडचणी येत असतात. सर्व साधारण उद्योजक दिशाहीन होऊन त्यांची वाढ खुंटते, या करीता मार्गदर्शनासाठी ताते यांनी मिनी जपान समजल्या जाणार्‍या बाँम्बे टॉकीज मालाड येथे लघु उद्योजकांची आपले जीवलग मित्र श्री. मोहनभाई नागपाल व श्री. संघवी यांच्या मदतीने मालाड हार्डवेअर मँन्यूफॅक्चरींग असोसिएशन संघटना बांधली व आतापर्यंत त्याचे अध्यक्ष म्हणून धुरा सांभाळत आहेत.

एवढे मोठे उत्तुंग भारदस्त व्यक्तिमत्व पण समाजामध्ये वावरताना सर्वसामान्यांच्या पंक्तीतच रममाण होतात. आधी केले मग सांगितले अशा स्वभावाच्या तात्यांकडे कधीही दरपोक्तीचा अंश देखिल सापडत नाही. कोकणातल्या फणसासारखे मधाळ व्यक्तीमत्व असलेले अतिशय प्रेमळ स्वभावाचे, संगीत प्रेमी, प्रसंगी वरवर रागावणारे थोडक्यात वज्रादपि कठोरराणी मृदूनि कुसुमादपि असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे. हया ताते व सौ. रोहीणी ताईच्या सानिध्यांत दरवर्षी ८ जून या त्यांच्या वाढदिवशी आनंदाला उधाण येते हा दिवस सर्व कामगार मित्रमंडळी समवेत सामुदायिक सहलीने उत्साहाने साजरा होतो.

त्यांची औद्योगिक क्षेत्रातील प्रगती व समाज उपयोगी कार्यात असलेल्या सहभागाची नोंद घेऊन अनेक लहान मोठया संस्था आमंत्रण देऊन त्यांचा सन्मान करीत असतात. या कोकण सुपुत्राच्या कार्याचा मागोवा घेऊन मा. आमदार भाई जगपात पुरस्कृत कोकण महोत्सव २००८ जोगेश्वरी (पू) मुंबई येथे उच्च शिक्षण मंत्री महोदय मा. सुरेश शेट्टी यांच्या हस्ते कोकण रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तो दिवस नक्कीच आम्हा सर्वांच्या दृष्टीने भाग्याचा व सुवर्णाक्षरात लिहीण्यासारखा संस्मरणिय ठरला.

माननीय ताते जरी राजकारणी नसले तरी त्याच्या निगर्वी सामाजिक सहभागामुळे सर्व राजकीय पक्ष कार्यकर्ते व पुढार्‍यांना त्यांचा आदर वाटतो. त्यांचे व्यक्तिगत संबंध राजकीय क्षितीजापलिकडेच असल्यामुळे तात्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना सर्वच स्तरातील मान्यवर आवर्जून उपस्थिती लावतात यातच तात्यांची प्रभावी उजळ प्रतिमा अनुभवास येत असते.

तात्यांच्या कारकीर्दीची सुरुवात आंबेवाडी, कुरार व्हिलेजच्या पत्र्यांच्या चाळीमध्ये झाली. तेथे अनेक वर्ष राहिले परंतु तेथील वाढत्या व्यापामधून निवांतपणा मिळावा आणि वाढत्या कुटुंबाची गरज हेरुन टाउुन शिप मालाड (पू), मुंबई येथे नवीन जागेत बिर्‍हाड हलविले. या ठिकाणी त्यांचे विलास, विजय हे विवाहित मुलगे, दोन सुना व दोन नातू असा परिवार गोकुळासारखा नांदत आहे. परंतु *जुने ते सोने* म्हणून ज्या खोलीतून व्यावसायिक सुरुवात केली त्याच खोलीत बसून ताते आपले ऑफिस सांभाळतात तर त्यांची मुले व कंपनी अधिकारी वर्ग त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे ह्या प्रचंड उद्योगाचे कार्य व्यवस्थित हाताळताना पाहून ते सुखावलेले दिसतात.

ज्या गावी ताते जन्मले ते पाचरळ गाव म्हणजे नवरत्नांची खाण वाटते. येथे प्रतिभासंपन्न उच्च सरकारी अधिकारी, इंजिनिअर, डॉक्टर, बँक मॅनेजर, पोलिस कमिशनर झाले आणि आज श्री. मनोहर बाबाजी घोसाळकर यांच्या रुपाने अनेकांना रोजी रोटी देणारे यशस्वी उद्योगपती व प्रयोगशील शेतकरी उद्यास आले आहेत. या जन्मभूमीचा सुगंध दरवळून ते आता अत्याधुनिक शेती क्षेत्राकडे ओढले गेले आहेत.

सुमारे ५० एकर जमिनीवर निसर्गरम्य मोक्याच्या ठिकाणी ठिबक सिचन पद्धतीने आंबा, काजू, पपई, शेवग्याची शेती विकसित होत आहे. वाटेचा वाटसरु, गाडीतील प्रवासी देखील आपुलकीने व कौतुकाने त्या फळबागेकडे पाहतात. एकेकाळी दाट जंगलाने वेढलेले ते ठिकाण आज रमणीय आणि मनाला भुरळ घालणारे सुंदर ठिकाण झाले आहे. *हात लावीन तेथे सोन* ही किमया फक्त तातेच करु शकतात.

आपण ध्रुवतार्‍यासारखे त्यांच्या दिशेने चालण्याचा प्रयत्न व अनुकरण केले तरी आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो. या अष्टपैलु व्यक्तिमत्त्वावर कितीही लिहिले तरी अपुरेच. जीवनाचा आनंद आस्वाद वर्तमानात अनुभवण्याचा त्यांचा सकारात्मक दृष्टीकोन निश्चितच प्रेरणादायी आहे.

अशा या अष्टपैलू व्यक्तीमत्त्वाच्या माणसाच्या मनाचा ठाव घेणे दुरापास्त आहे. तात्यांच्या बाबतीत एवढेच म्हणावेसे वाटते की, झाले बहू होतिल बहू परंतु या सम हा! तात्यांनी आता कामाची जागा बदलून जवळच्या पिपळाच्या झाडाखाली शंभर चौरस फुटाची छपराखाली नूतन कारखान्याची स्थापना केली. ताते व सौ. रोहीणी या उभयतांना या शुभ सुरुवातीने सात्विक समाधान वाटले होते. म्हणून की अन्य कारणामुळे महानगरपालिकेच्या मुकादमाने ते छप्पर उध्वस्त केले. शेजारीपाजार्‍यांनी बघ्याची भूमिका घेतली पण कोणीही त्यांना थांबविना. कारखान्याची यंत्रसामुग्री म्हणजे हॅडप्रेस, ऐरण, हातोडी इतर सामान उघडयावर पडले. तात्यांचे नशीब की ते सामान जप्त झाले नाही. उभयता शुन्य नजरेने पहात होती. गहीवरुन आले. पैन पै जमा करुन उभारलेले छप्पर तुटले गेले. नवीन छप्पर उभारणीसाठी शिल्लक शून्य होती.

पण त्या शून्यातूनच वर्ष १९८३ मध्ये विजय प्रॉडक्टचे विश्व आकार घेऊ लागले. कुरारगांव आंबेवाडीतील आदिवासी बांधव तसे प्रेमळ त्यांनी आपल्या वतनदारीचा आधार दिला आणि रितसर परवान्याचे त्याच पिपळाखाली झोपडे बांधून दिले. आता कामकाज नव्या उमेदीने चालू झाले. वामनभाऊच्या सोबतीत तात्यांची मु. सापे. गावची मावस बहीण सौ. ताई व वंदना सावंत (बनीअक्का) त्यांच्या मदतीस येऊ लागली. सौ. रोहीणीचा फौजाफाटा वाढतच होता. शेजारी पाजारी विरंगुळा म्हणून उठबस करु लागले. सुरक्षितता वाटू लागली तसे ताते परदेश मंत्र्यासारखे सतत बाहेर ऑर्डर आणण्यासाठी हार्डवेअर मार्केटमध्ये धाऊ लागले. जागेची कमतरता भासू लागली. खर म्हणजे पुढे दुकान मागे मकान ही संकल्पना तात्यांनी राबवताना शेजार्‍यांना देखील प्रेरणा दिली. जागेचा पुरेपूर उपयोग होत होता. सोबत हातखर्चाला पैसे देखील खुळखुळू लागले. घराघरात छोटी छोटी हातयंत्रे बसवून मागेल त्याला काम हे तंत्र राबवून उत्पादन घेण्यास सुरुवात झाली.

वस्तीमध्ये बंधूभावाचे आनंदी वारे वाहू लागले तात्यांना *मुखी राम हाती काम* असा गुणगुणण्याचा भजनाचा छंद असल्यामुळे रात्री सवंगडयांसोबत भजनात दंग असत, तोपर्यंत सौ. रोहीणीताई घासलेटच्या टेंब्यासमोर यजमानांची वाट पहात ऐरणीवर सोनारी हातोडीने ग्लासरनरला बेअरींग फीटींगचे काम करीत असत. तिला झोपडीत सोबत फक्त दोन सुपुत्रांची चि. विलास, विजय. शेवटी ताते व सौ. रोहीणीच्या मेहनतीचा विजय होऊ लागला. व्यापारी ऑर्डर दिवसागणिक वाढल्यामुळे वस्तूचा वेगळेपणा दिसावयास हवा होता. म्हणून उत्पादनाला नाव दिले विजय प्रॉडक्ट.

वस्तीमध्ये कौटूंबिक वातावरण तयार होऊन कामानिमित्त सर्व एकमेकांशी साखळीने जोडले गेले पण ही कुटुंबकर्त्याची जबाबदारी तात्यांवर येऊन थांबली, कोकणातील ताते नावाचे नाते बंधुभगिनीनी आणि लहान थोरांनी तात्यांवर प्रेमाने लादले. सुखदुःखात सदासर्वकाळ ताते आहेत म्हणजे काळजी नाही, असा सूर सर्वत्र घुमू लागला. लहान थोरांना कुवतीप्रमाणे काम देणे नित्याचे झाले. घरबसल्या व्यवसाय धंदा मिळाल्यामुळे प्रत्येकजण आज सुखावत आहे, पण वाढत्या व्यापाराबरोबर संवेदनशिलता व भिडस्तपणा व्यवहारात परवडणारे नसते हे तात्यांनी वेळीच हेरले आणि स्वतंत्र वेगळया जागी कारखाना उभा करण्याचे ठरविले.

आता कामकाजाकडे लक्ष ठेवण्याएवढे चि. विलास आणि चि. विजय मोठे झाले होते. त्यांच्या शिक्षणासाठी खास शिक्षकांमार्फत शिकवणी ठेवली होती. परंतु व्यवसायाचे बाळकडू त्यांना वेळेपूर्वीच पचनी पडून दोघेही बंधू व्यवसायात आनंदाने समरस झाले. मुलांची जोड मिळाल्यामुळे तात्यांची जिद्द वाढली होती. आजूबाजूच्या रिकाम्या होणार्‍या खोल्या खरेदी अगर भाडे तत्वावर घेऊन कामकाज चालू होते. कामगारांची भर पडत ती शंभराहुन अधिक गेली आहे. हात यंत्राना उत्पादनाच्या मर्यादा आल्यामुळे स्वयंचलीत यंत्राच्या शोधात ताते धावू लागले. व्यावसायिक आत्मविश्वास जागा झाला होता. धंद्यात जम बसला होता. हार्डवेअर बाजारात श्री. मनोहर घोसाळकरांचे आदराने मनोहरभाई नावारुपात येत होते तर कधी कधी त्यांना गरीबदास म्हणून प्रेमाने बोलत होते, आता वाढत्या उत्पादनाची व्यवस्था करण्यासाठी आर्थिक उलाढाल करुन स्वयंचलित प्रेस व ट्राॅंब मशिन खरेदी केल्या आहेत. मालाड ते गोरेगांव विभागात कच्या मालासाठी योग्य अशी वेगवेगळया आठ ठिकाणी इंजिनिअरिग डिझाइनिग, प्रेसशॉप, टूलरुम, बेअरिग मॅन्यूफॅक्चरींग, पावडर कोटींग, इलेक्ट्रोप्लेटींग, पॅकेजिग अशी अत्याधुनिक यंत्राने कामे चालू केली पण त्यांची सर्वस्वी जबाबदारी मात्र नात्यातील घरच्याच व्यक्तीकडे सोपविली आहे. त्यामुळे आज उत्पादन, दर्जा, सर्व कसोटीत उजवा ठरत आहे.

आज विजय प्रॉडक्टचे दर्जेदार उत्पादन देशाच्या कानाकोपर्‍यात पोहोचलेले आहे, या व्यावसायिक चढत्या कमानीच्या आलेखाकडे पाहताना त्यांना आवर्जून आठवण येते ती त्याचे व्यावसायिक मार्गदर्शक कै. जानी उभयताची. या जानी कुटुंबाकडे धंद्याचे पहिले धडे गिरविले होते. कै. जानीनी त्यांच्यावर मुलासारखे प्रेम करुन मार्गदर्शन केले होते. ते त्यांना आज दिपस्तंभासारखे वाटते. कै. जानी उभयता प्रत्येक दिवाळीला श्रीमान ताते व रोहिणीताई यांना रु.११ भेट देऊन उभयतांना प्रामाणिकपणाचे, कष्टाळुपणाचे, आज्ञाधारकपणाचे, सचोटीचे आणि कठोर परीश्रमाचे कौतुक करायचे, अजुनही ते पहिले अकरा रुपये जपून ठेऊन त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाची शिदोरी जतन केली आहे.

आज स्पर्धेचे युग असुन सुद्धा विजय प्रॉडक्टच्या उत्पादनाला प्रचंड मागणी देशाच्या कानाकोपर्‍यातून येते. तरीसुद्धा व्यापार्‍यांशी परिचय व्हावा व व्यापारी संबंध वाढावा म्हणुन संधीप्रमाणे दौर्‍यांची आखणी करुन उत्पादनाचा दर्जा, पुरवठयातील नियमीतपणा व व्यापार्‍यांच्या अडचणींचे निराकरण करण्यात ते फार जागरुक असतात. विविध शहरांमध्ये म्हणजेच मुंबई, दिल्ली, हैद्राबाद, चेन्नई व बेंगलोर येथे व्यापारी स्नेहसम्मेलने आयोजीत करीत असतात.

गेल्या पंचवीस वर्षांच्या व्यावसायिक प्रवासामध्ये त्यांनी अनेक आर्थिक, कौटुंबिक चढउतार पाहिले. पाण्यातल्या माश्यांचे अश्रू जसे दिसत नाहीत तसे त्यांच्या बाबतीत घडत असते. या सर्व परीस्थितीत त्यांचे निर्विकारपणे कामकाज चालू असून उद्योगाचा बहर वाढतच आहे. आता हातयंत्रे जाऊन स्वयंचलित अजस्त्र यंत्रे कंपनीत धडधडू लागली. त्या मार्फत निर्माण होणार्‍या विजय प्रॉडक्ट ब्रँड ची गुणवत्ता सांभाळण्याकरीता आपले मुलगे चि. विलास, चि. विजय, भाचे चि. वैभव सांवत, अशोक सुर्वे आणि पुतण्या चि. संदेश या कर्तबगार तरुणांची फळी तात्यांच्या मार्गदर्शनाखाली कित्ते गिरवीत कार्यरत आहे.

जीवनाची अशी यशस्वी वाटचाल चालू असताना २००४ ची कोजागिरीच्या रात्री त्यांच्या गाडीला ड्रायव्हरच्या चुकीमुळे पनवेल सायन रोडवरती जीवघेणा अपघात घडला. गाडी पाहून यातून कोणी वाचले असेल यावर विश्वास बसत नव्हता. त्या भयंकर अपघातातून अनेक परिवारांचा पोषिंदा असल्यामुळे ते नशिबाने आणि सौ. रोहीणीच्या सौभाग्याच्या लेण्याने वाचले हा परमेश्वरी साक्षात्कारच होता.

पेरलेले उगवते आणि दीनदुबळयांचे आशीर्वाद कसे कामाला येतात या सत्कृतीची अनुभुती होऊन ते अंतर्मुख झाले. आज आपल्या धनसंपत्तीचा काही अंश गरजूंना कामी यावा या करीता ते स्वतः खर्ची पडून इतरांना प्रोत्साहन देतात. खास उल्लेखनीय बाब म्हणजे पूर्वी वस्तीमध्ये सार्वजनीक सत्यनारायण पूजा, गणेशोत्सव तसेच आबालवृद्धांना आर्थिक मदतीत अग्रभागी असणार्‍या तात्यांची सामाजिक बांधिलकी अधिकच वाढली आहे.

१) स्वतःला पुरेसे शिक्षण न मिळालेले ताते शैक्षणिक बाबतीत अग्रेसर असतात. वस्तीतील होतकरु तरुण मुलामुलींना मार्गदर्शन करुन आर्थिक पुरस्कार देत असतात. तसेच प्रतिवर्षी सुमारे दोनशे गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना वहया व पुस्तके वाटून आर्थिक हातभार लावत असतात.

२) त्यांनी २६ जुलै २००५ रोजीच्या मुंबईतील अतिवृष्टी पूरप्रसंगी वस्तीतील लोकांना चादर वाटप केले व सुमारे १५० माताभगिनींना साड्यांचे वाटप केले.

३) ग्रामीण विकासाचा ध्यास घेणार्‍या तात्यांनी आपले मु. पाचरळ या जन्मगावी मराठा विकास मंडळाच्या मार्फत बांधलेल्या राजे शिवछत्रपती भव्य सभागृहाचा मोठा आर्थिक भार उचलला. या सभागृहाचा उद्घाटन सोहळा त्यांच्या अध्यक्षतेखाली माननीय आमदार सूर्यकांत दळवी यांच्या हस्ते व मराठा महासंघाचे अध्यक्ष मा. शशिकांत पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

या उद्घाटन प्रसंगी खर्‍या अर्थाने पाचरळ पंचक्रोशी व मंडणगड तालुक्यातील समाज बांधवांना, राजकर्त्यांना ताते यांचा अल्प परिचय झाला. उपस्थितांना आपला मनु एवढा मोठा आहे हे ऐकून अवघे सभागृह भारावून गेले.

४) याच सभागृहात ६ मे २००७ रोजी सामाजिक बांधिकीचा वसा घेतलेल्या तात्यांनी सुमारे ३०० माता भगिनींना मा. आमदार सूर्याकांत दळवी यांच्या हस्ते साडी वाटप करुन माता भगिनींचा सन्मान केला.

५) दि. १३ जानेवारी २००८ रोजी मु. पाचरळ ता. मंडणगड येथे आरोग्य धनसंपदा या संकल्पनेतून तज्ञांच्या मार्फत चष्मा शिबीराचे आयोजन करुन सुमारे ४०० गरजूंना चष्मे पुरविले.

६) अशी सामाजिक कामे चालू असतानाच आंतरराष्ट्रीय हार्डवेअर प्रदर्शन इंडेक्स २००४ ब्रांदा-कुर्ला संकुलात विजय प्राँडक्ट सहभागाने जागतिकीकरणाच्या युगात आपल्या ब्रँड ट्रेडमार्कचे निशाण उंच फडकविण्याची भरीव कामगिरी केली.

७) ४ मे २००८ रोजी झालेल्या गर्जतो मराठी या प्रदर्शनात भाग घेऊन मराठी माणूस हार्डवेअर क्षेत्रात आघाडीवर आहे. हे अवघ्या महाराष्ट्राला दाखवून आपल्या कर्तबगारीचा ठसा उमटविला.

८) विशेष म्हणजे आज मराठा चेंबर आँफ काँमर्स चे संलग्न सभासद असून संस्थेच्या सर्व कार्यक्रमात सहभागी असतात.

९) उद्योग व्यवसाय चालविताना नेहमी वेगवेगळे परवाने, ना हरकत पत्र, कायदयाची पूर्तता अशा अनंत अडचणी येत असतात. सर्व साधारण उद्योजक दिशाहीन होऊन त्यांची वाढ खुंटते, या करीता मार्गदर्शनासाठी ताते यांनी मिनी जपान समजल्या जाणार्‍या बाँम्बे टॉकीज मालाड येथे लघु उद्योजकांची आपले जीवलग मित्र श्री. मोहनभाई नागपाल व श्री. संघवी यांच्या मदतीने मालाड हार्डवेअर मँन्यूफॅक्चरींग असोसिएशन संघटना बांधली व आतापर्यंत त्याचे अध्यक्ष म्हणून धुरा सांभाळत आहेत.

एवढे मोठे उत्तुंग भारदस्त व्यक्तिमत्व पण समाजामध्ये वावरताना सर्वसामान्यांच्या पंक्तीतच रममाण होतात. आधी केले मग सांगितले अशा स्वभावाच्या तात्यांकडे कधीही दरपोक्तीचा अंश देखिल सापडत नाही. कोकणातल्या फणसासारखे मधाळ व्यक्तीमत्व असलेले अतिशय प्रेमळ स्वभावाचे, संगीत प्रेमी, प्रसंगी वरवर रागावणारे थोडक्यात वज्रादपि कठोरराणी मृदूनि कुसुमादपि असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे. हया ताते व सौ. रोहीणी ताईच्या सानिध्यांत दरवर्षी ८ जून या त्यांच्या वाढदिवशी आनंदाला उधाण येते हा दिवस सर्व कामगार मित्रमंडळी समवेत सामुदायिक सहलीने उत्साहाने साजरा होतो.

त्यांची औद्योगिक क्षेत्रातील प्रगती व समाज उपयोगी कार्यात असलेल्या सहभागाची नोंद घेऊन अनेक लहान मोठया संस्था आमंत्रण देऊन त्यांचा सन्मान करीत असतात. या कोकण सुपुत्राच्या कार्याचा मागोवा घेऊन मा. आमदार भाई जगपात पुरस्कृत कोकण महोत्सव २००८ जोगेश्वरी (पू) मुंबई येथे उच्च शिक्षण मंत्री महोदय मा. सुरेश शेट्टी यांच्या हस्ते कोकण रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तो दिवस नक्कीच आम्हा सर्वांच्या दृष्टीने भाग्याचा व सुवर्णाक्षरात लिहीण्यासारखा संस्मरणिय ठरला.

माननीय ताते जरी राजकारणी नसले तरी त्याच्या निगर्वी सामाजिक सहभागामुळे सर्व राजकीय पक्ष कार्यकर्ते व पुढार्‍यांना त्यांचा आदर वाटतो. त्यांचे व्यक्तिगत संबंध राजकीय क्षितीजापलिकडेच असल्यामुळे तात्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना सर्वच स्तरातील मान्यवर आवर्जून उपस्थिती लावतात यातच तात्यांची प्रभावी उजळ प्रतिमा अनुभवास येत असते.

तात्यांच्या कारकीर्दीची सुरुवात आंबेवाडी, कुरार व्हिलेजच्या पत्र्यांच्या चाळीमध्ये झाली. तेथे अनेक वर्ष राहिले परंतु तेथील वाढत्या व्यापामधून निवांतपणा मिळावा आणि वाढत्या कुटुंबाची गरज हेरुन टाउुन शिप मालाड (पू), मुंबई येथे नवीन जागेत बिर्‍हाड हलविले. या ठिकाणी त्यांचे विलास, विजय हे विवाहित मुलगे, दोन सुना व दोन नातू असा परिवार गोकुळासारखा नांदत आहे. परंतु *जुने ते सोने* म्हणून ज्या खोलीतून व्यावसायिक सुरुवात केली त्याच खोलीत बसून ताते आपले ऑफिस सांभाळतात तर त्यांची मुले व कंपनी अधिकारी वर्ग त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे ह्या प्रचंड उद्योगाचे कार्य व्यवस्थित हाताळताना पाहून ते सुखावलेले दिसतात.

ज्या गावी ताते जन्मले ते पाचरळ गाव म्हणजे नवरत्नांची खाण वाटते. येथे प्रतिभासंपन्न उच्च सरकारी अधिकारी, इंजिनिअर, डॉक्टर, बँक मॅनेजर, पोलिस कमिशनर झाले आणि आज श्री. मनोहर बाबाजी घोसाळकर यांच्या रुपाने अनेकांना रोजी रोटी देणारे यशस्वी उद्योगपती व प्रयोगशील शेतकरी उद्यास आले आहेत. या जन्मभूमीचा सुगंध दरवळून ते आता अत्याधुनिक शेती क्षेत्राकडे ओढले गेले आहेत.

सुमारे ५० एकर जमिनीवर निसर्गरम्य मोक्याच्या ठिकाणी ठिबक सिचन पद्धतीने आंबा, काजू, पपई, शेवग्याची शेती विकसित होत आहे. वाटेचा वाटसरु, गाडीतील प्रवासी देखील आपुलकीने व कौतुकाने त्या फळबागेकडे पाहतात. एकेकाळी दाट जंगलाने वेढलेले ते ठिकाण आज रमणीय आणि मनाला भुरळ घालणारे सुंदर ठिकाण झाले आहे. 'हात लावीन तेथे सोने' ही किमया फक्त तातेच करु शकतात.

आपण ध्रुवतार्‍यासारखे त्यांच्या दिशेने चालण्याचा प्रयत्न व अनुकरण केले तरी आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो. या अष्टपैलु व्यक्तिमत्त्वावर कितीही लिहिले तरी अपुरेच. जीवनाचा आनंद आस्वाद वर्तमानात अनुभवण्याचा त्यांचा सकारात्मक दृष्टीकोन निश्चितच प्रेरणादायी आहे.

अशा या अष्टपैलू व्यक्तीमत्त्वाच्या माणसाच्या मनाचा ठाव घेणे दुरापास्त आहे. तात्यांच्या बाबतीत एवढेच म्हणावेसे वाटते की, झाले बहू होतिल बहू परंतु या सम हा!

संदर्भ - श्री. व्यंकेटश सार्वेत

यशोगाथा कृपा औषधालयाची

रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात त्रिशुळ व वेलदूर या हिरव्यागार डोंगराच्या कुशीत, दाभोळची खाडी वाशिष्टी नदीच्या काठावर वसलेलं धोपावे गाव. या नयनरम्य गावाची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण ओळख म्हणजे ध्येयप्राप्तीचं स्वप्न उराशी बाळगणारे व यश मिळविण्याच्या पुसटश्या आशेवरच उद्योगाचा प्रारंभ करुन हृदयात बाळगलेल्या स्वप्नांची पूर्ती करणारे कृपा औषधालयाचे दुर्दम्य, आशावादी तरुण उद्योजक श्री.राजन दळी.

कृपा औषधालय या उद्योगाचा प्रारंभ मुळात एक समस्या व त्या समस्येवर उपाय शोधण्याच्या जिद्दी वृत्तीतून झाला. राजन दळी यांचे वडील श्री. वसंत दळी यांचे वयाच्या १८ व्या वर्षातच केस गळू लागले. ऐन तारुण्याच्या उंबरठयावर असताना केस गळण्याच्या समस्येवर औषध शोधले पाहिजे. म्हणून चिकीत्सक स्वभावाच्या वसंतरावांनी गावाच्या आसपासच्या परीसरात डोंगरद-यातून उपलब्ध असणा-या नैसर्गिक औषधांचा शोध घेण्यास सुरुवात केली. आयुर्वेंद वेगवेगळ्या पुस्तकांचे वाचन, वडिलांचे मार्गदर्शन व अनेक प्रयोगांच्या माध्यमातून अखेरीस तीन-चार वर्षांच्या अथक परिश्रमातून त्यांना केसांच्या समस्येवर औषध सापडले. सुरुवातीला त्यांनी स्वतःवरच त्या तेलरुपी औषधाचा प्रयोग केला व सहा महिन्यात केसांची गळती थंाबवून घट्ट व दाट काळे केस येण्यास प्रारंभ झाला. आज वयाच्या ७५ व्या वर्षीही वसंतरावांचे केस दाट व काळेभोर आहेत. अशा पद्धतीने अनपेक्षितपणे उद्भवलेल्या समस्येवर उपाय शोधण्याच्या जिद्दीतून औषधाचा शोध लागला.

केसांच्या समस्येवर गुणकारी उपाय वसंतरावांकडे आहे अशी प्रसिद्धी पंचक्रोशीत झाली होती. श्री. राजन दळी सांगतात की, मी लहान असतानाच माझ्या आईचे निधन झाले. घरातील समस्यांमुळे वडिलांच्या उद्योगी वृत्तीस बसणारी खिळ लहान वयातही मला जाणवली होती. व्यवसायासाठी आवश्यक ते शिक्षण घेतल्यांनतर उद्योगधंद्यात उतरायचे ठरविले. माझं व्यवसायाचं गणित मनात मांडत होतो. नोकरी न करता पुढे व्यापार उद्योग करण्याच्या विचार बालवयात माझा नक्की झाला होता. मधल्या काळात हे संशोधन व्यवहारीक दृष्ट्या उपयोगात न येता तसेच पडून होते. दाभोळ व आसपासच्या परिसरातील वडिलांच्या मित्रांना संशोधनासंदर्भात माहीत होते. परमेश्वराची कृपा आमच्यावर आहे. या जाणीवेतून उद्योगाचं नाव कृपा औषधालयव उत्पादनाचे नाव कृपा हेअर टॉनिकअसं ठेवलं.

कृपा औषधालयाच्या कृपा हेअर टॉनिक या औषधाच्या गुणवत्तेमुळे बाजारात उत्पादनाची मागणी वाढत होती.

श्री. राजन सर सांगतात, कृपा हेअर टॉनिक हे एक आयुर्वेदिक औषध असून गुणधर्म ः केस पूर्ण काळेभोर, लांबसडक, चमकदार होतात. केस गळणे, पिकणे, खवडे, कोंडा होणे थांबते. चाईवर रामबाण उपाय, उन्हाचा त्रास डोळयांची आग व जळजळ थांबते. शांत झोप येण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.

वडाची पारंब, कचोरा, मेहंदी, आवळा, ब्रह्मी हरडा, बेहडा, कापूर, पुदीना फुल, इ. आयुर्वेदिक औषधी वनस्पती वापरल्याने त्याचे दुष्परिणाम होत नाहीत. त्यामुळे लोकांची नेहमीच वाढती मागणी असते. कृपा हेअर टॉनिकच्या भव्य यशानंतर संधीवातावर प्रभावी स्नेहरुमा हे आयुर्वेदिक औषध अनेक संशोधनानंतर बनवले गेले. निर्गुडी, दशमुलाभरड, रासना भरड, गंधपुरातेल, तीळ तेल इत्यादी योग्य प्रमाणात वापरुन बनविलेले हे तेल संधीवात, सांधे जखडणे, स्नायू दुखणे, सायटिका, कंबर, मान, पाठदुखी यावर स्नेहरुमा हा रामबाण उपाय आहे. ह्याही औषधाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. संशोधनाच्या दरम्यान लोकांच्या मिळणा-या प्रतिसादामुळे नेहमी स्फूर्ती मिळत गेली. त्यातूनच चारपाती निवडुंगापासून ट्वीन टच हे औषध बनविले गेले.

श्री. राजन दळी सांगतात की, वापरण्यात येणा-या मालाची क्वालिटी मेंटेन करणे, शुद्ध खोबरेल तेल, शुद्ध तिळाचे तेल व ताज्या वनस्पतीवरुन गुणवत्तेसाठी कधीही तडजोड केली नाही हेच यशाचे गमक आहे.

संकल्पना, ध्येय, जबरदस्त जिद्द व संशोधनासाठी लागणारे परिश्रम यांच्या आधारे श्री. राजन दळी आज यशाच्या शिखरावर आहेत. परंतु वरील पाच सुत्रांपेक्षाही वेगळी आहे ती लोकांना उपयुक्त उत्पादनं (औषधांच्या स्वरुपात काढून जास्तीत जास्त लोकांना व्याधीमुक्त करण्याची त्यांची तळमळ, ही तळमळच त्यांना यशाच्या शिखरावर घेऊन जाते आहे व त्यांच्या उत्पादनांची देशविदेशातून मागणी सतत वाढती आहे.

संफ - मु. पो. धोपावे, ता. गुहागर, ४१५७०३

जि. रत्नागिरी. मोबा. ९४२२०५२०२९

No comments:

Post a Comment