Thursday, 29 December 2011

अंक १ला, ५ जानेवारी २०१२

विशेष संपादकीय *
८९व्या पर्षात पदार्पण!
किरातच्या ८८व्या वर्षाचा वर्धापनदिन वेंगुर्ले येथील भक्त निवास सभागृहात गेल्या १४ मोठ्या दिमाखाने साजरा झाला. या निमित्ताने कै. भाऊ आंबर्डेकर यांच्या दुर्मिळ हस्तलिखित, नव्याने संगीत शिकणा-यांसाठी उपयुक्त अशा ‘स्वरमाया‘ या पुस्तकाचे प्रकाशन सध्याचे आघाडीचे संगीतकार अशोक पत्की यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात ज्येष्ठ गायक अरविद पिळगांवकर, सरोदवादक दत्ता प्रभू तेंडोलकर, बाळ आंबर्डेकर यांच्या गायनाची मैफलही झाली. भाऊ आंबर्डेकर यांची कन्या मायादत्त आंबर्डेकर आणि कुटुंबियांचा या कार्यक्रमात मोठाच सक्रीय सहभाग होता. हा कार्यक्रम अनेक अर्थांनी संस्मरणीय ठरला.
या अंकापासून ‘किरात‘ ८९व्या वर्षात पदार्पण करीत आहे. जानेवारी ते डिसेंबर या वर्षभरात ‘किरात‘चे दिवाळी विशेषांकासह एकूण ४७ अंक प्रसिद्ध झाले. दिवाळी विशेषांक २०० पृष्ठांचा कोकणातील गुढ रहस्ये उलगडणारा होता. नेहमीच्या आकारातील ४६ अंकांची पृष्ठ संख्या ४१२ होती. या वर्षभरात विविध विषयांवर संपादकीय, अधोरेखित या सदरांबरोबरच अनेक जाणकार मान्यवरांचे लेख अनेक विषयांसंदर्भात प्रसिद्ध केले. ‘उद्योग भरारी विशेष‘ या २८ पृष्ठांच्या विशेषांकातून मूळच्या कोकणातील मुंबई व अन्यत्र जाऊन मोठा व्यवसाय उभारुन प्रगती केलेल्या काही उद्योजकांच्या मुलाखती, लेखांद्वारे कोकणच्या मराठी उद्योजकांची ओळख झाली. यामुळे दरवर्षी असा एखादा अंक प्रसिद्ध करावा अशा सूचना आल्या. पृष्ठमर्यादेमुळे त्यावेळी उद्योग भरारीमध्ये ब-याच उद्योजक, व्यक्तींचा परिचय देता आला नव्हता. यावर्षीच्या अंकात ती उणीव भरुन काढण्याचा प्रयत्न राहील.
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प देशभर गाजला. त्या प्रश्नाचे राजकीय भांडवलही करण्यात आले. ‘किरात‘ च्या टीमने जैतापूर येथे जाऊन परिसराची पाहणी करुन लोकांशी संवाद साधला. तेव्हा प्रकल्पग्रस्तांची योग्य ती बाजू प्रसारमाध्यमांनी फारशी मांडली नसल्याबद्दल त्यांनी खत व्यक्त केली. या विषयावर समीरण सावंत व तज्ञ लेखकांनी लेखमाला लिहिली, स्थानिकांच्या मुलाखती प्रसिद्ध केल्या. त्यामध्ये अणुउर्जा कशी बनते? अणुउर्जेला पर्याय, या प्रकल्पाचे आर्थिक पैलू अशा बाबी होत्या. या संपूर्ण माहितीच्या लेखांसह एक पुस्तक प्रसिद्ध करावे अशा अनेकांच्या आणि मुख्यतः जैतापूर प्रकल्पग्रस्तांच्या सूचना आल्या. त्यानुसार ‘किरात‘ ट्रस्टतर्फे ‘जैतापूरची रणभूमी‘ हे पुस्तक प्रसिद्ध केले आणि सहा महिन्यातच त्याची दुसरी आवृत्तीही प्रसिद्ध करावी लागली. इतका या पुस्तकाला प्रतिसाद मिळाला.
दोडामार्ग तालुक्यातील खजिन प्रकल्प, रेडी - विजयदुर्ग या बंदरांचा खाजगीकरणातून विकास, यामुळे तेथे पर्यावरण प्रदूषणाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यावरही ‘किरात‘ने अचूक शरसंधान केले आहे.
२०११ मध्ये प्रत्येक महिन्यात स्वतंत्र विषय घेऊन चार अंक परिपूर्ण माहितीने देण्याचा प्रयत्न केला. ताणतणाव व्यवस्थापन विशेष, जैतापूरची रणभुमी, महिला दिन विशेष, शिक्षण विषयक समस्या, आरोग्य विशेष, विवाह विशेष, करिअर विशेष, गुढ विशेष आणि कोकणातील जत्रौत्सव असे विविध विषय किरातने मांडले. या विशेष अंकांचे अतिथी संपादक म्हणून डॉ. सुविनय दामले, सौ. सुमेधा देसाई, समीरण सावंत, संयोगिता करंदीकर यांनी जबाबदारी सांभाळली.
किरातचे संपादक म्हणून काही वर्षे जबाबदारी सांभाळलेले भूतपूर्व संपादक कै. के. अ. मराठे यांचे स्नेही कै. विष्णुपंत गणेश नाईक यांचे यंदाचे हे जन्मशताब्दी वर्ष. त्यानिमित्ताने त्यांच्या विविधांगी कार्यकर्तृत्वाचा परिचय देणारे लेख असलेला विशेषांक प्रसिद्ध केला. कै. विष्णु पंतांचे कुटुंबीय श्री. सगुण उर्फ आबा नाईक त्यांचे बंधू व भगिनी यांनी या शताब्दी वर्षानिमित्ताने वेंगुर्ले येथील सेंट लुक्स हॉस्पीटलला अद्ययावत अतिदक्षता विभाग आणि प्रसुतीगृहाचे नूतनीकरण करुन देऊन आपल्या आई वडिलांच्या स्मृती चिरंतन केल्या आहेत. नाईक कुटुंबियांच्या या उपयुक्त देणगीमुळे सेंट लुक्सला अन्य व्यक्तींकडूनही देणग्या येऊ लागल्या आहेत. याकामी प्रसिद्धीच्या रुपाने किरातचाही सहभाग आहे हे नमूद करण्यास आम्हाला अभिमान वाटतो.
डॉ. मधुकर घारपूरे यांनी ‘मध्वानुभव‘ हे नवीन रंजक सदर सुरु केले. त्यांच्या यापूर्वीच्या ‘ससुली‘ प्रमाणेच हे सदरही लोकप्रिय झाले. ‘ससुली‘ पुस्तक रुपाने प्रसिद्ध करावे अशा सूचना आल्या. लवकरच ते प्रसिद्ध कराण्याचा आमचा प्रयत्न आहे. तळेबाजार - देवगड येथील सौ. सुमधा देसाई याही विविध विषयांवर लिहित असतात. त्यांनी प्रसिद्ध समाजसेविका सिधुताई सपकाळ यांची घेतलेली मुलाखत विशेष उल्लेखनीय होती. शिक्षणतज्ञ श्रीराम मंत्री (मुंबई), प्रा. श्री. मनोहर जांभेकर (पुणे) यांनीही शिक्षण व्यवस्थेवर लिहिलेले लेख उल्लेखनीय होते. ज्येष्ठ पत्रकार व उद्योग सल्लागार म्हणून या जिल्ह्या काम केलेले किशोर बुटाला हे कोकण विकासावर सातत्याने विविध लेख देत असतात.
बाळशास्त्री जांभेकर स्मारक गोलमाल प्रकरणातील नियोजन मंडळाचे प्रताप, वाचनालयाचा बोजवारा ओंकार तुळसुलकर यांनीच किरातच्या माध्यमातून प्रथम प्रकाशात आणले. कोकणात दूध व्यवसाय कसा वाढेल यावरील माहितीपूर्ण लेखाबद्दल अनेकांनी प्रतिक्रिया नोंदविल्या. याखेरीज पर्यटन, कोकण रेल्वे, घाट रस्त्यांची दुरावस्था, जिल्ह्यातील लहान-मोठे खड्डेमय ग्रामीण रस्ते यामध्ये कशा प्रकारे भ्रष्टाचार होतो. जिल्ह्याच्या विकासासाठी शासनाने मंजूर केलेला निधी पुरेसा खर्ची न पडता परत का जातो? या विषय सविस्तर माहिती प्रसिद्ध केली. यामध्ये खेदाने नमूद करावेसे वाटते की, नियतकालीकांनी विकासाचा पैसा परत का व कसा जातो या विषयी काहीही लिहिलेले नाही किवा शोधपत्रकारिताही केलेली नाही.
पर्यटनाविषयी ‘किरात‘ गेली सुमारे पंचवीस वर्षे सातत्याने लिहित आहे. अनेक वृत्तपत्रांनीही ते लेख पुनर्मुद्रित केले. याशिवाय बहुतेक सर्वच वृत्तपत्रांनी सिधुदुर्ग १५ वर्षापूर्वी पर्यटन जिल्हा जाहीर झाला. तेव्हापासून सातत्याने या विषयावर लेखणी चालविली आहे. ‘किरात‘च्या माध्यमातून यावर्षी आम्ही शाश्वतीचे पर्यटन लोकांच्या पुढाकारातून (शा.प.लो.पु.) हा एक वेगळा विचार मांडला. त्यासाठी कुडाळ येथील जॉर्ज जोएल यांचे लेखन आणि प्रायोजकत्व लाभले. त्यासाठी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी खास चार पृष्ठे आम्ही त्यासाठी दिली आहेत.
मे २०११ मध्ये सा. किरातचे प्रकाशन अधिक आकर्षक, जास्त पृष्ठांचे करता यावे तसेच विविध समाजोपयोगी उपक्रम चालविता यावेत यासाठी किरात ट्रस्टची स्थापना करण्यात आली. सा. किरातचे प्रकाशन करणे हे या ट्रस्टचे मुख्य उद्दिष्ट आहे. याखेरीज ट्रस्टने यावर्षी सुरु केलेले उपक्रम खालीलप्रमाणे -
१) ५वी ते ७वी च्या मुलांसाठी तथापी ट्रस्ट, पुणेच्या मदतीने शरीर साक्षरता हा १२ सत्रांचा उपक्रम वेंगुर्ले परिसरातील तीन शाळांमध्ये राबविला जातो. पुढील शैक्षणिक वर्षापासून अत्यंत गरज असलेल्या या उपक्रमाचा २० शाळांमध्ये विस्तार करण्याचा मनोदय आहे.
२) विवाहेच्छुक मुला-मुलींसाठी रेशीमगाठी हा उपक्रम ज्योतिषी मायाताई आंबर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सीमा मराठे समन्वयक म्हणून काम करत आहेत. यामध्ये विवाह जुळवून देणे हे टारगेट नसून वधु-वरांमध्ये विवाह विषयक अवाजवी समज-गैरसमजांचे समुपदेशनाने (क्दृद्वदद्मड्ढथ्थ्त्दढ) ने दूर करण्याचा प्रयत्न करणे हा आहे. किरातचा प्रत्येक महिन्यातील दुस-या आठवड्यातील अंक विवाह विशेष म्हणून प्रसिद्ध होतो. यामध्ये लेखनाची जबाबदारी सुमेधा देसाई, वंदना करंबेळकर यांनी स्विकारली आहे.
३) पर्यटनाविषयी केवळ लिखाण न करता प्रत्यक्ष कृती कार्यक्रम म्हणून वायंगणी गावामध्ये जॉर्ज जोएल यांच्या संकल्पनेतून कासव जत्रा या उपक्रमाचे २७ ते २९ डिसेंबर दरम्यान आयोजन केले होते. या उपक्रमाला मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, सोलापूर, रत्नागिरी येथील ६२ कुटुंबांनी नोंदणी करुन सहभाग घेतला होता. ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांचे संवर्धन करणा-या सुहास तोरसकर आणि त्यांच्या सहका-यांना तसेच वायंगणी गावाच्या पर्यटनवाढीसाठी हा उपक्रम निश्चितच पूरक ठरेल.
यापुढे किरात ट्रस्टतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. किरात साप्ताहिकाच्या नियमित प्रकाशनासाठी कायम ठेव निधी उभारण्याच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. यासाठी अधिकाधिक देणगीदारांनी निधी संकलनाला मदत करावी.

विशेष *

यशस्वी सहजीवनासाठी
स्वातीला घेऊन तिचे आई-बाबा माझ्या क्लिनीकमध्ये आले. तिच्या चेह-यावर धुमसणारा राग, वैताग, चिडचिड, हळवेपणा स्पष्ट दिसत होता. ‘‘डॉक्टर आता तुम्हीच काय ते समजावून सांगा हिला. अहो, ऐकतच नाही! चार महिने झाले नाहीत लग्नाला, तर अचानक सामान घेऊन निघून आली. आता परत जाणारच नाही म्हणते. काय करायचं? कसं समजवायचं? आमचे सगळे मार्गच खुंटलेत. तुम्हीच काय ते करा....‘‘
तिच्या आई-वडिलांनी बांध फुटावा तसं मनातलं बोलून टाकलं. सविस्तर बोलणं झाल्यावर मी म्हटले, ‘‘मी तुला काहीच समजावणार नाही. फक्त मला एक सांग की, तुझा तुझ्या आई-वडिलांवर विश्वास आहे का?‘‘ ती म्हणाली, ‘‘हो.‘‘ मग म्हटलं, ‘‘आता लग्न, संसार, घटस्फोट, नवरा, सासू, नणंद सगळं बाजूला ठेव. विचारही करु नकोस या सगळ्याचा आणि शांतपणे कुठलाच विचार न करता आई-बाबांकडे सुट्टीवर आल्यासारखी एक महिना रहा. एक महिन्यानंतर पुन्हा भेटू. मग पुढचं काय ते ठरवू!‘‘
त्या दिवसापासून तिस-या आठवड्यात ती व तिचे आई-बाबा डोळ्यात आनंदाश्रू घेऊन आले. म्हणाले, ‘‘स्वतःच जाते म्हणाली. नव-याला फोन केला. नवरा आला आणि काहीच झाले नसल्यासारखा तिला घेऊन गेला. चार दिवस झाले. तिथून तिचा फोनही आला.‘‘

का होत असं? हे एक हॅपी एंडींग उदाहरण होतं. पण सर्वच लग्न एवढी नशिबवान ठरतात असं नाही. एकतर हल्ली लग्नाला उशीर होतो आणि बारीकसारीक गोष्टींनी ते तुटायला मात्र अजिबात उशीर होत नाही! आणि मग घटस्फोटाचे प्रमाण वाढते आणि आपण सर्वजण भांबावल्यासारखे स्त्री-स्वातंत्र्य, व्यक्ती-स्वातंत्र्य, नोकरी करणारी स्त्री, स्त्री-पुरुष समानता या असंबद्ध गोष्टींचा उहापोह करुन या सर्वांची कारणमिमांसा शोधण्याचा प्रयत्न करत बसतो. असंबद्ध अशासाठी की, लग्न हा माझ्या मते मुळात दोन माणसांचा अतिशय खाजगी विषय आहे.
मुळात लग्न मोडणे किवा घटस्फोट याचा फक्त त्या त्या व्यक्तीचा समजुतदारपणा, बदल समजावून घेण्याची क्षमता, वैयक्तिक नातेसंबंध, नाती जोपासण्याची कला, जबाबदारीची जाणीव या गोष्टींशी संबंध असू शकतो. पण मग ज्याअर्थी घटस्फोटांचे प्रमाण वाढलेलं दिसतंय याचा अर्थ हल्ली सर्वच मुला-मुलींमध्ये समजूतदारपणा आणि इतर गोष्टी पूर्वीपेक्षा कमी आहेत, असं समजावं का? नाही, बिल्कूल नाही! मला असं वाटतं की हे सर्व गुण बहुतेकांमध्ये असतात. पण आजकालच्या वेगवान जीवनपद्धतीमुळे होणा-या घाईमुळे हे गुण बाजूला होतात आणि लग्नाचा बळी जातो.
एकतर आजकाल उशीराने म्हणजे मुलगा आणि मुलीचं पूर्ण शिक्षण होऊन नोकरी वगैरे लागून आर्थिक, सामाजिकदृष्ट्या स्थिरस्थावर झाल्याची भावना झाल्यावरच लग्नाचा विचार होतो. त्यामुळे हे सगळे होईपर्यंत एकतर स्वभाव घट्ट बनलेला असतो. ‘व्यक्तिमत्वाच्या मर्यादा‘ ब-याच प्रमाणात ठरुन गेलेल्या असतात आणि मग घाई-गडबडीत किवा ‘झालं बुवा एकदाचं‘ या आनंदाच्या भरात मुला-मुलीला लग्नाच्या बंधनात टाकलं जातं आणि एखाद्याला कोणतीही पूर्व कल्पना न देता अचानक पाण्यात फेकून दिलं तर त्याची जी भांबावलेली, घाबरलेली, श्वास कोंडलेली अवस्था होईल तशी झाल्यामुळे ‘बाकी सगळं जाऊ दे, आधी पाण्यातून मला बाहेर काढा.‘ असी मानसिकता निर्माण होते आणि मग स्वातीसारखं अचानक ‘लग्नातून बाहेर‘ पडण्याची मानसिकता तयार होते.
मग काय करायचं आता ह्या सगळ्यावर? मुळात लग्न हा आयुष्यातला फार परिणामकारक बदल आहे. त्यामुळे तो बदल होण्यापूर्वी जर पूर्वतयारी केली, चर्चा केली, सल्ला-मसलत केली, एक मानसिक पाया निर्माण केला, ज्यावर संसाराची इमारत मजबूत उभी करता येईल, तर बराच चांगला परक पडेल.
आधीच म्हटल्याप्रमाणे लग्न हा एक ‘मोठ्ठा‘ बदल निश्चितच आहे आणि त्याला ‘मोठ्ठा‘ म्हणायचं कारण म्हणजे अचानक आपल्या भूमिकेत बदल होतो. मुलगा, दादा, वडील, दीर होण्याएवढे नवरा होणं सोपं नाही. नव-याची भूमिका समजूतदारपणे पार पाडावी लागते.
दुसरी गोष्ट म्हणजे जबाबदारी! कोणीही, कितीही, काहीही म्हटले तरी आपल्या देशात पुरुषप्रधान संस्कृती आहे आणि तो आपल्या समाज मनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. त्यामुळे बायको कितीही कर्तबगार, हुशार असली तरीही समाज, कुटुंब, नातेवाईक, शेजारी हे एखाद्याच्या बायकोच्या भल्याबु-यासाठी नव-यालाच जबाबदार धरणार! हे खरेही आहे. त्यामुळे लग्न झाले म्हणजे एक नवीन वस्तू आपल्या आनंदासाठी घरात आणणं असं नसून एक नातं निर्माण करणं की ज्यात आपण आणि आपली पत्नी ही निम्मे-निम्मे वाटेकरी आहोत, म्हणजेच ती दोन स्वतंत्र व्यक्तीमत्व आहेत. एकमेकांच्या भल्यासाठी समान जबाबदारी हा दृष्टीकोन ठेवला तर बाकी समाज, नातेवाईक काहीही म्हणोत, नवरा मुलगा ‘टेन्शन‘ घेणार नाही! मग ह्या गोष्टीबरोबर उत्तरदायीत्व आलं! पूर्वीसारखं कुणलाही न सांगता २ तास उशीरा घरी येणं शक्य नाही. कुणीतरी तुमच्याबद्दलची माहिती जाणण्याचा प्रयत्न करणारा समान हक्कदार घरी बसलाय हे लक्षात ठेवावं. अर्थात प्रेम ही जादुई वस्तू असेल तर या गोष्टीचा वेगळेपणाने विचारच करायची गरज नाही.
आता मुलीच्या बाबतीत मुळात मला असं वाटतं की, आई-बाबांचं घर सोडून दुस-या माणसाच्या घरात जाणं आणि पुढे हेच आपले घर असं मान्य करुन राहणं ही एक फारच कठीण, असह्य, ताणकारक गोष्ट आपल्याकडच्या मुली लिलया करत असतात. बायकांसाठी मात्र नवरा, दिर, सासू, सासरा, नणंद वगैरे ही नवीन गोष्टीची लिस्ट जरा मोठीच असते आणि परत ह्या सर्वांच्या नजरेत ती सुद्धा नवीन व्यक्ती म्हणजे ह्या सर्वांच्या एकूणच ह्या लग्नापासून पर्यायाने नवीन सून, वहिनी, असेलच तर काकू वगैरे... यांच्याकडून असलेल्या अपेक्षा, नव-याच्या अपेक्षा आणि त्या मुलीच्या स्वतःच्या ह्या सर्वांकडून असलेल्या अपेक्षा ह्यांची सांगड घालून तिला पुढे जायचे असते.
सर्वसामान्यपणे निरागस मुलीच्या मनात जे आदर्श चित्र असतं ते असं की, सासू-आईसारखी, सासरा - वडीलांसारखा आणि नवरा - मित्रासारखा! पण होते असे की, अशी निरागस अपेक्षा ब-याचदा कठोरपणे मोडून गेल्याचा अनुभव मुलींना येतो आणि मग त्यातून प्रश्न निर्माण होतात. अस का होत? ह्या अशा अपेक्षा करणे चूक आहे का? बिलकूल नाही, पण ज्याप्रमाणे तिचे खरे आई-वडील, भाऊ-बहिण, मित्र यांना प्रत्येकाला ती व्यक्ती म्हणून जशी पूर्णपणे ओळखून, त्यांचं व्यक्तीमत्व मान्य करुन मग नातं मान्य होऊन स्थिर झालेलं असतं. तसं ह्या नात्यांकडून नवीन किवा अपेक्षित नात्यांकडून लग्नाच्या दुस-या दिवशीच होईल. अशी अपेक्षा करणे मात्र निश्चितच त्रासदायक आहे. त्यासाठी आधी ती माणसं एक माणूस म्हणून कशी आहेत हे ओळखणे, मग ती ती माणसं जशी आहेत तशी मान्य करणं ह्या प्रक्रियांना भरपूर आणि योग्य तो वेळ दिला गेला पाहिजे तो फार वेळ दिला जात नाही आणि अपेक्षा करण्यात घाई होते. बरं हे करताना त्या मुलीला अजून एक जबाबदारी पार पाडायची असते ते म्हणजे ह्या सर्वांच्या तिच्याकडून असलेल्या अपेक्षांना सुद्धा तडा जाऊ द्यायचा नसतो आणि त्यांनीसुद्धा तिला एक माणूस म्हणून ओळखणे, मान्य करणे ह्या प्रक्रियेत कोणत्याही अपेक्षा करण्यापूर्वी पुरेसा वेळ देणं महत्वाचं असंत. नवीन जाऊ, नवीन सून, नवीन भावजय, नवीन वहिनी, नवीन नवरा, नवीन बायको, नवीन सासू, नवीन सासरा, नवीन नणंद, नवीन घर ह्या सर्वाबद्दल कोणतीही ठाम मतं बनविण्यापूर्वी पुरेसा कालावधी जाऊ दिला तर सर्वांच्या अपेक्षा योग्य प्रमाणात पूर्ण व्हायला निश्चितच मदत होईल आणि ही सर्व नाती ओझं न वाटता रोजचीच होऊन जातील.
नकारात्मक निर्णय घेण्यात केलेली हेतुपरस्पर चालढकल, विनाकारण किवा नात्यातील अपरीपक्वतेमुळे तुटणारी ‘लग्न‘ निश्चितच वाचवू शकतो!
- डॉ. कौस्तुभ लेले, सावंतवाडी



विवाहपूर्व तयारी - स्वतःची!
विवाह.... आयुष्यातल्या एका नव्या अध्यायाची सुरुवातच जणू! अशी नवी-नवी सुरुवात करण्यासाठी कोणती व कशी पूर्वतयारी करावी, ही हुरहुर प्रत्येक विवाह इच्छुक मनामध्ये दाटत असते. आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी, दुःख निम्मे करण्यासाठी आणि खरे तर आपल्या निसर्गातल्या अस्तित्वाचा अर्थ जगण्यासाठी जेव्हा, ‘मला लग्न करायचंय‘ असा विचार मनात रुजतो आणि पक्का होतो तेव्हा या अज्ञात प्रदेशाची माहिती देण्यासाठी आपण अनेक आप्तस्वकीयांशी हितगुज करु लागतो. त्यातून या पूर्वतयारी विषयी बरीच उत्तरंही मिळू लागतात. मग कधीकधी होतं काय की अनेकांकडून ऐकलेले अनेक विचार मनात सुसूत्रतेने बांधले न गेल्याने विचारांत गोंधळ निर्माण होतो आणि कुठूनशी एखादी महत्वाची माहितीसुद्धा दुर्लक्षित होते. या सर्व शक्यतांचा विचार मनात गृहीत धरुनच हा लेखप्रपंच. सप्तपदी चालण्यापूर्वी कोणत्या पायघड्यांवरुन जायचं असतं हे आता जाणून घेऊयात-
मनावर कायमचा ठसा उमटविणा-या आणि मनुष्याच्या व्यक्तिमत्वातील हर एक पैलू विकसित करणा-या हिदू संस्कृतीतील १६ संस्कारांपैकी एक महत्वाचा संस्कारे - विवाह संस्कार! हे संस्कार अगदी पुरातनकाळापासून आपापल्या मुलांवर आई वडील करीत आले आहेत आणि त्यात इतर वडीलधारी मंडळींनीही मोलाचा वाटा उचलला आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत आपल्या अपत्यांचा विवाह लावून देणे ही केवळ वडीलधा-यांची जबाबदारी होती, पण आजच्या विज्ञान आणि तंत्रयुगातील स्वतंत्र विचारांची तरुण पिढी ही स्वतःच्या विवाहाविषयी अधिक विशाल दृष्टिकोन बाळगत सजग झाली आहे. त्यामुळेच की काय स्वतःच्या विवाहाच्या पूर्वतायारीत ती स्वतःलाही अधिक समंजसपणे सामील करुन घेत आहे. त्यांच्या दृष्टीने संपूर्ण आयुष्यभराकरिता सुयोग्य साथीदार मिळवणं-निवडणं ही त्यांची स्वतःची मोलाची जबाबदारी आहे. आजच्या या आधुनिक युगात यासाठी परदेशांमध्ये घ्द्धड्ढद्रठ्ठद्यठ्ठद्यत्दृद ढदृद्ध थ्र्ठ्ठद्धद्धत्ठ्ठढड्ढ सारखे कोर्सेस चालविले जातात आणि आता तर भारतातही विवाहपूर्व समुपदेशन करणा-या संस्था आपले कार्य करीत आहेत. शहरी भागातील अनेक उच्चविद्याविभूषित तरुण-तरुणी याचा लाभही घेत आहेत.
माझ्या विवाह इच्छुक सखी आणि मित्रांनो, आपण येथे या सर्व विवाहपूर्व स्वतःच्या तयारीच्या पैलूंचा बारकाईने विचार करुया.
शारिरीक पातळीवरचा विचार-
विवाहपूर्व स्वतःची तयारी करताना जोडीदाराची निवड करणे त्यासोबत विचार होतो तो विवाहाकरिता स्वतःची अनुकूल अशी शारिरीक, मानसिक व आर्थिक पातळीवर तयारी करण्याचा.
स्वतःचा जोडीदार निवडणं ही भविष्यकाळाच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाची जबाबदारी असते. म्हणूनच येथे भावनिक होऊन नकळतपणे चुकीचा निर्णय न घेता थोडा दूरदृष्टिकोन बाळगूनच पूर्ण विचारांती निर्णय घ्यावा. जेव्हा समोरच्या व्यक्तीचा आपण आपला भावी जोडीदार म्हणून विचार करीत असतो तेव्हा केवळ प्रेम व आकर्षणाची पट्टी डोळ्यांवर जर बांधली गेली असेल तर त्या विशिष्ट व्यक्तिविषयी आपल्याला जे पहायला आवडणार नाही ते आपल्याकडून पाहूनही न पाहिल्यासारखे केले जाते आणि अर्थातच निर्णयात वास्तवापासून फारकत घेतली जाते. अशावेळेस एकच विचार सर्वप्रथम मनात आणावा की उद्या या व्यक्तीला आपण आपला जोडीदार म्हणून आपल्या आयुष्यात स्थान देऊ तेव्हा आपलं आयुष्य आपल्याच नजरेतून स्वतःला गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून कैक पाय-या उंचीवर जाणवलं पाहिजे. कारण आपण समोरच्याच्या फक्त शरीराशी नव्हे तर त्याच्या/तिच्या विश्वाशीसुद्धा विवाहबद्ध होत असतो.
याची सतत जाणीव ठेवावी की विवाहानंतर एकमेकांवर सर्वांत मोठी जबाबदारी असते ती घर सांभाळण्याची व घर चालवण्याची. ही जबाबदारी समर्थपणे पेलण्यासाठी अर्थातच आपले आरोग्याचे बाहूही तितकेच मजबूत हवेत. यासाठीच विवाहापूर्वी मुलाने व मुलीने विश्वासार्ह आरोग्यतज्ज्ञांकडून स्वतःच्या रक्ताची तपासणी करुन घेणे आवश्यक आहे.
तसेच दोघांच्या घरी एखाद्या अनुवंशिक आजाराचा इतिहास आहे का हेही विवाहापूर्वी जाणून घ्यावे. मुळातच दोघांनाही शक्यतो कोणतेच व्यसन असू नये आणि असल्यास ते विवाहापूर्वीच सोडले जाईल याची कठोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. कारण कोणत्याही व्यसनांचे दुष्परिणाम हे त्यांच्या तीव्रतेनुसार पुढील चार-पाच पिढ्यापर्यंत जनुकांमार्फत पोहोचवले जातात.
पालकांचे आरोग्य जितकं उत्तम असतं तितकंच उत्तम आरोग्य होणा-या संततीला लाभतं. सध्याच्या स्पर्धात्मक आणि तणावपूर्ण जगात बाळाला समर्थपणे उभं करायचं असेल तर विवाहीत जोडप्याने देहशुद्धी व पर्यायाने बीजशुद्धी करुन घ्यावी. त्याकरिता आयुर्वेदिक चिकित्सापद्धतीनुसार पंचकर्मासहितचे विविध उपाय करावेत.
विवाह ठरविताना केवळ शारिरीक सौंदर्याचे निकष लावू नयेत. शरीरापेक्षाही अनेक पटीने अधिक महत्वाचं ठरतं मनाचं सौंदर्य, जे चेह-यावरच्या स्मितहास्यातून आणि नजरेतल्या आनंदी भावातून स्पष्टपणे जाणवतं. शारिरीक सौंदर्याचा विचार हा दुय्यम पातळीवरच ठेवावा. केवळ ‘शारिरीक सुखांचा विचार करुन विवाह करणं‘ हे उथळ मनाचे लक्षण आहे. असे विवाह अर्थातच भविष्यात दुःखदायी होतात. विवाह म्हणजे स्वैराचार नव्हे, तर विवाह म्हणजे जबाबदारीचं भान ठेवून उपभोगलेला विवाहातील स्वातंत्र्याच्या अत्तराचा सुगंध सहजीवनाला पुलकित करतो.
अजून एक मुद्दा आहे - वयाचा. हे सर्वमान्य आहे की लग्नाच्या वेळी मुलाचे वय मुलीच्या वयाच्या ३-४ वर्षांनी अधिक हवे. कारण मुलीची शारिरीक वाढ ही मुलांच्या शारिरीक वाढीपेक्षा ३-४ वर्षे लवकर पूर्ण होत असते आणि त्यामुळे तिची मानसिकता ही मुलाहून अधिक प्रगल्भ असते. मुलीचे वय जर अधिक असेल तर हे जरुर पाहावे की ती मुलगी मनाने (मानसिकतेने) व उत्साहाने वयाच्या मानाने अधिक तरुण आहे का आणि तो मुलगाही त्याच्या समवयीन मुलांहून मानसिकदृष्ट्या अधिक प्रगल्भ व आर्थिकदृष्ट्या सबळ आहे ना!
मानसिक पातळीवरचा विचार-
विवाहपूर्व तयारी करताना संयम, सहनशीलता, क्षमाशीलता, आनंदी वृत्ती, आधार देण्याची वृत्ती अशा सर्व गुणांची जोपासना करावी. आपल्याला आपला जोडीदार जितका गुणवान हवा तितके गुण आपल्याकडेही आहेत का ते पाहावे. निवडलेल्या जोडीदारासोबत समंजस चर्चा करुन विवाह अधिक सुखकर करण्यासाठी एकमेकांचे गुण जपत दोष दूर करण्याचे उपाय अंमलात आणावेत.
विवाह करण्यासाठी शारिरीक, मानसिक, भावनिक व आध्यात्मिक प्रगल्भता असणे आवश्यक आहे. विवाह करताना आयुष्यातील इतर प्राधान्यक्रमांची निश्चिती असणे, व्यावसायिक ध्येय व उद्दिष्ट ठरवलेले असणे व शिस्तीचा अवलंब करत ते मिळविणे आणि मुख्यतः विवाहाच्या मूळ उद्देशाबाबत जागरुक असणे. यामुळे मानसिक, भावनिक व आध्यात्मिक प्रगल्भता निश्चितच विकसित होते. यासाठी विवाह म्हणजे समर्पण, वचन याची जाणीव असणे महत्वाचे असते.
आता जसे वरील गुण आवश्यक आहेत तसेच पुढील दोष टाळणेही तितकेच महत्वाचे आहे. समोरच्याच्या बारीक-सारीक चुकांवर लक्ष ठेवून असणे, जोडीदाराचा अपमान करणे, सतत बदलणा-या मुडमुळे समोरच्याला दुखावणे, साशंकता, हटवादीपणा, हेकेखोरपणा, हुकूमत गाजवणे, कुत्सितता, असूया, अहंकार, भावनाहिनता हे ते दोष होत.
म्हणूनच एकमेकांना गृहीत न धरता एकमेकांच्या गुणांची व मदतीची जाणीव ठेवणे व ती खुल्या मनाने बोलून दाखवणे, मतभेद होण्याअगोदरच स्वतःहून वेळीच माघार घेणे, एकमेकांपासून कोणतीही वैयक्तिक गुपिते न ठेवणे (केवळ व्यावसायिक गोपनीयता सोडल्यास) या सर्व छोट्या छोट्या परंतु महत्वपूर्ण कृतींचा अवलंब विवाहातील व सहजीवनातील विश्वासार्हता जपण्यास खूप मदत करतो. एकमेकांना योग्य त-हेने वेळप्रसंगी सांभाळून घेणे, आवश्यकता असताना मायेची उब देणे जरुरीचे आहे, हे जोडीदाराला जाणवून देणे या सर्व गुणांमुळे सहजीवनात आनंद टिकवता येतो आणि पती-पत्नीचं हे नातं नेहमीच टवटवीत राहतं.
एक वेगळा विचार येथे आवर्जून मांडावासा वाटतो. विवाह करताना शक्यतो स्वतःशी समकक्ष वैचारीक पातळी असणा-या व्यक्तीबरोबरच विवाह करावा. कारण थोडा नीट विचार केला तर असे आढळून येते की जेव्हा-जेव्हा दोघांना एखाद्या महत्वाच्या निर्णयाप्रत यायचे असते तेव्हा वैचारिक समानता असेल तर एकमेकांशी समान पातळीवरची चर्चा करुन एकमताने निर्णय घेता येणे सोपे जाते. कधी कधी होते काय की, आपला जोडीदार जेव्हा त्याच्या कामाबद्दलच्या समस्या आपल्याला सांगत असतो तेव्हा आपल्याकडून त्याला त्याच्या बौद्धिक पातळीनुसारचे निराकरण, सहानुभूती आणि समजूतदारपणा साहजिकच अपेक्षित असतो. त्याला हवा असतो त्याच्या विचारांना पटेल असा सल्ला. समविचारकक्षा असतील तर हा नैतिक पाठिबा आपण नक्कीच देऊ शकतो आणि त्या महत्वाच्या क्षणांनी आपले सहजीवन अधिकच आनंदी व समाधानी बनवू शकतो. अशा प्रकारे या वैचारीक समकक्षतेमुळे सर्व कुटुंब सुखी बनतं. आता पुन्हा एकदा विवाहपूर्व तयारीतील काही भाग जाणून घेऊयात.
शक्यतो लग्नाअगोदर एकमेकांच्या घरी व मित्रपरिवारात थोडे मिसळून पहावे, कारण आपला साथीदार समाजात कसा वावरतो हे त्यामुळे कळतेच, शिवाय त्याचे अज्ञात गुणही समजू लागतात. मुलीने हे पहावे की मुलाला त्याच्या आईविषयी आदर व प्रेम आहे की नाही. कारण असा मुलगा स्वतःच्या पत्नीविषयीही आदर व प्रेम बाळगणारा असतो आणि मुलाने हे पाहावे की मुलीला लहान मुलांविषयी ओढ व माया आहे का नाही. कारण अशी मुलगीच उत्तम माता बनू शकते. लक्षात ठेवावे की आपण आपल्या समोरच्यामध्ये केवळ चांगला जोडीदारच नाही तर एक उत्तम आई-वडीलही शोधत असतो.
आर्थिक पूर्वतयारीचा विचार-
लग्न करण्यापूर्वी दोघांनीही बचत करण्याची सवय जाणीवपूर्वक जोपासण्याची गरज असते. कारण विवाहानंतर येणा-या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी, आजारपणातील खर्च, अचानक उद्भवणारे खर्चाचे प्रसंग, घर चालवणे आणि तरीही यातून आनंद मिळवण्यास कधी गृह सजावट तर कधी ट्रिप्स काढणे या सर्वांसाठी पैशांची अगोदरच बचत करणे आवश्यक असते. काटकसर जरुर करावी. पण कंजूषपणा नको आणि यासाठीच हॉटेलिग, सिनेमा यांसारख्या महागड्या गोष्टींची सवय असेल तर ती जरुर दूर करावी. लॉटरी, सट्टा अशी व्यसनं तर पूर्णपणे टाळावीत.
थोडक्यात सांगायचं झालं तर, लग्नासाठी सुयोग्य असा जोडीदार निवडणं हे जितकं महत्वाचं आहे तितकंच त्यासाठी सर्वकष पूर्वतयारी करणंही महत्वाचं आहे. अशी पूर्वतयारी करणं हे लग्नाच्या निमित्ताने जणू आजवर जगलेल्या आयुष्याचं सिहावलोकन करुन स्वतःचं शारिरीक आणि मानसिक सौंदर्य, आरोग्य आणि प्रगल्भत्व वृद्धिगत करण्यासारखंच आहे. होय ना?
- डॉ. अनुराधा वा. थिटे

आद्य मराठी पत्रकार स्व. बाळशास्त्री जांभेकर
मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आद्यपत्रकार स्व. बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ ला ‘दर्पण‘ या वर्तमानपत्राचा पहिला अंक प्रसिद्ध केला. त्यास १७० वर्षे झाली. बाळशास्त्रींचा जन्म देवगड तालुक्यातील पोंभुर्ले या खेडेगावात झाला. वडील व्युत्पन्न ब्राह्मण. बाळशास्त्रींचे प्राथमिक शिक्षण, वेदाध्ययन, संस्कृत ग्रंथांचा अभ्यास गावीच झाला. पुढे मुंबईत आल्यावर त्यांच्या कर्तृत्वाला मोठा वाव मिळाला. महाराष्ट्रातील पहिले आद्य पत्रकार म्हणून आजची पीढीही त्यांचा गौरवाने उल्लेख करीत असली तरी ते इतर अनेक विषयात प्रकांड पंडित होते. भारतातील पहिले गणिताचे प्राध्यापक, इतिहासकार, भूगोलतज्ञ, एलफिन्स्टन महाविद्यालयाच्या ७ संस्थापकांपैकी एक, समाज सुधारक, स्त्री शिक्षण, स्त्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते अशा विविधांगी पैलूंचे दर्शन त्यांच्यावर लिहिल्या गेलेल्या ग्रंथांमधून दिसते. त्यांच्या जांभेकर कुटुंबातील गणेश गंगाधर जांभेकर यांनी ‘पश्चिम भारतातील नवयुग प्रवर्तक आचार्य बाळ गंगाधर शास्त्री जांभेकर‘ या नावाने चार ग्रंथ लिहिले आहेत. ते ४ जानेवारी १९२८ मध्ये प्रसिद्ध झाले होते. या ग्रंथाच्या प्रास्ताविकात इंग्रजी, मराठी आणि संस्कृतमध्ये श्लोक स्वरुपात ८ चरणांमध्ये बाळशास्त्रींची जी महती कथन केली आहे ती त्या काळच्या मराठी भाषेच्या शैलीत येथे दिली आहे.
आङ्ग्लसत्ताधिष्ठि महाराष्ट्र देशात बाळ गंगाधरशास्त्री नामक राष्ट्रोन्नतिसाधक थोर नरवीर निर्माण झाला ।।१।।
ह्या जांभेकर कुलश्रेष्ठाला ‘बालबृहस्पती‘, ‘आद्याचार्य‘ असे संबोधिले आहे ।।२।।
हा अतुल गणिती व निष्णात ज्योतिषी होता; प्राच्य व पाश्चात्य शास्त्रे यांस अवगत होती आणि याला बारा भाषा येत होत्या ।।३।।
हा शिकविण्यात अत्यंत कुशल, दानशील, समदर्शी व सज्जन होता. भाऊ दाजी लाड, दादाभाई नौरोजी, केरु नाना छत्रे, दादासाहेब तर्खडकर हे याचे प्रसिद्ध शिष्योत्तम होत ।।४।।
ह्याने व्याकरण, भूगोल, इतिहास, शून्यलब्धिगणित इत्यादी विषयांवर ग्रंथरचना केली आणि मराठी गद्याला योग्य वळण लावणारा ग्रंथकार म्हणून हा सर्वमान्य होता ।।५।।
हा ‘दर्पण‘चा व ‘दिग्दर्शन‘चा निर्माता असून आपल्या उपदेशाने महाराष्ट्राला जागे करणारा हाच पहिला मान्यवर संपादक होय।।६।।
प्राचीन लिपिलेख लावणारा व नाना राष्ट्रेतिहास जाणणारा आद्य भारतीय पुराणेतिहास संशोधक म्हणून याची गणना आहे।।७।।
हा संस्कृत भाषेत निपुण असून स्वभाषा व स्वधर्म यांचा पुरस्कर्ता होता. पाठभेदयुक्त ज्ञानेश्वरी यानेच प्रथम प्रकाशित केली, अशी याची ख्याती आहे ।।८।।
वरील परिच्छेदातून बाळशास्त्रींचे व्यक्तिमत्व केवढे विशाल होते याची कल्पना येते. एवढ्या प्रगल्भ बुद्धिमत्तेचा बालबृहस्पती मराठी भाषेला लाभला हे मराठीचे भाग्यच होय.
बाळशास्त्रींना इंग्रजी, मराठी, संस्कृत याबरोबरच गुजराती, पार्शी, बंगाली या भाषाही अवगत होत्या.
दर्पण वृत्तपत्र काढण्यामागची त्यांची प्रेरणा ही स्वदेशाभिमान हीच होती. त्याचबरोबर समाज प्रबोधनाचे कामही त्यांनी दर्पणद्वारे केले. हे वृत्तपत्र त्यांनी मोठ्या स्वार्थत्यागाने चालविले. परंतु आर्थिक अडचणींमुळे ते १८४० साली बंद करावे लागले. नंतर त्यांनी ‘दिग्दर्शन‘ नावाचे मासिक सुरु केले. लोकशिक्षणाच्या दृष्टीने या मासिकाचा त्याकाळी फार उपयोग झाला.
अशा या प्रकांडपंडित बालबृहस्पतीचा मृत्यू आकस्मीक आजाराने १८ मे १८४६ ला वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षी झाला. एवढ्या लहान वयात त्यांनी केलेले लेखनाचे आणि प्रबोधनाचे काम प्रचंड आहे. या थोर आद्यपत्रकाराला कोटी कोटी प्रणाम!
पोंभुर्ले या बाळशास्त्री जांभेकरांच्या जन्मगावी त्यांच्या वंशजांकडून उपलब्ध झालेल्या जागेवर एक सभागृह त्यामध्ये बाळशास्त्रींचा अर्धपुतळा अशा स्वरुपाचे स्मारक ‘महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी‘ या फलटण येथील संस्थेच्या अथक प्रयत्नांमुळे उभे राहिले आहे. या संस्थेचे कार्याध्यक्ष रविद्र बेडकीहाळ यांनी या कामासाठी आपल्या पत्रकार सहका-यांच्या मदतीने निधी उभा करुन हे स्मारक उभारले आहे. दरवर्षी ६ जानेवारीला याठिकाणी पत्रकार दिन साजरा केला जातो.
या गावी जाण्यासाठी चांगला रस्ताही नव्हता. तेथील ओढ्यावर पूल बांधून आता तरळा-विजयदुर्ग मार्गावर एक बाजूला असलेल्या या पांभुर्ले गावातील बाळशास्त्री स्मारकापर्यंत जाता येते.
पत्रकार कल्याण निधीला या कामी महाराष्ट्रातील अनेक पत्रकारांचे तसेच शासनाचेही सहकार्य लाभले. ग्रामस्थांचे आणि जांभेकर कुटुंबियांचेही चांगले सहकार्य या कामी मिळाले.
बाळशास्त्रींच्या द्विशताब्दीनिमित्त तरळे-विजयदुर्ग मार्गाला बाळशास्त्रींचे नाव देण्याची मागणी
बाळशास्त्री जांभेकर यांची २०० वी जयंती १६ फेब्रुवारी २०१२ रोजी येत आहे. त्यानिमित्ताने तरळे-विजयदुर्ग या राज्यमार्गाला आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव द्यावे अशा मागणीचे निवेदन पुणे येथील ‘जांभेकर प्रतिष्ठान‘ या संस्थेतर्फे शासनाला देण्यात आले आहे.

माझ्यातला ‘मी‘
समाजामध्ये वावरतांना जो तो स्वतःमधला ‘मी‘ जपण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असतो. या ‘मी‘ पणाला धक्का लागू नये म्हणून तो सदैव जागरुक असतो. ‘मी‘पणा शाबूत ठेवण्यासाठी वाटेल त्या तडजोडी करण्याची त्याची तयारी असते.
कुटुंबात जेव्हा मी मोठा असतो तेव्हा आपसूक माझा मीपणा जोपासला जातो. कुटुंबातील लहानथोरांमधला सहभाग, सुखदुःखाचे क्षण, यशापयशाची गोळाबेरीज, अनेक कौटुंबिक समस्या, कर्तव्ये, नैमित्तिक समारंभाची आखणी अशा विविध घडामोडींमधून सर्वांशी समरस होऊन कौटुंबिक स्वास्थ आणि सौख्याचा आनंद घेऊ शकतो.
या उलट माझ्यातला ‘मी‘ संकुचित झाल्यास मात्र आफत ओढावते. संकुचितपणामुळे एकाकी पडून कौटुंबिक सुखांना पारखा होतो. समाजातून जनप्रवाद निर्माण होतात.
‘मी‘ पणाची बाधा अगदी प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. महाभारतात धृतराष्ट्राचा ‘मी‘ पणा आडवा आला. आत्मकेंद्रीत धृतराष्ट्र आणि त्याचे उद्दाम पुत्र यामुळे संकुचितपणा वाढला. पर्यायाने दग्धयोगाची व्याप्ती वाढून महाभारताचे युद्धपर्व लादले गेले.
मी समाजाचा आणि समाज माझा या व्यापक वृत्तीने वावर असल्याने सामाजिक बांधिलकीपासून ‘मी‘ मागचा अर्थ उमगण्यासाठी दैनंदिन व्यवहारातील किती तरी बोलकी उदाहरणे उपलब्ध होतील.
माझ्याकडे घरकाम करणारी सालस स्वभावाची बायजा. अठराविश्वे दारिद्रय, दारुडा नवरा आणि पदरी चार पोरांचे लोढणे घेऊन निगुतिनं संसार रेटायची. अपार कष्ट अन् दारुड्या नव-याकडे दरगुजर करुन गुजराण करायची.
सणासुदीला काही गोडधोड खायला दिलं की ते बायजेच्या घशाखाली उतरत नसे. मोठ्या आत्मियतेने ते गोडधोड घरी नेऊन सर्वप्रथम नव-यावा वाटा वेगळा काढून मुलांना भरवायची आणि नंतर उरल्यास एखादा घास तोंडात टाकायची. बायजेमधल्या ‘मी‘ तिच्या स्वतःपुरता कधी मर्यादित नव्हता. तिचा मीपणा अवघ्या कुटुंबात सामावला होता.
या उलट तिचा नवरा ऐदी, ऐषारामी. दारुमुळं तर्रर्र झालेल्या त्याच्या डोळ्यांना बायकोचे कष्ट कधी दिसलेच नाहीत. उपाशी मुलांच्या अगतिक नजराही त्याला वितळू शकल्या नाहीत. बायकोला धुत्कारुन, मारझोड करुन पैसे हिसकावणे हाच त्याचा पुरुषार्थ. संकुचित ‘मी‘ पणाचं एवढं ज्वलंत उदाहरण पुरेसं आहे.
रंगभूमी गाजवलेले एक प्रसिद्ध नटवर्य विदर्भात नाटकाच्या दौ-यावर होते. पहिला प्रयोग सुरु होण्यापूर्वी काही मिनिटे आधी त्यांचा मोबाईल किणकिणला. मातोश्रींच्या दुःखद निधनाची बातमी होती. क्षणभर ते विचलीत झाले असतील. दुस-याच क्षणी पडदा वर गेला अन् त्यांनी रंगमंचावर प्रवेश केला. नंतरचे तीन तास नेहमीप्रमाणे त्यांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. नाटक संपताच रात्री सर्व मंडळी जेवायला बसली असता नटवर्यांनी कटाक्षाने सारे गोड पदार्थ बाजूला सारले. सर्वांना अचंबा वाटला. खोदून विचारलं असता नटवर्य शांतपणे म्हणाले, ‘तासाभरापूर्वी माझ्या मातोश्री गेल्याचा फोन आला. त्यामुळे या क्षणापासून माझं अशौच सुरु झालं. पण मी प्रयोगात खंड पडू देणार नाही. माझ्यावरल्या लोभापोटी नाट्यगृहात गर्दी करणा-या प्रेक्षकांचा हिरमोड कदापी करणार नाही. माझ्या मातोश्री वृद्ध होत्या. व्हायचं ते झालं.‘ नटवर्यांचा ‘मी‘पणा व्यापक होता. त्या व्यापकतेमुहे नाट्यगृहातला प्रेक्षकवर्ग त्यांच्यामध्ये सामावून गेला होता.
संकुचित ‘मी‘ पणाची मुबलक उदाहरणं सापडतील.
सॉफ्टवेअरमध्ये कार्यरत असलेली उच्चशिक्षित पती-पत्नी, दोघांनाही भरपूर पगार. त्यामुळं आर्थिक सुबत्ता. तथापी, दोघांच्याही कामाच्या वेळा अलग अलग. सकाळी कामाला गेलेली ‘ती‘ तिन्हीसांजेला घरी परतणार तोवर संध्याकाळी ड्यूटीवर जाण्याकरीता पतिराज सिद्ध. दोघांनाही मोकळेपणा मिळेना. एकत्र येणे तर अशक्य. हळुहळू दुरावा निर्माण होऊन दोघांमधले दर्पित उद्गार, ताणतणाव वाढीला लागले. क्षणोक्षणी उफाळून येणा-या ‘मी‘पणामुळे दोघांमधला सुसंवाद संपुष्टात येऊन संसाराला ग्रहण लागले.
एकत्र कुटुंबात ‘मी‘ कधीही हरवत नाही इतका तो व्यापक असतो. कुटुंबातील लहानथोर सदस्यांमध्ये सर्वदूर सामावलेला असतो. ‘मी‘ पणाच्या समानशीलतेमुळे कौटुंबिक वातावरण पोषक अन् मोकळंढाकळं असतं.
‘व्यक्ती तितक्या प्रकृती‘ या उक्तीनुसार भरल्या कुटुंबात देखील एखाद्याचा ‘मी‘ संकुचित असल्यास समस्या निर्माण होतच राहतात. त्याला पायबंद घालणे हे कुटुंब प्रमुखाचे कर्तव्य ठरते. संकुचित वृत्तीच्या अन् तोकड्या विचाराच्या व्यक्तीने अंतरंगात डोकावून स्वतःच्या ‘मी‘ पणाचा शोध घ्यायला हवा म्हणजे ‘मी‘ पणाचे सावट चुटकीसरशी दूर होईल.
अरुण सावालेकर



विशेष बातम्या *
नगरपरिषद सभापती निवड बिनविरोध
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पूर्ण बहुमत असलेल्या वेंगुर्ले नगरपरिषदेच्या विषय समिती सभापतींची निवड अपेक्षेप्रमाणे बिनविरोध झाली. नियोजन, पर्यटन, पर्यावरण समिती सभापतीपदी - प्रसन्ना कुबल, सदस्य -अवधुत वेंगुर्लेकर, सौ. फिलोमिना मॅक्सीमन कार्डोज, आरोग्य, क्रीडा, ज्येष्ठनागरिक कल्याण समिती सभापतीपदी - मनिष अनंत परब, सदस्य-शैलेश गुंडू गावडे, सौ.पद्मिनी जगन्नाथ सावंत, महिला बालकल्याण समिती सभापतीपदी डॉ. सौ. पूजा राजन कर्पे व उपसभापतीपदी सौ. अन्नपूर्णा नार्वेकर, सदस्य- सौ. चेतना विलास केळुसकर, पाणी पुरवठा व उद्यान समिती सभापतीपदी उपनगराध्यक्ष रमण शंकर वायंगणकर, सदस्य - वामन धोंडू कांबळे, सौ. सुलोचना शशिकांत तांडेल याप्रमाणे निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी अरविद वळंजू यांनी काम पाहिले.स्थायी समितीमध्ये नगराध्यक्ष सौ. नम्रता नितीन कुबल या समितीच्या पदसिद्ध अध्यक्ष असून उपनगराध्यक्ष रमण वायंगणकर, सभापती - प्रसन्ना कुबल, मनिष परब, पूजा कर्पे हे पदसिद्ध सदस्य आहेत. नगरपरिषदेचा बांधकाम विभाग या समितीकडे राहील.

सभापती निवडीत सावंतवाडी, मालवण राष्ट्रवादीकडेच
सावंतवाडी नगरपरिषदेतही शंभर टक्के राष्ट्रवादी असल्याने तेथील विषय समिती सभापतींची निवडणुक बिनविरोध झाली. विलास जाधव, राजू बेग, सुधन्वा आरेकर, अनारोजीन लोबो हे सभापती झाले.
मालवणात मात्र राणे समर्थक काँग्रेसने रडीचा डाव सुरुच ठेवला आहे. मालवण न.प.मध्ये राष्ट्रवादी, शिवसेना, अपक्ष अशी शहर विकास आघाडी स्थापन करुन या आघाडीचे गटनेते आपटे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच राष्ट्रवादीचे नितीन वाळके यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आली. उपनगराध्यक्ष पदासह पालिकेतील तीन्ही सभापतीपदे आपल्याकडे राखून राष्ट्रवादीने काँग्रेसला शह दिला आहे. वाळकेंच्या स्विकृत सभासद अर्जावरही काँग्रेसने आक्षेप घेतला. पण तो फेटाळला गेला. आता शहर विकास आघाडी बेकायदेशीर असल्याचे सांगत न्यायालयात जाण्याचा इशारा काँग्रेसचे नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी दिला आहे.



आमदार वि. प. नेते विनोद तावडे यांच्या दौ-याने भाजप ‘चार्ज‘
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून निवड झाल्यावर भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि प्रदेश सरचिटणीस विनोद तावडे यांनी सिधुदुर्ग जिल्ह्याला भेट दिली. त्यावेळी सर्व तालुक्यांमध्ये भाजप - सेना युतीतर्फे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. जिल्ह्यातील वनजीवन, कुळकायदा, तिलारी धरणग्रस्तांचे प्रश्न, रखडलेले पाटबंधारे प्रकल्प या प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधून ती पूर्ण करण्यास भाग पाडणार असल्याचे तावडे यांनी सांगितले. सर्व तालुक्यांतून भारतीय जनता पक्षाची संफ केंद्रे सुरु करण्यात आली असून त्या मार्फत सरकारी योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवून गरजूंना त्याचा लाभ मिळवून देण्याचे काम पक्षाचे कार्यकर्ते करतील असे त्यांनी सांगितले. नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीशी आघाडी केल्याचा पक्षाला फायदा झाल्याचे सांगून भाजपा विकास कामांना पाठिबा देतानाच प्रसंगी चुकीच्या गोष्टींना विरोध करुन सत्ताधा-यांवर अंकुश ठेवण्याचे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना-आरपीआय आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाआघाडी करण्याचे अधिकार भाजपच्या स्थानिक पदाधिका-यांना असतील अशीही त्यांनी घोषणा केली.

खानोली सरपंचपदी महेश प्रभू खानोलकर
खानोली ग्रामपंचायतीचे सरपंचपद विद्याधर प्रभू आणि महेश राधाकृष्ण प्रभू खानोलकर यांनी अडीच अडीच वर्षे सांभाळावे असे ठरले असतांना प्रथम सरपंच झालेले काँग्रेसचे विद्याधर प्रभू यांनी अडीच वर्षानंतर राजीनामा देण्याचे नाकारले. शेवटी त्यांच्यावर अविश्वास ठराव आणून तो मंजूर करण्यात आला. त्यानंतर ३१ डिसेंबरला महेश प्रभूखानोलकर यांनी सरपंचपदी बिनविरोध निवड झाली. या निवडीत त्यांनी राष्ट्रवादी पक्षाचे सहकार्य मिळाल्याचे आभार व्यक्त करतांना सांगितले.

पार्सेकर मंडळाचे नवीन दशावतारी नाटक संत चोखामेळा
पारंपारीक दशावतारी नाटकाला अत्याधुनिकतेची जोड देत सात ट्रीकसीनच्या समावेशात खानोली - सुरंगपाणी येथील विठ्ठल पंचायतनाच्या ठिकाणी पार्सेकर दशावतार नाट्यमंडळाने प्रतिवर्षीप्रमाणे रसिक प्रेक्षकांसाठी सादर केलेल्या ‘संत चोखामेळा‘ दशावतारी नाटकातील ‘विराट स्वरुप देवदर्शन‘ बरोबर अन्य सहा ट्रीकसीनमुळे रसिक मंत्रमुग्ध झाले. या कलेची लोकप्रियता वाढविण्यासाठी या दशावतार मंडळाचे मालक प्रभाकर पार्सेकर यांनी आपल्या मंडळातील कलाकारांना दिलेल्या प्रोत्साहनातून राधाकृष्ण नाईक या कलाकाराने संत चोखामेळा यांच्या जीवनावर आधारीत घटनांचा आढावा घेत दशावतारी नाटक सादर केले.
खानोली सुरंगपाणी येथील श्री विठ्ठल पंचायतनाचे मठाधिपती प. पू. दादा पंडित यांच्या हस्ते पार्सेकर दशावतारी मंडळाच्या नाटकाचा शुभारंभ झाला. ‘संत चोखामेळा‘ नाटकात प्रमुख भूमिका राधाकृष्ण नाईक, आनंद नार्वेकर, बाबा कामत, चारुदत्त तेंडोलकर, रामचंद्र रावले, रमेश करंगुटकर, पपू नांदोस्कर, राजू हरियाणा, बाळू कोचरेकर यांनी साकारल्या आहेत.

अभिनंदनीय *
डॉ. सुरेश बोवलेकर
मुंबई आणि बंगलोर येथे कार्यरत असलेल्या ‘फार्मानेट क्लिनिकल सव्र्हस प्रा. लि.‘ या अमेरिकन आंतरराष्ट्रीय कंपनीचे कार्यकारी संचालक डॉ.सुरेश बोवलेकर यांची ‘सोसायटी फॉर क्लिनिकल डेटा मॅनेजमेंट‘ (एस.सी.डी.एम) या आंतरराष्ट्रीय संस्थेने त्यांच्या विश्वस्तांच्या नियामक मंडळावर २०१२ आणि २०१३ या कालावधीसाठी नियुक्ती केलेली आहे. या नियामक मंडळावर नेमणूक झालेले डॉ. सुरेश बोवलेकर हे दुसरे भारतीय नागरीक आहेत. सोसायटी फॉर क्लिनिकल डेटा मॅनेजमेंट (एम.सी.डी.सी.) ही औषधांच्या चाचणी करतांना गोळा केलेल्या माहितीचा दर्जा उत्कृष्ट प्रकारचा असावा यासाठी झटणारी एकमेव आंतरराष्ट्रीय संस्था आहे. ही संस्था जगातील सुमारे ४० देशामध्ये कार्यरत असून या सर्व देशातील मिळून सुमारे २६०० सभासद आहेत. डॉ.बोवलेकर हे दाभोली - वेंगुर्ल्याचे सुपूत्र आहेत. त्यांच्या या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या विश्वस्तांच्या नियामक मंडळाच्या महत्त्वाच्या पदावर झालेल्या निवडीबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.



डॉ. सतीश घाडी
‘प्रिव्हेंटीव्ह कॉर्डिऑलॉजी‘ या विषयावर ८ जानेवारीला अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्को येथे होणा-या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी मुंबईतून डॉ. सतीश घाडी यांची निवड झाली आहे. बायपास सर्जरी कशी टाळता येईल या विषयावरील चर्चासत्रामध्ये डॉ. घाडी भाग घेणार आहेत. डॉ. सतीश घाडी हे वेंगुर्ल्याचे सुपूत्र असून ‘किरात‘चे आजीव सभासद आहेत.



धार्मिक *
रामेश्वर मंदिरात माघी उत्सव
श्री देव रामेश्वर मंदिरात माघ शु.१, मंगळवार दि. २४-१-२०१२ ते माघ शु. ६, रविवार दि. २९-१-२०१२ पर्यंत श्री गणेश जयंती, श्री देवी भगवती, श्री देव नागनाथ व श्री शनिदेव वर्धापनदिन दिन उत्सव साजरा होणार आहे. त्यानिमित्त खालील कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
दि.२४-१-२०१२ रोजी उत्सवास प्रारंभ. श्री देवी सातेरी मंदिरातून तरंग देवतांचे सवाद्य आगमन,श्रीदेव रामेश्वरावर लघुरुद्र व अभिषेक. दि. २५-१-२०१२ रोजी श्री शनिदेव वर्धापनदिन उत्सव, सकाळी श्री सत्यनारायणाची महापूजा.
दि. २६-१-२०१२ रोजी श्रीदेव नागेश्वराचा वर्धापनदिन उत्सव, श्री नागेश्वरावर लघुरुद्र अभिषेक, श्री वरदशंकर व्रतपूजा. श्री नवचंडी देवता स्थापना, नवचंडी पाठवाचनास सुरुवात. श्री गणेश जयंती उत्सव, २१ पार्थीव गणपतींची स्थापना व त्यानंतर २१ गणेशयाग (हवन) पुर्णाहुतीसह.
दि.२७-१-२०१२ रोजी नवचंडी पाठवाचन. संध्याकाळी ४ वाजल्यापासून स्त्रियांसाठी हळदीकुंकू समारंभ.
दि. २८-१-२०१२ रोजी श्री देवी भगवती वर्धापनदिन उत्सव, श्री नवचंडी हवनयुक्त. सकाळी १० वाजल्यापासून कुंकूमार्चन. श्री नवचंडी हवनाची पुर्णाहूती.
दि.२९-१-२०१२ रोजी दुपारी १२ वा. श्री बारापाच देवतांस महानैवेद्य, त्यानंतर आरती, गार्‍हाणे व सर्व लोकांस महाप्रसाद देण्यात येईल.
भाविकांनी सर्व कार्यक्रमाचा व ‘श्रीं‘ च्या दर्शनाचा तसेच उत्सव सांगतेच्या दिवशी ‘महाप्रसादाचा‘ अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन श्री रामेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे. उत्सव कालावधीत रोज रात्रौ ८ वा. श्री गणेश, श्री भगवती, श्री नागनाथ, श्री दत्त या देवतांची भजनासहीत पालखी प्रदक्षिणा होणार आहे.

अंक ४७वा, २९ डिसेंबर २०११

अधोरेखित *
वेध पर्यटनाचा
पर्यटन हंगाम सुरु झाला आहे. पर्यंटन संस्कृती आपल्या देशात आता चांगलीच रुजली आहे. त्यामुळे तसा पर्यटन हंगाम शालेय, महाविद्यालयीन परीक्षांचा काळ आणि भर पावसाळ्याचे महिने असा दोनेक महिन्यांचा कालावधी वगळता वर्षभरच सुरु असतो. पर्यटन सहली घडविणा-या संस्था आपल्या सहलीमध्ये नवनवे उपक्रम आणून या पर्यटन सहली संस्मरणीय करण्याचा प्रयत्न करीत असतात. वेगवेगळ्या वयोगटांसाठी, वेगवेगळ्या व्यावसायीकांसाठी, धार्मिक स्थळांसाठी अशा खास सहली आयोजित करुन लोकांना आकृष्ट करीत असतात. राज्यांपुरत्या किवा देशापुरत्या पर्यटन सहली काढणा-या कंपन्यांनी आता परदेशातील सहलीमध्येही भरारी घेतली आहे. एकेकट्या कुटुंबाने पर्यटन स्थळांची सहल करण्याऐवजी अशा पर्यटन कंपन्यांच्या बरोबर सहलीला जाणे हे आर्थिकदृष्ट्या किफायतशीर आणि सोयीस्कर ठरते. बरेसचे सुरक्षितही ठरते. त्यामुळे यात्रा कंपन्यांबरोबर सहलीला जाणा-यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या पर्यटन कंपन्यांना चांगला व्यवसाय मिळू लागला आहे. पर्यटनासाठी जाणा-यांची आवडनिवड वेगवेगळी असते.
देशातला पहिला पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर झालेल्या सिधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन विकास, पर्यटनातून रोजगार याचा घोषा गेली बारा-पंधरा वर्षे लावला जातो आहे. या लेखात अधोरेखित केलेल्या अन्यत्रच्या विविध पर्यटन प्रकारांशी तुलना केली तर देशातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत आपला जिल्हा कोठे आहे हे स्पष्ट होईल.
संपूर्ण कोकणपट्टीत रायगडपासून सिधुदुर्ग पर्यंत समुद्रकिनारपट्टी आणि सह्याद्री पर्वतांची रांग यामध्ये कितीतरी धार्मिक स्थळे, ऐतिहासिक स्थळे, नैसर्गिक सुंदर ठिकाणे आहेत. कोकणात, विशेषतः सिधुदुर्गातील देवस्थाने, गावरहाटीच्या विविध परंपरांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहेत. येथील मंदिरांना गोवा किवा दक्षिण भारतातील मंदिरांप्रमाणे भव्यता नसेल पण पर्यटकांना खिळवून ठेवतील अशा आख्यायिका, परंपरा आहेत.
कोकणात ऐतिहासिक स्थळेही भरपूर आहेत. त्यातील रायगड सोडला तर अन्य किल्ल्यांची दूरवस्था आहे आणि सरकारची उदासिनताही आहे. शिवाजी महाराजांनी मालवणात एका बेटावर बांधलेला सिधुदुर्ग हा जलदुर्ग खूप महत्वाचा आहे. शिवाजी महाराजांचे एकमेव मंदिर या किल्ल्यात आहे. या किल्ल्यामुळे मालवणला पर्यटनदृष्ट्या महत्व आले आहे. परंतु या किल्ल्याची ढासळती तटबंदी कायमस्वरुपी मजबूत करण्यात राज्य सरकारला स्वारस्य दिसत नाही. जंजिरा, विजयदुर्ग या अजूनही सुस्थितीत असलेल्या किल्ल्यांप्रमाणेच सिधुदुर्ग किल्ल्याकडेही पुरातत्व खात्याने दुर्लक्ष केलेले आहे. मग बरीचसी पडझड झालेल्या कुलाबा, जयगड, रत्नागिरी, देवगड, रेडी तील यशवंतगड, सह्याद्रीतले हनुमंतगड अशा किल्ल्यांची काय कथा?
धर्मांधांना आवडत नाही म्हणून आपल्या गौरवशाली इतिहास दडपू पाहणा-या राजकर्त्यांकडून आपल्या वैभवशाली आणि शौर्याचा वारसा सांगणा-या ऐतिहासिक वास्तूंचे, गड-किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करील अशी अपेक्षा कशी करायची?
निसर्गरम्य स्थळे हा पर्यटनाचा आनंद देणारा भाग. कोकणातील समुद्रकिनारपट्टी ही बरीचशी कडेकपारींनी भरलेली आहे. लांबलचक वालुकामय किनारपट्ट्या आहेतच, परंतु डोंगर कड्यावरुन दिसणारे समुद्राचे, समुद्राला येऊन मिळणा-या नदी-खाड्यांचे दर्शन विलोभनीयच असते. अशा कड्यावरुन सूर्यास्ताचे, समुद्राच्या पाण्यात बुडणा-या मोठ्या सूर्यबिबाचे दर्शन तर अवर्णनीय. मावळतीला जाणारा सूर्य समुद्राच्या पुळणीवर लाटांशी खेळणा-यांना आपापल्या राहुटीत (रिसॉर्ट) परतायची सूचना देतो. खाड्यांमध्ये होडीतून सैर करणे समुद्रापेक्षा सुरक्षित. आता तर त्या पाण्यामध्येच राहणा-या हाऊसबोट पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत. यामध्ये आता पंचतारांकित सोयी असलेल्या हाऊसबोटीही कोकणातल्या खाडीमध्ये येऊ घातल्या आहेत.
अशा सागरी पर्यटनासाठी मुख्य रस्त्यापासून पर्यटनस्थळी जाण्याकरिता चांगल्या रस्त्यांची मात्र कोकणात वानवाच आहे. मच्छिमारी बंदरांच्या ठिकाणी जाण्यापुरते डांबरी रस्ते आहेत तेवढेच. पण त्यांचीही बव्हंशी दूरवस्थाच आहे. चांगले रुंद रस्ते किनारपट्टीलगतच्या पर्यटनस्थळांपर्यंत होणे, त्या रस्त्यांवर आणि पर्यटनस्थळी विजेचे दिवे लागणे, पाण्याची सोय असलेली स्वच्छतागृहे, पिण्याचे शुद्ध पाणी मिळणे या गोष्टींकडे यापूर्वी सोडाच पण गेल्या दहा-बारा वर्षांतही कोणी लक्ष दिले नाही. ना लोकप्रतिनिधींनी, ना सरकारने, ना स्थानिक रहिवाशांनी. यामध्ये स्थानिक जमिन मालक हाही एक घटक आहेच! पण त्यावरही सरकारी हस्तक्षेपाने मार्ग काढता येणारा असतो. पर्यटक मोठ्या संख्येने आले की त्यांना आवश्यक चहापान, जेवणखाण व अन्य सोयी देण्याचा सेवा व्यवसाय आलाच. दोन-चार चांगली दुकानेही तेथे चांगली चालतील. कोकण किनारपट्टीवर राहणारे ९० टक्के लोक मच्छिमारी व्यवसायातले असतात. त्यातील काही कुटुंबांना पर्यटक सेवेचा स्वयंरोजगार उभारता येईल. स्थानिकांनी हे केले नाही तर दुसरे कोणीतरी परप्रांतीय येथे येऊन ते करणारच आहेत आणि आम्ही फक्त पहात राहणार आहोत. सिधुदुर्गातच नव्हे तर राज्याच्या अन्य भागातही केरळी, राजस्थानी लोकांनी आपापले व्यवसाय सुरु करुन जम बसविला आहे. त्यातले काही व्यवसाय पर्यटनाशी निगडीत आहेत. पर्यटनप्रवण असलेल्या आपल्याकडील गावात स्थानिक लोकांना तसे व्यवसाय करता येणे शक्य आहे. परंतू दूरदृष्टीचा अभाव, शारिरीक श्रम करण्याची तयारी नसणे यामुळे ते काहीच कामधंदा न करता घरी पेजभात मिळते म्हणून आळसावून बसलेले असतात.
अशा लोकांना कामासाठी उद्युक्त करण्याचे कार्य कुठल्याही कन्सल्टन्सीच्या आवाक्यातले नाही. टाटा कन्सल्टन्सीने लाखो रुपये फी घेऊन सिधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाचा आराखडा तयार केला. पण सिधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांना पर्यटन व्यवसायात सामावून घेण्यासाठी नेमके काय केले पाहिजे याचा उहापोह नाही. ते काम विविध सामाजिक संस्थांनीच केले पाहिजे. नव्हे तसे काम उभे करुन या तरुणांमधील नैराश्य, आळस, झटकून काढण्याचे काम केले पाहिजे.
- श्रीधर मराठे

संपादकीय *
सरकारी पर्यटन १५ वर्षानंतरही जैसे थे
सिधुदुर्ग जिल्हा देशातील पहिला ‘पर्यटन जिल्हा‘ म्हणून जाहीर झाल्याला १५ वर्षे पूर्ण झाली. इतक्या वर्षात सर्वत्र उत्तम रस्ते, बारमाही भरपूर पाणी पुरवठा, स्व-निर्मित वीज आणि या विजेचा २४ तास पुरवठा, अजूनही काही प्रमाणात संरक्षित असलेल्या मोठ्या देवरायांमध्ये पक्षी, प्राणी यांच्यासाठी अभयारण्ये, नियमित आणि वक्तशीर सार्वजनिक वाहतुक व्यवस्था, पुरेशी सार्वजनिक स्वच्छतागृहे इत्यादी सरकारी निधीतून होणारी कामे पूर्ण होणे आवश्यक होते. त्यासाठी केंद्र व राज्यसरकारने निधीही दिलेला होता. त्यातील बराचसा खर्चही पडला आहे. सरकारी वरिष्ठ अधिका-यांची उदासीनता, दप्तर दिरंगाई आणि भ्रष्टाचार यांतून मार्गी लागलेली ही कामे निकृष्ट दर्जाची आणि अर्धवट स्वरुपाची झालेली आहेत. जिल्ह्याच्या सीमांवर पर्यटकांच्या स्वागताच्या कमानी उभारणे तेथे त्यांना विश्रांतीसाठी हॉटेल तसेच स्वच्छतागृहाची सोय उपलब्ध करुन देणे. यासाठी निधी मंजूर झाला. परंतू एकाही सीमेवर काही काम झालेले नाही. मग प्रत्यक्ष जिल्ह्यात काही कामे पूर्ण होण्याची बातच सोडा.
अलिकडेच मिळालेल्या माहितीनुसार सिधुदुर्ग जिल्ह्यातील ‘क‘ वर्ग पर्यटन स्थळांच्या वर्गवारीचा शासन निर्णयच झालेला नसल्याने जिल्हाधिका-यांनी पर्यटन विकासासाठी आलेले प्रस्ताव मंजूर न करण्याचा निर्णय घेऊन पुढील सर्व कामे रोखली आहेत. या प्रस्तावांसाठी सुमारे साडेपाच कोटीचा निधी लागणार आहे. तो प्रस्ताव मंजूर न झाल्यामुळे अखर्चित राहून परत जाणार. या बाबतीत विचारणा झाली असता पाठविलेल्या प्रस्तावांना मंजूरी मिळताच सदरील कामे त्वरित हाती घेऊन पूर्ण केली जातील असा खुलासा जिल्हाधिका-यांनी केला आहे.
आता केंद्र सरकारकडून सिधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी दीडशे कोटी रुपये मिळणार असल्याची माहितीही जिल्ह्याधिका-यांनी दिली आहे. त्याबाबत पर्यटन समितीने पाहणी करुन जिल्ह्यातील काही ठिकाणे निश्चित केल्याचे त्यांनी सांगितले. अर्थात या जर - तरच्या गोष्टी आहेत. प्रत्यक्षात ही कामे केव्हा सुरु होऊन पूर्ण होतात हे महत्त्वाचे.
शासन निर्णय नसतांनाही जो निधी खर्चही झाला आहे. त्यातून ‘क‘ वर्ग पर्यटन यात्रास्थळ विकास म्हणून काही रस्ते, ओरोस येथील रवळनाथ मंदिर परिसराचे सुशोभिकरण, बालोद्यान, पथदिवे, वाहतुक, आंगणेवाडी, कुणकेश्वर येथे काही कामे झाली. त्यावेळी वर्गवारीचा नियम आड आला नाही. ही पद्धती चुकीची असल्याचे विद्यमान जिल्हाधिका-यांनी मान्य करुन यातील दोषी अधिका-यांवर कारवाई केली जाईल असे म्हटले आहे. अर्थात अशी चौकशी होणेही आवश्यक आहे. कारण या विषयाशी संबंधीत अधिका-यांनी मंजूर होऊन खर्ची पाडलेल्या निधीमध्ये मोठाच ‘घपला‘ केला असणार यात शंका नाही. यामध्ये जिल्हा नियोजन अधिका-याचा हात असावा. आद्य पत्रकार स्व.बाळशास्त्री जांभेकर स्मारक प्रकरणी वादग्रस्त ठरलेले यापूर्वीचे नियोजन अधिकारी मंजूर निधीवर कसा हात मारीत होते. याची अनेक उदाहरणे त्या त्या कामांशी संबंधित लोक सांगू शकतील. अर्थात कोट्यावधी रुपयांच्या या निधीमध्ये त्यांचे शासकीय आणि अशासकीय भागीदार असणारच!
पर्यटन विकासासाठी सरकारने पायाभूत सोयी उपलब्ध करुन द्याव्यात इतकीच मागणी होती व आहे. बाकीचे काम खाजगी उद्योजकांचे. निवासी हॉटेल्स बांधणे तेथे चांगल्या दर्जाची उपहारगृहे करणे, पर्यटकांना यात्रा स्थळांचे दर्शन घडविणे, त्यासाठी वाहन व्यवस्था, समुद्रसफरीसाठी छोट्या बोटी सुरु करणे. अशा अनेक व्यावसायीक गोष्टी उद्योजक करु शकतात. त्याप्रमाणे ब-याच ठिकाणी हॉटेल्स, स्थळदर्शन सुविधा सुरुही झाली आहे. ग्रामस्थांनीच पुढाकार घेऊन व लोकवर्गणी जमवून आपापल्या गावांतील भव्य मंदिरांचा जीर्णोद्धार, सुशोभिकरण केले आहे. तेथे भक्तनिवासही उभारले आहेत. अनेक मठ मंदिरांमध्ये दुपारच्यावेळी अत्यंत अल्प दरात चांगले जेवण प्रसाद म्हणून दिले जाते. या सर्व गोष्टींचा लाभ देवदर्शनासाठी येणारे पर्यटक घेत असतात. हे सर्व सरकारी निधीतून झालेले नाही. पण या लोकांची अपेक्षा एवढीच की त्या त्या पर्यटनस्थळापर्यंत, मंदिरांपर्यंत जाणारे रस्ते चांगले प्रशस्त आणि खड्यविना असावेत. सरकारी योजनांतून पुरेसा पाणी पुरवठा बारमाही व्हावा. जिल्ह्यातील बहुतेक सर्व मोठ्या मंदिरांलगत पाण्याचे तलाव असतात. त्याकडे सरकारचे आणि स्थानिक ग्रामस्थांचेही अक्षम्य दुर्लक्ष झालेले आहे. या तळ्यांमधील गाळ काढून पाणी साठा वाढविणे आणि सुशोभिकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. त्याकरिता तळ्यातील गाळ, माती काढून नेण्याचे काम विनामोबदला करण्यास काहीजण तयार आहेत. (कौल कारखाने, वीट उद्योग, नर्सरी उद्योगांना ही माती उपयुक्त असते.) पण यातील असल्यास तर कायदेशीर त्रुटी दूर करुन तळ्यांचे पुनरुज्जीवन सरकारी पातळीवर होऊ शकणार आहे.
सिधुदुर्गसारख्या छोट्या आणि इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी दुर्गम असलेल्या जिल्ह्यासाठी अपारंपारीक उर्जास्त्रोतांद्वारे चौवीस तास वीज पुरवठा सुरु करता येणे अवघड नाही असे अनेक तज्ञांचे मत आहे. मुळात या जिल्ह्यात मोठे उद्योगधंदे नसल्यामुळे निकषांपेक्षा कमीच वीज वापरली जाते. एक दोन छोटे जलविद्युत प्रकल्प, पवनउर्जा प्रकल्प या जिल्ह्यात उभारले तर छोटी - मोठी कारखानदारी आली तरीही हा जिल्हा विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण राहील. शिवाय असे प्रकल्प हे सुद्धा पर्यटन स्थळे बनतील.
पायलट मोटकरसायकल सेवा हवी
सिधुदुर्ग जिल्हा आकाराने छोटा असला तरी वाहतुकीची समस्या काही प्रमाणात आहेच, त्यासाठी गोव्याप्रमाणे पायलट मोटरसायकल सेवा विशेष बाब म्हणून या जिल्ह्यात सुरु करण्यास परिवहन खात्याने मंजूरी दिली तर शेकडो बेरोजगारांना हा नवा व्यवसाय मिळेल. पर्यटकांबरोबरच जिल्ह्यातील लोकांचीही चांगली सोय होईल. याबाबतीत पर्यटन खात्याने काही प्रस्ताव मांडला आहे की नाही ते समजले नाही. पण तिकडे रत्नागिरी जिल्ह्यात मात्र अशी पायलट सेवा सुरु करण्यासंबंधी परिवहन खात्याशी चर्चा झालेली आहे. तसा प्रस्तावही झाला असेल. तो मंजूर झाला तर सिधुदुर्ग जिल्ह्यातही तशी सेवा सुरु करता येईल. अन्य जिल्ह्यां कडूनही अशी मागणी होईल म्हणून हा प्रस्ताव शासन बाजूला ठेऊ पाहील. परंतू सिधुदुर्ग पर्यटन जिल्हा असल्याने विशेष बाब म्हणून राजकीय नेतृत्वाने पाठपुरावा करणे आवश्यक आहे.
कामाविषयी उदासीन आणि भ्रष्ट नोकरशाही, त्याहूनही उदासीन असणारे नागरीक यामुळे सरकारी योजनांवर पैसे खर्च होऊनही कामे कशी निकृष्ट होतात किवा कामे होतच नाहीत हे अनेक उदाहरणे देऊन सांगता येईल. या निष्क्रीय यंत्रणेला कामाला लावणारा खमका राजकीय नेता हवा. तो स्वतः किवा त्याचे निकटवर्तीय यांचा त्यामध्ये आर्थिक स्वार्थ असता नये तरच पर्यटन विकासातून जिल्हा विकासाचे हे स्वप्न वास्तवात येऊ शकेल.

विशेष *
सिधुदुर्ग ः पर्यटन जिल्हा लोकांचा पुढाकार
सिधुदुर्ग जिल्हा देशातील पहिला ‘पर्यटन जिल्हा‘ म्हणून जाहीर झाल्याला १५ वर्षे पूर्ण झाली. इतक्या वर्षात सर्वत्र उत्तम रस्ते, बारमाही भरपूर पाणी पुरवठा, स्व-निर्मित वीज आणि या विजेचा २४ तास पुरवठा, अजूनही काही प्रमाणात संरक्षित असलेल्या मोठ्या देवरायांमध्ये पक्षी, प्राणी यांच्यासाठी अभयारण्ये, नियमित आणि वक्तशीर सार्वजनिक वाहतुक व्यवस्था, पुरेशी सार्वजनिक स्वच्छतागृहे इत्यादी सरकारी निधीतून होणारी कामे पूर्ण होणे आवश्यक होते. त्यासाठी केंद्र व राज्यसरकारने निधीही दिलेला होता. त्यातील बराचसा खर्चही पडला आहे. सरकारी वरिष्ठ अधिका-यांची उदासीनता, दप्तर दिरंगाई आणि भ्रष्टाचार यांतून मार्गी लागलेली ही कामे निकृष्ट दर्जाची आणि अर्धवट स्वरुपाची झालेली आहेत. जिल्ह्याच्या सीमांवर पर्यटकांच्या स्वागताच्या कमानी उभारणे तेथे त्यांना विश्रांतीसाठी हॉटेल तसेच स्वच्छतागृहाची सोय उपलब्ध करुन देणे. यासाठी निधी मंजूर झाला. परंतू एकाही सीमेवर काही काम झालेले नाही. मग प्रत्यक्ष जिल्ह्यात काही कामे पूर्ण होण्याची बातच सोडा.
अलिकडेच मिळालेल्या माहितीनुसार सिधुदुर्ग जिल्ह्यातील ‘क‘ वर्ग पर्यटन स्थळांच्या वर्गवारीचा शासन निर्णयच झालेला नसल्याने जिल्हाधिका-यांनी पर्यटन विकासासाठी आलेले प्रस्ताव मंजूर न करण्याचा निर्णय घेऊन पुढील सर्व कामे रोखली आहेत. या प्रस्तावांसाठी सुमारे साडेपाच कोटीचा निधी लागणार आहे. तो प्रस्ताव मंजूर न झाल्यामुळे अखर्चित राहून परत जाणार. या बाबतीत विचारणा झाली असता पाठविलेल्या प्रस्तावांना मंजूरी मिळताच सदरील कामे त्वरित हाती घेऊन पूर्ण केली जातील असा खुलासा जिल्हाधिका-यांनी केला आहे.
आता केंद्र सरकारकडून सिधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी दीडशे कोटी रुपये मिळणार असल्याची माहितीही जिल्ह्याधिका-यांनी दिली आहे. त्याबाबत पर्यटन समितीने पाहणी करुन जिल्ह्यातील काही ठिकाणे निश्चित केल्याचे त्यांनी सांगितले. अर्थात या जर - तरच्या गोष्टी आहेत. प्रत्यक्षात ही कामे केव्हा सुरु होऊन पूर्ण होतात हे महत्त्वाचे.
शासन निर्णय नसतांनाही जो निधी खर्चही झाला आहे. त्यातून ‘क‘ वर्ग पर्यटन यात्रास्थळ विकास म्हणून काही रस्ते, ओरोस येथील रवळनाथ मंदिर परिसराचे सुशोभिकरण, बालोद्यान, पथदिवे, वाहतुक, आंगणेवाडी, कुणकेश्वर येथे काही कामे झाली. त्यावेळी वर्गवारीचा नियम आड आला नाही. ही पद्धती चुकीची असल्याचे विद्यमान जिल्हाधिका-यांनी मान्य करुन यातील दोषी अधिका-यांवर कारवाई केली जाईल असे म्हटले आहे. अर्थात अशी चौकशी होणेही आवश्यक आहे. कारण या विषयाशी संबंधीत अधिका-यांनी मंजूर होऊन खर्ची पाडलेल्या निधीमध्ये मोठाच ‘घपला‘ केला असणार यात शंका नाही. यामध्ये जिल्हा नियोजन अधिका-याचा हात असावा. आद्य पत्रकार स्व.बाळशास्त्री जांभेकर स्मारक प्रकरणी वादग्रस्त ठरलेले यापूर्वीचे नियोजन अधिकारी मंजूर निधीवर कसा हात मारीत होते. याची अनेक उदाहरणे त्या त्या कामांशी संबंधित लोक सांगू शकतील. अर्थात कोट्यावधी रुपयांच्या या निधीमध्ये त्यांचे शासकीय आणि अशासकीय भागीदार असणारच!
पर्यटन विकासासाठी सरकारने पायाभूत सोयी उपलब्ध करुन द्याव्यात इतकीच मागणी होती व आहे. बाकीचे काम खाजगी उद्योजकांचे. निवासी हॉटेल्स बांधणे तेथे चांगल्या दर्जाची उपहारगृहे करणे, पर्यटकांना यात्रा स्थळांचे दर्शन घडविणे, त्यासाठी वाहन व्यवस्था, समुद्रसफरीसाठी छोट्या बोटी सुरु करणे. अशा अनेक व्यावसायीक गोष्टी उद्योजक करु शकतात. त्याप्रमाणे ब-याच ठिकाणी हॉटेल्स, स्थळदर्शन सुविधा सुरुही झाली आहे. ग्रामस्थांनीच पुढाकार घेऊन व लोकवर्गणी जमवून आपापल्या गावांतील भव्य मंदिरांचा जीर्णोद्धार, सुशोभिकरण केले आहे. तेथे भक्तनिवासही उभारले आहेत. अनेक मठ मंदिरांमध्ये दुपारच्यावेळी अत्यंत अल्प दरात चांगले जेवण प्रसाद म्हणून दिले जाते. या सर्व गोष्टींचा लाभ देवदर्शनासाठी येणारे पर्यटक घेत असतात. हे सर्व सरकारी निधीतून झालेले नाही. पण या लोकांची अपेक्षा एवढीच की त्या त्या पर्यटनस्थळापर्यंत, मंदिरांपर्यंत जाणारे रस्ते चांगले प्रशस्त आणि खड्यविना असावेत. सरकारी योजनांतून पुरेसा पाणी पुरवठा बारमाही व्हावा. जिल्ह्यातील बहुतेक सर्व मोठ्या मंदिरांलगत पाण्याचे तलाव असतात. त्याकडे सरकारचे आणि स्थानिक ग्रामस्थांचेही अक्षम्य दुर्लक्ष झालेले आहे. या तळ्यांमधील गाळ काढून पाणी साठा वाढविणे आणि सुशोभिकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. त्याकरिता तळ्यातील गाळ, माती काढून नेण्याचे काम विनामोबदला करण्यास काहीजण तयार आहेत. (कौल कारखाने, वीट उद्योग, नर्सरी उद्योगांना ही माती उपयुक्त असते.) पण यातील असल्यास तर कायदेशीर त्रुटी दूर करुन तळ्यांचे पुनरुज्जीवन सरकारी पातळीवर होऊ शकणार आहे.
सिधुदुर्गसारख्या छोट्या आणि इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी दुर्गम असलेल्या जिल्ह्यासाठी अपारंपारीक उर्जास्त्रोतांद्वारे चौवीस तास वीज पुरवठा सुरु करता येणे अवघड नाही असे अनेक तज्ञांचे मत आहे. मुळात या जिल्ह्यात मोठे उद्योगधंदे नसल्यामुळे निकषांपेक्षा कमीच वीज वापरली जाते. एक दोन छोटे जलविद्युत प्रकल्प, पवनउर्जा प्रकल्प या जिल्ह्यात उभारले तर छोटी - मोठी कारखानदारी आली तरीही हा जिल्हा विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण राहील. शिवाय असे प्रकल्प हे सुद्धा पर्यटन स्थळे बनतील.
पायलट मोटकरसायकल सेवा हवी
सिधुदुर्ग जिल्हा आकाराने छोटा असला तरी वाहतुकीची समस्या काही प्रमाणात आहेच, त्यासाठी गोव्याप्रमाणे पायलट मोटरसायकल सेवा विशेष बाब म्हणून या जिल्ह्यात सुरु करण्यास परिवहन खात्याने मंजूरी दिली तर शेकडो बेरोजगारांना हा नवा व्यवसाय मिळेल. पर्यटकांबरोबरच जिल्ह्यातील लोकांचीही चांगली सोय होईल. याबाबतीत पर्यटन खात्याने काही प्रस्ताव मांडला आहे की नाही ते समजले नाही. पण तिकडे रत्नागिरी जिल्ह्यात मात्र अशी पायलट सेवा सुरु करण्यासंबंधी परिवहन खात्याशी चर्चा झालेली आहे. तसा प्रस्तावही झाला असेल. तो मंजूर झाला तर सिधुदुर्ग जिल्ह्यातही तशी सेवा सुरु करता येईल. अन्य जिल्ह्यां कडूनही अशी मागणी होईल म्हणून हा प्रस्ताव शासन बाजूला ठेऊ पाहील. परंतू सिधुदुर्ग पर्यटन जिल्हा असल्याने विशेष बाब म्हणून राजकीय नेतृत्वाने पाठपुरावा करणे आवश्यक आहे.
कामाविषयी उदासीन आणि भ्रष्ट नोकरशाही, त्याहूनही उदासीन असणारे नागरीक यामुळे सरकारी योजनांवर पैसे खर्च होऊनही कामे कशी निकृष्ट होतात किवा कामे होतच नाहीत हे अनेक उदाहरणे देऊन सांगता येईल. या निष्क्रीय यंत्रणेला कामाला लावणारा खमका राजकीय नेता हवा. तो स्वतः किवा त्याचे निकटवर्तीय यांचा त्यामध्ये आर्थिक स्वार्थ असता नये तरच पर्यटन विकासातून जिल्हा विकासाचे हे स्वप्न वास्तवात येऊ शकेल.
- जॉर्ज जोएल

डॉल्फिन डेस्टीनेशन
२००३ सालापासून निवतीचा समुद्र किनारा डॉल्फिन दिसण्याचा हॉटस्पॉट म्हणून विकसित झाला. सुरुवातीला निवती येथील श्रीधर मेथर आणि त्यांच्या सहका-यांना हे गाव पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली. इथला ९९ टक्के समाज मच्छिमारी व्यवसायात आहे. त्यामुळे पर्यटनाची मानसिकता रुजायला वेळ लागला. सोबत न बदलणारी सरकारी नियम, जाचक अटी यांची संगत होतीच. सर्वांवर मात करीत आज निवती गावात ५ ते ६ घरांमध्ये निवास-न्याहारीची सोय होवू शकते.
मेथरांच्या भाषेत हा वन-डे पिकनीक पॉईंट झाला आहे. नोव्हेंबर ते मार्च या महिन्यात हमखास सकाळच्या वेळी या भागात डॉल्फिनचे दर्शन होते. याचे मार्केटिग करुन निवतीकडे पर्यटकांना खेचण्यात यश आले. सकाळचे दोन तास डॉल्फिन दर्शन, त्यानंतर ३ ते ४ तास ‘वेंगुर्ले रॉक‘ला चक्कर, वाटेत बेटांवर दिसणारी स्विफ्ट पक्षांची घरटी हा साहसी पर्यटनाचा भाग सफर अविस्मरणीय बनवितो. संध्याकाळच्या वेळी मासेमारीचा प्रत्यक्ष अनुभव, रात्री माशांचे जेवण जेवून पर्यटक मजेत आपला दिवस घालवतात.
प्रस्थापित पर्यटनस्थळांपासून पूर्णपणे नव्या डेस्टिनेशनचा शोध घेणे, त्यासाठी सुरुवातीची मेहनत, प्रसिद्धी माध्यमांची मदत यामुळेच एखादे ठिकाण विकसित होत असते. गेल्या ७ वर्षात मासेमारीबरोबरच पूरक व्यवसाय म्हणून पर्यटनाकडे काही प्रमाणात पाहिले जात आहे. याला इतर स्थानिकांची मदत तर लागणारच आहे, पण सर्वात महत्वाची गरज आहे ती सरकारी परवानग्या मिळविण्याची.
नजिकच्या गोवा राज्यात कॅप्टन ऑफ पोर्ट खात्यांतर्गत पर्यटकांना समुद्रात फिरविण्यासाठी बोटींना विशेष परवाना मिळतो. ती प्रक्रिया अतिशय सुलभ आहे. आपल्याकडे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड हे परवाने देते. सिधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर होऊन एक तप उलटले. तरी प्रत्यक्ष व्यवसाय दिसत असूनही मेथरांचे परवानगीचे प्रकरण गेली दहा वर्षे मेरीटाईम बोर्डाकडे प्रलंबित आहे. अथक परिश्रमांनी तारकर्ली-मालवण इथल्या बोटमालकांना टुरिस्ट बोटचा तात्पुरता परवाना मिळाला. गेली सात वर्षे सर्व सरकारी अधिकारी बोटीने निवती भागात फिरुन येतात. पण परवानगीचे प्रकरण अजुनही प्रलंबित आहे. तसेच अरुंद रस्ते, दिशादर्शक फलक नसणे यांवरही मार्ग निघणे आवश्यक आहे. मे २०११ मध्ये पर्यटन विकास महामंडळाचे मॅनेजिग डायरेक्टर श्री. कुरुंदकर यांनी पनवेल ते गोवा दरम्यान महत्वाच्या पर्यटनस्थळांकडे जाणारे दिशादर्शक फलक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहकार्याने लावणार असल्याचे सांगितले होते. ७ महिने होत आले तरी दिशादर्शक फलकांचा पत्ता नाही. त्यामुळे सरकारी घोषणा, एम.टी.डी.सी.ची स्थानिकांप्रती अनास्था इथल्या लोकांना काही नवीन नाही.
केवळ अडचणी सांगणे हा शा.प.लो.पु. पुरवणीचा उद्देश नाही. श्रीधर मेथर आणि त्यांच्या सहका-यांनी अनेक अडचणींवर मात करत निवती गावाची सिधुदुर्गच्या पर्यटन नकाशात स्वतंत्र ओळख निर्माण केली. आणि निवतीचे नाव सर्वदूर पोचवले.
अगदी माफक दरामध्ये बोटिगची सुविधा निवतीमध्ये उपलब्ध आहे. रहाण्याची सोय देखिल काही घरांमध्ये केल्यामुळे सागरी पर्यटनाचा आनंद तिथल्या गावात जावून घेता येईल.
संफ ः श्रीधर मेथर, ९४२०८२१९९१.

वायंगणी समुद्र किना-यावर कासव जत्रेची शानदार सुरुवात
ऑलिव्ह रिडले कासव संवर्धनासाठी प्रसिद्ध असलेला वेंगुर्ले-वायंगणी किनारा आता पर्यटकांसाठीही आकर्षण ठरतो आहे. किरात ट्रस्टच्या ‘कासव जत्रे‘च्या निमित्ताने वायंगणी गाव सहयोगातून पर्यटन नकाशावर आणण्याच्या प्रयत्नांना संपूर्ण महाराष्ट्रभरातून आलेल्या पर्यटकांनी चांगला प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे औपचारीक उद्घाटन वायंगणी गावच्या सरपंच सौ. रसिका पंडीत यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्राणीमित्र सुहास तोरस्कर, अवधूत नाईक, प्रा. मर्गज, किरात ट्रस्टचे अध्यक्ष श्रीधर मराठे आदी मान्यवर उपस्थित होते. पेडणेकर गुरुजींनी मालवणी पद्धतीने पारंपारिक गा-हाणे घातले. वायंगणी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांच्या स्वागत गीतानंतर उपस्थित महिला पर्यटकांना आबोलीचे वळेसार देवून स्वागत करण्यात आले. या उपक्रमात मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, सोलापूर, रत्नागिरी येथील ६२ कुटुंबे नोंदणी करुन सहभागी झाली आहेत. ओळखीच्या कार्यक्रमात इथल्या घरांमधील आदरातिथ्याने आपण भारावून गेलो असल्याच्या भावना पर्यटकांनी व्यक्त केल्या.
कासव संवर्धनाचे काम करणा-या सुहास तोरसकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सरपंच सौ. रसिका पंडीत यांच्या हस्ते प्रातिनिधीक सत्कार करण्यात आला. किरात ट्रस्टचे अध्यक्ष श्रीधर मराठे यांनी कासव जत्रा हा उपक्रम सुहास तोरसकरांनी चालविलेल्या कासव संरक्षण आणि संवर्धनाला पूरक ठरेल, पर्यटनाच्या माध्यमातून गावाची नवी ओळख पर्यटन नकाशावर येईल अशी जत्रेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. सामाजिक कार्यकर्ते अवधूत नाईक, सरपंच रसिका पंडीत यांनीही उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
उद्घाटन कार्यक्रमानंतर प्राणीतज्ञ प्रा. मर्गज यांच्या ‘टॉक शो‘ कार्यक्रमांतर्गत त्यांनी कासवांच्या जगभरातील प्रजाती, कासवांच्या सवयी, कासवांचे प्रजनन याविषयी माहिती सांगून उपस्थितांचे शंका निरसन केले. दुपारच्या सत्रात आरती कुलकर्णी यांची ‘गाज‘ ही प्राणीजिवनावरील फिल्म दाखविण्यात आली. नंतरच्या चर्चासत्रात पत्रकार कुमार कदम यांनी या उपक्रमाचे कौतुक करुन सातत्याने असे उपक्रम कोकणकिनारपट्टीवर झाले पाहिजेत असे सांगून पर्यटकांनी याची प्रसिद्धी स्वतःहून करुन या कार्याला हातभार लावावा असे आवाहन केले.
सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सावरीश्वर दशावतार मंडळाच्या ‘कासव अवतार‘ या नवीन बसविण्यात आलेल्या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग सादर करण्यात आला.
दुस-या दिवशीच्या सत्रामध्ये आंतरराष्ट्रीय किर्तीचे चित्रकार व दाभोली गावचे रहिवासी अरुण दाभोलकर यांनी आपल्या चित्रकलेचा अविष्कार उपस्थित पर्यटकांसमोर दाखविला. सामाजिक कार्यकर्त्या वंदना करंबेळकर यांनी ग्रामिण भागातील स्त्री जीवनावर गप्पांच्या स्वरुपात संवाद साधला. सुहास तोरसकर यांनी चित्रित केलेल्या, विनायक वारंग आणि समिर बागायतकर यांनी संकलीत केलेल्या फिल्मचा शो दाखविण्यात आला. समिर बागायतकर यांच्या साकारलेल्या मालवणी गीतांचा कार्यक्रमाने संध्याकाळ रंगतदार केली. सायली फाटक, सीमा मराठे, संतोष नांदोसकर यांनी सादर केलेल्या गीतांना निलेश पेडणेकर, प्रथमेश गुरव, मार्यान फर्नांडीस यांनी संगितसाथ केली.
पर्यटकांनी डॉल्फिन दर्शन, जंगल भ्रमंती, विविध चर्चासत्रे या सर्व कार्यक्रमांत उत्स्फूर्त सहभाग घेतला. वायंगणी गावातील स्थानिक महिलांनी सौ. मंगल खडपकर आणि त्यांच्या सहका-यांनी उत्कृष्ट मालवणी पद्धतीचे घरगुती जेवण व न्याहारी देऊन त्यांची वायंगणी ट्रीप ख-या अर्थाने संस्मरणीय बनवली. जत्रेच्या ठिकाणी कासावल्ली कासवाची जन्मकथा सांगणारा फलक, कोकणी मेव्याचे स्टॉल यांना जिल्ह्यातील पर्यटकांनीही भेटी दिल्या.
वायंगणीचे सुपूत्र मुंबईचे दीपक दीनानाथ नाईक यांनी पर्यटकांना समुद्र सफरीसाठी वापरावयाची लाईफ जॅकेटस् या कार्यक्रमासाठी देऊन सहकार्य केले. तसेच तोरसकर यांच्या निसर्गमित्र मंडळाचेही उत्तम सहकार्य लाभले. वायंगणी बागायतवाडीतील स्थानिक लोकांच्या सर्व सोयी असलेल्या घरांमध्ये पर्यटकांची निवास व्यवस्था करण्यात आली होती. वायंगणी येथील डॉ. मिनाक्षी किर्लोस्कर मेमोरिअल ट्रस्टचेही चांगले सहकार्य मिळाले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थ चंद्रकांत पेडणेकर, सुहास तोरसकर, दीपक व अवधूत नाईक, तसेच समिर बागायतकर व त्यांचे सहकारी जितेंद्र वजराटकर, विक्रांत आजगावकर, पंकज शिरसाट व किरात परिवाराने परिश्रम घेतले.

विशेष बातम्या *
विद्यार्थ्यांनी शाळेचे ऋण विसरु नयेत! - वेंगुर्ला हायस्कूल शतकमहोत्सव वर्ष कार्यक्रम
पैसा ही खरी संपत्ती नसून शिक्षण हिच खरी संपत्ती आहे. ही संपत्ती जो इतरांना वाटतो, त्यांना परमेश्वर अधिकाधिक देतो. म्हणूनच प्राथमिक शाळेपासून महाविद्यालयापर्यंत शिक्षण घेतलेले विद्यार्थी आपल्या शिक्षकांना कधीही विसरु शकत नाहीत. माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आपल्या शाळेचे ऋण फेडण्यासाठी कार्य केले पाहिजे असे प्रतिपादन वेंगुर्ला हायस्कूल शतक महोत्सवी कार्यक्रमाचे उद्घाटक उद्योजक रघुवीर मंत्री यांनी केले.
वेंगुर्ला हायस्कूलचा शतक महोत्सवी कार्यक्रम २० डिसेंबर रोजी झाला. त्यावेळी कोल्हापूर चर्च कौन्सिलचे चिटणीस श्रीकांत पठाणे, माजी चिटणीस पी.बी.कांबळे, मुख्याध्यापक एस. बी.चोकाककर, पर्यवेक्षक आर.एस.तळसंदेकर, विद्यार्थी प्रतिनिधी अदिती वेंगुर्लेकर, नगरसेवक शैलेश गावडे,माजी विद्यार्थी सचिन वालावलकर, संजय पुनाळेकर, मुंबईहून गोविद उर्फ विजू गावडे, अॅड.शाम गोडकर आदी उपस्थित होते. यावेळी उद्घाटक रघुवीर मंत्री ५० हजार रुपयांची तर सचिन वालावलकर १० हजार रुपयांची देणगी दिली. संजय पुनाळेकर यांनी प्रवेशद्वार कमानीचे बांधकाम आणि विजू गावडे यांनी देणगी स्वरुपात प्रयोग शाळा बांधून दिली. यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. प्रवेशद्वार कमानिचे उद्घाटन श्रीकांत पठाणे तर प्रयोगशाळेचे उद्घाटन रघुवीर मंत्री यांच्या हस्ते झाले. माजी मुख्याध्यापक एस. एस. काळे, जे. एम. सामंत, श्रीमती परब, सौ.एच.एच.मुल्ला, जे. आर. पुराणिक, सौ.वृंदा कांबळी, के.एच.शेख, डी.आर.माने, ठेकेदार श्री. काळे सर आदींचा माजी विद्यार्थी विजू गावडे यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.
शालेय विद्यार्थ्यांचा बक्षिस वितरण सोहळा झाला. श्री. पठाणे यांनी या शाळेत ११वी च १२वी ज्युनिअर कॉलेज सुरु करण्याचा मानस व्यक्त करुन माजी विद्यार्थ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. याप्रसंगी वेंगुर्ला हायस्कूल माजी विद्यार्थी मित्रमंडळ मुंबईचे सचिव प्रताप पवार, सदस्य सुभाष दिपनाईक हेही खास उपस्थित होते.

जागृती फेस्टीव्हल उत्साहात संपन्न
जागृती क्रीडा-सांस्कृतिक मंडळाने गेली २३ वर्षे सातत्याने विविध स्पर्धा, कार्यक्रम, सामाजिक उपक्रम राबवून जिल्ह्यात आदर्श मंडळ म्हणून नावलौकि मिळविला ही वेंगुर्लेच्या दृष्टीने गौरवास्पद बाब असल्याचे नगराध्यक्ष सौ. नम्रता कुबल यांनी जागृती फेस्टीव्हलच्या उद्घाटनप्रसंगी सांगितले.
यावेळी सातेरी व्यायामशाळेचे संस्थापक व प्रशिक्षक किशोर सोन्सुरकर यांना जागृती गौरव पुरस्कार रत्नागिरी पं. स. गटविकास अधिकारी सुनिल रेडकर यांच्या हस्ते तर आदर्श बालवाडी पुरस्कार सौ. कांचन दामले यांना गटशिक्षणाधिकारी सौ. वंदना वळवी यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी जिल्हा युथ संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास गावडे, राष्ट्रवादीचे सचिन वालावलकर, जागृतीचे अध्यक्ष संजय मालवणकर, अमोल सावंत, प्रशांत मालवणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
फेस्टीव्हल निमित्त विविध स्पर्धेतील विजेते - वेशभूषा स्पर्धा - ४ गटात ५५ मुलांचा सहभाग होता. बालवाडी - १) भैरवी म. घाडी (शि.प्रा.अंगणवाडी), २)प्रसन्न प्र. नाईक (ज्ञानदा शिशु वेतोरे), ३) तन्वी श. परब (शिवाजी प्रा. अं.), उत्तेजनार्थ -हितेश येरम (दाभोली), श्रावणी न. गाडगीळ (ज्ञानदा वेतोरे), १ली ते २री - १)निर्जरा सं.पाटील (शाळा क्र.४),२)दिक्षा द.कामत (इं.मि. स्कूल),३)सिद्धी उ.परब (भटवाडी नं.१), उत्ते.-आदित्यराज शि. सावंत, सुयोग चा.जोशी, ३री ते ४थी - १) धीरज घाडी (शिवाजी प्राग.), २)प्रयाग मि. दामले (वेतोरे क्र.१), ३) पूर्वा चा.जोशी (भटवाडी नं.२), उत्ते.-मैथिली कि. सोनसुरकर, प्रबल अ. बिराजदार, ५वी ते ९वी - १) प्रणाली प्र. सातार्डेकर (वेंगुर्ला हाय.), २) अक्षय सं. पाटील (वेंगुर्ला हाय.), ३) गौरेश सु. कावले (वेंगुर्ला नं.३), उत्ते. -शुभम श. परब, ओंकार जनार्दन कासले
चित्रकला स्पर्धा-बालवाडी-श्रावणी पेडणेकर (भटवाडी नं.१), हर्षदा गावडे, पवन कांबळे (शिवाजी प्राग.), भुषण सावंत (वेंगुर्ले नं. ३), हेमांगी कुडपकर(भटवाडी नं.१) १ली ते २री - निर्जरा पाटील (शाळा क्र. ४), सिद्धी परब (भटवाडी नं.१), पूर्वा करंगुटकर (वेंगुर्ले नं. १), अक्षता परब (परबवाडा नं.१), प्रथमेश भगत (कणकेवाडी नं.१) ३री ते ४थी - अमरेन सावंत (सिधुदुर्ग विद्या.), वैष्णवी वराडकर (भिवजीवाडी वेतोरे), प्रज्वल कोयंडे, धिरज घाडी (शिवाजी प्राग.),आदेश धुरी(भिवजीवाडी वेतोरे), ५वी ते ७वी-संस्कृती कांबळी (वेंगुर्ले हाय.), गोविद सावंत (परबवाडा नं.१), वैभव जाधव (वेंगुर्ले हाय.), अनुष्का शिरसाठ (वेंगुर्ले नं. ३), प्रेम चोडणकर (वेंगुर्ले हाय.), ८वी ते १०वी -लक्ष्मी करंगळे,मोहन नवार (वेंगुर्ला हाय.), शुभम मांजरेकर, सुमित मांजरेकर (उभादांडा हाय.), श्वेता गावडे (अणसूर पाल), कर्णबधीर गट-ओंकार कांबळी, अभिषेक पाटील, सर्वेश कांबळी (सर्व कर्णबधीर विद्यालय शिरोडा)
मॅरेथॉन स्पर्धा- १०वर्षाखालील मुले-संदीप पाटील (शिवाजी प्राग.), योगेश वराडकर (भिवजीवाडी वेतोरे), विशाल पवार (परबवाडा क्र.१), शुभम मालवणकर (रामघाट शाळा), सुकृत दामले (आडेली-खुटवळ), सुजल जाधव (शाळा क्र. ४), उत्कर्षा भोवर (परबवाडा क्र.१), ऐश्वर्या मालवणकर (सिधुदुर्ग विद्या.), सेजल जाधव (शाळा क्र.४), सुशिला कांबळी (वेंगुर्ले क्र.४), समिक्षा भोवर (परबवाडा क्र.४), १२ वर्षाखालील मुले-मयूरेश घाडी (शिवाजी प्राग.)युवराज नाईक (सिधुदुर्ग विद्या.), बाळकृष्ण परब (परबवाडा क्र.१), प्रबल बिराजदार (सिधुदुर्ग विद्या.), धीरज घाडी (शिवाजी प्राग.),मुली- प्रणाली कुबल,गंगा वालावलकर, उत्कर्षा जाधव, पूर्वा परब (वेंगुर्ले क्र.४), सानिका कांबळे, ईशा मालवणकर (दोन्ही वेंगुर्ले क्र.३), मुले - विशाल बागायतकर(उभादांडा क्र.१), जमेरुद्दीन खान (वेंगुर्ले क्र.१)
नृत्य स्पर्धा -लहान गट-१) तन्वी परब (शि.प्रा.अं.), २) श्रावणी पेडणेकर (भटवाडी नं.१,अं.),३) ऋतुजा गावडे (शिवाजी प्राग.), उत्ते. - हेमांगी सं. कुडपकर (भटवाडी नं.१.अं.) व श्रावणी गाडगीळ (ज्ञा.शि.वेतोरे),मोठा गट -१) प्रचिती मालवणकर (सिधुदुर्ग विद्या.), २)लक्ष्मी प्रभुखानोलकर (मदर तेरेसा स्कूल), ३) प्रार्थना मातोंडकर (सिधुदुर्ग विद्या.), उत्ते.- निर्जरा पाटील (वेंगुर्ले नं. ४) व सानिका कांबळे (वेंगुर्ले नं. ३)
ग्रुपडान्स स्पर्धा -लहान गट -१) शिवाजी प्रागतिक अंगणवाडी, २) ज्ञानदा शिशुवाटीका वेतोरे, ३) शेणई बालवाडी, उत्तेजनार्थ - वेंगुर्ले नं. ३ अंगणवाडी, मोठा गट - १) दाभोली शाळा नं. १, २) भिवजीवाडी शाळा वेतोरे, ३) श्री देवी सातेरी हायस्कूल, वेतोरे, उत्तेजनार्थ - दाभोली हायस्कूल व मोरया ग्रुप वेंगुर्ले
पाककला स्पर्धा-१)सौ.संध्या खांबकर, २) वैशाली वैद्य, ३) श्रद्धा गोरे, उत्तेजनार्थ-सौ. कविता भाटीया, सौ.मनाली पिगुळकर, परिक्षण-सौ.स्नेहांकिता साने, सौ.श्रद्धा बेलवलकर यांनी केले.
बक्षिस वितरण नगरसेवक प्रसन्ना कुबल, अभी वेंगुर्लेकर, महेश वेंगुर्लेकर, वामन कांबळे, सौ. सुषमा प्रभूखानोलकर, सौ. हेमा गावसकर, दादा आरोलकर यांच्या हस्ते झाले.

सुदेश आचरेकरांना तूर्त राजयोग
मालवणात काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने अपक्ष म्हणून निवडणुक लढवून विजयी झालेले महेश जावकर यांनी आपल्या एका मतामुळे काँग्रेस पक्षाकडे नगराध्यक्ष पद जाऊ नये यासाठी राष्ट्रवादीची साथ करण्याचे ठरविले आणि राष्ट्रवादीचे ६ आणि शिवसेनेचे २ मिळून ८ नगरसेवकांनी जावकर यांनाच नगराध्यक्ष -पदी बसविण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे सौ. कासवकर यांनी त्यांचा उमेदवारी अर्जही भरला. काँग्रेसतर्फे सुदेश आचरेकर यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला.
जावकरांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप नोंदवितांना राष्ट्रवादीच्या कासवकर यांना जावकर यांनी प्रधिकृत केल्याचे पत्र नव्हते. त्यामुळे जावकरांचा अर्ज विभागीय आयुक्त व नंतर न्यायालयाने अपात्र ठरविला. त्यामुळे सुदेश आचरेकरना एक मत कमी असूनही मालवणच्या नगराध्यक्षपदाची खुर्ची मिळाली आहे.
राष्ट्रवादीतर्फे जावकरांचा अर्ज भरतांना केलेली घाई आणि गलथानपणा राष्ट्रवादीच्या अंगाशी आला. तरीही एका बहुमताच्या आधारे नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी महेश जावकर यांचीच निवड करुन राष्ट्रवादीने विषय समित्याही मित्रपक्षाच्या साथीने आपल्याकडे राखल्या.

Thursday, 22 December 2011

अंक ४६वा, २२ डिसबर २०११

अधोरेखित *
निळ्या ज्योतिची क्रांती
कोकणातील गाव म्हटल्यावर मागे डोंगररांगा व माडांच्या गर्द छायेमध्ये कौलारु घरं व त्या घरांच्या छपरातून येणा-या धुरांच्या रांगा असं रमणीय चित्र सर्वांना दिसतं. ‘चुलीतील धूर‘ कौलांच्या फटीतून येतो तेव्हा घर सुद्धा विडीचा धूर बंद ओठातून सोडणा-या कोकणी माणसासारखं बेरकी दिसतं. पण जी महिला चुलीसमोर बसून जेवण करते तिच्यासाठी मात्र ती चूल सखी नसते. धुरामुळे तिचा जीव घुसमटतो, डोळे चुरचुरतात, खोकला येतो, भांडी काळी होतात. पावसाळ्यातील भिजलेली, दमट लाकडं पेटविताना जीव नकोसा होतो. बाहेरच्या पडवीत बसून ‘‘च्याय करुक इतको वेळ लागता?‘‘ म्हणणा-या नवरोबाला याची कितपत जाणीव असते? आम्ही धूरमुक्त गावाची स्वप्नं पाहिली. आज स्वप्न सत्यामध्ये उतरत आहे. बायोगॅसच्या ‘निळ्या ज्वाळा‘ ही क्रांती घरोघरी घडवत आहे.
पाच ते सहा माणसांच्या कुटुंबाला वर्षभरात ६ बैलगाड्या लाकूड इंधनासाठी लागतं. म्हणजे २५० घरांसाठी १५०० बैलगाड्या लाकूड वर्षासाठी लागते. चुलीची कार्यक्षमता ३५ टक्के असते. धुरामधील कार्बन मोनॉक्साइड वायू अधिक विषारी असतो. पांढ-या धुरामध्ये हा अधिक असतो. आम्ही गावांचे सर्व्हे केले. किती कुटुंबांकडे जनावरे आहेत? वृक्षतोड किती होते? बायोगॅस बांधणार का? असे मोजके पाच प्रश्न सर्व्हेमध्ये असतात. बंद पडलेले बायोगॅस सुरु करण्यात आले. नवीन पद्धतीचा फेरोसिमेंटचा ‘दिनबंधु बायोगॅस‘ बांधण्याचे प्रशिक्षण गवंड्यांना बँक ऑफ इंडिया व नाबार्डच्या सहकार्याने दिले. गावामध्ये गवंडी प्रशिक्षणं घेतली. माहितीचे फलक लावले. म्हणता म्हणता १२०० बायोगॅस पूर्ण झाले. २०२० पर्यंत २० हजार बायोगॅस बांधण्याचा संकल्प आहे.
बायोगॅस बांधण्यासाठी देवाचा कौल घेणारे ‘श्रद्धाळू‘ ही भेटले. गावातील घाडी, गुरव, भटजी हे खरं तर ‘ओप्पीनियन मेकर‘ असतात. त्यांचे बायोगॅस अग्रक्रमाने बांधले. आता अडचण येत नाही. गॅस बांधायचा तर १५ हजार रु.चा खर्च. एवढे पैसे कुठून आणणार? जिल्हा बँकेचे सतीश सावंत, अनिरुद्ध देसाई व नाबार्डचे चंद्रशेखर देसाई यांच्यामुळे गॅससाठी १२ हजार रु.चे कर्ज मिळणे सुलभ झाले. ३००० रु. शेतकरी उभे करतो. एकट्या होडावडे शाखेमध्ये १४० कर्जप्रकरणे झाली. म्हणजे १६ लाख ८० हजार रुपये. शाखाधिकारी श्री. कोचरेकर यांनी खूप मदत केली. गवंड्यांना गाडी घेण्यासाठी बँकेने कर्जे दिली. त्यामुळे लांब जाणे सोपे झाले. आज आपले गवंडी रत्नागिरी जिल्ह्यामध्येही काम करतात. ५० गवंड्यांची टीम आहे. वर्षाकाठी प्रत्येकजण ५० हजार रु.चे काम करतो. श्रमाला ज्ञान व तंत्राची जोड मिळाली. स्वप्नवत वाटणारे काम सत्यामध्ये उतरले. महिलेला जेवण करणे आनंददायी झाले. बायोगॅसच्या निळ्या ज्योतीची ‘सखी‘ तिला मिळाली. बचत गटाच्या बैठकांना ती हजर राहू लागली. घुसमटणा-या महिलांना ‘श्वास‘ घ्यायला उसंत मिळाली.
‘मिथेन‘ हा वायू कुजण्याच्या प्रक्रियेमध्ये तयार होतो. बायोगॅसमधील या वायूमुळे जेवण होते, गॅस पेटतो. पण हा वायू वातावरणामध्ये गेल्यास पर्यावरणाचे तपमान वाढते. ग्लोबल वॉर्मिग होते. रोटरी क्लब, माहिम-मुंबई ३१४० या क्लबने धूरमुक्त गावासाठी मोठे आर्थिक सहकार्य केले. अवधूत ट्रस्ट, मुंबई, तपोवन संस्था या सर्वांच्या सहकार्यामुळे कामाची गती वाढली. बायोगॅसमुळे जंगलतोड वाचली. सेंद्रिय खत मिळाले. ‘बायोगॅस‘ हा कल्पवृक्ष ठरत आहे. गवंड्यांना यामधून ‘ग्रीन करीअर‘ मिळाले. कोकणी माणूस आळशी नाही. कोणी तरी ‘लढ‘ म्हणणारे लागतात. ‘पाठीचा कणा‘ ताठ असतोच. भगीरथ या सर्वांमध्ये आपलं होऊन राहिलं. यातून विकासाची प्रक्रिया सुरु झाली.
आज आपण ‘स्टील‘ ऐवजी कोकणातील माणगा (बांबू) वापरुन बायोगॅस बांधत आहोत. त्यामुळे २ हजार रुपये वाचतात. या प्रयोगासाठीही ‘नाबार्ड‘कडे प्रस्ताव पाठविला आहे. बाई म्हणजे ‘चूल आणि मूल‘ हे आता जुनं झालं. गॅसमुळे जेवण करायचा वाचलेला वेळ कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्ध व्यवसाय यासाठी वापरला जात आहे. ‘सावित्रीच्या लेकी‘ मळलेल्या वाटांचे रुपांतर हमरस्त्यांमध्ये करीत आहेत. गॅस पेटल्यानंतर पाणावणारे डोळे खूप खूप समाधान देत आहेत. आपल्या गावामध्येही असं घडू दे ही ‘पाषाणाला‘ प्रार्थना!
-डॉ. प्रसाद देवधर, भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठान,झाराप,ता. कुडाळ. ९४२२५९६५००.

संपादकीय *
निवडणुकीनंतर*.
नगरपरिषद निवडणुकांचा शिमगा संपला असला तरी कवित्व उरले आहे. जिल्ह्यातील तीनही नगरपरिषदांच्या ५१ जागांपैकी केवळ ९ जागाच मिळवू शकलेल्या नारायण राणे समर्थक काँग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांनी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांत राष्ट्रवादी व त्यांच्या मित्रपक्षांना धूळ चारुन काँग्रेसच सत्तेवर येईल अशी विधाने करणे सुरु केले आहे. वेंगुर्ल्यात राणे समर्थक सशस्त्र गुंडांनी ५ डिसेंबरच्या रात्री राडा केला. तरीही तो शिवसेना- राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घडवून आणला असे राणेंसह सर्वजण जाहीरपणे रेटून खोटेच सांगत राहिले. अर्थात तीन्ही नगरपरिषदांमध्ये नागरिकांनी काही बोलता त्यांच्या विरोधात कौल देऊन खोट्या प्रचाराला मतदान यंत्रातूनच एक प्रकारे उत्तर दिले आहे.
या सर्वातून बोध घेऊन राणे समर्थक काँग्रेसने समजूतदारपणाने आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत या जिल्ह्यात राष्ट्रवादीशी आघाडी केली तर त्यामध्ये अर्थातच राष्ट्रवादीला झुकते माप देणे भाग पडेल. राष्ट्रवादी पक्ष त्याचा लाभ घेतल्याशिवाय राहणार नाही.
राज्यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी अशी आघाडी सत्तेवर आहे. आत्ताच्या अनेक नगरपालिकांमध्ये दोन्ही पक्षांच्या आघाडीने निवडणुका लढवून यश प्राप्त केले. जिथे शक्य होते तिथे स्वबळावर यश मिळविले. आपल्या नजिकच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्येही मध्यंतरी नारायण राणे विरुद्ध भास्कर जाधव असा दोन मंत्र्यांमध्ये कलगी तुरा रंगूनही त्या जिल्ह्यात आघाडी होऊ शकली. त्यामुळे माफक यश मिळाले. दोन्ही काँग्रेसने एक पाऊल मागे घेण्याचे ठरवून येती जिल्हा परिषद एकत्र येऊन लढविली तर त्यांचीच सत्ता येऊ शकते. त्यामुळे शिवसेना-भाजप-आरपीआय या युतीला सत्तेपासून वंचित रहावे लागेल.
परंतू अन्य जिल्ह्यात काँग्रेस -राष्ट्रवादी पक्षात तीव्र स्वरुपाचे मतभेद असूनही तेथे काही ठिकाणी दोन्ही पक्षांची आघाडी झाली तशी सिधुदुर्ग जिल्ह्यात होईल याची शक्यता कमीच आहे. निवडणुक प्रचारात आरोप-प्रत्यारोप अगदी खालच्या पातळीवर जाऊन झाले. वेंगुर्ल्यात नारायण राणेंच्या पुत्राला घेराव घातल्याने संतप्त झालेल्या पालकमंत्री राणेंनी स्वतः जातीनिशी येऊन सशस्त्र कार्यकर्त्यांकरवी जमावावर हल्ला चढविला. स्थानिक कार्यकर्त्यांना षंढ म्हणून त्यांचा ‘स्वाभिमान‘ डिवचला आणि त्यांनाही लाठ्या-काठ्या घेऊन वाहनांची मोडतोड करण्यास उद्युक्त केले. हे सर्व शेकडोंच्या संख्येने जमलेल्या लोकांनी आणि ‘बंदोबस्ता‘साठी आलेल्या पोलिसांनीही प्रत्यक्ष पाहिले तरी हा हल्याचा कट शिवसेना, राष्ट्रवादीनेच घडवून आणला असे टी. व्ही. वाहिन्यांवरुन आणि प्रचारसभांतून खोटेच सांगितले. या खोटेपणाचीच चीड येऊन काँग्रेसचे म्हणून असलेले बरेच मतदान विरोधात गेले. आता वेंगुर्ले पोलिसांनी निवडणुका संपल्यावर आठवडाभराने त्यावेळी जमावातील असलेल्या काही तरुणांवर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरुन गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. असे करुन बाहेरुन आलेल्या लाठ्या, शिगा, तलवारींनी जमावावर हल्ला करुन वाहनांची मोडतोड करणा-यांवर काहीच कारवाई न करणारे पोलीस पक्षपात करीत आहेत. यामुळे राजकीय वातावरण आणखीच गढूळ बनले आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांवरही त्याचा परिणाम होऊन काँग्रेस पक्षाला ती निवडणुकही जड जाईल. तसेच घडावे असे वेंगुर्ले पोलीसांचे धोरण नसेलच असे म्हणता येणार नाही. कारण राष्ट्रवादीचे आबा पाटील यांच्याकडेच तर मंत्रिमंडळातील महत्त्वाचे गृहखाते आहे!
या निवडणुकीत नारायण राणे व व राष्ट्रवादीचे आमदार केसरकर यांच्यात तशी दिलजमाई होणे सध्या तरी शक्य दिसत नाही. कारण दोन्ही पक्षांनी आत्ताची निवडणुक पक्षाबरोबरच वैय्यक्तिक प्रतिष्ठेची केली होती. वेंगुर्लेतील राडा प्रकरणामुळे जनमत काँग्रेसविरोधात गेल्यामुळे सत्तेसाठी काँग्रेसशी दिलजमाई करणे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनाही मानवणारे नाही. न. प. निवडणुकीतील अपयशामुळे शिवसेनेने भाजपा - राष्ट्रवादी युतीमध्ये सामील होण्याचे ठरविले तर सिधुदुर्ग जिल्हा परिषदेवर या महायुतीला आपली सत्ता प्रस्थापित करता येईल.
हे सर्व पक्षशिस्तीत बसत नसले तरी सर्वच पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने केंद्रात व राज्यात आघाडी, युती केलेली असली तरी स्थानिक पातळीवर पक्षाला फायदा होईल अशा प्रकारे आघाडी, युती करण्यास स्थानिक पक्ष नेतृत्वाला तोंडी संमत्ती दिलेली आहे. त्यामुळेच यावेळच्या न. प. निवडणुकांत काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी, शिवसेना विरुद्ध भाजप, काँग्रेस-सेना-भाजप युती, राष्ट्रवादी-सेना-भाजप युती अशा अजब युत्या आणि आघाड्या मतदारांना पहावयास मिळाल्या त्यातून जनतेचे मनोरंजन झाले असले तरी फायदा मात्र कोणताच होणारा नाही. फायदा होईल तो निवडून आलेल्या उमेदवारांचा आणि राजकीय पक्षांचा.

विशेष *
जतन आणि संवर्धन मंदिराचे
सन २००८ पासून एल.एस. रहेजा स्कूल ऑफ आर्किटेक्चर, बांद्रा चे विद्यार्थी सिधुदुर्गातील प्राचीन मंदिरांच्या उभारणीचा, स्थापत्यशास्त्र, वास्तूवरील चित्रकला यांचा अभ्यास करण्यासाठी प्राचार्य ए. एम. खानोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक वर्षी येत आहेत. यावर्षी वेंगुर्ले येथील रामेश्वर आणि सातेरी मंदिरांचा अभ्यास हे विद्यार्थी करीत आहेत.
आपल्याकडची जवळपास सर्वच मंदिरे ३०० पेक्षा जास्त वर्षांचा इतिहास असणारी, कोकणी आणि पेशवाई वास्तुशैलीचा सुंदर मिलाफ दर्शविणारी आहेत. ‘किरात‘च्या २४ नोव्हेंबरच्या ‘शा.प.लो.पु.‘ पुरवणीत अशी प्राचीन मंदिरे झपाट्याने कमी होत असल्याची खंत मांडली होती आणि त्यावर उपाय योजनाही सुचविल्या होत्या. अशा प्रकारचे जतनीकरणाचे काम गिर्ये-विजयदुर्गच्या रामेश्वर मंदिरात सुरु आहे. प्राचिन बांधकाम जतन करणे, नव्या स्वरुपात डागडुजी करणे या सर्वांना खर्च प्रचंड येतो. पण हे बांधकाम १०० वर्षांपेक्षा जास्त टिकावू असते. स्लॅबच्या बांधकामाची हमी १० वर्षांपेक्षा जास्त कोणताही स्थापत्यकार देऊ शकत नाही. हेच मत एल. एस. रहेजा स्कूल ऑफ आर्किटेक्चरचे प्राचार्य अरविद खानोलकर यांनी मांडले आहे.
प्राचार्य खानोलकर गेली ४ वर्षे आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना इथल्या बांधकामाचा, कलेचा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष फिल्डवर अनुभव घेता यावा म्हणून सिधुदुर्गात असे अभ्यासदौरे आखत आहेत. त्यांचे मुख्य उद्देश शहरातील विद्यार्थ्यांना पुरातन स्थापत्य बांधणीचा प्रत्यक्ष अनुभव देणे आणि गावातील मंदिरे पाहायला बाहेरुन अभ्यासक येत आहेत हे पाहिल्यावर पर्यटन वाढीलाही हातभार लागेल. त्यानिमित्ताने मंदिरांची साफसफाई होते.
स्थापत्यशास्त्र हे जगभर समान आहे. फक्त फरक असतो तो वास्तूच्या बांधणीमध्ये आणि रचनेत. कोकणातल्या मंदिरांचे वैशिष्ट्य म्हणजे कौलारु, लाकडी खांबावर कोरीवकाम असणारी आणि गोव्याप्रमाणे भव्य.
अलिकडे जीर्णोद्धार करणे म्हणजे जुनी मंदिरे पाडून झटपट वर्षभरात उभी रहाणारी सिमेंट काँक्रीटची मंदिरे उभी करणे हा ट्रेंड रुजला आहे. खानोलकरांच्या मते वास्तवात विचार करता जुन्या पद्धतीची टिकावू लाकडे आज मिळणे अवघड आहे. त्यामुळे जिथे शक्य असेल ते जसेच्या तसे जतन करण्याचा प्रयत्न व्हायला हवा आणि जिथे अजिबातच शक्य नाही त्या ठिकाणी वेगळा विचार करायला हवा. उदा. मंदिरांचे जीर्णोद्धार करताना पुरातनपण टिकवायचे असेल तर प्राधान्यक्रमाने कामे हाते घ्यावीत. म्हणजे खांब, तुळया, वाशे ही कामे एकहाती पूर्ण केली पाहिजेत. नंतरच्या टप्प्यात कोरीव काम, फरशा घालणे अशी कामे करावीत. म्हणजे आर्थिक नियोजनही करता येते. अशा जतन करण्याच्या कामांना खर्च जास्त येतो. पण आपली प्राचिन वारसा सांगणारी संस्कृती, स्थापत्यकला जतन करण्याची जबाबदारी आपलीच आहे. नाहीतर पुढच्या काही वर्षात आर्किटेक्चरच्या नवीन मुलांना इथे काय दाखवायचे?
मंदिरांच्या जतन आणि संवर्धन करण्याच्या प्रक्रियेमध्ये कारागिरांचा विचारही व्हायला हवा. साधारणतः दीडशे ते दोनशे वर्षांनी मंदिरे दुरुस्तीला येतात. आपल्याकडे कारागिर मिळत नाहीत अशी ओरड असते. त्यामुळे स्थानिक कारागिरांना प्रशिक्षण देणे, त्यांची टीम बनविणे, सर्वांनी केलेल्या कामाच्या लिखित नोंदी ठेवणे आवश्यक आहे. म्हणजे कारागिर आयात करणे थांबेल आणि इथल्याच हातांना काम मिळेल.

विश्वविक्रमाचा ध्यास
मठ येथील प्रतिथयश शेतकरी भगवान उर्फ भाऊ बोवलेकर यांनी वांग्याच्या विक्रमी उंचीच्या झाडाची दखल लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड यांनी घेतल्यानंतर त्यानी आता मिरचीचे झाड १६.२ फूट उंच वाढवून आणखी एक विक्रम केला आहे.
पहिल्या वांग्याच्या प्रयोगात समाधान न मानता आपल्या संशोधनातून अनेक झाडांची उंची वाढविण्याचे त्यांनी ठरविले आणि काम सुरु केले आहे. आपल्या शेतात मिरचीचे उत्पादन घेताना केवळ मिरचीची लागवड शेती म्हणून न पाहता लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये मिरचीच्या झाडाच्या उंचीची नोंद १६ फूट झालेली आहे. आपणही यापेक्षा उंच मिरचीचे झाड वाढवावे ही प्रेरणा त्यांनी घेतली आहे. आपल्या विशिष्ट प्रकारच्या सेंद्रीय खताच्या संशोधनातून त्यांनी मिरचीचे झाड तब्बल १६.२ फूट उंच वाढविण्यात यश मिळविले आहे. शिवाय आणखीन काही झाडे ८ फूटांपेक्षा उंच वाढलेली आहेत.
या मिरचीच्या झाडापासून दर महिन्याला साधारणतः एक ते दीड किलो मिरचीचे उत्पादन मिळते. सदरच्या मिरचीचे झाड हे लांब मिरचीचे आहे. हे मिरचीचे बियाणेसुद्धा बाजारातून मसाल्यासाठी आणलेल्या मिरचीच्या बिया वाफ्यावर रुजवून रोपे तयार केली व उंची वाढविण्यासाठी एका झाडावर प्रयोग केला. सदरच्या झाडाचे बियाणे ४ एप्रिल २०११ रोजी रुजवून त्यावर कोणत्याही प्रकारचे बाजारी खत अथवा कीटकनाशकांचा वापर केलेला नाही.
केवळ स्वतःच्या कल्पकतेने व तयार केलेल्या सेंद्रीय खताचा वापर करुन मिरचीचे झाड १६.२ फूट वाढविण्यात बोवलेकर यशस्वी झाले आहेत. हे उंच मिरचीचे झाड लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, तसेच गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होण्यास सिद्ध झाले आहे. याबाबत अनेक मान्यवरांकडून भाऊ बोवलेकर यांचे कौतुक होत आहे. तसेच हे मिरचीचे झाड पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.
शेतीविषयक प्रयोगांच्या माहितीसाठी संफ- भाऊ बोवलेकर ः ९४२२२१६३६५.

कॉ. वैदेही पाटकर पुरस्कार वितरण
महिलांवरील अन्यायाच्या विरोधात प्रत्यक्ष कृती करुन त्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य करणा-या आणि त्यांना आत्मनिर्भर होण्यास सहाय्य करणा-या चेतना महिला संस्था, पुणे च्या वेंगुर्ले केंद्रातील सुप्रिया नवार, सायली कोचरेकर, लुड्डीन फर्नांडीस, इजाबेल डिसोजा, अंकिता बांदेकर, अक्षता साळगावकर तसेच बांबोळी रुग्णालयातील कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या अनिशा नाईक यांना यावर्षीचा पहिलाच काँम्रेड वैदेही पाटकर स्मृती पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
कोलगाव येथील निरामय विकास केंद्राच्या सभागृहात ११ डिसेंबरला झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोवा येथील लेखिका नमन सावंत, प्रमुख पाहुण्या सुप्रसिद्ध लेखिका व विचारवंत श्रीमती विद्या बाळ, खनिज प्रकल्पा विरोधात लढा देणा-या कळणे सरपंच सौ. संपदा देसाई या होत्या.
बांदा येथील लोकलढ्यात समर्थ नेतृत्व करणा-या परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्या वैदेही आनंद पाटकर यांच्या नावे हा पुरस्कार देणारे त्यांचे सुपूत्र डॉ. रुपेश पाटकर यांनी या पुरस्कारामागची भूमिका स्पष्ट केली. अॅड. शशांक मराठे यांनी पुरस्कार मिळालेल्या महिलांच्या कार्याचा परिचय करुन दिला. निरामय केंद्राच्या संचालिका वंदना करंबेळकर, पुरस्कार विजेत्या महिला, प्रमुख पाहुण्या व अध्यक्षांनी मनोगत व्यक्त केले. प्रसाद घाणेकर यांनी सुत्रसंचालन केले.
कार्यक्रमास चेतना संस्थेच्या संचालिका अॅड. असुंता पारधे, लेखिका सौ. उषा परब, विनया बाड, आरती कार्लेकर आदी विविध क्षेत्रातील व संघटनांमधील कार्यकर्ते उपस्थित होते.

विशेष बातम्या *
वेंगुर्ले नगराध्यक्षपदी नम्रता कुबल तर उपनगराध्यक्षपदी रमण वायंगणकर
वेंगुर्ले नगरपरिषदेच्या अध्यक्षपदी सौ. नम्रता नितीन कुबल यांची पुन्हा एकदा बिनविरोध निवड झाली आहे. पाच वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून निवडून आल्यावर पहिल्या अडीच वर्षांकरिता त्यांची नगराध्यक्षपदी निवड झाली. त्यावेळी राष्ट्रवादीचे चारच उमेदवार निवडून आले होते. त्यांना शिवसेना आणि भाजपचे प्रत्येकी दोन आणि एक अपक्ष उमेदवार गिरगोल फर्नांडीस यांचा पाठिबा मिळाला. त्यावेळी नगराध्यक्षपद हे महिलांसाठी आरक्षित होते. पुढील अडीच वर्षांकरिता त्याच अपक्षाच्या पाठिब्यावर संदेश निकम नगराध्यक्ष झाले होते.
यावेळीही नगराध्यक्षपद हे इतर मागास महिलांसाठी आरक्षित असल्याने आणि नवीन कौन्सीलमध्ये राष्ट्रवादीचेच बारा सदस्य निवडून आल्यामुळे त्यांना कोणत्याही पक्षाच्या पाठिब्याची जरुरी नव्हती. शिवाय सौ. नम्रता कुबल या पूर्वाश्रमीच्या केळुसकर म्हणजे इतर मागास प्रवर्गात येणा-या भंडारी ज्ञातीमधील असल्याने त्यांचे नाव नगराध्यक्षपदासाठी अपेक्षित होतेच. इतर मागास प्रवर्गातील माजी नगराध्यक्षा सौ. सुलोचना तांडेल याही नगराध्यक्षपदाच्या दावेदार होत्या. परंतु त्यांनी यापूर्वी पाच वर्षे नगराध्यक्षपद भूषविलेले होते. तसेच डॉ. सौ. पूजा कर्पे आणि सौ. अन्नपूर्णा नार्वेकर या राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीपर्यंत काँग्रेसतर्फे उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्नशील होत्या. तेथे उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करुन उमेदवारी मिळविली आणि राणे समर्थक काँग्रेस विरोधी लाटेत त्या निवडूनही आल्या. या सर्व पार्श्वभूमीचा विचार करुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सौ. नम्रता कुबल यांचीच निवड करुन नगराध्यक्ष पदासाठी त्यांचा उमेदवारी अर्ज भरला. अन्य कोणाचाही अर्ज नसल्याने सौ. नम्रता कुबल यांचे नगराध्यक्षपद निश्चित झाले.तसेच राष्ट्रवादीची उमेदवारी न मिळालेले रमण वायंगणकर हे अपक्ष म्हणून निवडून आले आणि ते राष्ट्रवादी पक्षाबरोबरच राहिल्याने त्यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.
सावंतवाडी नगरपरिषदेत प्रेमानंद उर्फ बबन साळगावकर व उपनगराध्यक्षपदी राजन पोकळे यांची बिनविरोध निवड झाली. तर मालवण नगरपरिषदेत काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने अपक्ष म्हणून निवडून आलेले महेश जावकर यांना राष्ट्रवादीच्या सहा आणि शिवसेनेच्या दोन नगर सेवकांचा पाठिबा मिळाल्याने त्यांनी उमेदवारी अर्ज भरला, पण त्यात त्रुटी असल्याची हरकत काँग्रेसने घेतल्यामुळे ही निवडणुक पुढे ढकलण्यात आली.

१० जणांची अनामत जप्त
वेंगुर्ले नगरपरिषदेच्या निवडणुकीत पराभूत झालेल्यांपैकी १० उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. प्रभाग एकमधून नागेश मोहन गावडे (काँग्रेस), सिप्रियान तमास फर्नांडीस (मनसे), उपनगराध्यक्ष गिरगोल संतांन फर्नांडीस (काँग्रेस), भूषण उर्फ समीर भगवान सारंग (अपक्ष). प्रभाग २ मधून राधा सह्याद्री सावंत (शिवसेना), निलेश मोहन परब (अपक्ष), अल्ताफ हमीद शेख (शिवसेना), प्रभाग तीनमधून मनीष वामन सातार्डेकर (मनसे), प्रभाग चारमधून अलिशा जाफर शेख (अपक्ष) अशा १० उमेदवारांची एकूण ९ हजार रुपये अनामत रक्कम जप्त झाली.

जागृती फेस्टीव्हल २४ व २५ रोजी
वेंगुर्ले येथील जागृती क्रीडा-सांस्कृतिक मंडळाच्या २३व्या जागृती फेस्टीव्हल २०११ चे आयोजन सिद्धिविनायक मंगल कार्यालयात २४ व २५ डिसेंबर रोजी करण्यात आले असून या फेस्टीव्हलचे उद्घाटन २४ डिसेंबरला सायंकाळी ६ वाजता वेंगुर्लेच्या नगराध्यक्ष सौ. नम्रता कुबल यांच्या हस्ते होणार आहे.
दि.२४ रोजी सायंकाळी जागृती गौरव पुरस्कार वितरण, ‘आई‘ या विषयावरील कविता लेखन स्पर्धेचे बक्षिस वितरण, ७ वा. वेशभूषा स्पर्धा, ८ वा. नृत्यस्पर्धा. दि. २५ रोजी सकाळी ८ वा. कॅम्प मैदानावर मॅरेथॉन स्पर्धा, १० वा. सिद्धिविनायक मंगल कार्यालयात बालकुमार चित्रकला स्पर्धा, सायं. ४ वा. महिलांसाठी बटाटीपासून गोडपदार्थ बनविण्याची पाककला स्पर्धा. सायं. ६ वा. आदर्श बालवाडी पुरस्काराचे वितरण. ७ वा. ग्रुपडान्स स्पर्धा, रात्रौ १० वा. फेस्टीव्हलचा समारोप. या फेस्टीव्हलला वेंगुर्लेवासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जागृती मंडळाचे अध्यक्ष संजय मालवणकर व सचिव अमोल सावंत यांनी केले आहे.

Thursday, 15 December 2011

अंक ४५वा, १५ डिसबर २०११

अधोरेखित *
दहशतवादला झटका
उद्योगमंत्री नारायण राणे आणि त्यांच्या समर्थकांना वेंगुर्ले आणि सावंतवाडी नगरपालिकांमध्ये भुईसपाट करुन त्यांच्या दहशतवादाला मतदारांनी लोकशाही मार्गाने जोरदार झटका दिला आहे. त्यामानाने मालवण नगरपरिषदेत त्यांना निसटते यश मिळाले असले तरी त्यासाठी त्यांना सत्तेकरीता अपक्षाला हाताशी धरावे लागणार आहे. राणे आणि त्यांच्या पुत्राने वेंगुर्ल्यात केलेल्या उद्योगांमुळे जनमत त्यांच्या पूर्ण विरोधात गेले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सावंतवाडी नगरपरिषदेवर पूर्वीपासून राष्ट्रवादीचेच वर्चस्व होते. आमदार दीपक केसरकर यांना शह देण्यासाठी राणे समर्थकांनी जंगजंग पछाडले. खुद्द मुख्यमंत्री काँग्रेसच्या प्रचाराला आले. परंतू सावंतवाडीत १०० टक्के, १७ पैकी १७ जागा जिकून राष्ट्रवादी पक्षाने आपले वर्चस्व अबाधित ठेवले एवढेच नव्हे तर राणे समर्थक काँग्रेसच्या खोट्या प्रचाराचा बुरखाही फाडला आहे.
हीच गोष्ट वेंगुर्ल्यातही घडली. येथे राष्ट्रवादीला १२ जागा मिळाल्या तर राष्ट्रवादीबरोबर युती केलल्या भारतीय जनता पक्षाला २ जागा मिळाल्या. १ जागा मनसेला तर काँग्रेसपक्षाला एकमेव जागा मिळविता आली. राष्ट्रवादीकडून उमेदवारी नाकारल्याने अपक्ष म्हणून बंडखोरी केलेले रमण वायंगणकर हे मूळचे राष्ट्रवादीचेच उमेदवार विजयी झाले आहेत. वेंगुर्ल्यात यापूर्वी काँग्रेसची सत्ता होती ती केवळ अडीच वर्षापुरती. यापूर्वी ४ राष्ट्रवादी, २ सेना, २ भाजप आणि १ अपक्ष अशा ९ जणांच्या गटाचे बहुमत झाल्यामुळे राष्ट्रवादीच्या सौ. नम्रता कुबल यांची नगराध्यक्ष झाल्या. त्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाल संपल्यावर पुन्हा पुढील अडीच वर्षासाठी नगराध्यक्ष निवडतांना चारच जागा मिळालेल्या काँग्रेसला ४ अपक्ष आणि आधीच्या सत्ताधारी गटातील एका अपक्षाच्या साथीने ९ जणांचे बहुमत करुन अडीच वर्षाचे नगराध्यक्षपद मिळाले होते.
सिधुदुर्ग जिल्ह्यात तीन्ही नगरपालिकांवर काँग्रेस पूर्ण बहुमतात येईल असे ठामपणे सांगणा-या राणे समर्थकांचा मुखभंग झाला आहे. विकासाच्या खोट्या गोष्टी सांगणा-या राणे आणि त्यांच्या समर्थकांनी वेंगुर्ल्यात ५ डिसेंबरला जो काही राडा केला तो शिवसेना आणि राष्ट्रवादीनेच केल्याचे जाहीर सभेतून सांगून खोट्या प्रकाराची त्यांनी कमालच केली होती. परंतू वेंगुर्ल्यातील सूज्ञ मतदारांनी राणेंच्या विरोधात कौल देऊन आपली कमाल दाखविली आहे. त्याचबरोबर राणे ज्या शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आले. त्या शिवसेनेच्या जशास तसे उत्तर देण्याच्या भाषेलाही मतदानातून विरोधी कौल देत राडा संस्कृतीला वेंगुर्ल्यात स्थान नाही हे दाखवून दिले आहे. वेंगुर्ले व सावंतवाडीत शिवसेनेचा एकही उमेदवार निवडून आला नाही.
मालवणात केवळ २ जागा मिळाल्या. ६ जागा जिकणा-या राष्ट्रवादीला राष्ट्रीय काँग्रेसने उमेदवारी नाकारलेल्या एका अपक्षाला साथीला घेऊन मालवण नगरपरिषदेवर सत्ता हाती घेता येईल.
येत्या दोन महिन्यात जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांवर पुन्हा बहुमत राखण्यासाठी राणे आणि त्यांचे समर्थक आटोकाट प्रयत्न करतील यात शंका नाही. परंतु जिल्ह्यातील तीन नगरपालिकांवर वर्चस्व मिळविण्यासाठी राणे समर्थकांनी साम, दाम, दंड, भेद ही निती वापरुन आणि पैशांचा भरपूर वापर करुनही या पक्षाला दोन नगरपरिषदांत केवळ एक जागा आणि मालवणात आठच जागा जिकता आल्या. हेच चित्र आगामी जिल्हा परिषद निवडणुकीतही उमटले तर काँग्रेस पक्षात शिवसेनेतून आलेल्या राणे समर्थक काँग्रेस गटाची सद्दी संपली असे म्हणता येईल. शहरी मतदारांनी ज्या निर्भयपणे आणि सूज्ञपणे मतदान करुन राणे समर्थकांना सत्ताभ्रष्ट केले ती किमया जिल्ह्यातील ग्रामिण मतदार करील काय?

सिधुदुर्ग जिल्ह्यातील ३ नगरपरिषदांच्या निवडणुकीत ५१ जागांपैकी राष्ट्रीय काँग्रेसला फक्त ९ जागा मिळविता आल्या. राष्ट्रवादीने ३५ जागा मिळवून बाजी मारली. भाजपला २, शिवसेनेला २, मनसेला १ जागा मिळाल्या. २ बंडखोर अपक्ष निवडून आले. सावंतवाडी नगरपरिषदेत १७ पैकी १७ जागा राष्ट्रवादीला, वेंगुर्ल्यात १२ राष्ट्रवादी, २ भाजप, १ मनसे, १ काँग्रेस, १ अपक्ष तर मालवणात ८ काँग्रेस, ६ राष्ट्रवादी, २ सेना, १ अपक्ष विजयी झाले.
रत्नागिरी जिल्ह्यात नारायण राणे समर्थकांचा प्रभाव पूर्वीही नव्हता. तिथे रत्नागिरी शहरात २८ जागांपैकी सेना- १३, भाजप- ८ मिळून युतीने २१ जागा मिळविल्या. राष्ट्रवादीला ६ व काँग्रेसला १ जागा मिळाली. चिपळुणात २४ पैकी राष्ट्रवादी-१३, काँग्रेस-२ आघाडीला १५ जागा मिळाल्या. शिवसेनेने ४ तर शहर विकास आघाडीला ५ जागा मिळाल्या. खेडमध्ये १७ पैकी ९ जागा मिळवून मनसेने प्रथमच बहुमत मिळविले. शिवसेनेला ७ तर राष्ट्रवादीला १ जागा मिळाली. दापोलीत १७ पैकी शिवसेना-४, भाजप-२, आर.पी.आय. १ या युतीला ७, राष्ट्रवादी ६ व काँग्रेसला १ आणि मनसेला ३ जागा मिळाल्या. राजापूरात १७ पैकी काँग्रेस-१०, राष्ट्रवादी- २ आघाडीला १२, सेनेला ३ तर भाजपला २ जागा मिळाल्या.
श्रीधर मराठे



प्रासंगीक *
दहशतीने गाजली नगरपरिषद निवडणुक
एरवी कुठल्याही निवडणुकीच्या काळात आतापर्यंत शांततामय वातावरण असलेल्या आत्ताच्या नगरपरिषद निवडणुकीत बाहेरुन आलेल्या नारायण राणे समर्थकांनी सोमवारी ५ डिसेंबरच्या रात्री घातलेल्या हिसक हैदोसामुळे वातावरण अत्यंत तणावपूर्ण आणि भितीदायक बनले होते.
निमित्त झाले जिल्हा युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वेंगुर्ल्यातील उद्योजक विलास गावडे यांच्या घरी जाऊन नारायण राणेंचा मुलगा नितेश आणि त्यांच्या समवेत असलेल्यांनी केलेल्या दहशती कृत्याचे. विलास गावडे घरी नसतांना झालेल्या या प्रकाराचे वृत्त सगळीकडे समजताच गावडेवाडी, दाभोसमधील शेकडो लोकांनी धाव घेतली व दाभोली नाका येथील काँग्रेस कार्यालयात नितेश राणे अन्य कार्यकर्त्यांसमवेत बसलेले असतांना घेराव घातला. नितेश राणे यांच्या विरोधात घोषणा दिल्या. जमाव वाढत गेला. पोलीस पथक, तहसिलदार वैशाली पाटील वगैरे तेथे हजर झाले. जमावाची एकच मागणी होती. नितेश राणेंना बाहेर काढा. सुमारे तीन तास शांततेने चाललेल्या या घेराव नाट्याला पालकमंत्री नारायण राणे, खासदार निलेश राणे पुढे पोलीस व मागे तीस-चाळीस गाड्यांतून बाहेरचे कार्यकर्ते घेऊन आल्यावर हिसक वळण मिळाले. लाठ्या, शिगा, चाकू, तलवारी अशा शस्त्रांनिशी आलेल्या राणेंच्या समर्थक कार्यकर्त्यांनी जमलेल्या निरपराध जमावावर हल्ला चढविला. अनेकांना मारहाण करुन जखमी केले. नंतर रस्त्यातील दुचाकी, चारचाकी वाहनांवर लाठीचार्ज करुन मोडतोड केली. यातून पोलीस व निवडणुक विभागाच्या गाड्याही सुटल्या नाहीत. तेथून सुंदर भाटले येथील शिवसेनेच्या कार्यालयावरही हल्ला चढविला. आमदार परशुराम उपरकर तेथे बसलेले होते. त्यांच्या अंगरक्षक पोलीस कॉन्स्टेबलने शटर खाली ओढताच सशस्त्र गुंडांनी ते जबरदस्तीने उघडून कार्यालयातील वस्तूंची नासधूस केली. दरम्याने अंगरक्षकाने स्व-संरक्षणार्थ गोळीबार करताच हल्लेखोर पळाले. नंतरही बाहेरुन आलेल्या राणे समर्थकांनी चौरस्त्यावर दहशत निर्माण केली. रस्त्यावर उभ्या केलेल्या चारचाकी दुचाकी वाहनांचा काचा फोडून, लोखंडी शिगा, काठ्यांनी नासधुस केली. जमावातील ब-याच लोकांना मार बसला. काहीजण जखमी झाले. बरेच लोक घाबरुन पळून गेल्यामुळे बचावले. पालकमंत्र्यांना घाबरुन असलेल्या पोलिसांनी मात्र एवढा सगळा प्रकार होऊनही निष्क्रीयता दाखविली. सुमारे तासभर हैदोस घातल्यावर राणे समर्थक कणकवलीकडे निघून गेले.
घटनेच्या रात्रीच दूरदर्शनवरील बातम्यांमधून सर्वत्र हा प्रकार समजला. खुद्द नारायण राणे आणि त्यांच्या निकटच्या समर्थक कार्यकर्त्यांनी त्यावर दिलेल्या प्रतिक्रियांचा खोटेपणाही घडलेला प्रकार प्रत्यक्ष पाहणा-यांच्या लक्षात आला आणि लोकांमधील असंतोष आणखी वाढला. दुस-या दिवशी मंगळवारी राणे समर्थकांच्या या कृत्यांमुळे संतप्त झालेल्या व्यापारी व्यावसायीकांनी वेंगुर्ले बंद शंभर टक्के यशस्वी केला. कोणीही लोकांना बंदचे आवाहन केले नसतांना संपूर्ण बाजारपेठ मार्केट, रिक्षा व अन्य व्यावसायिकांनी संपूर्ण दिवस आपले व्यवहार बंद ठेऊन कडकडीत हरताळ पाळून निषेध व्यक्त केला.
बुधवारी सायंकाळी नारायण राणे यांनी माणिक चौकात जाहीर सभा घेऊन आपले कार्यकर्ते निर्दोष असल्याचे सांगत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीच बाटल्या, दगडफेक करुन नासधूस केल्याचे सांगितले. या सभेतही काँग्रेस पक्षाचे उमेदवार, त्यांचे मोजकेच कार्यकर्ते, पदाधिकारी आणि ४० ते ५० गाड्यांतून बाहेरुन आणलेले तथाकथित कार्यकर्ते हजर होते.
त्यानंतर गुरुवारी सायंकाळी साई मंगल कार्यालयात तालुक्यातील काँग्रेस सोडून सर्व पक्षांचे कार्यकर्ते आणि पक्षांचे जिल्ह्यातील पदाधिकारी नागरीक यांची मोठी सभा होऊन राणे समर्थक काँग्रेस उमेदवार सोडून कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला मत द्या असे आवाहन सर्व पक्षांच्या नेत्यांनी केले. शांत, सुसंस्कृत वेंगुर्ले शहराला राणे समर्थकांनी दहशती कृत्ये करुन काळिमा फासल्याचे वक्त्यांनी सांगितले. आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले की, आपली राज्यातील आघाडी काँग्रेस पक्षाशी आहे. राणे समर्थकांच्या काँग्रेसशी नाही.
या सभेत शिवसेना आमदार परशुराम उपरकर, माजी आमदार श्रीकांत सरमळकर, भारतीय जनता पक्षाचे दोडामार्गचे माजी सभापती म्हापसेकर, शिवसेना जिल्हा प्रमुख वैभव नाईक, आर.पी.आय.चे मिलिद वेंगुर्लेकर, तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष विवेक खानोलकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रा. पां. जोशी, लायनेस क्लबच्या अध्यक्षा सौ.स्मीता डुबळे, भ्रष्टाचार निर्मूलन न्यासाचे अतुल हुले, तालुका भाजपा अध्यक्ष साईप्रसाद नाईक, शिवसेनेचे नेते व उद्योजक पुष्कराज कोले, डॉक्टर्स फॅर्टनिटी क्लबचे डॉ. मणचेकर, बार असोसिएशनचे अॅड. सूर्यकांत खानोलकर, अॅड. डी. ए. सामंत, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिपक नाईक आदींनी आपले परखड विचार मांडून जिल्ह्यातील हा दहशतवाद वेंगुर्ल्यातील नागरिकांनी मतपेटीद्वारे संपवावा असे आवाहन केले.
युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विलास गावडे यांनी वेंगुर्ले शहरात फिरुन राणे समर्थकांकडून दहशती कृत्ये होऊनही वेंगुर्ल्यातील लोकांनी संयम पाळला व सनदशीर मार्गाने वेंगुर्ले बंद ठेवून आपला निषेध व्यक्त केला याबद्दल आभार मानले व काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता या नात्याने ज्यांच्या वाहनांचे नुकसान झाले त्यांना तसेच जखमी झालेल्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले.
शुक्रवारी (ता.९) जाहीर प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेची माणिक चौकात जंगी सभा झाली. विरोधी पक्षनेते रामदास कदम, श्रीकांत सरमळकर, आमदार परशुराम उपरकर, जिल्हा प्रमुख वैभव नाईक, एकनाथ नाडकर्णी आदींची भाषणे झाली.
सर्वच पक्षांनी वेंगुर्ले शहरातून प्रचार फेरी काढली. राष्ट्रवादीच्या फेरीत आमदार दीपक केसरकर यांच्यासह पदाधिकारी आणि निवडणुकीतील सर्व उमेदवार, कार्यकर्ते सहभागी झाले होते. काँग्रेसच्या फेरीत माजी आमदार शंकर कांबळी, नारायण राणेंचे पुत्र स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष व ज्यांच्यावर वेंगुर्ले निवडणुकीची जबाबदारी सोपविली होती ते नितेश राणे, जिल्ह्यातील व तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी, जि.प., पं.स.सदस्य आणि उमेदवार प्रचार फेरीत सहभागी झाले होते. शिवसेनेनेही प्रचार फेरी काढली. त्यामध्येही जिल्हा, तालुका स्तरावरील पदाधिकारी, उमेदवार व कार्यकर्ते यांचा सहभाग होता. भारतीय जनता पार्टीचे तीनच उमेदवार असल्याने त्यांचा भर घरोघरी जाऊन मतदारांना भेटणे यावर होता. या शिवाय मतदारांवर प्रचार पत्रकांचा, वृत्तपत्रांतून जाहिरातीद्वारे आवाहने, सर्वच पक्षांच्या पदाधिका-यांच्या दुस-यांची उणीदुणी काढणा-या मुलाखती, पालकमंत्री, आमदार यांच्या मुलाखती यांचा मारा वृत्तपत्रांद्वारे मतदारांवर करण्यात आला.
वेंगुर्ल्यात झालेल्या राणे समर्थकांच्या दहशती कृत्याबद्दल पोलिसांनी घेतलेली भूमिका आक्षेपार्ह होती. त्यानंतर मात्र निवडणुक आयोगाच्या आदेशानुसार सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. वेंगुर्ल्यात बाहेरुन आलेल्या आणि मतदार यादीत नाव नसलेल्या राणे समर्थकांना शोधून काढून परत पाठवावे असे आदेश होते. त्याची कितपत अंमलबजावणी झाली हे समजू शकले नाही. मात्र वेंगुर्ले शहराच्या सर्व हद्दीवर आणि शहरात नाक्यानाक्यावर स्थानिक पोलिस आणि राज्य राखीव दलाचे पोलिस यांचा बंदोबस्त होता. वाहनांची झडती घेतली जात होती. जिल्ह्यात मनाई आदेश लागू असतांना आणि आचार संहीता असताना नारायण राणेच्या समवेत ३०-४० गाड्या भरुन बाहेरचे गुंड येतात कसे हा सर्वसामान्यांना पडणारा प्रश्न जिल्हा प्रशासनाला पडलेला दिसून आला नाही. अन्यथा निवडणुक काळात महसूल प्रशासन आणि पोलिस खाते यांच्यावर निःपक्षपाती पणे कारभार करण्याची जबाबदारी असते ती त्यांनी योग्यप्रकारे पार पाडली नाही किबहूना त्यांना ती दबावामुळे पार पाडता आली नाही असे दिसून आले.
वेंगुर्ल्यात यापूर्वी निवडणुकीत कधीही असा प्रकार घडला नव्हता. सर्वच पक्षांचे कार्यकर्ते निवडणुक संपल्यावर आपापसात कोणतेही वैमनस्य न ठेवता वागत असत. आता मात्र राणे समर्थक आणि इतर अशी फुट पडली आहे. एकंदरीत ही निवडणुक विचार, विकास यापेक्षा आपापसातील वादविवादांनी गाजली.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस पक्षाच्या प्रचारासाठी सावंतवाडीत उतरले तेव्हा त्यांना दोनच दिवस आधी वेंगुर्ल्यात घडलेल्या हिसक प्रकाराची माहिती पोलिसांच्या गुप्तवार्ता विभागाकडून मिळाली नसेल असे म्हणता येणार नाही. खरोखरच तशी ती मिळाली नसेल तर ती पोलीस खात्याची बेपर्वाई आहे आणि मिळाली असेल तर ‘कुठे आहे दहशतवाद‘ असे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे विचारणे हे तर अत्यंत आक्षेपार्ह आहे. त्याचबरोबर राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सावंतवाडी आणि मालवणात प्रचार सभा घेतल्या त्यांनी वेंगुर्ल्यात येऊन राडा प्रकरणाची झाडाझडती घेणे हे त्यांचे कर्तव्य होते. त्यांनीही ते पार पाडले नाही. यावरुन लोकनियुक्त प्रशासन किती ‘ढिले‘ आहे हेच या निमित्ताने दिसून आले.

विशेष *
वेंगुर्ले नगरपरिषद निवडणुक २०११ - वॉर्ड निहाय निकाल
प्रभाग क्र. १
एकूण मतदार- २३५२,
झालेले मतदान - १५९९
अ- सर्वसाधारण, विजयी उमेदवार-
वेंगुर्लेकर अवधुत उर्फ महेश-राष्ट्रवादी- ८४३, कोयंडे चंद्रशेखर लक्ष्मण-शिवसेना * ४८९, गावडे नागेश मोहन-रा. काँग्रेस * १६५, फर्नांडीस सिप्रीयान तमास-मनसे * १०२
ब- सर्वसाधारण, विजयी उमेदवार-
कुबल प्रसन्न तुकाराम - राष्ट्रवादी * ६६५, गावकर श्रीकृष्ण गं. - शिवसेना - ४५५
तानावडे संजय महादेव -मनसे * १७५, फर्नांडीस गिरगोल सं.-रा.काँग्रेस - १४१
सारंग भुषण भगवान - अपक्ष - १६३
क-ना.मा.प्र.महिला, विजयी उमेदवार-
कर्पे पुजा राजन - राष्ट्रवादी * ७००, लोणे रोहीणी सदाशिव -रा. काँ. - २६९
हुले श्वेता सतिश - शिवसेना - ६२६
ड- सर्वसाधारण महिला, विजयी उमेदवार-
केळुसकर चेतना विलास-राष्ट्रवादी * ७९५, आरोलकर मंजुषा महेंद्र-रा.काँग्रेस * ३०४, गिरप गुलाबी रविद्र - शिवसेना - ४९६
प्रभाग क्र. २
एकूण मतदार- २५०५,
झालेले मतदान - १८६७
अ- सर्वसाधारण महिला, विजयी उमेदवार-
भागवत निला दिनकर - भाजपा * ८५२, आंगचेकर शितल ज्ञा.-रा. काँग्रेस - ७४४
बाविसकर प्रतिभा प्रविण-शिवसेना * २७१,
ब-सर्वसाधारण महिला, विजयी उमेदवार-
सावंत पद्मिनी जगन्नाथ-राष्ट्रवादी * ८८४, घोगळे रेश्मा रमेश - रा. काँग्रेस - ३०८
चव्हाण सई सुरेंद्र - अपक्ष * ४५६, सावंत राधा सह्याद्री - शिवसेना - २१८
क-ना. मागास प्रवर्ग, विजयी उमेदवार-
वायंगणकर रमण शंकर-अपक्ष * ७४२, कौलगेकर शाम कृष्णा - मनसे - २५६
निकम संदेश प्रभाकर-रा.काँग्रेस * ३४२, म्हापणकर चैतन्य अंकुश-भाजपा - ५२८
ड- सर्वसाधारण, विजयी उमेदवार-
गावडे शैलेश गुंडू - राष्ट्रवादी * ८४३, गावडे विक्रम विजय - रा. काँग्रेस - ३६६
परब निलेश मोहन - अपक्ष * २७, शेख अल्ताफ हमिद - शिवसेना - ११८
सापळे तुषार गजानन - अपक्ष - ५१३
प्रभाग क्र. ३
एकूण मतदार- २१३०,
झालेले मतदान - १३८१
अ-सर्वसाधारण महिला, विजयी उमेदवार-
कुबल नम्रता नितीन - राष्ट्रवादी * ७७८, भोसले शितल सुरेश - शिवसेना - ३४८
वेंगुर्लेकर लक्ष्मी बाबुराव- रा.काँग्रेस - २५४
ब-सर्वसाधारण महिला, विजयी उमेदवार-
प्रभूखानोलकर सुषमा सु. - भाजपा- ५९३, परब संचिता सुनिल - रा. काँग्रेस - २९६
परब सुस्मिता संजय - मनसे * ३०३, मोर्डेकर वृंदा कमलाकांत - शिवसेना-१८९
क-नागरिकांचा मागास प्रवर्ग,
विजयी उमेदवार- वेंगुर्लेकर अभिषेक राजीव - मनसे -५९७, किनळेकर यशवंत प्र. -रा. काँग्रेस * ३४५, साटेलकर सत्यवान विठ्ठल - राष्ट्रवादी-४३८
ड- सर्वसाधारण, विजयी उमेदवार- परब मनिष अनंत - राष्ट्रवादी * ५७५, कुबल विवेक श्रीगुरुनाथ - शिवसेना * २७९, डुबळे सुनिल शशिकांत - रा. काँग्रेस * ४०४, सातार्डेकर मनिष वामन - मनसे - १२४
प्रभाग क्र. ४
एकूण मतदार- २७६०,
झालेले मतदान - १८६६
अ- अनुसूचित जाती, विजयी उमेदवार-कांबळे वामन धोंडू - राष्ट्रवादी * ११४५, जाधव रामचंद्र कृष्णा - रा. काँग्रेस * ७२१,
ब- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला,
विजयी उमेदवार-नार्वेकर अन्नपूर्ण दत्ताराम- राष्ट्रवादी -११७८, रेडकर अनुसया मुकुंद - रा. काँग्रेस -६८५
क- नागरिकांचा मागास प्रवर्ग,
विजयी उमेदवार- तांडेल सुलोचना शशिकांत-राष्ट्रवादी-१०८४, निकम सुमन संदेश - रा. काँग्रेस - ७७८
ड- सर्वसाधारण महिला,
विजयी उमेदवार-, कार्डोज फिलोमीना मॅक्सी- राष्ट्रवादी * ६२१, डिसोजा पेरपेतीन बा. -रा. काँग्रेस * ५३२, नाईक निशा नरेंद्र - शिवसेना * ५९०, शेख अलिशा जाफर - अपक्ष - १२३
इ- सर्वसाधारण, विजयी उमेदवार-परब यशवंत लक्ष्मण - रा. काँग्रेस * ६४४, आरोलकर विवेकानंद श. - शिवसेना * ४०६, येरम बुधाजी उर्फ उमेश - राष्ट्रवादी * ३६२, शेटये सचिन भगवान - अपक्ष - ४५६

लग्न - दोन कुटुंबांचे मनोमिलन

लग्न म्हणजे केवळ दोनच जीवांचं मनोमिलन नव्हे तर दोन व्यक्तींबरोबरच दोन कुटुंब एकत्र येत असतात. लग्न ठरल्यानंतर वधू-वरांकडची मंडळी तयारीला लागतात. लघीनघाई सुरु होते आणि मग ‘आता इतकेच दिवस उरले हो स्वातंत्र्याचे!‘ अशी उलटी गणना मित्रमंडळी, नातेवाईक आणि स्वतः वधु-वरांकडून केली जावू लागते.
एकीकडे लग्न ही जीवनात घडणारी अनिवार्य घटना म्हणून गृहीत धरलेली असते. मनात याबद्दल बरीच स्वप्नही असतात. पण प्रत्यक्षात यापुढे आपण आपलं संपूर्ण जीवन दुस-या व्यक्तीबरोबर भागीदारीत जगायला निघालो आहोत याची कुणाला पुरेशी जाणीव नसते तर कुणाला याबद्दल मनात एक प्रकारची भितीही वाटत असते. ही भिती ही दोन प्रकारची, एक म्हणजे या भागीदारीत आपला निभाव कसा लागेल? दुस-या व्यक्तीबरोबर सहजीवनात आपल्या व्यक्तिगत आशा, इच्छा, मत स्वातंत्र्य यांना कितीसा वाव उरेल? दुस-या व्यक्तीचा व्यवहार किती समंजसपणाचा असेल? आणि आपण प्राप्त परिस्थिती आणि आपलं मन यांचा ताळमेळ बसवू शकू का? ही दुसरी भिती स्वाभाविकरित्या जवळपास प्रत्येक वधू-वराच्या मनात येत असते.
विवाहामुळे घडणारा बदल जीवनातील व्यावहारीक गरज म्हणून आपण स्विकारत आहोत की आपल्या इच्छेनुसार मनःपूर्वक स्विकारत आहोत हाही प्रश्न सोडवणं गरजेच असतं. कारण जोपर्यंत एखादी गोष्ट भावनात्मक स्विकृतीच्या आधारे मनापासून अंगिकारली जात नाही तोपर्यंत तिच्यासाठी केलं जाणारं परिवर्तन हा नाइलाजापोटी केलेला जुलमाचा रामराम ठरतो. तसं होणं मग घातक ठरु शकतं. लग्नाद्वारे स्विकारला जाणारा संबंध हा आपल्या स्वतःच्या दीर्घकालीन उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी स्विकारार्ह आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मुळातच कोणताही निर्णय घेताना जीवनाच्या नेमक्या उद्दिष्टांचा बारकाईने विचार व्हायला हवा.
भौतिक उद्दिष्टे -
१) अन्नवस्त्रादी प्राथमिक गरजांची पूर्तता.
२) रहाणीमानाचा उचित स्तर गाठणे आणि टिकवणे.
३) भविष्यात हौसा भागविण्यासाठी किवा आपत्कालीक गरजांसाठी बचत
भावनात्मक उद्दिष्ट-
१) निकट प्रेमाचे संबंध (स्वतः कुणावर तरी प्रेम करणे आणि आपल्यावर प्रेम करणारे कुणी असणं.)
२) सामाजिक पातळीवर प्रतिष्ठा व प्रशंसा मिळवणे.
वैचारिक उद्दिष्टे-
१) बौद्धिक स्तरावर स्वतःच्या निरपेक्ष (द्वदद्धड्ढथ्ठ्ठद्यड्ढड्ड) अस्तित्वाचा विचार.
२) स्वतःच्या सिमीत अस्तित्वाच्या सीमांची वास्तविकता तपासून व्यक्तित्वाच्या असीमतेच्या संभावनेचा विचार.
३) असीम अस्तित्वाचा बोध होण्याच्या दिशेने प्रयास.
वरील सर्व उद्दिष्ट क्रमाने समजून घेणं गरजेचं आहे. यापैकी वैचारीक उद्दिष्टं सर्वथा व्यक्तिगत असतात. पहिल्या दोन उद्दिष्टांच्या पूर्ततेकरिता सामाजिक व पारिवारीक जीवन पद्धतीची गरज असते. म्हणजेच मुळात वैवाहिक जीवन हे पहिल्या दोन प्रकारच्या लक्ष्यांच्या प्राप्तीसाठी स्विकारलेले असते हे लक्षात ठेवायला हवं. वस्तुतः कौटुंबिक जीवनात भावनात्मक लक्ष्यप्राप्ती ही जास्त महत्वाची असते. कारण दोन मनं एकत्र येवून संसार सुरु होणार असतो.
आधी म्हटल्याप्रमाणे वैवाहीक जीवनानंतरच्या परिस्थितीबद्दल विचार करताना त्यानुसार दृष्टिकोन बदलणं जसं आवश्यक आहे त्याचप्रमाणे प्राप्त परिस्थितीचं विश्लेषण तटस्थपणे करताना चार मूलभूत मुद्यांची बैठक असायला हवी. मॅनेजमेंटच्या क्षेत्रात याला च्ज़्ग्र्च्र् ठ्ठदठ्ठथ्न्र्द्मत्द्म म्हणतात, च्ज़्ग्र्च्र् ही द्मद्यद्धड्ढदद्य, ध्र्ड्ढठ्ठत्त्दड्ढद्मद्म, ठ्ठद्रद्रदृद्धद्यद्वदत्द्यत्ड्ढद्म व द्यण्द्धड्ढठ्ठद्यद्म या चारांची आद्याक्षरे.
कोणत्याही परिस्थितीमध्ये व्यक्तीच्या स्वतःच्या अंगभूत व प्राप्त परिस्थितीच्या उपलब्ध क्षमता सहाय्यक ठरतात. परिस्थिती बदलताच स्वतःच्या अंगभूत क्षमतांना वाव मिळणं वा त्यावर प्रतिबंध येणं यात त्या-त्या परिस्थितीनुसार फरक पडतो. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये द्मद्यद्धड्ढदढद्यण् ची बैठक बदलते. तीच स्थिती कमजोरी वा उणिवांच्या (ध्र्ड्ढठ्ठत्त्दड्ढद्मद्मड्ढद्म) बाबतीत असते. प्रत्येक परिस्थितीत प्रगतीसाठी उपलब्ध संधी (दृद्रद्रदृद्धद्यद्वदत्द्यत्ड्ढद्म) आणि उद्भवणा-या समस्या (द्यण्द्धड्ढठ्ठद्यद्म) यांचं स्वरुपही बदलतं. आता स्वतःच्या जीवनाकडे पहाताना या वैचारीक बैठकीच्या आधारे विश्लेषणाचा प्रयत्न केला तर प्राप्त परिस्थिती ही परकी न वाटता आपलीशी वाटते आणि वैवाहीक जीवनाच्या परिस्थितीबाबत परकेपण न उरणं हेच भावनात्मक पातळीवर सफल जीवनाच्या दिशेनं टाकलेलं पहिलं पाऊल आहे.
समोरची व्यक्ती ही आपल्या स्वतःच्या आजवराच्या पूर्वसंस्कारांनी प्रभावित असल्यानं तिच्या व आपल्या विचारसरणीत अंतर असणार हे गृहीत मानायला हवं. तरीही त्याचे किवा तिचे विचार आपल्या आजवरच्या आयुष्यात तशी स्थिती आपण पाहिली नसल्याने नवे किवा वेगळे वाटत असते तरी ते चुकीचे असतीलच असं नाही! नव्या परिस्थितीमध्ये आपल्याला काय मिळेल या विचाराबरोबरच आपण तिकडे आपल्या क्षमतांचा वापर करुन कोणती भर घालू शकू हा विचारही व्हायला हवा. जसं स्वतःच वैयक्तिक भलं करण्याचा किवा स्वतःचं स्वतंत्र व्यक्तित्व सिद्ध करण्याचा दृष्टिकोन मनाशी असतो तसाच त्यातून आपण संपूर्ण कुटुंबाच्या हितासाठी काय करु शकतो याचाही विचार हवा कारण विवाहानंतर जीवन एकट्यापुरतंच नसून कौटुंबिक सहजीवनासाठी आहे ही खूणगाठ मनाशी बांधली गेली तर सारेच सोपे होईल.
जीवनात सर्वच परिस्थिती मनाजोगी असेल असं नाही. हे जितकं खरं तितकंच ती परिस्थिती सर्वस्वी प्रतिकूल असेल असंही नाही. कोणतंही नातं केवळ भौतिक वस्तुविनिमयापुरतं नसतं. त्यात भावनात्मक संबंध महत्वाचा असतो. नाहीतर त्याला नातं म्हणताच येणार नाही, तो व्यवहार ठरेल. मानसिक आधाराची भावना नात्याला स्थायीत्व देवू शकते. समोरच्या व्यक्तीचे गुण, क्षमता, त्याचा व्यवहार या सर्वांच्या आधारे प्रत्येकामध्ये असा भावनात्मक आधाराचा संबंध जर शोधला गेला तरच ख-या अर्थाने विवाह केवळ दोघांचं मनोमिलन न ठरता दोन कुटुंबांचं मनोमिलन ठरेल यात शंकाच नाही!
- सौ. सुमेधा देसाई, तळेबाजार-देवगड,


ओळख स्वतःची
विवाहसंदर्भाने स्वतःची ओळख करुन घ्यायची तर रुप, रंग, उंची, वजन इतकीच मर्यादित न ठेवता अधिक व्यापक पातळीवर करुन घेण्याची गरज आहे. शरिर ओळखीमध्ये स्वतःचा रुप रंग... विषयी ‘आपला तो बाब्या‘ या चालीबरची ओळख नको तर वास्तव स्विकारलेली ओळख असावी. म्हणजे माझा रंग काळा असेल तर त्याला सावळा, गव्हाळ अशा वेष्टनात बांधण्याची गरज नाही. तेच नाक, डोळे, उंचीबाबत. जे जसं आहे तसं स्विकारायला हवं. आपल्याचसारखी शरिर वैशिष्ट्य असलेल्या दुस-या माणसाचं वर्णन आपण कसं करु? तसंच स्वतःचही केलं पाहिजे. म्हणजे मग ते नक्कीच वास्तव पातळीवर येतं.
यानंतर स्वतःचं शिक्षण. शालेय, महाविद्यालयीन पलिकडे जाऊन विशेष वेगळं अधिक असं काही आपण शिकलो आहोत का? आपल्याकडे काही खास कौशल्य उदा. पाककला, शिवण, संगणक, सौंदर्यशास्त्र इ. आहेत का? याचा विचार व्हायला हवा.
आपण अर्थाजनासाठी काही करत आहोत का? नोकरी, व्यवसाय. यातून आपल्याला किती अर्थप्राप्ती करता येते? हे गाव किवा ठिकाण बदललं तर त्याचे परिणाम काय होतील? आपल्या कामाचं स्वरुप कसं आहे? आपली राहण्याची जागा, परिसर, ठिकाण (शहर/गाव) यानुसार कोणत्या नविन भागात रहायला जायला जमेल? आवडेल?
आपल्या घरातील धार्मिक सामाजिक परंपरा, चालिरिती, देव, जात, धर्म याबद्दलच्या कल्पना या सगळ्या संदर्भाने स्वतःची स्वतःविषयी स्पष्ट, नेमकी मत मांडून स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा.
स्वतःच्या आरोग्याविषयी देखील आपल्याला नक्की माहिती हवी. किमान आपला रक्तगट, एकूण आरोग्य, आपण व्यायाम करतो का? खेळतो का? आतापर्यंत आपल्याला एखादा मोठा आजार झाला होता का? व्यंग असल्यास त्याविषयी छोट्या आजारांच्या सवयी म्हणजे डोकं दुखणं, खोकला, बारिक ताप यातलं सातत्य. आपल्या आहाराच्या सवयी आणि प्रमाण इ. सर्व गोष्टींची किमान प्राथमिक माहिती जाणीवपूर्वक आपल्याला असायला हवी.
तसचं स्वतःचा स्वभाव, वैशिष्ट्य यावरही आपल्याच घरात आपल्याला फारसा कधी विचार करावा लागलेला नसतो. पण जेव्हा घरातील माणसांव्यतिरिक्त अनोळखी व्यक्तिशी सतत सहवासात रहायचं असेल तर आपल्या स्वभाव वैशिष्ट्यांची स्पष्ट जाणीव आपल्याला असायला हवी आणि दुस-याला न दुखावता त्यांनाही ती वैशिष्ट्यं समजायला हवी असतील तर त्याविषयीची स्पष्टता अत्यंत आवश्यक आहे. मुख्यत्वे करुन आपला राग, इतरांच्या रागावरील आपल्या प्रतिक्रिया, बोलकेपणा, आत्मकेंद्री, मित्रांची आवड, काम करण्याची आवड, विचारांची पद्धत, सकारात्मक / नकारात्मक या दृष्टीने स्वतःच्या स्वभाव वैशिष्ट्यांची ओळख करुन घेणं महत्त्वाच आहे.
याबरोबर ही ओळख करुन घेतांना, यावर विचार करतांना याविषयीचे मुद्दे चक्क कागदावर लिहून काढावेत, लिहितांना विचारांमध्ये अधिक स्पष्टता व नेमकेपणा येतो. लिहिलेलं इतरांना दाखवण्याची आवश्यकता नसते. त्यामुळे एकदा लिहीतांना नाही जमलं तर कागद फाडून टाकून पुन्हा नव्याने सुरुवात करता येते. यात कमीपणा, मूर्खपणा मानायचं काहीच कारण नाही. याउलट या गोष्टीकडे सकारात्मक पद्धतीने, गंमत म्हणून प्रयोग करुन तर बघू इतका स्वस्थ, स्वच्छ विचार करावा.
जोडीदार निवडताना जे आपल्यात नाही ते जोडीदारात असावं अशी अपेक्षा असते. त्यासाठी अनेक तडजोडी करायची लोकांची तयारी असते. तोच विचार आरोग्य, स्वभाव, सवयी याबाबत स्पष्ट खरं सांगून करायला हरकत नाही. उदा. मला फारसं बोलायला जमत नाही. पण घरी पाहुणे आलेले आवडतात किवा मित्रमैत्रिणी असाव्यात असं वाटतं. तस आळशी व्यक्तिला कामसू जोडीदार चालेल पण त्या व्यक्तिला आळशी जोडीदार चालणार आहे का? असे विचार करायचे तर मुख्यतः स्वतःची स्वतःला पूर्ण, स्पष्ट ओळख असणं आवश्यक आहे. तर जोडीदाराविषयीच्या स्पष्ट कल्पना आपल्याला मांडता येतील. त्याविषयीच्या अपेक्षा व्यक्त करता येतील. जेणेकरुन पुढचा जीवनप्रवास अधिक सुखकर होण्याच्या शक्यता वाढतात.
- वंदना करंबळेकर, समुपदेशक, सावंतवाडी, ९८५०४७३०१२