Saturday, 18 June 2011

दहावी परीक्षा निकाल विशेष

अंक - २३वा, २३ जून २०११,


वेंगुर्ले केंद्रातील पहिले पाच
१) मोर्डेकर मुक्ता कमलाकांत - ५३४
२) बिजीतकर रोहन गुरुदत्त - ५३२
३) गिरप काशिनाथ रावजी - ५३१
४) गावतळकर अक्षय नकुल - ५२८
५) परुळेकर राजेश नारायण * ५२७

वेतोरे केंद्रातील पहिले पाच
१) धुरी दिपपाली दामोदर - ५१८
२) वेंगुर्लेकर प्रथमेश हरेश - ५१०
३) धुरी रेश्मा रविद्र - ५००
३) वजराटकर अंकिता प्रकाश - ५००
४) गावडे प्रसाद प्रमोद - ४९६
५) खानोलकर निधी रविद्र * ४९४

शिरोडा केंद्रातील पहिले पाच
१) पल्लवी सुधाकर राऊळ - ५२६
२) शुभम शांताराम जाधव - ५२२
३) देवेश दशरथ गोसावी - ५२०
४) रुपाली भालचंद्र नाबर - ५१६
५) ऐश्वर्या प्रभूसाळगांवकर - ५१५
५) सतिश धनंजय मुळीक - ५१५
५) दत्तराज अवधूत राणे - ५१५

राज्याच्या ८ विभागतून परीक्षार्थी - १४,६०,९४७
उत्तीर्ण - ११,११,२४१ (७६.०६ टक्के)


कोल्हापूर विभाग - परीक्षार्थी - १,७९,०६९
उत्तीर्ण - १,५३,५४६ (८०.३९ टक्के)


सिधुदुर्ग जिल्हा - परीक्षार्थी - १३,३२१
उत्तीर्ण - १२,०२५ (९०.२७ टक्के)


वेंगुर्ले तालुका - परीक्षार्थी - १,११८
उत्तीर्ण - ९९२ (८६.०९ टक्के)


वेंगुर्ले तालुक्यातील शाळांची टक्केवारी
१) न्यू. इंग्लिश स्कूल, उभादांडा - १११ पैकी १११ (१००)
२) अणसूर - पाल हायस्कूल - ६० पैकी ६० (१००)
३) सिधु.विद्या.निकेतन इं.मि.स्कुल वेंगुर्ला- ५ पैकी ५ (१००)
४) स. का. पाटील विद्या. केळूस- ४४ पैकी ४४ (१००)
५) सरस्वती विद्यालय, आरवली - ३७ पैकी ३६ (९७.३७)
६) बावडेकर विद्यालय, शिरोडा - १३८ पैकी १२३ (९१.९५)
७) आसोली हाय. आसोली- ४६ पैकी ४३ (९३.४८)
८) विद्यामंदिर परुळे - ६९ पैकी ६५ (९१.५५)
९) श्री सातेरी हायस्कूल, वेतोरे - १०१ पैकी ८७ (८६.१३)
१०) वेंगुर्ला हायस्कूल, वेंगुर्ला - १३२ पैकी ११७ (८३.६७)
११) न्यू इंग्लिश स्कूल, मातोंड - ३३ पैकी २९ (८२.८६)
१२) रा. धों. खानोलकर हायस्कूल - २८ पैकी २५ (८१.८२)
१३) पाटकर हायस्कूल, वेंगुर्ला - ६४ पैकी ५४ (८०.८२)
१४) माऊली विद्यामंदिर, रेडी - ६४ पैकी ५० (७९.४१)
१५) चमणकर हायस्कूल, आडेली - ६७ पैकी ५१ (७३.६१)
१६) दाभोली इं. स्कूल, दाभोली - ५४ पैकी ४० (६५.०८)
१७) शिवाजी हायस्कूल, तुळस - ६२ पैकी ४६ (६३.७०)

वेंगुर्ला केंद्रातील निकाल *
गावतळकर अक्षय नकुल-५२८, नवार अमर अरविद-४१२, साळगांवकर भाग्यश्री सु.-३९२, मांजरेकर भक्ती विजय-४७८
साळगांवकर चेतन अनिल-४४६, साळगांवकर दर्शना दिपक-४२१, साळगांवकर दिनानाथ नं.-२९७, साळगांवकर दिपाली अ.-४८८
मांजरेकर गौरी विष्णू-४३९, साळगांवकर गुरुनाथ तु.-५००, साळगांवकर जगन्नाथ रा.-३३६, बागायतकर जान्हवी नरेंद्र-४४७
बागायतकर कांचन रमेश * ५१५, मांजरेकर मंदार विनोद * ४४८, मांजरेकर मयुर मोहन * ४२५, साळगांवकर नामदेव वि.-४७५
बागायतकर निकिता भा.-४८०, कवठणकर नितांजली श्री.-५१६, बागायतकर पवन नरेंद्र * ४११, चोडणकर राजाराम बाबुराव-२८७
मांजरेकर रसिका लक्ष्मण-४७७, मांजरेकर रुचिता सुनिल-४२४, परब सोनू सखाराम -४४०, बागायतकर शैलेश सुरज-५०८
साळगांवकर स्नेहा यशवंत-४०१, मांजरेकर तेजस भानुदास-३००, घुबे अमित आनंद * ४३३, नाईक तनुजा बाळकृष्ण-३५३
परब अरुण महादेव-४४९, नाईक सारिका श्रीनिवास-४०४, नाईक सुषमा सुनिल-३४८, राणे समिता विलास-३५१
मुल्ला शदब अहमत मु.-३७४, नाईक प्रल्हाद पंढरीनाथ * ३४८, परब प्रसाद विजय * ३९५, मुळीक संपदा चंद्रकांत * ४२०, पालयेकर सदाशिव रा.-३९३, मेस्त्री श्रद्धा दशरथ * ३०६, गवंडे भागेश लिलाधर * ३३८, भोगले भाग्यश्री श्रीधर * ४३३, सोकटे साईराज गुरुनाथ * ३३३, नवार साईराज संजय * ४८१, बांदेकर काजल यशवंत -३४८, तुळसकर राजेश कृष्णा -४४०, गावडे गुणाजी गुंडू - ५१०, सावळ प्राजक्ता विष्णू * ४३०, माळकर कोमल भानूदास-३७५गावडे काजल सोनू -३४९बेहरे गोपाळ विजय - ३२४
जाधव रुपाली बाबुराव - २६८बेहरे सायली चंद्रकांत - ३६८सावंत सोनाली दशरथ - ४६३मेस्त्री अंजली प्रभाकर - ३०९धर्णे दिपाली सहदेव - ३३९नाईक स्वप्नाली श्रीधर -४८३गावडे सोनाली विलास - २१२सावंत दिपाली विरेंद्र - ३१२केळजी मनाली विवेक - ३४०
गावडे श्यामली शिवराम - ४३९कनयाळकर अमेय ना.-४१०डिचोलकर अमोल उत्तम -३९४भुते लक्ष्मण अभिमन्यू - ४५९गावडे नूतन उत्तम -३१८पवार कल्पना गोपाळ-२६८परब अर्चना जयराम - २८२तारी रामचंद्र गोपाळ - ३११लुद्रीक वेलांकनी विल्सन-४४६कोरगांवकर अंकिता यशवंत-२६४पालव तुषार अर्जुन - २३१गिरप मंदार राजन - ४९६न्हैचिआडकर वर्षा नारायण-३९०जाधव जयराम आत्माराम-३१२झरकर सिताराम सु.-२८७भोई साईप्रसाद शरद- ३५१कानसे धनश्री जनार्दन - ३०६गावडे तेजस्वी बाबू -४७०पालकर तेजस्वीनी अरुण -३९२नवार अक्षता नंदकिशोर - ३६३आरोलकर प्रथमेश आपा -४८४परब प्रणिता विठ्ठल - ४८०शेटये गायत्री गुरुनाथ - ५११पेडणेकर गौरेश सुरेश - २५८तुळसकर रविना कृष्णा - ३६१परब राजलक्ष्मी यशवंत - ५०४सावंत विजय गजानन - ३९२रेडकर विजय संजय - ३९४परब अक्षय शंकर - ३६६गावडे विनया अर्जुन - ४८९नाईक प्रसाद अर्जुन - २६४वस्त संपदा महादेव - ३६०गिरप चांदणी रघुनाथ - ४३०हरमलकर दत्ताराम सोनू - ४००परब श्रद्धा सूर्यकांत -३४९हरमलकर धनश्री रामचंद्र - ४५४गावडे सिद्धेश नारायण - ३३८प्रभू सिद्धेश रमेश * ४६५ सावंत नंदिनी संतोष - ३३०डिचोलकर दिपाली बा. - ३४१सावंत जगदीश जयसिग - ४५० पेडणेकर हेमांगी वि. * ५०९ रेडकर जितेंद्र वासुदेव - ३७३माळकर योगेश जयराम - २९१कबरे रमेश प्रशांत - ३६४जाधव गितेश रघुनाथ - ३१०गुरव मंगेश शामप्रसाद - ३६५नाईक शैलेश सुरेश - ४६२नाईक विघ्नेश विलास - ४१७परब अनिकेत आनंद - ३३७इकनगुट्टी गणेश भिमराव - ३९८शेटये गौरेश उल्हास - ३९३वाडकर भाग्यश्री राजन - २७५नेमळेकर शैलेश शंकर - ३३७परब विठ्ठल प्रकाश - ४६६गोळम प्रथमेश प्रकाश - ४७८तांडेल अर्चना अर्जुन - २६०कुबल दर्शना विलास - २९६केळुसकर शारदा भालचंद्र-३८३गावडे अक्षता अरुण - ४३९नरसुले महेश सगुण - ४०४कांबळी निखील विजय - ३८८गावडे सचिन सिताराम - ३०८रेडकर काशिनाथ नारायण-३५९परब संचिता अशोक - ४६९परब संचिता भाऊ - २९६
सावंत विष्णू मनोहर - २८६भाईडकर श्रद्धा शंकर - ४२७पावसकर शुभम नागेश - ३१७बेहरे माधुरी अशोक - २६७वराडकर भुषण अजित -३५८गावडे यशवंत दादू - ५०१सावंत ऐश्वर्या अशोक - ३६९गावडे जीजी प्रभाकर - २८१गिरप गौरी सावळाराम - ३७५कोनयेकर सिद्धाली अरुण-३६५तुळसकर सिद्धेश मंगेश -४३३नरसुले वैदेही सुशिल - ३९९सावंत सारिका बाळकृष्ण-३४८परब आशिका जयप्रकाश-४०२गावडे रसिका महादेव - ३८८घोंगे रसिका विनोद -४११गावडे श्रीकांत सूर्यकांत - ३७०मसुरकर विकास गिरीष - ४५७शेख फातिमाबी अब्बास - ३३६वेतूरकर लिना चंद्रशेखर - ३०४गिरप काशिनाथ रावजी - ५३१मसुरकर विनिता सि. - ३७६गावडे दिलीप मधुकर - ४१६गोळम प्रदिप प्रकाश - ४८२गावडे नितीश रविद्र - ३३६रेवंडकर निशा रामचंद्र - ३४१सावंत अभिषेक रघुनाथ - ३८४घोगळे कृष्णकांत प्रभाकर -३५०
गावडे अनिकेत महादेव - ४७५जाधव योगिता अंकुश - २९०ब्रिटो वलीता बेजमी - ३१८माळकर समिता दिलीप - २८१गावडे योगिता लक्ष्मण - ३८९गावडे विनीता सिताराम - ४८४केरकर अंकिता वासुदेव-४६३सावंत कविता विश्राम - २२९गावडे चैताली महेश - ४५६मुळीक सुप्रिया बाळकृष्ण - ३३०सावंत संजय राघोबा - ३५१गांवकर विजयश्री विनायक -२४७परब हिरोजी आत्माराम - ४२८परब बाबाजी सूर्यकांत - २९६परब शंकर परशुराम - २३३कामत-आडारकर रुपाली -४४८सावंत प्रकाश काशिनाथ - ३४३पेडणेकर अक्षय अशोक - ४६३
चव्हाण धाकू आनंद - ४४९नेमण मिनल मोहन -३०५गावडे लिना मेघःश्याम - ४९५परब कमलेश उत्तम - ३७६नाईक दिपाली गुंडू - ५०७
तांबे सायली सिद्धार्थ - ३००परब दिपाली उदय -२७३आरोलकर बाळकृष्ण लाडू-४१७राऊळ सीमा दिलीप - ४१२ब्रिटो विल्मा मिनीन - ४३८शेटये प्रेमा मोहन - २४०सावंत लक्ष्मण देऊ - ३०१बटवलकर मंदार जगदीश-३६०हळदणकर मयुरी सुभाष - ३४६मेतर लालन प्रल्हाद - ३६३भोने नवीन वसंत - ४१०भोने अमरनाथ शंकर - ३२६गावडे प्रणय पंढरीनाथ - २३७नाईक अश्विनी राजाराम - ४७७आंगचेकर निधी विजय - ३४३राऊत गितांजली प्रताप - २४७आडणेकर संजय रामचंद्र - ३१२गांवकर संकेता देवेंद्र - २६२गावडे शांताराम सिताराम-३३०
नवार देवू उत्तम - ३७१बिजीतकर रोहन गुरुदत्त - ५३२आरावूज आमरोज तमास - ३४०प्रभू-खानोलकर उदय मोहन-३७६मराठे पुनम केशव - ४३४वाडयेकर पूजा सुधीर - ४३६कुंभार ज्योती गोपाळ - २९४आंगचेकर पल्लवी महेश - ३४६तुळसकर अपूर्वा दत्तगुरु -४३८
आरावंदेकर अलका वामन - ४३५वेंगुर्लेकर अंकिता दिपक-३४८आरांवेदकर अश्विनी भरत -४७०नाईक किशोर महादेव - ४५७
आरावंदेकर प्रियांका मोहन-४१८वेंगुर्लेकर पूजा राजेश - २९२करंगुटकर प्रथमेश साबाजी-३९२वेंगुर्लेकर रघुवीर विजय-३९९
तेरेखोलकर राजाराम ब्र.-४२३वेंगुर्लेकर रोहन शेखर - ३३४करंगुटकर सिद्धेश साबाजी-५२४आरावंदेकर वसंत जगदीश-३७९
वेंगुर्लेकर योगेश पांडुरंग-५१४पालकर नेत्रा प्रविण - ३४२जबडे शारदा सुंदर - २४९आंगचेकर राघोबा पांडुरंग - २६३खोबरेकर राहूल रमेश -३४८कोठारी सुरज चंद्रकांत - ३३१परुळेकर राजेश नारायण-५२७परब विश्राम अनंत -२९०तांडेल नम्रता सद्गुरु - ३५२गावडे गौरव बाळकृष्ण - ३४१जाधव गौरव नारायण - २८२कुबल मयुरी जयवंत -३९६केरकर गौरी विजय - ३५७डिसोजा डोरिता रेमेल- ४८७ गवंडे सृष्टी किशोर-३१९कुंभार दर्शना शिवराम - २२२पिगुळकर रुचिरा राधाकृष्ण-४३५शिरसाट अमृता जगन्नाथ - २७५चौकेकर संकेत राजन - ४२७निवजेकर संकेत सदानंद - २८७आंगचेकर संतोषी कृष्णा - ४८२देसाई अंकुश अनिल - ३०४परब जयेश राजन - ४३२
शेटकर निशा चंद्रकांत - ३३०गावडे दर्शन जगदीश - ३३१घोगळे अक्षता जयराम - ४०९कनयाळकर शितल श्रीराम-४०१भैरे दिक्षीता सुरेश -२९८तेंडोलकर शितल शरद - ४२१आरोसकर विष्णू गोविद - ४५९गांवकर ऐश्वर्या सुधाकर - ३९४फर्नांडीस सिन्थीया विल्सन -३६५ब्रिटो क्रोसिया घाब्रियल - ३८६आरोलकर सुस्मिता रघुनाथ-४५५फर्नांडीस स्टेफी सालू - २३१शिरोडकर सुजाता ज्ञानदेव-३५२ पेडणेकर स्वप्नाली दत्ताराम-३१५हळदणकर स्वप्नाली केशव-२१३करमलकर स्वप्नाली हनुमंत-२९७सावंत अनिता भिकाजी - २३२तारी नम्रता गोविद - ३७१गिरप योगिता केशव - ४६६घाडी सुनिता प्रकाश - २९५परब कविता संजय - ३६७गोसावी स्मिता सुरेश - ३००
गावडे चेतन दत्ताराम -४०१सावंत दत्तप्रसाद-चिराग हे.-४८३रॉड्रिक्स पीटर विल्सन - ३६७गवंडे नितेश प्रदिप - ४६०गावडे प्रथमेश महादेव - ४८८सावंत स्वाती बाळकृष्ण-४७७परब भक्ती गजानन - ३६२सावंत आरती मोहन - ४६१सावंत प्रतिक ज्ञानेश्वर - ४०४केरकर चित्रांजली अंकुश - ४५६ठुंबरे सुधीर सुधाकर - २६६पेडणेकर युगंधरा शरद - ३८६मसुरकर सुनिल अभिमन्यू - २८२आरोलकर गौरेश विलास -५२२
पेडणेकर पुष्पलता लक्ष्मण-३६३मुणगेकर तुषार बाबू - ४९५मोबारकर सुषमा शामसुंदर - ४३०राऊत अवधूत बाबू - २९९निवजेकर वृषाली राजेंद्र - ३५४शेटकर दिव्या दिनकर - २८४आडेलकर लक्ष्मी उमेश - २४८सावंत अजय गजानन - ३६४परब छाया संजय - ३२९कांबळी प्रियदर्शनी सत्यवान-३२६जाधव सुर्यकांत अशोक - २९४परब नारायण महादेव - ३५९गावडे प्रियांका अनिल - ५१२
सावंत प्रियांका रविद्र - ३११नवार भाग्यश्री मधुसुदन - ३१२गोसावी सत्यवान सुरेश - ३०१साटेलकर ज्योती मोहन -३९३सातार्डेकर अंकिता विजय-३८५नाईक गौरी देवू - ३८५सातार्डेकर मंदार प्रसाद-३८२सातार्डेकर मंगल परशुराम-४०७साळगांवकर संदेश वासुदेव-२७१ कोचरेकर शुभम भिसाजी -३९६बांदवलकर शुभम रामदास-३४४खोबरेकर उर्मिला गुंडू - २६८माणगांवकर वसंत विजय - ३७७माने काजल विठ्ठल - ३६२काळे मुग्धा मिलींद - ५२२तोरसकर जागृती विलास-३८४धोंड सूर्यकांत सुरेश - ३१२सांगेलकर अक्षया दिगंबर - ३७५सावंत सोनल आत्माराम - २६८तांडेल दिपाली बाबुराव - ४३०गावडे सोनाली सुरेश - ४०८कुंडेकर ममता अर्जुन - ४१४पडवळ रोहन शरद -३५२गोडकर ज्ञानदा नारायण - ५१५पालव प्रियांका हरेश - ३८१तांडेल सुकन्या सुहास - ४९७वारंग ओंकार सुनिल - ४७१सामंत आत्माराम पांडुरंग - ४४०पडवळ राजाराम शिवाजी-२५६चुडनाईक दर्शना महादेव-३६२डिसोजा निकालस आ.-२७८गोठोसकर आशिष अशोक- ३३०येरम धनश्री शामसुंदर - ५१६झांटये तेजश्री विश्वनाथ - ४८८दाभोलकर अस्मिता आनंद-३५०गावडे तेजस्वी रविद्र - ४७२
परब नम्रता सतीश - ४९६बोवलेकर दत्तप्रसाद कि.-२४२पालव अक्षय सत्यवान - २५८येरम बयाबयी वसंत - ४६४पडवळ शुभम-वासुदेव प्र.-४०६गावडे वैभव किशोर - ४५०शेणई रामचंद्र राजेंद्र - ३९६जाधव संदेश सुभाष - २८३पालयेकर विणा चंद्रकांत - ४२७कांदळकर गुरुदत्त सूर्यकांत-२५६राऊळ भगवान नारायण - २३८पडते भाग्यश्री नारायण - ४९०किडये राधा हर्षल - ३८८कुबल हर्षदा विजय - ३०८
गावडे रोशन मधुकर - ३०५कौलगेकर हर्षल महेश - ३६३परब वैभवी किशोर - ३८५जाधव अक्षय गुरुनाथ - २९५गावडे अक्षय सुधीर -४९५जाधव निशिगंधा दिपक - ३९६ढोके यक्षिणी सुधाकर - ५१०किडये ऐश्वर्या संजय - ३४८कर्पे निधी संजीव - ५१८परब रुचिका शांताराम - ४०४कुलकर्णी विमल दत्तात्रय - ४९९गावडे रोहीत अनंत - ४४३भगत कविता बापू - ४७६कांबळी अंकिता सिताराम - ३७०
जाधव अस्मिता सुरेश - ३३०आमडोसकर मिताली म.-२८३मिशाळे चित्रा दत्ताराम - ३०७गावडे पूजा महेंद्र - ३१३पाटकर प्राजक्ता रमेश - ४३८सावळ सोनल संतोष - ४२८परब शैलजा सहदेव - ५०९डुबळे सायली संजीव - ३९३पालव रेश्मा कमलाकांत - ४१४
पंडीत पद्मजा नारायण - २८१गवस रश्मी नंदकिशोर - ४७३फर्नांडीस मिलीता अॅन्थोनी-४७३मालवणकर मृणाल उमेश - ५०८मठकर सोनाली सुरेश - ३००मिसाळ गजानन पारुजी - ४३५नाईक रघुनाथ दिपक - २६३देसाई विघ्नेश लाडू - ३१०मळेकर मंजुषा कृष्णा - ३४२
पेडणेकर अनुपमा आनंद-३९३प्रभूखानोलकर ऐश्वर्या ग.-४९६प्रभूखानोलकर सच्चिदानंद-३७४प्रभूदाभोलकर सौरभी वि.-५१४प्रभूदाभोलकर सिद्धेश स.-३१९प्रभूदाभोलकर उद्धव श्रीपाद-३००धुरी संजोत सुरेश - ४६६हळदणकर प्राजक्ता आपा - ३८७कांदळकर प्रियांका भरत - ४३२परुळेकर प्रियांका परशुराम-३०९हळदणकर पुंडलिक अर्जुन-५०५चेंदवणकर चित्रलेखा सु.-३७४वेंगुर्लेकर देवेंद्र दिनानाथ - ३५५
वारखंडकर माधुरी सदाशिव-४४२चेंदवणकर मनोज विनायक-३२०करंगुटकर वासुदेव चारुदत्त-४६०गावडे सौरभ राजन - ३३३
बापट मकरंद प्रमोद - ४७६कुडव जर्नादन अशोक - ४४०जाधव सुप्रिया सुभाष - २२७केरकर सुप्रिया विश्वनाथ - ४६४मयेकर हर्षदा अशोक - २७१रावराणे हर्षल राजन - ३९३फर्नांडीस रुजारिया दि. - ३१३मालवणकर समिक्षा गणपत-३००फर्नांडीस सान्ता रुजाय * ३७० कौलगेकर सायली शाम - ३३४जाधव आकाश अजित - २९२जाधव वर्षा अनंत - ४२९जाधव हर्षल चंद्रकांत - ३७०मिशाळे अक्षय उल्हास - ३३०कांदळकर शितल प्रभाकर - ३०४मिशाळ करिष्मा पांडुरंग - ४३६आरोलकर सुश्मिता पांडुरंग-३७४मालवणकर श्रद्धा कृष्णा - ३२५हळदणकर स्नेहा अशोक - ४८४शिरोडकर सुधा सुहास - ३१९कोंडुरकर स्वप्नाली सुभाष-३५६परब निकिता दिलीप - ३८२
परब निकिता नितीन - ३७९आडारकर हितेश गु. - ४४५ गोवेकर निलेश-शिवराम उ.-३००पंडीत दिप्ती रविद्र - ४४३मेस्त्री प्रतिक्षा राजाराम - ४१९मठकर यतीन रविद्र - ३३५आरोलकर शुभम अंकुश - ३०१ मोर्डेकर मुक्ता कमलाकांत-५३४राजगे अर्जुन गोपाळ * ४६० फाटक मयुरेश गजानन - २९०पालयेकर सुस्मिता सूर्यकांत-३००परब विश्वंभर उदय - ४९९शिरसाट विवेक विनायक-४८२
धावडे सविता आनंद - २९०शेणई अश्विनी दत्तात्रय - ५०९शिदे अश्विनी संतोष - ३३७शेणई अमेय अमोल - ४३३पोरे अक्षय मधुकर - ४९९सावंत विद्या वसंत - २६९येरम भाग्यश्री शामसुंदर - ५१२मांजरेकर अदिती अंबरीष -३०४डिकॉस्टा मार्यान सालू - ३७२प्रभूखानोलकर शुभम अनिल-४६६डिसोजा अगास्मी कारलो - २६८घारे शितल चंद्रकांत -४३९मुळगांवकर कोमल प्रमोद - ३१९खवणेकर मेघा वासुदेव - २३४हुले ओंकार प्रकाश - २७९आडारकर महेंद्र विश्वनाथ-३१५केळुसकर विनायक भरत - ३४४म्हाकले रमण मोहन - २४८मोंतेरो सोनिया सेबेस्तीन - २३७गायकवाड रजत अविनाश-२२७शेळकर रावसाहेब अशोक-२३७मुरमुरे जयश्री रामदास - २६३मोडक शितल प्रभाकर - २६५तोरसकर कमलेश आ.-३०८नाईक भुषण अजित - २७३मळीक तन्मय गुरुदास -४७१भगत दिनेश भिवा - ३७३मोरजे हर्षद रमाकांत - २६१सुर्वे विठ्ठल मधुकर - ४२६कांबळी अंकिता अर्जुन - २५८फर्नांडीस मार्विन जेम्स - ३८३आसोलकर गणेश दाजी - २५४
वाळके कल्पना कृष्णाजी - ३०८नेवरेकर प्रथमेश विलास - ३४०येटले गौरव अशोक - ३७१परेरा आंद्रु इतोरीन - ३९७नांदोसकर सागर दत्ताराम -२७१वेळकर शशांक रामचंद्र - ३७२प्रजापत अशोककुमार क.-३०७कुलकर्णी स्वप्नाली वसंत-४१७
बहिस्थ -मोरजे सुरज दाजी, पाटील विकास अमृत, मांजलकर उमेश गंगाराम,वारंग उदय मनोहर,कोणेकर चंद्रकांत रविद्र , दाभोलकर राहुल अर्जुन, कोचरेकर नारायण नागेश, यादव योगराज यशवंत, हळदणकर पांडुरंग श्रीकृष्ण

अंक २२वा, २६ जून २०११

विशेष संपादकीय

पंत!
तसे ते आमच्याहून सुमारे चाळीस वर्षांनी मोठे. ‘किरात‘ मुद्रणालयाशेजारीच त्यांचे घर. आमच्या लहानपणापासून आम्ही त्यांना पहात आलोय. सावळा वर्ण, स्वच्छ धोतर, सदरा आणि गांधी टोपी असा वेश. तरतरीत चाल, स्थूल नसले तरी एकूणच भारदस्त व्यक्तिमत्व.
आठवीपासून अकरावीपर्यंत भटवाडीच्या आमच्या घरापासून पाटकर हायस्कूलमध्ये आम्ही चालतच जायचो. साहजीकच इतक्या लांबवरच्या जाता-येतानाच्या चालीत कधीमधी मित्रांसोबत वागण्या बोलण्यात वाह्यातपणा असायचा. पण, मारुतीच्या देवळापाशी आल्यावर तो आपोआपच थांबायचा. एकतर प्रेसमध्ये वडील बहुतेकदा असायचे पण पंतही अनेकदा तिथे असायचे किवा त्यांच्या घरापासून मार्केटपर्यंत कुठेतरी वाटेत दिसायचेच. त्यांचे आडनावच तेवढे माहित होते. ते करतात काय? गावात त्यांचे स्थान काय हे कळायचे तेव्हा वयच नव्हते. पण त्यांच्या एकूणच व्यक्तिमत्वामुळे त्यांच्याविषयी आदरयुक्त दरारा वाटायचा.
हायस्कूल संपले, कॉलेज जीवन सुरु झाले आणि मग गावातल्या कुठल्या कुठल्या सभा, संमेलनात जात असू तेव्हा गावातल्या महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग दिसायचा. तेव्हा ते वेंगुर्ले नगर वाचनालयाचे कार्यवाह होते. कॉलेज शिक्षण पूर्ण झाल्यावर ‘किरात‘ प्रेसच्या छपाई कामांच्या संदर्भात अनेकदा त्यांच्यासमोर जावे लागायचे. वाचनालयात पुस्तके घेण्यासाठीही जायचो. कथा-कादंब-यांचा भर ओसरुन वैचारिक साहित्याची आवड निर्माण झाली होती. एकदा त्यांनी कसली पुस्तके वाचतोस म्हणून विचारले तेव्हा इरावती कर्वे, नरहर कुरुंदकर, आचार्य अत्रे अशी काही नावे सांगीतली. त्यावर त्यांना खूपच समाधान झाल्याचे जाणवले. म्हणाले, अशीच चांगल्या मोठ्या लेखकांची चांगली चांगली पुस्तके वाचीत जा. तुला वर्तमानपत्र चालवायचे असेल तर भरपूर वाचन हवे. त्यांचा हा सल्लावजा उपदेश आम्हाला खूपच उपयोगी पडला.
पत्रकारितेत आम्ही उमेदवारी करीत असतांनाच अल्प आजाराने वडिलांचे निधन झाले. प्रेस आणि ‘किरात‘ची संपूर्ण जबाबदारी खांद्यावर आली. तेव्हा ते जाता येतांना हाक मारुन विचारपूस करीत. धीर देत. काही लागलं सवरलं तर सांग म्हणत. कधी वेळ असला तर बसून जुन्या आठवणी सांगत. ‘किरात‘शी आणि आमच्या वडिलांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. कधीकधी दोघांचे शाब्दीक भांडणही व्हायचे. पण ते व्यक्तिगत कधीच नसायचे. गावातील कुठल्यातरी घटनेवरुन झालेला तो वाद-विवाद असायचा. थोड्याच वेळात ते सगळे विसरुनही जायचे.
त्यांनी मध्यंतरीच्या काळात ‘किरात‘ची जबाबदारी समर्थपणे सांभाळली होती. ‘किरात‘चे संस्थापक आमचे आजोबा मुंबईतल्या प्रसिद्ध ढवळे प्रकाशनाकडे पुस्तके लिहिण्यानिमित्ताने बराच काळ मुंबईत असायचे. तेव्हा आमच्या वडिलांना प्रेस,‘किरात‘ आणि कौटुंबिक जबाबदारी त्यात ‘किरात‘वरील दाव्यांमुळे कोर्ट कचे-या हे सर्व जड जात असे. पण ‘किरात‘चे प्रकाशन नियमित रहावे यासाठी त्यांची धडपड असायची आणि तेव्हा अनेक महत्त्वाच्या कामी ते आमच्या वडिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. संपादनाची आणि विविध विषयांवरील लेखनाचीही जबाबदारी त्यांनी सांभाळली. ‘किरात‘च्या आजवरच्या यशस्वी वाटचालीत त्यांचाही मोलाचा सहभाग होता.
त्याकाळी ते अनेक कामांत खूपच व्यस्त असायचे. स्वातंत्र्य लढ्याचा तो काळ ते स्वतः काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत पाईक, त्यातच अनेक सामाजिक संस्थांची कामे. घरी सदैव लोकांचा राबता. स्वातंत्र्य चळवळीतील सहभाग हे सगळे आम्ही प्रत्यक्ष पाहिले नसले तरी त्यांच्या समकालीन लोकांकडून नंतर ऐकलेले. साहजिकच त्यांच्या विषयीचा आदरभाव दुणावलेला.
गावातल्या कोणा महत्त्वाच्या व्यक्तीचे निधन झाले तर त्या घरी त्यांची उपस्थिती असायची. त्या दुःखद शोकाकुल वातावरणात त्या व्यक्तीच्या आठवणी, मोठेपण, याविषयी ते सांगायचे. त्याबरोबरच स्मशानयात्रेतील किवा स्मशानातील काही घडलेल्या गंमती सांगून वातावरणातील शोकाकूल ताण कमी करायचे.
त्यांचा असा गप्पिष्ट स्वभाव फारसा कोणाला माहिती नसावा. पण त्यांच्या समकालीन स्नेह्यांना आणि विविध कारणपरत्वे त्यांच्या सहवासात आलेल्यांना त्यांच्याशी होणा-या गप्पांमधून खूप नवनवीन माहिती समजायची आणि तेव्हा हे करारी, बाह्यतः तामसी दिसणारे व्यक्तिमत्व श्रद्धा, प्रेम आणि करुणा यांनी किती ओतप्रोत भरलेले आहे हे जाणवायचे.
असे हे आदरणीय व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले. आपल्या सार्वजनिक कार्यामुळे आपले नाव मागे ठेवून गेले. वेंगुर्ल्याच्या इतिहासात त्यांचे नाव ठळकपणे नोंदले जावे असेच त्यांचे कार्य होते. त्यांची जन्मशताब्दी लोकांना आठवण रहावी या पद्धतीने त्यांच्या कुटुंबियांकडून साजरी होत आहे.
वेंगुर्ल्याचे एकेकाळी भूषण असलेले परंतू अलिकडच्या काळात संपूर्ण रया गेलेले सेंट लुक्स हॉस्पीटल नवीन व्यवस्थापनाखाली पुन्हा एकदा उभारी घेत आहे. त्यासाठी जिल्ह्यात कुठेही नाही अशा प्रकारचे आय.सी.यू. युनिट (अतिदक्षता विभाग) त्यांच्या मुलामुलींनी हॉस्पीटलला, पर्यायाने वेंगुर्ल्याला उपलब्ध करुन दिले आहे. त्याला पंतांचेच नाव दिले आहे आणि हॉस्पीटलच्या प्रसुतीगृहाचे संपूर्ण नूतनीकरण करुन त्या विभागाला आपल्या मुलांवर उत्तम संस्कार करणा-या आईचे कै. सौ. लक्ष्मी यांचे नाव दिले आहे. या दोन्ही विभागांचा नामकरण सोहळा पंतांच्या शताब्दी दिवशीच होत आहे. हे दान रुग्णसेवेसाठी आहे. देणा-यांनी निरपेक्ष भावनेने ते दिले आहे. पंतांच्या समाजकार्याची स्मृती जपणा-या या देणगीचा लोकांना अव्याहत उपयोग व्हावा याची जबाबदारी आता हॉस्पीटल व्यवस्थापनाची आहे. तेच पंतांना खरे अभिवादन ठरेल!
श्रीधर मराठे


विशेष लेख -
बाबा तुमच्यासाठी
प्रिय बाबा,
स. न. वि. वि.
आज खूप वर्षांनी पत्र लिहितेय तुम्हाला. खूप नियमित पत्र लिहायची मी तुम्हाला. पण, ती चौकशी करण्यासाठी आणि आम्हा सगळ्यांची खुशाली कळवण्यासाठीच असायची. माझ्या मनातले विचार सांगण्यासाठी किवा कधी तुमचा सल्ला ऐकण्यासाठी असा संवाद फारसा झालाच नाही. आज तुमच्या शंभराव्या जन्मदिवसाच्या निमित्ताने मी ते सांगायचा प्रयत्न करतेय, त्यासाठी हा पत्राचा घाट.
आमचा लहानपणाचा काळ हा अगदी वेगळा होता. आजच्यासारखं वडील-मुलांच्या प्रेमाचे उक्तीने वा कृतीने प्रदर्शन करण्याची तेव्हा फारशी पद्धत नव्हती आणि तशी गरजही नसायची. आपल्याकडे तर ती अजिबातच नव्हती. त्यामुळेच अगदी साध्या साध्या गोष्टींसाठी आमचा आपल्याशी संवाद असायचा तो आईच्या माध्यमातून, त्यामुळे आम्ही तुमच्यापासून दूरच राहिलो. नंतरच्या आयुष्यात तेव्हा थोडी संवाद साधण्याची मानसिकता तयार झाली तोवर आम्ही तुम्हा दोघांपासून खूपच दूर निघून गेलो आणि बोलायचं सगळं राहूनच गेलं! आता थोडं बोलायचा हा प्रयत्न.
‘बालपणीचा काळ सुखाचा‘ असं म्हटलं जातं. पण आमच्यासाठी ते तितकं सुखाचं कधी नव्हतंच. असंख्य अडचणींच्या आगारात आमचं बालपण, शिक्षण, संगोपन, संस्कार या सगळ्याच गोष्टी तशा अवघडच होत्या. खरं म्हणजे आमच्या पिढीत ब-याच लोकांना अशा या ना त्या प्रकारच्या अडचणी सोसाव्याच लागल्या. त्यामुळे तेही तसं विशेष नव्हतं. मात्र तुम्ही व आई दोघांनीही ज्या प्रकारे परिस्थितीला तोंड दिलंत त्यामुळे आम्ही तेव्हाही खरंच खूप चांगलं आयुष्य जगलो असंच आजही वाटतंय. तुम्हा दोघांच्या परस्पर सहकार्यामुळे आणि समजुतदारपणामुळे अवघड गोष्टीही खूपच सोप्या झाल्या.
तुमची शिस्तबद्ध दिनचर्या, नेमस्त जेवण्या-खाण्याच्या सवयी आणि आहे त्या परिस्थितीत स्वाभिमानाने, खंबीरपणाने, आत्मविश्वासाने वागण्याची रीत या सगळ्याच गोष्टी न बोलताही खूप काही शिकवून गेल्या. खरं म्हणजे त्या न कळत्या वयात आजूबाजूला दिसणारं वैभव डोळे दिपवणारं असायचं! खूप कुतूहलाच्या, नवलाईच्या आणि आकर्षित करु शकणा-या गोष्टींची रेलचेल बघत होतो. त्यांचा लाभ घेण्याचा प्रयत्न करणं अगदी सहज शक्य होतं. मात्र त्याचा मोह कधीच झाला नाही. उलट त्याविषयी एक अलिप्त भावच कायम मनात असायचा, जो आजही तसाच असतो. आता कळतय तुम्ही किती सहजपणाने आम्हाला खूप मौलिक धडा घालून दिलात. या सगळ्याचा परिपाक म्हणजे आपण काही कमी आहोत, आपल्याला काही अप्राप्य आहे असा कोणताही न्यूनगंड मनात निर्माण झाला नाही, तसेच कुठल्याही गोष्टीबद्दलची असोशीही निर्माण झाली नाही.
खरं सांगू बाबा,खूप चिडके होतात तुम्ही! तुमच्या रागाच्या भीतीने तुमच्यापासून आणखी चार पावलं दूर गेलो. पण तुमचं रागावणं का होतं हे आम्हालाही हळूहळू समजत गेलं आणि त्यामुळे त्याची भीती जरी वाटायची तरी ते चीड निर्माण करणारं ठरलं नाही. संतापी वडिलांच्या अनेक कथा ऐकत होतो. बघतही होतो. मात्र तुमच्या संतापी स्वभावाने बिथरुन जाऊन कोणताही टोकाचा किवा अविचारी निर्णय घेण्याचा विचारही कधी मनात आला नाही.
मला माहीत आहे बाबा, त्या काळात तशी पद्धत नव्हती आणि तुम्ही ज्या पद्धतीने वाढलात त्यात ते अपेक्षितही नव्हतं, त्यामुळेच तुमच्या व्यक्त प्रेमाचा अनुभव आम्हाला घेता नाही आला, पण तरीही तुमची आमच्याबद्दलची काळजी, हळवा भाव तुमच्या छोट्या छोट्या कृतीतून आमच्यापर्यंत पोहोचत होता. अर्थात तो पोहोचण्याच्या बाबतीत आईची भूमिका खूपच महत्वाची होती आणि ते तुम्हालाही माहीत होतं आणि आम्हालाही.
आमच्या समजुतीच्या काळात मोठे भाऊ बाहेर त्यांच्या शिक्षणात वगैरे व्यस्त होते. आम्ही चौघंही लहान व शिकणारी भावंडे. खूप अडचणीतून जात होता तेव्हा तुम्ही. तुमचा तेव्हा किती कोंडमारा होत असेल हे आता कळतं. तेव्हा ते वयही नव्हतं आणि परिपक्वताही नव्हती. मात्र तुम्हा दोघांची साथ आहे या एकाच आधारावर आम्ही सर्व अडचणी पचवत होतो. मात्र आजही आठवतं तेव्हा आश्चर्य एकाच गोष्टीचं वाटतं की, त्या सगळ्या परिस्थितीत आई इतकी सोशीक व शांत कशी राहू शकली? ती तुमच्याशी कडाडून भांडतांना किवा तुमच्या मागेही तुमच्याविषयी आम्हाला काही ऐकवताना कधीच आढळली नाही. सगळं समजून उमजून सोसत होती आणि आम्हालाही तसंच वागायचा संदेश आपल्या कृतीतून देत होती. आईच्या वागण्या वावरण्याने खूप प्रश्न सोपे झाले होते निश्चितच. पण बाबा तुम्हाला माहित होतं किवा नाही, मला माहित नाही, मात्र आम्हाला हे माहीत होतं की, या सगळ्याचं श्रेय आई तुम्हालाच देत होती. ती म्हणायची, ‘‘संकटाच्या काळात घरचा कर्ता पुरुष जेव्हा कुटुंबासोबत राहून संकटं धैर्याने झेलतो तेव्हाच कुटुंब त्यातून यशस्वीपणाने तरुन जातं.‘‘ किती खरं होतं तिचं म्हणणं, हे खूप उशिरा कळलं. आज मात्र ठायी ठायी या म्हणण्याचा प्रत्यय येतो. तुम्ही आमच्यासोबत असल्याने आम्हाला जगण्याची दिशा आणि बळ तर मिळालंच, पण संकटकाळातही कुठेही न भरकटता शांतपणाने व धैर्याने कसं पार पडता येतं याचा एक मौलिक धडाच आम्हा भावंडांना दिला. आज सभोवतालच्या समाजाचं भरकटलेलं स्वरुप, दिशाहीनता, संयमाचा आणि विवेकाचा अभाव हे सगळं बघताना लक्षात येतं की तुम्ही दोघांनी आम्हाला खरंच किती मोठी शिदोरी दिली होती. याचमुळे पुढच्या आयुष्यात अनेक संकटांना, अडचणींना न डगमगता तोंड देणं आम्हाला शक्य झालं.
कोणत्याही मनाला पटलेल्या गोष्टीत स्वतःला झोकून देणं हे तुमचं आणखी एक वैशिष्ट्य! आमच्या लहानपणीची तुमची काँग्रेसनिष्ठा व त्यापायी करीत असलेली धावपळ आम्ही बघत होतोच, पण सोसतही होतो. मात्र जीव तोडून केलेल्या या राजकारणाच्या सेवेत तुम्ही स्वतःसाठी निदान एका मुलासाठी तरी काही मिळवायला हवं होतं असं मला तेव्हा खूप वाटत असे. तुम्ही मात्र तसा कधी विचारही केला नाहीत. उलट त्यासाठी घरातल्या आमच्या घासातला अर्धा घास प्रसंगी पुढे केलात. खूप राग यायचा तेव्हा, अर्थातच मनातल्या मनात. आम्ही बहिणींनी तर तेव्हाच निश्चय केला होता की, या असल्या पदरमोडीच्या आणि मनस्तापाच्या फंदात कधी पडायचं नाही. मी तुम्हाला असं कितीही म्हणले तरी, ‘अच्छा है कुछ ले जानेसे देकरही कुछ जाना‘ ही तुमची वृत्ती नकळत मनात रुजलीच.
खरं म्हणजे बाबा! आमचा जितका राग तुमच्या राजकारणावर होता तितकाच तो तुमच्या समाजसेवेवरही होता. कोणालाही कोणतीही अडचण आली की, अगदी हक्काचं घर म्हणजे तुमचं घर! कोणाला कशाची माहिती दे, कोणाचे अर्ज लिहून दे, कोणाला हक्काची मदत मिळवून दे, हे तुमचं आपलं चाललेलंच असायचं. मग काय तुमचं मोफत सहाय्य केंद्र अगदी गजबजलेलं असायचं. तुमचा स्वभाव तुमच्यापेक्षा बाकी लोकांनाच अधिक समजला होता व त्याचा फायदाच नाही तर गैरफायदाही लोकांनी पुरेपूर घेतला. आपल्या पायलीभरातलं पसाभर देणं हे अगदी योग्यच आहे पण तुम्ही संत वाङमयाचे गाढे व्यासंगी, तुमचं आपलं ‘आल्या अतिथा मुठभर द्याया, मागे पुढती पाहू नको‘ ही अनंत फंदींची शिकवण अनुसरणं चालू असायचं आणि मग कधीकधी घरात आमची जी अवस्था व्हायची त्याला तोड नाही.
बघा बोलायला घेतलं आणि अगदी भरकटतच गेले की, खूप लांब झालं पत्र. आता आवरतं घेते, मात्र जाता जाता एक गोष्ट सांगायलाच हवी, तुम्हा दोघांचा वाचनाचा छंद हा आम्हाला तुम्ही दिलेला सगळ्यात मोठा धनाचा साठा. मोकळा वेळ चांगल्या वाचनात घालवण्याचा तुमचा छंद आमच्याही अंगवळणी इतका पडला की तो अगदी जिवाभावाचा सखाच झाला आहे. कितीही दमायला, कंटाळायला अगदी चिडायला झालं तरी छान काही वाचण्यासाठी असेल तर सगळं जगच विसरायला होतं. अगदी टी.व्ही.च्या भुक्कड मालिकासुद्धा.
शेवटी इतकंच सांगेन, आज आम्ही जिथे, जसे आहेत तिथे अगदी समाधानात आणि आनंदात आहोत. मात्र आठवण सदैव येतच असते आणि विशेषतः जेव्हा काही चांगलं घडतं तेव्हा तर खूपच आठवण होते. कारण आम्ही आजवर जे काही यश, मान-सन्मान, प्रतिष्ठा मिळवली त्याच्यामागे तुम्हा दोघांच्या पुण्याईचा, सच्चेपणाचा आणि निर्व्याज समाजसेवेचा जितका प्रभाव होता तितकाच तुमच्या आमच्यासाठी असलेल्या आशीर्वादाचाही होता. तुमचे आशीर्वाद आम्हाला आणि आमच्या पुढच्या पिढीला असू द्या इतकेच मागणे.
तुमची,
उषा.

तेथे कर माझे जुळती!
श्री. विष्णु गणेश तथा विष्णूपंत नाईक यांचा १७ जून १९११ रोजी वेंगुर्ले येथे सुखवस्तू कुटुंबात जन्म झाला. बालपण तसं लाडाकोडातच गेलं. वेंगुर्ले हे मुळातच गजबजलेले व्यापारी शहर आणि त्या काळातही शिक्षण, सांस्कृतिक जीवन, धार्मिक समारंभ या सर्वच बाबतीत सुधारलेले या गटात मोडत असल्यामुळे बालवयात या गोष्टींचा त्यांना फारच फायदा झाला.
वेंगुर्ल्यात त्या काळातही मॅट्रिक पर्यंतच्या शिक्षणाची सोय असल्यामुळे शिक्षण यथावकाश, व्यवस्थित सुरु झाले. मात्र हा काळ स्वातंत्र्यपूर्व काळ असल्यामुळे व सर्व देशभर सुरु असलेल्या स्वातंत्र्य चळवळीत हे पुढारलेले गाव मागे राहणे शक्यच नसल्यामुळे शिक्षणाच्या मधल्या टप्प्यात इंग्रजांच्या शाळांवर बहिष्काराची जी चळवळ सुरु झाली. त्या दरम्यान विष्णुपंतांनी वेंगुर्ल्यात दे.भ. आबा वालावलकरांनी स्थापन केलेल्या राष्ट्रीय शाळेत शिक्षण घेण्यास सुरुवात केली. या शाळेतच कै. नारायण सिताराम आरोसकर हे गुरु म्हणून लाभले. त्यांनी त्या काळात दिलेले संस्कृतचे धडे व तसेच शिस्तीचे धडे हे पुढे जन्मभराची शिदोरी ठरली. (कै.नारायण आरोसकरांची मुलगी सुधा माझी पत्नी झाली व माझी बहिण सुधा त्यांची सून झाली.) या संस्कृतच्या शिक्षणाच्या पक्क्या पायाच्या आधारावरच नंतर आयुष्यभरात अनेक संस्कृत ग्रंथांचा केलेला अभ्यास अगदी पदव्युत्तर स्तरावरच्या विद्यार्थ्यांनाही मागे टाकणारा होता.
त्या काळात मॅट्रिकची परीक्षा मुंबईत जाऊन द्यावी लागत असे. त्यांच्या प्रकृतीला या परिक्षेसाठीचा प्रवास व दगदग फारशी मानवली नाही व आजारपणाला तोंड देणे भाग पडले. परिणामी, शिक्षणासाठी मुलाला दूर पाठवण्याच्या बाबतीत नाराज असलेल्या त्यांच्या वडिलांनी पुढचे शिक्षण घेऊन किमान पदवीधर होण्याची त्यांची इच्छा पूर्ण करण्याची परवानगी दिली नाही व म्हणून क्षमता असून, प्रबळ इच्छा असूनही त्यांनी आपली ही इच्छा सोडून दिली व वडिलांच्या इच्छेप्रमाणे घराची जबाबदारी स्विकारली. शिक्षणाची अपुरी राहिलेली आपली इच्छा त्यांनी बंधू कै. महादेव गणेश नाईक यांना एल.एल.बी. व नंतर त्यांच्या इच्छेनुसार बी.टी.पर्यंत शिक्षण देऊन पूर्ण केली. स्वतःच्या मुलांच्या बाबतीतसुद्धा, परिस्थिती प्रतिकूल असूनही महाविद्यालयीन शिक्षण घेण्यास शक्य ते प्रोत्साहन दिले.
शिक्षण जरी जास्त घेता आले नाही. तरीही अंगीकृत बुद्धिमत्ता व ग्रहणक्षमता, मराठी, संस्कृत व इंग्रजी या तिन्ही भाषांवरील प्रभुत्व यामुळे वाचनाची आवड फार मोठी होती व त्यामुळे व्यासंगही गाढा होता. संत वाङमय, ज्ञानेश्वरी यांचा अभ्यासाच्या बाबतीत त्या काळात तरी त्यांची बरोबरी करणारी व्यक्ती गावात नव्हती असेच म्हणावे लागेल. एम.ए.चा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांना ज्ञानेश्वरी शिकविण्याचे काम त्यांनी त्या काळात केले होते.
वाचनामुळे वक्तृत्व व लेखन गुणही त्यांच्याकडे होते. प्रसंगानुरुप वक्तृत्व व प्रसंगानुसार काव्य वा गद्य लेखन हा त्यांचा हातखंडा होता. इ.स.१९२२ पासून वेंगुर्ल्यातून प्रसिद्ध होणा-या ‘किरात‘ साप्ताहिकामध्ये अनेक वर्षे संपादकीय मजकूर लेखनाचे काम विष्णुपंतांनी केले होतेच व तेव्हाचे संपादक कै.के.अ.मराठे यांच्याबरोबरीने या साप्ताहिकासाठी अन्य कामही केले होते. याखेरीज काव्य, लेख, कथा, नाटके या प्रकारचे लिखाणही त्यांनी केले होते. मात्र ते साहित्य अप्रकाशित व दुर्लक्षितच राहिले व काळाच्या ओघात नष्टही झाले.
आवाजाची देणगी त्यांना त्यांच्या आईकडून मिळाली होती. आवाजातला नैसर्गिक गोडवा, उत्तम उच्चार, असंख्य अभंग, भजनांचे पाठांतर यामुळे अनेक धार्मिक समारंभात व पालखीच्यावेळी भजनांसाठी त्यांची उपस्थिती अपरिहार्य अशीच असे. त्यांचे आवडते दैवत म्हणजे ‘विठ्ठल रखुमाई‘ या मंदिरात वर्षातून दोनवेळा होणारी काकड आरती न चुकविण्याचा त्यांचा कटाक्ष असे. शिवाय दर महिन्यात एकादशीच्या दिवशी प्रवचन करण्याचा रिवाज त्यांनी अनेक वर्षे पाळला होता. ते उत्तम किर्तनकार होते. अनेक वर्षे मारुती मंदिरात हनुमान जन्माच्यावेळचे किर्तन तेच करीत असत.
सामाजिक कार्य हा जणू त्यांचा छंदच असावा इतके ते त्यात समरसून जात. अतिवृष्टी, वादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीत किवा अशाच अन्य आपत्तीत शक्य ती मदत अगदी सहजभावनेने देऊ करीत, त्यामुळेच अशा प्रसंगी किवा अन्य प्रसंगी गरजूंना सरकारी मदत मिळवून देण्याचं मोफत मदत केंद्र आमच्या घरात सदैव चालूच असे व अशा अनेक प्रसंगी कित्येकांना चहा-जेवणही देतांना त्यांचा हात मागे नसे. अर्थात त्याचे चटके घरातल्या व्यक्तींना किती सोसावे लागले याबाबत न बोलणेच बरे!
ऐन तारुण्याचा काळ हा स्वातंत्र्यपूर्ण काळ. त्यामुळे त्याकाळात चालू असलेल्या स्वातंत्र्यलढ्यात न पडणे हे त्या काळच्या सुजाण तरुणाला शक्यच नव्हते. हेही त्याला अपवाद नव्हते. मात्र, त्याच वेळी आजारी वडिलांची जोखीम व संपूर्ण कुटुंबाची एकट्याच्या शिरावर असलेली जबाबदारी याचं भान बाळगणं भाग होतं. त्यामुळे स्वातंत्र्य लढ्यात झोकून देणे बेजबाबदारपणाचे ठरले असते, म्हणूनच स्वातंत्र्यलढ्यात त्यांना छुपेपणाने सहभागी व्हावे लागले व त्यासाठी भूमिगत होणेही भाग पडले.
स्वातंत्र्योत्तर काळात राज्यकर्त्या काँग्रेस पक्षाच्या सहकार्याने गावाचा शक्य तितका विकास साधावा या हेतूने अनेक वर्षे काँग्रेसचे काम अगदी तळमळीने व कार्यक्षमतेने केले. मात्र नंतरच्या काळातली त्या पक्षाची तत्वे मानवणारी नाहीत हे लक्षात आल्यावर त्याच निग्रहाने काँग्रेसचा त्याग केला.
गावाला अधिकाधिक विकसित करण्याच्या दृष्टीने जे जे काही करणे आवश्यक वाटले अशा सर्व गोष्टींचा विष्णूपंतांनी सतत पाठपुरावा केला व त्यामुळेच त्या काळात गावातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणविषयक गरजा भागविणा-या पाटकर हायस्कूल, कन्याशाळा, मंगेश विद्यालय या माध्यमिक शिक्षण देणा-या नावाजलेल्या संस्थांना सतत मदत, मार्गदर्शन केलेच व त्या शाळांच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्षपदही भूषवले. गावातील १०० वर्षांपेक्षा जुन्या अशा प्राथमिक शाळांनाही योग्य ती मदत मार्गदर्शन करीत राहिले.
गावात महाविद्यालय असणे ही त्यांची अगदी अनेक वर्षांची तीव्र इच्छा होती व जेव्हा बॅ.बाळासाहेब खर्डेकर, प्राचार्य एम.आर.देसाई हे कोकणात महाविद्यालय स्थापन करता येईल का याची पाहाणी करण्यासाठी सावंतवाडी येथे येणार असल्याचे कळले तेव्हा स्वतः सावंतवाडी येथे जाऊन वेंगुर्ला हे त्यासाठी किती योग्य ठिकाण आहे हे त्यांना अशाप्रकारे पटवून दिले की, दक्षिण कोकणातलं पहिलं महाविद्यालय वेंगुर्ल्यात सुरु झालं. आजवर या महाविद्यालयातून हजारो तरुण पदवीधर होऊन निरनिराळ्या व्यवसायात, उद्योग, नोकरीत स्थीर झाले आहेत.
गावातले वाचनालय हे गावाच्या सुसंस्कृतपणाचा व विचार समृद्धतेचा आरसा असतो. आमच्या गावात त्या काळात असे १०० वर्षे जुने वाचनालय होते ही गावाच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची गोष्ट होती. या वाचनालयाच्या जीर्णावस्थेच्या काळात वेगवेगळ्या टप्प्यात त्यांनी अनेक वर्षे काम केले व विशेषतः १९६६ ते १९८१ या अतिशय महत्त्वाच्या कालखंडात त्यांनी कार्यवाह पदावर काम करतांना संस्थेला जी शिस्त लावली व एक नेमस्तपणा व आकार दिला तो अगदी कौतुकास्पद असाच होता. त्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत वर्णन करण्याच्या पलिकडची होती. या काळात संस्थेच्या अनेक गरजा पूर्ण करण्यासाठी व विशेषतः आज ज्या नवीन इमारतीत नगर वाचनालयाचा कारभार चालतो त्या इमारतीसाठी विविध थरातील लहान-मोठ्या व्यक्तींकडून देणग्या व तत्सम मदत मिळविण्यासाठी त्यांनी आपल्या मुलांच्या सहकार्याने घेतलेली जिवापाड मेहनत याचे आम्ही सर्वच कुटुंबीय साक्षीदार आहोत.
गावातील विविध सामाजिक कार्यक्रम आयोजनात त्यांचा सहभाग मोलाचा असे. गावाच्या विकासासाठी होणा-या कोणत्याही कार्यक्रमात किवा बैठकीत त्यांची हजेरी ही अगदी अपरिहार्यच होती. वानगीदाखल सांगायचे तर १९६० सालात वेंगुर्ले येथे झालेले कोकण विकास परिषदेचे आयोजन. या परिषदेच्या प्रारंभापासून ते यशस्वीपणे पार पडेपर्यंत विष्णुपंतांचे प्रत्येक गोष्टीतले नियोजन अगदी वाखाणण्याजोगे होते. इतकेच नाही तर या कार्यक्रमासाठी त्यांनी स्वतः रचलेली ‘ईशस्तवन‘ व ‘स्वागतगीत‘ या दोन्ही रचना आजही वाचतांना गहिवरायला लावतात. याच परिषदेदरम्यान कोकण वासियांच्या रेल्वेच्या अगदी जिव्हाळ्याच्या प्रश्नालाही वेग देण्याचा प्रयत्न झाला होता व त्यावेळच्या समविचारी राजकारण्यांच्या मदतीने याबाबत खूपच वाटचालही केली गेली. कोकणच्या बहुसंख्य लोकांना शिक्षण, रोजगार या सर्वच गोष्टींसाठी मुंबईकडे धाव घेणे अपरिहार्य होते. मात्र डोंगरद-यांच्या या प्रदेशातील एस.टी.बसचा १४-१६ तासांचा खडतर प्रवास हा एक भयंकर अनुभव असे. साहजिकच आगगाडीचा सोपा प्रवास आपल्याला लाभावा ही प्रत्येक कोकणवासियांच्या अंतरीची आस होती. हे स्वप्न सत्यात उतरावे यासाठी त्यावेळच्या राजकर्त्यांना सतत जागते ठेवण्यासाठी झटणा-यांमध्ये विष्णुपंत अग्रणी होते. आज या कोकण रेल्वेचा सुखकर प्रवास उपभोगायला ते नाहीत.
गावात त्या काळात कार्यरत असणा-या सर्वच संस्थांशी विष्णुपंतांचे सहकार्याचे संबंध होते. त्या काळात गावाचे वैभव असणारे सेंट लुक्स हॉस्पिटल हेही त्याला अपवाद नव्हते. येथे कार्यरत असणारे डॉ.सव्र्हड व डॉ.सिटन हे तसेच त्या काळात या रुग्णालयात निष्णात शल्यविशारद म्हणून कार्यरत असलेले डॉ.सत्राळकर हे त्यांचे अगदी जवळचे व जिव्हाळ्याचे मित्र होते.
सर्वात शेवटी उल्लेख करावयाची महत्त्वाची बाब म्हणजे गावातील कुठल्याही गरजू माणसाने कोणत्याही वेळी, अगदी मध्यरात्रीसुद्धा मदत मागितली तर यांचा हात नेहमी पुढेच राहिला. त्यातला महत्त्वाचा भाग म्हणजे एखाद्या व्यक्तीचे निधन झाले आणि त्याला निरोप देण्यासाठी स्मशानापर्यंत जाणे गरजेचे असेल तर त्यांनी कधीही कोणत्याही क्षणी ते नाकारले नाही. अगदी स्वतःला व घरातल्या माणसांना त्रास झाला तरीही. अखेर गावाच्या या अनावर ओढीमुळेच त्यांनी अखेरचे दिवस अगदी जिद्दीने तिकडेच घालवले व गावातच अखेरचा श्वास घेतला. यापेक्षा वेगळी मातृभूमीची ओढ वेगळी काय असू शकेल!- स. वि. नाईक

मानवाच्या कल्याणासाठी
सर्वसाधारण संसारात असलेल्या मनुष्यांना प्रामुख्याने ऐहिक सुखलालसेचीच इच्छा असते व अशी इच्छा असणे ही गोष्ट स्वाभाविक आहे. भगवान गोपालकृष्णांनीही अर्जुनाला निमित्त करुन सर्व विश्वाच्या कल्याणाकरिता, जी प्रत्यक्ष रणांगणावर, त्याची कर्तव्यपराङ्मुखता घालवून त्याला कर्तव्योन्मुख करण्यासाठी निवेदन केली, त्या श्रीमद्धगवद्धीतेच्या अठराव्या अध्यायातही, भगवंतांनी सर्वसाधारण संसारी जीवासाठी हा बुद्धियोग म्हणजे कर्मयोगच सांगितला आहे.
स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धि लभते नरः।
स्वकर्मनिरतः सिद्धि यथा विन्दति तच्छृणु ।।
(श्रीमद्धगवद्धीता १८ः४५)
या श्लोकाचा अर्थ फार मनन करण्यासारखा आणि विचार करण्यासारखा आहे. आपापल्या कर्माच्या ठिकाणी जो मनुष्य रत होतो, त्याला वैराग्यप्राप्ती होते आणि तो स्वकर्मरत मनुष्य मोक्षमार्गाचा अधिकारी होतो. (क्रमाक्रमाने मोक्ष पावतो.) या श्लोकावर विवरण करतांना श्रीज्ञानेश्वर महाराज लिहितात.
हें विहित कर्म पांडवा । आपुला अनन्य वोलावा ।
आणि हेचि परम सेवा । मज सर्वात्मकाची ।।
(ज्ञानेश्वरी १८ः९०६)
अगा जयासि जें विहित । तें ईश्वराचे मनोगत ।
म्हणौनि केलिया निभ्रांत । सांपडेचि तो ।।
(ज्ञानेश्वरी १८ः९११)
यतः प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततम् ।
स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धि विन्दति मानवः ।।
(श्रीमद्धगवद्धिता १८ः४६ वा)
यातही श्री ज्ञानेश्वर म्हणतात,
तया सर्वात्मका ईश्वरा । स्वकर्मकुसुमांची वीरा ।
पूजा केली होय अपारा । तोषालागीं ।।
(ज्ञानेश्वरी १८ः९१७)
या सर्व उपदेशाचा विचार करता सर्वसाधारण संसारी माणसाला कर्मयोग हाच प्रामुख्याने शिकविणे व आचरण करुन दाखविणे जरुर आहे असे वाटते. परंतू हा कर्मयोग सकाम वा निष्काम रीतीने आचरण करण्याला तो मनुष्य, प्रथमतः व्यावहारिकदृष्ट्या थोडास तरी सुखी असलाच पाहिजे. तरच त्याचे चित्त वा लक्ष शांत राहील व नंतर तो कर्मयोगाचार करण्यास अगर अध्यात्मज्ञानाचा अधिकारी होण्यास योग्य व लायक होईल.
यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीला शुद्ध आचार, शुद्ध विचार, शुद्ध सात्त्विक ज्ञान, शुद्ध उच्चार हे सर्व शिकविणे व सत्कर्मप्रवृत्त करणे जरुरीचे आहे, कारण समाज हा एक एक व्यक्ती मिळून शत, सहस्त्र, लक्ष, कोटी अशा श्रेणीने बनलेला आहे. परंतू प्रथमतः त्यांत व्यक्तीलाच प्राधान्य देणे जरुरीचे आहे. प्रत्येक व्यक्ती आचार-विचार-उच्चार-संपन्न, नीतीसंपन्न, न्यायसंपन्न, सत्कर्मसंपन्न, सत्शास्त्रसंपन्न अशी बनली म्हणजे आपोआपच, समाज हा आचार-विचार-उच्चार-संपन्न बनतो.
परंतू हे सर्व समाजाला शिकविण्यासाठी धर्मनिरपेक्ष व निःस्वार्थी अशा संस्था, आणि त्या संस्थांतून स्वार्थत्यागी, निष्काम कर्मयोगी, सेवाधर्मपारायण अशी माणसे तयार व्हावीत म्हणूनच ‘‘श्रीसंत सीतारामबुवा वालावलकर चॅरिटेबल ट्रस्ट‘‘ ही संस्था स्थापन करण्यात आली आहे. मानवसेवाधर्म आणि निष्काम कर्मयोागाचा आचार हेच या संस्थेचे ध्येय आहे.
आजचा भारतातील मानवी समाज हा अत्यंत गांगरुन गेलेला, लाचार बनलेला आणि ध्येयशून्य असा झाला आहे. या समाजाला धड खायला अन्न मिळत नाही, प्यायला पाणी मिळत नाही, राहायला घर नाही, नेसायला वस्त्र नाही, रोग निवारणाकरिता वैद्यकिय मदत नाही, उत्तम शिक्षण नाही, पोट भरण्याकरिता कामधंदा नाही, स्वधर्माचे ज्ञान नाही, स्वकर्माचे ज्ञान नाही अशा हतबल, निरुत्साही आणि उत्सन्न बनलेल्या या आपल्या स्वदेश व स्वधर्मबांधवांना, जर आम्ही वरील गोष्टी प्राप्त करवून देण्याचे प्रयत्न केले नाहीत, तर या भारतातील हा मानव समाज अवनतीला जाईल व शेवटी नामशेष होईल की काय, अशी भिती निर्माण झाली आहे.
भगवान व्यासमहर्षींनी हा युगधर्माचा मार्ग पूर्वीच दाखवून दिलेला आहे. धर्माची सुरुवात आणि धर्ममंदिराची स्थापना, प्रथमतः मानवाच्या हृदयात होत असते आणि त्या मंदिराचा पाया पोटात असतो. आज आपण भगवान व्यासमहर्षींनी सांगितलेला, ख-या सेवाधर्माचा आचार-विचार विसरुन गेलो आहोत आणि त्याच ख-या धर्माचा थोडास तरी आचार करण्याचे या विश्वस्त निधीने घोषित करुन थोडे तरी कार्यान्वित केले आहे. (त्या ख-या धर्माचे प्रात्यक्षिक श्रीसद्गुरु दिगंबरदास महारजांनी डेरवण येथील कार्यातून जगला दर्शविले आहे.)
म्हणून भगवान व्यासमहर्षी म्हणतात,
अशनं वसंन वासः येषांचैवा व्यवस्थितम् ।
मगधेन समा काशी गंगाप्यङ्गारवाहिनी ।।
म्हणजे ज्या समाजातील व्यक्तींचे खाणे, पिणे, कपडालत्ता, राहण्यासाठी घर हे व्यवस्थित नाही, त्यांना पवित्र काशी किवा मगध देश दोन्ही सारखेच. तसेच त्यांना शीतल गंगाजळ हे इंगळाच्या नदीप्रमाणे तापदायक ठरणार. तात्पर्य हीनदीन स्थितीमध्ये जगणारा मनुष्य उच्च तत्त्वज्ञान पेलण्यास असमर्थ असतो. भौतिक, धार्मिक वा अध्यात्मिक गोष्टींचा हा पायाच आहे आणि पायाचा एकतरी दगड निदान बसवावा असे सेवाधर्माचे व्रत ‘श्रीसंत सीतारामबुवा वालावलकर चॅरिटेबल ट्रस्ट‘ या संस्थेने अंगिकारले आहे हे महत्त्वाचे आहे.
- श्रीसद्गुरुचरणरज
श्री. विठ्ठल गणेश जोशी

आदरणीय व्यक्तिमत्व - कै. वि. ग. नाईक
वेंगुर्ले शहरातील जुन्या पिढीतील ज्या व्यक्तींनी स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात शहराच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीत भरीव कार्य केले त्यामध्ये कै. श्री. विष्णु गणेश नाईक यांचे नांव आवर्जून घ्यावे लागेल. खादीचा पांढरा स्वच्छ सदरा, धोतर आणि डोक्यावर गांधी टोपी या वेषात भरभर पावले टाकीत जाणारे श्री. नाईक आजही आठवतात. शहरात आणि परिसरात ‘पंत‘ या नांवाने ते परिचित होते.
१७ जून १९११ या दिवशी त्यांचा जन्म झाला. वडिलांचा व्यापार होता. श्री. विष्णुपंत लहानपणापासूनच शिक्षणात हुषार होते. तेव्हाची अकरावी म्हणजे मॅट्रीकची परीक्षा होती. त्या परीक्षेत उत्तम यश मिळविले. परंतू पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी वेंगुर्ल्याबाहेर जाण्यास परवानगी मिळू शकली नाही. त्यांचे मराठी व संस्कृत भाषेवर प्रभुत्व होते. संस्कृतमधील अनेक वचने त्यांना मुखोद्गत होती. ज्ञानेश्वरीतल्या ओव्या, मोरोपंतांच्या आर्या, तुकारामांचे अभंग, अर्वाचीन कवींच्या कविता त्यांना तोंडपाठ होत्या. या सर्वांचा वापर ते आपल्या वक्तृत्वातून करीत असत. अनेक विषयांवरील पुस्तकांचे त्यांचे वाचन अव्याहत चालू असे. जणू काही वाचन आणि पुस्तके ही त्यांची जीवनशैलीच बनून गेली होती. चातुर्मासात ते पांडव प्रताप, भक्तिविजय इ. ग्रंथांचे वाचन करीत. शहरातील विठ्ठल मंदिरात तर कित्येक वर्षे ते पहाटे काकड आरतीसाठी नित्य नियमाने जात असत. पूर्वी या विठ्ठल मंदिरात कै. आजगांवकर वकील, प्रा. डॉ. चि. त्र्यं. केंघे (खर्डेकर महाविद्यालयातील तत्कालीन संस्कृत व तत्वज्ञानाचे प्राध्यापक) हे ज्ञानेश्वरीवर प्रवचन करीत असत. हे वेंगुर्ल्याच्या आध्यात्मिक क्षेत्रातले एक वैशिष्ट्य होते. श्री. नाईक यांचा संत साहित्याचा व्यासंग असल्यामुळे त्यांनीही ज्ञानेश्वरीवर निरुपणे केलेली आहेत व ती अजूनही अनेकांच्या स्मरणात असावीत. वेंगुर्ल्यातील सार्वजनिक उत्सव, देवस्थानचे उत्सव इ. मध्ये त्यांचा सहभाग ठरलेला असायचा. तसेच गोवा मुक्तीनंतर अडवलपाल (गोवा) येथील श्री देवी शर्वाणी वेताळ महारुद्र देवस्थानच्या सर्व उत्सवात ते अत्यंत उत्साहाने सहभागी होत असत.
स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी भाग घेतला होता. अखिल भारतीय काँग्रेस पक्षाची विचारसरणी त्यांनी स्विकारली होती. ते निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्ता होते. त्यांच्या घरी असलेली पं. नेहरु, राजेंद्र प्रसाद, राजाजी, सरदार पटेल यांची भव्य चित्रे त्याची साक्ष आजही देतात. परंतू काँग्रेस दुभंगल्यानंतर त्यांनी संघटना काँग्रेस मध्येच राहणे पसंत केले. नंतर संघटना काँग्रेस जनता पक्षात विलीन झाल्यामुळे १९७७ च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी जनता पक्षाचे उमेदवार प्रा. मधु दंडवते यांच्या प्रचारात भाग घेऊन अनेक सभांतून भाषणेही केली होती.
लोकांचे वाचनच कमी झाले. त्यामुळे वाचन संस्कृती संपणार, दूरचित्रवाणीमुळे पेपरही वाचला जात नाही अशा प्रकारच्या तक्रारी नेहमी ऐकू येतात. अशा परिस्थितीत वाचनाबद्दल समाजात जागृती निर्माण व्हावी, लोकांना विविध विषयांवरील पुस्तकांचा आस्वाद घेता यावा या एकमेव उद्देशाने श्री. नाईक यांनी वेंगुर्ले शहराचा मानबिदू असलेल्या वेंगुर्ले नगर वाचनालयाचे कार्यवाहपद स्विकारुन वाचनालयामध्ये उत्तमोत्तम पुस्तके उपलब्ध करुन दिली व त्यासाठी त्यांनी बरेच परिश्रम घेतले. त्यांच्या अथक प्रयत्नांनी वाचनालयाचा दर्जा व गुणवत्ताही सुधारली. कथा-कादंब-यांच्या चौकटीत अडकून न पडता त्या पलिकडे जाऊन ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञान-आरोग्य - शेती-व्यापार इत्यादी विषयांनी मराठी साहित्य विश्व समृद्ध करणारी अनेक पुस्तके वाचनालयात उपलब्ध करुन देण्याचे कार्यही त्यांनी कळकळीने केले व त्याचबरोबर व्यवस्थापनाची जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळली. या कामात त्यांना त्यावेळच्या कार्यकारी मंडळाच्या सदस्यांची तसेच श्री. वल्लभ धोंड, राय, गोळम या कर्मचा-यांची साथ लाभली.
विष्णुपंतांना लेखनाची आवड होती. घराच्या बाहेरील ओटीवर टेबलावरती विजेचा दिवा लावून रात्री खूप उशिरापर्यंत त्यांचे लिखाण चालू असायचे. सा. ‘किरात‘, सा.व्याध, सा. नवकोंकण इ. त्यावेळच्या रत्नागिरी जिल्ह्यातील वृत्तपत्रांतून त्यांनी अनेक विषयांवर लिखाण केलेले आहे.तसेच वेंगुर्ल्यातील प्रसिद्ध सा. ‘किरात‘चे संपादकत्वही त्यांनी काही काळ भूषविले होते.
संगीत ऐकणे हाही त्यांचा छंद होता. त्यांना गायनाचीही आवड होती. लहान-थोरांशी सारख्याच आत्मीयतेने ते बोलत आणि चौकशी करीत. वेंगुर्ल्यातील शिक्षण क्षेत्रातही त्यांचा वावर असायचा. शहरातील नावाजलेल्या वेंगुर्ले एज्युकेशन सोसायटीचे ते अनेक वर्षे कार्यकारी मंडळ सदस्य होते. तसेच काही काळ चेअरमन म्हणूनही त्यांनी काम पाहिले. जे जे नवीन, सुंदर आहे ते अगदी सहज स्विकारण्यासाठी ते नेहमीच तयार असत.
त्यांच्या जीवनात त्यांना कै.सौ.माई (लक्ष्मीबाई वि. नाईक) यांनी मोलाची साथ दिली म्हणूनच ते सामाजिक कार्य करु शकले. कै. विष्णुपंत व कै.सौ.माई यांनी आपल्या सर्व मुलांना सुसंस्काराची जन्मभर पुरणारी शिदोरी दिली. मुला-मुलींनी निवडलेल्या क्षेत्रात त्यांची वाटचाल पाहतांना त्यांन मनस्वी आनंद होत असे व तो आनंद योग्यवेळी व्यक्तही करीत असत. त्यांची मुले उच्च विद्याविभूषित असून आपापल्या क्षेत्रात मोठ्या दर्जाचा पदावर कार्य करुन निवृत्त झाली आहेत. आता त्यांची तिसरी पिढीही उच्च विद्याविभूषित असून देशात आणि परदेशात उच्च पदांवर कार्यरत आहेत.
सामाजिक बांधीलकी मानून कार्य करणा-या कै. वि. ग.नाईक यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या विषयीचे मला ज्ञात असलेले विचार व्यक्त करतांना त्यांच्या आदरणीय स्मृतीस विनम्र अभिवादन.
- बाळ खानोलकर
गोरेगांव, मुंबई मोबा. ९८६९८४८४१६

एक कुशल व्यवस्थापक
वेंगुर्ले नगर वाचनालयाचे सन्मान्य आजीव सभासद, माजी कार्यवाह कै. श्री. विष्णुपंत गणेश नाईक यांची अद्यापही उणिव भासत आहे. त्यांच्या कार्याचा उल्लेख करतांना त्यांनी नगर वाचनालय वेंगुर्ले संस्थेला जी उर्जितावस्था आणली. संस्था भरभराटीस येण्यास जे परिश्रम केले ते सांगावे तेवढे थोडेच आहे.
या आधी ते काँग्रेस सभासद, वेंगुर्ला एज्युकेशन सोसायटीचे माजी चेअरमन, एक प्रगल्भ वक्ते, किर्तनकार, सामाजिक कार्यात सहभाग असणारे म्हणून ओळखले जात. स्वातंत्र्यसैनिक आबासाहेब वालावलकर यांनी ज्या ज्या व्यक्तींना मार्गदर्शनल केले त्या व्यक्तितील एक शिष्य म्हणजे पंत.
वेंगुर्ल्यातील पडवळ कुटुंबिय वेंगुर्ले वाचनालयातून निवृत्त झाल्यावर ग्रंथालय संस्थेचा सर्व आर्थिक कारभार नेटाने चालविणारे, कागदपत्रे, हिशेब, दप्तर व्यवस्थित ठेवणारे, वाचनालयाच्या संबंधी सरकारी कागदपत्रांना उत्तरे देण्यात तरबेज असणारे पंत संस्थेचे खंबीर आधारस्तंभ होते. व्यापारी वर्गाच्या विठ्ठल मंदिरातील काकड आरती सातत्याने नियमितपणे सुमारे ३० वर्षे त्यांनी व त्यांच्या सौ. लक्ष्मीबाई यांनी व्यवस्थित चालविली होती.
वाचनालयात वासंतिक व्याख्यानमाला भरविणे, हितचितक सभेमार्फत व संस्थेच्या शतकमहोत्सवा वेळी मोलाचे कार्य करणे, सर्व पदाधिका-यांना विश्वासात घेऊन मार्गदर्शन करणे, हा त्यांचा स्थायी भाव होता. सुमारे २५ वर्षे संस्थेचा आर्थिक कारभार सुरळीत चालविला.
पंत १९३७ सालापासून १९३९ पर्यंत प्रथम वाचनालयाचे कार्यवाह झाले. दुस-या टप्प्यात १९६२ पासून मे १९८३ पर्यंत सलग २१ वर्षे त्यांनी आपल्या सबलतेने नगरवाचनालयाचे कार्यवाहपद सांभाळले. पंत दररोज वाचनालयात येत. त्यांच्या दैनंदिन कारभारावर लक्ष असे. इमारतीच्या देखभाल दुरुस्तीपासून ते संचनालयाच्या पत्रांना उत्तने देण्याचेही काम त्यांनी तत्परतेने पार पाडले.
त्यांच्याच कार्यवाह पदाच्या काळात संस्थेचा शतक महोत्सव पार पडला. यावेळी प्रसिद्ध लेखक अनंत काणेकर हे अध्यक्ष म्हणून लाभले होते. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून स्वामी कादंबरीकार रणजित देसाई आले होते.
नगरवाचनालयाची दैनंदिन कामाची काहीशी विस्कळीत झालेली घडी बसविण्याचे महत्त्वाचे कार्य विष्णुपंतांनी केले. सध्या दुमजली दिसणारी संस्थेची इमारत उभारण्याच्या कामी विष्णुपंतांनी मोलाचे योगदान दिले होते.
मराठी प्रमाणेच इंग्रजीवरही त्यांचे प्रभुत्व होते. इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी दैनिकात त्यावेळी दक्षिण रत्नागिरीतील चालू घडामोडी संबंधी माहिती ते देत असत. या एकाच उदाहरणावरुन त्यांच्या कड्यार् इंग्रजीची जाणीव सर्वांना निश्चित होईल.
एत्रादी गोष्ट मनाविरुद्ध झाली तर ते पंतांना सहन होत नसे. त्यांचा निर्णय ब-याचवेळा अचूक असायचा. सदर निर्णय योग्य आहे हे पटवून देऊन त्याप्रमाणे कार्यवाही करुन घेण्यात ते तरबेज होते. खादीचे नेहरु शर्ट, स्वच्छ पांढरेशुभ्र धोतर, कडक इस्त्रीची गांधी टोपी हा त्यांचा पेहराव सर्व परिचित होता. विशेष प्रसंगी ते जाकीटही परिधान करीत. कडक शिस्तीचे म्हणून ते व्यवस्थापनात प्रसिद्ध होते.
नाईक कुटुंबियच उच्चशिक्षित होते. तोच वारसा त्यांच्या मुलामुलींनी चालविला आहे. त्यांचे या संस्थेस लाभलेले योगदान विसरता येणार नाही. त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन!
- अनिल श्रीकृष्ण सौदागर,
कार्याध्यक्ष,
नगर वाचनालय वेंगुर्ले

स्व. विष्णुपंत नाईक ः एक संयमी व्यक्तिमत्व
वेंगुर्ल्यामध्ये जुन्या पिढीतील सर्वांना ज्ञात आहे की, विष्णु गणेश तथा विष्णुपंत नाईक या नावाचे एक समाजसेवी व्यक्तिमत्व या शहरात होऊन गेले. यावर्षी जून २०११ पासून त्यांचे जन्मशताब्दी वर्ष. ते वेंगुर्ले नगरवाचनालयाचे कार्यवाह असतानाच्या काळात मी या वाचनालयात ग्रंथपाल होतो. त्यातून जाणवलेले त्यांचे व्यक्तिमत्व सांगण्याचा हा प्रयत्न.
पांढरे शुभ्र धोतर, शुभ्र सदरा, त्यावर खादीचे जॅकेट व पांढरी टोपी, वर्ण सावळा व जलद चाल. समोरुन येत असतांना कुणीही ओळखावे हे विष्णुपंत आहेत. त्यांच्या सान्निध्यात सुमारे १५-१६ वर्षे रहाण्याचा योग मला आला तो नगरवाचनालयाचा ग्रंथपाल म्हणून काम करतांना. कारण ते या संस्थेचे मानद कार्यवाह म्हणून काम करीत होते. त्यांचा जन्म वेंगुर्ल्यातच झाला. त्यांच्या पत्नी सर्वांच्या ‘माई‘ म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यांना तीन कन्या व चार मुलगे असे कुटुंब. त्यांचा व्यवसाय खादी भांडार चालवायचा. धड नोकरी नाही. किरकोळ जमिनी होत्या त्या कुळांकडे होत्या. उत्पन्न जेमतेम. स्वस्ताई होती पण पैसा दिसत नसे. मदत कुणाची नाही व मुले मुळातच हुशार असल्याने शिकणारी. प्रपंच चालविणे कठीण होते. पण न डगमगता अनेक चांगल्या-वाईट प्रसंगांना तोंड देत त्यांनी मुलांना शिक्षण दिले. पुढे मुले मोठी झाली. त्यांचे दोन मुलगे स्टेट बँकेत गुणवत्तेच्या जोरावर मोठ्या हुद्द्यावर पोचले. मोठा मुलगा एक्साईज अँड कस्टममध्ये कलेक्टर झाला. आता त्यांना पैशांची कमी नव्हती आणि सर्व मुले त्यांना फार मान देत. त्यांचा स्वभाव थोडा तापट होता. काही चूक झाली की क्षणात ते चिडायचे. मग पत्नी असो, मुलगी असो अगर मोठ्या पदावर असलेला मुलगा असो. पण त्यांना प्रतिउत्तर करण्याचे धाडस कुणी करीत नसे. पण काही क्षणातच ते शांत होऊन सारे विसरुन जायचे. त्यांच्या तीनही कन्या नम्र व सुशील होत्या. मुलगेही तसेच होते. एक दोन वेळा राज्य ग्रंथालय संमेलनाच्या निमित्ताने त्यांच्या मुंबई निवासी मुलांच्या घरी राहण्याचा मला योग आला. पण माझ्यासारख्या एका सामान्य माणसाला आपल्यातीलच समजून पती-पत्नीने जी वागणूक दिली त्याने मला त्यांचा अभिमान वाटला.
तर अशा चांगल्या परिस्थितीत त्यांनी नगर वाचनालयाचे कार्यवाहपद स्विकारले. त्यांचेसोबत संस्थंच्या कार्यकारी मंडळ, त्यांचे इतरही सहकारी होते. त्यावेळी संस्थेची अवस्था मात्र हलाखीची होती. पण विष्णुपंतांची शिस्त, हुषारी आणि टापटीपपणा यामुळे त्यांना संस्थेत मान होता. प्रयत्न आणि चिकाटी यावर संस्था सुधारण्यासाठी त्यांनी श्रम केले. राज्य ग्रंथालय संमेलनात व्यासपीठावर आवाज उठवून अनुदान वाढवण्यास शासनास जाग आणली. हळू हळू अनुदान वाढत गेले. याच मुदतीत नगर वाचनालयास १०० वर्षे झाली. मोठी जबाबदारी समोर आली. योगायोगाने संस्थेस मुंबई हायकोर्ट वकिल, वेंगुर्ल्याचे सुपूत्र अॅड.गो.रा.उर्फ अरुण रेगे अध्यक्ष म्हणून लाभले आणि सर्व सहका-यांच्या मदतीने संस्थेसाठी नवीन इमारत बांधून शतकमहोत्सव करण्याचे ठरले व तो विष्णुपंतांच्या कारकिर्दीतच झाला. आज ही संस्था प्रगतीपथावर असून आर्थिक संपन्नता प्राप्त आहे, त्याचे श्रेय विष्णुपंताना आहे.
याच संस्थेत त्यांनी त्यावेळी ‘हितचितक सभा‘ नावाची छोटी संस्था काढून काही पारंपारिक धार्मिक कार्यक्रम ते करीत, नारळी पौर्णिमा, विजयादशमी, शमीपूजन आदी कार्यक्रम व समाज उपयोगी कामे त्यांनी केली. त्यांना भजन-कीर्तनाचीही खूप आवड होती. रामेश्वर सप्ताहात ते आरंभापासून दिडीपर्यंत सहभागी व्हायचे.
स्व. विष्णूपंतांनी जसे सामाजिक कार्य केले तसेच देशासाठीही केले होते. १९३० सालच्या मिठाच्या सत्याग्रहात भाग घेऊन लाठीमार खाल्ला. ब्रिटिशांनी त्यांना तुरुंगवासात टाकले. तिथे जेलमध्येही त्यांनी हालअपेष्टा सोसल्या. स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्य सैनिक म्हणून सन्मानपत्र व मानधन त्यांना मिळाले, पण त्यांनी ते नाकारले. पण बरोबरच्या इतर सहका-यांना पेन्शन मिळवून देण्याच्या कामी बहुमोल सहकार्य केले. इतकेच नव्हे तर देशप्रेमाने भाराऊन १५ ऑगस्ट व २६ जानेवारीला ते आपल्या निवासस्थानी राष्ट्रध्वज फडकावून सलामी देत असत. त्यांनी कधीही जातीभेद मानला नाही. त्यांनी केवळ सामाजिक कार्यासाठी स्वतःला बांधूनच घेतले होते. सर्वांसाठी झिजत असतांना अकस्मात त्यांच्या पत्नी, सर्वांच्या माई त्यांना सोडून या जगातून निघून गेल्या. आयुष्याची सोबतच गेल्याने विष्णूपंत खंगत गेले. मुलांनी खूप प्रयत्न केले. पण कुणाचेही न ऐकता आपल्या घरातच राहण्याचा त्यांनी आग्रह धरला. आपल्या घरातच अकस्मातपणे त्यांनी देह ठेवला.
असा हा सर्वांचा आधारस्तंभ आज आपल्यात नाही याची खंत वाटते. पण स्मृति मात्र ताज्या वाटतात. अशा या थोर माणसाच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या विषयीच्या स्मृति जागृत करुन त्यांना मी आदरांली अर्पण करतो.
- वल्लभ कृष्णाजी धोंड, वेंगुर्ले

ज्ञानोपासक प्रा. मोहन पवार
विद्यार्थी दशते असतांना आपल्या जीवनात अनेक शिक्षक - प्राध्यापक येतात. आपल्यावर ज्ञान संस्कार करतात. जीवनाला आकार देतात आणि या दुनियेत समर्थपणे उभे राहण्याकरिता व आव्हानांना सामोरे जाण्याकरिता लागणारे बौद्धिक बळ देतात. असे असले तरी सर्वच शिक्षक आणि त्यांची नावे स्मरणात राहतात असे नाही. प्रा. मोहन पवार हे असे प्राध्यापक होते की, प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात त्यांची प्रतिमा कोरलेली होती. कारण त्यांची अध्यापनाची शैली आणि त्यांचे प्रसन्न व्यक्तिमत्व हे होय. ज्ञानेश्वरीतील ओव्यांचे विवेचन करतांना आम्हां मुलांना ते प्रति ज्ञानेश्वर वाटायचे तर बखरीतील उतारे शिकविताना बखरकार वाटायचे. मराठी भाषेचे उत्तम ज्ञान, उदाहरणे, दाखले देतांना मधाळ रसाळ वाणी त्यामुळे विद्यार्थी त्यांच्या अध्यापनाशी तद्रुप होत असत.
त्यांच्या निधनाची बातमी खूप उशिरा वाचनात आली आणि जवळ रहात असून देखील त्यांचे अंत्यदर्शन घेता आले नाही याची चुटपुट मनाला लागली. त्यांच्या निधन समयी मी गोव्या बाहेर असल्याने असे घडले होते. त्यांचे निधनाचे वर्तमान वाचले आणि माझे मन तब्बल ४७ वर्षे मागे गेले. मार्च १९६४ मध्ये मी रा. कृ. पाटकर हायस्कूलमधून शालांत परीक्षा पास झालो आणि जून ६४ मध्ये बॅ.खर्डेकर महाविद्यालयात पदवीपूर्व वर्गात दाखल झालो. परिसर परिचित असला तरी कुठच्याच प्राध्यापकांशी ओळख नव्हती.
नवीन वर्ग सुरु झाले. प्राचार्य पेडणेकर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले. वर्ग खचाखच भरलेला होता. काही थोराड विद्यार्थी बिनधास्तपणे बसले होते. तर आमच्या सारखी नवखी मिसरुडही न फुटलेली मंडळी भित्र्या सशाच्या काळजाने भेदरलेल्या अवस्थेत बसली होती. प्राचार्यांच्या स्वागतपर भाषणातील एकही शब्द कळला नव्हता कारण त्यांनी स्वागत केले होते ते अस्खलीत इंग्रजीमध्ये! शालांत परीक्षेत तृतीय भाषा म्हणून पास होण्यापुरता आमचा इंग्रजीचा अभ्यास! आजूबाजूचे वातावरण मालवणी किवा मराठी भाषेतील! त्यामुळे इंग्रजी भाषेचे सतत दडपण! प्राचार्यांच्यानंतर क्रमाक्रमाने वेगवेगळ्या विषयांचे प्राध्यापक येत गेले. प्राध्यापक व विद्यार्थी यांच्यातील दरी कमी होत गेली आणि कॉलेजमधील वातावरण अंगवळणी पडलं. अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र शिकविणारे प्रा. आजगांवकर, हिदी विषयाचे प्रा. कुलकर्णी, मानसशास्त्राचे प्रा. शिरगुप्पीकर इंग्रजीच्या प्रा. पिटकर मॅडम तर इतिहासाच्या प्रा. संगम मॅडम आणि भूगोल विषयाचे हिरो सदृश्य श्री. कुन्हेकर सर. या सर्वांशी पुढे परिचय वाढत गेला. पण या सर्वांपेक्षा सर्वांना जवळचे व आपले वाटायचे ते प्रा. मोहन पवार. कारण त्यांच्या अध्यापनाचा विषय होता मराठी. जो आम्हा सर्वांना सहज सुलभ वाटत होता. शिवाय त्यांचे अध्यापन कौशल्य इतरांपेक्षा वेगळे होते. एखाद्या शब्दाला समानार्थी अनेक शब्द आणि त्यांच्या विरुद्धार्थी अर्थाचे शब्द सहजपणे ते जाता जाता सांगून जायचे. गद्यपाठ किवा पद्यपाठ शिकविण्यापूर्वी लेखक/कविची साग्रसंगीत माहिती ते देत असत आणि विषय विवेचन एवढ्या ओघवत्या भाषेत करायचे की, ऐकतच रहावे. त्यांची शब्दकळा अवर्णनीय होती. खूप साहित्य वाचन, मनन, चितन आणि अभ्यासूवृत्ती असणा-या ज्ञानोपासकाची ती लक्षणे होती. शब्दालंकार, अर्थालंकारांची खरी ओळख त्यांनीच आम्हाला करुन दिली. विविध संदर्भ पुस्तकांच्या वाचनाची आवड त्यांच्यामुळे जडली. सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेण्यास त्यांचेच प्रोत्साहन असायचे. त्यांच्या या सुसंस्कारीत मार्गदर्शनाचा उपयोग आम्हा विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकसीत होण्यासाठी निश्चितपणे झाला.
प्रा. पवार यांनी फोटोग्राफीचा छंद जोपासला. विविध साहित्य संमेलनाचे चित्रप्रदर्शनांचे, प्रसिद्ध साहित्यिकांचे फोटो त्या साहित्यिकाची स्वाक्षरी यांसह त्यांच्या संग्रही होते. पदवी शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी निमित्त मी गोव्यात आलो आणि जन्मगाव परका झाला. त्यामुळे त्यावेळचे आप्तमित्र, सगेसोयरे आणि शिक्षक हे दूरातले दिवे झाले. पण जन्म गावच्या आठवणी चिरंतन मनात राहिल्या. त्यात प्रा. मोहन पवार हे नाव ठळक होते.
१९९९ साली अशाच एका संगीत समारोहात खांद्याला कॅमेरा लटकाऊन छायाचित्रणासाठी योग्य क्षेत्र व जागा शोधणारे पवार सर दिसले. पुढे होऊन वाकून त्यांचे चरण स्पर्श केले. ते चांगलेच गोंधळले. ‘सर, मी तुमचा विद्यार्थी.‘ मग ओळख पटली. आपल्या निवृत्तीनंतर ते आपल्या धाकटे बंधू प्रकाश यांच्यासह पणजीला राहत होते हे समजले. त्यानंतर गोवा कला अकादमीत होणा-या संगीत, नाटक, परिसंवाद, चित्र प्रदर्शने यांच्या निमित्ताने त्यांची भेट व्हायची.
६ फेब्रुवारी २००० साली गं.त्र्य.तथा भाऊसाहेब माडखोलकर यांची जन्म शताब्दी त्यांच्या मूळ गावी म्हणजे आंबोली जवळच्या माडखोल इथे झाली. या समारंभाला भाऊसाहेबांचे नातू अॅड. प्रियदर्शन माडखोलकर खास नागपूरहून आले होते. किती तरी ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक आणि राजकीय व्यक्ती या सोहळ्याला उपस्थित होते. पवार सर मला या समारंभाला आग्रहाने घेऊन गेले. त्यामुळेच मी तो दिव्य सोहळा अनुभवू शकलो आणि स्थानिक वर्तमानपत्रासाठी शब्दबद्ध करु शकलो. पण त्यानंतर बराचकाळ त्यांच्याशी गाठ पडली नाही. २००४ साली मी सेवा निवृत्त झालो. निवृत्तीनंतर माझ्या जन्म गावासाठी काही करावे म्हणून माझ्यावर प्रभाव पाडलेल्या गुरुवर्यांच्या नावाने वार्षिक शिष्यवृत्त्या जाहीर केल्या. त्याची बातमी सा. ‘किरात‘ मधून प्रसिद्ध झाली होती. ती वाचताच त्यांनी माझा फोन नंबर मिळवला आणि मला आपला नवीन पत्ता दिला व भेटीची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार मी त्यांच्या कांपाल पणजी येथील निवासस्थानापाशी पोहोचलो. बेल वाजवताच त्यांनी स्वतःच दरवाजा उघडला. खोलीत सामान अस्ताव्यस्त पडले होते. पुस्तके, लिखाणाचे साहित्य, संगणक, कपडे यांचा पसाराच पडला होता. एकेकाळी टापटीपीने राहणारे सर ते हेच का असा भाव कदाचित माझ्या डोळ्यात त्यांना दिसला असावा. तेव्हा तेच म्हणाले, ‘एवढे दिवस मी आपला धाकटा भाऊ प्रकाश सोबत राहत होतो. पण अचानक त्यालाच अर्धांगाचा झटका आला. आता त्याची प्रकृती ठीक आहे. पण त्याच्या अशा अवस्थेत माझा भार त्याच्यावर नको म्हणून हल्लीच मी ही स्वतंत्र जागा घेतली. पण त्याच्या निवासस्थानापासून जवळच.‘ त्यानंतर खूप गप्पा झाल्या. वेंगुर्ल्याच्या त्या दिवसांच्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला. पण त्यांच्या खाजगी आयुष्यात डोकावण्याचे धाडस मला झाले नाही.
एकेकाळी विद्यार्थ्यांच्या गराड्यात वावरणारे माझे सर एकाकी जीवन जगत होते. सोबतीला होते ते ग्रंथ आणि नव्या पुस्तकांच्या संकल्पना! त्यांच्या खाजगी आयुष्याविषयी मी अनभिज्ञ होतो. त्यांची ओळख होती ती फक्त मराठी भाषेचा प्रगाढ प्राध्यापक एवढीच.
त्यांना माझ्या निवासस्थानी आणण्याची, माझ्या सौ.च्या हातचे सुग्रास भोजन देण्याची, तत्कालीन विद्यार्थी मित्रांच्या सहकार्याने त्यांच्या वेंगुर्ले येथे त्यांचा सत्कार सोहळा घडवून आणायची सुप्त इच्छा त्यांच्या निधनाने अपूर्णच राहिली. आता एकच गोष्ट हातात उरलीय ती म्हणजे त्यांच्या स्मृतीसाठी बॅ. खर्डेकर विद्यालयातून पदवी परीक्षेत मराठी विषयात सर्वोच्च गुण प्राप्त विद्यार्थ्याला पारितोषिक देण्याची. त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा हा अल्पसा प्रयत्न असेल. असे गुरुवर्य जन्मोजन्मी मिळोत हिच त्या ईश्वरचरणी प्रार्थना!
- ज. अ. उर्फ शरद रेडकर, सांताक्रुज - गोवा, मोबा. ९४२३३१०५४१

Sunday, 12 June 2011

अंक २१वा, ९ जून २०११

अधोरेखीत *
छोट्या जलविद्युत प्रकल्पांना चालना देण्याची गरज
एप्रिल-मे महिन्यातला असह्य उकाडा आणि त्यात विजेचे भारनियमन! यामुळे शेतकरी, विद्यार्थी आणि एकूणच त्रासलेली जनता हे गेली काही वर्षे असलेले राज्यातील चित्र, यावर्षी त्यात काही शहरी भागांमध्ये थोडीशी सुधारणा झाली असली तरीही संपूर्ण राज्याची या समस्येतून पुरती सुटका झालेली नाही. राज्य २०१२ पर्यंत ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होईल, भारनियमनमुक्त होईल, असे राज्यकर्ते सांगत होते. मात्र आता हे निर्धारित वेळेत शक्य होणारे नाही. राज्यातील जनतेची उर्जेची गरज ही वाढत्या लोकसंख्येबरोबर आणि वाढत्या शहरीकरणाबरोबर तसेच औद्योगिकीकरणाबरोबरही वाढतच जाणार आहे. त्यामुळे विजेचा हा तुटवडा दूर करण्यासाठी जे विविध उपाय योजायचे आहेत, त्यातला लगेच अंमलात आणण्याजोगा उपाय म्हणजे लघू आणि लघुतम जलविद्युत प्रकल्प होय, असे मत या क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. त्यासाठीची प्रक्रिया शासकीय लालफितीच्या कारभारापासून आणि भ्रष्टाचारापासून मुक्त झाली, तरच हे प्रकल्प लवकरात लवकर अंमलात येऊन गावे ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊ शकतील.
१०० किलोवॅटपर्यंत वीजनिर्मितीची क्षमता असणारे प्रकल्प हे लघुतम (मायक्रो) प्रकल्प, १०० ते २००० किलोवॅट (२ मेगावॅट) क्षमतेचे प्रकल्प हे अतिलघु (मिनी) प्रकल्प, तर २००० ते २५ हजार किलोवॅट म्हणजेच २५ मेगावॅट क्षमतेपर्यंतचे प्रकल्प हे लघू (स्मॉल) प्रकल्प म्हणून ओळखले जातात. त्यासाठी कोणतेच इंधन लागत नाही. फार मोठी जमिनही नको, आर्थिक गुंतवणुकही कमी लागते. (१ किलोवॅटकरिता ५० हजार रुपये)
अशा प्रकारचे लघु प्रकल्प राज्यात विविध भागांमध्ये जिथे जिथे वाहते पाणी आहे आणि सुमारे १० फूटांच्या उंचीवरुन ते पडत आहे, अशा ठिकाणी राबवता येतील. राज्यातल्या एकूण पाण्यापैकी ४० टक्के पाणी कोकणात आहे. ब-याच ठिकाणी झरे आहेत. त्यातले काही बारमाही आहेत. अशा ठिकाणी तसेच कालव्यांच्या प्रवाहावरही लघु प्रकल्प उभारता येतील. शासनाने लघू जलविद्युत प्रकल्पांद्वारे खाजगी तत्वावर वीजनिर्मिती सुरु करण्याचे धोरण अवलंबल्या नंतर आतापर्यंत सात प्रकल्प खाजगी तत्वावर कार्यान्वित झाले आहेत. याविषयीचा तपशील पुढे दिला आहे.
सिधुदुर्ग- सावंतवाडी जवळचा कोनाळ प्रकल्प - १० मेगावॅट, देवगडचा देवधर प्रकल्प - १.५ मेगावॅट, कोल्हापूर - राधानगरी- १० मे., पाटगाव- २ मे., चित्री - १.५ मे. सांगली - सोनावडे प्रकल्प - ४.४ मे., पुणे - नीरा देवधर प्रकल्प - ७.५ मे.
याव्यतिरिक्त अजून ७० प्रकल्पांच्या निविदा मंजूर झाल्या आहेत. त्यापैकी सुमारे निम्मे प्रकल्प हे लालफितीत अडकून पडले आहेत. तर निम्म्ये प्रकल्प काही ना काही अडचणींमुळे रेंगाळत आहेत. तेव्हा हे प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागले पाहिजेत.
देवघर इथला गद्रे मरिन एक्सपोर्ट या प्रकल्पातून तयार होणारी वीज ४ रुपये २६ पैसे या दराने मिळते. कुठल्याही प्रकल्पातून तयार झालेली वीज ही तीन प्रकारे वापरता येते. १) ती वीज राज्य वीज मंडळाला विकायची. मंडळ त्यातून ६ टक्के प्रती युनिट इतकी रक्कम वजा घालून ती खरेदी करते. २) लघु प्रकल्पातून वीज तयार करणारी खाजगी कंपनी एखाद्या तिस-या कंपनीलासुद्धी ही वीज विकू शकते. मात्र, तशी ती विकताना वाहून नेण्यासाठी राज्य वीज मंडळाच्या तारांचा वापर होत असल्यामुळे मंडळाला या वापरापोटी प्रती युनिट (४ रु. १६ पैसे) १६ टक्के इतका दर महिन्याच्या बिलात द्यावा लागतो. ३) वीज निर्मिती कंपनी ही वीज स्वतःसाठी वापरु शकते. ज्याला कॅप्टिव्ह प्लांट म्हणतात. असे लघु प्रकल्प उभारताना सुरुवातीची गुंतवणुक थोडी जास्त (७ते ८ कोटी) आहे. मात्र प्रकल्पासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते, प्रकल्प देखभालीचा ८० पैसे ते एक रुपया प्रती युनिट इतका खर्च, प्रकल्पावर काम करत असलेल्या कामगारांचे पगार, असे सर्व खर्च वजा जाता ८ ते १० वर्षांच्या काळात प्रकल्प गुंतवणुकीच्या रकमेवर परतावा मिळू शकतो.
१५ सप्टेंबर २००५ रोजी झालेल्या शासन निर्णय घ्ज्च्र्-१२०४/(१६०/२००४)/क्तघ् या आदेशाद्वारे शासनाने लघु जलविद्युत प्रकल्पांबाबतचे धोरण स्पष्ट केले असून हरित वीजनिर्मितीला चालना देणे, खाजगी वीज निर्मिती कंपन्यांकडून केल्या जाणा-या गुंतवणुकीच्या आधारे असे प्रकल्प अंमलात आणण्यासाठी धोरण निश्चित करणे ही उद्दिष्टे शासनाने त्यात दिली आहेत. अशा प्रकारे खाजगी तत्वावर वीजनिर्मिती करता येतील अशी राज्यभरातील ठिकाणे शासनाने निश्चित केली असून त्याची यादी याविषयीच्या धोरणातच दिली आहे. ही यादी आणि यासंबंधीचे धोरण शासनाच्या जलसंपदा विभागाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ३१ मार्च २०११ या तारखेपर्यंत दिलेल्या यादीनुसार केवळ कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रच नाही, तर मराठवाडा आणि विदर्भातही काही ठिकाणी असे प्रकल्प राबवता येतील असे शासनाने म्हटले आहे.
कार्यान्वित सात प्रकल्पां मधील देवगडचा देवघर प्रकल्प राबवत असलेल्या गद्रे मरिन एक्सपोर्ट कंपनीचे दीपक गद्रे यांनीही सांगितले की, अशा प्रकल्पांना अधिक गती मिळण्यासाठी शासनाकडून अधिक सहकार्याची गरज आहे. कार्यालयीन कामे वेगाने झाली पाहिजेत. यावर्षी त्यांनी ४७ लाख युनिटस् इतक्या वीजेची निर्मिती केली. ही क्षमता वर्षाला ६५ लाख युनिटस्पर्यंत नेण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. पण हे करत असताना त्यांनी एक प्रमुख अडचण सांगितली. सध्या त्यांना केवळ शेतीसाठी पाणी सोडले जाईल, तेव्हाच या प्रकल्पासाठी पाणी मिळणार आहे. मात्र पावसाळ्यात धरणातून अतिरिक्त पाणी सोडले जाते ते पाणी या वीजनिर्मिती प्रकल्पांच्या यंत्रणेतून न्यायला सध्या परवानगी नाही. त्यासाठी आदेश मिळायची गरज शासनाच्या संबंधित विभागाकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हे अतिरिक्त पाणी कुठल्याही वीज निर्मितीविना मोफत वाहून जात आहे. हे पाणी वापरायला परवानगी मिळाली तर वीज निर्मितीचे प्रमाण अजूनही वाढायला मदत मिळेल.
बॅ.अ.र.अंतुले हे मुख्यमंत्री असताना स्वामीनाथन समितीने १९८१ साली या संदर्भात एक अहवाल सादर केला होता. त्यात त्यांनी राज्याच्या प्रत्येक तालुक्यात अशा प्रकारचा प्रकल्प राबवायची सूचना केली होती. तसेच ग्कङक्ष् सारख्या संशोधन संस्थांच्या मदतीने अशा प्रकल्पांसाठी लागणारी यंत्रणा देशांतर्गत कमी खर्चात आणि अधिक कार्यक्षमतेची कशी तयार करता येईल, याविषयी संशोधन होण्याची गरज आहे. अशा लघु जलविद्युत प्रकल्पांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या काही योजना आहेत. त्यांची योग्य प्रकारे प्रसिद्धी होऊन त्यांची माहिती लोकांपर्यंत पोचली पाहिजे. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर अशा लघुतम आणि लघू प्रकल्पांचा प्रसार झाला, तर अनेक गावे ऊर्जेच्या बाबतीत स्वतःची गरज भागवू शकतील, त्यामुळे आपण ऊर्जा स्वयंपूर्णतेच्या दिशेने वाटचाल करु शकू.
या क्षेत्रातही चीनने पहिले पाऊल टाकले असून आज चीन त्याही बाबतीत आघाडीवर आहे. २००८ सालच्या एका जागतिक पाहणी अहवालानुसार चीन ६५ हजार मेगावॅट वीज लघू प्रकल्पांद्वारे तयार करत होता. आता त्यात आणखीही भर पडली असले. अशा प्रकल्पांद्वारे दहा हजार गावांचे विद्युतीकरण करायची योजनाही चीननं आखली आहे. आपल्या देशात हिमाचल प्रदेश याबाबतीत आघाडीवर आहे. त्या पार्श्वभूमीवर आपल्या महाराष्ट्र राज्यातही अजून जोरदार प्रयत्न होणे गरजेचे आहे. अशा प्रकारे जर खेडी वीजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाली, तर राज्य वीज मंडळावरचा ताण कमी होईल. अशा प्रकल्पांमधून अनेकांना रोजगार मिळेल. गावागावात वीज पोहोचल्यामुळे संगणक शिक्षणाचा दर्जाही सुधारेल आणि ग्रामीण जनताही विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील होऊ शकेल. मोठ्या प्रकल्पांवरचा ताण कमी झाला की त्यातून तयार होणारी वीज ही औद्योगिकीकरणासाठी वापरता येईल. त्यामुळे राज्याचा औद्योगिक विकास साधायला मदत होईल. त्यासाठी शासनाने या छोट्या प्रकल्पांबाबत अधिक जागरुकता दाखवायला हवी. प्रकल्प उभारणीत येणारे नोकरशाहीतले अडथळे आणि राज्य वीजमंडळाचा हस्तक्षेप कमी करुन या प्रकल्पांच्या उभारणीसाठी जी जी मदत आवश्यक असेल, ती लोकांना पुरवावी, म्हणजे भारनियमन मुक्तीबरोबरच ऊर्जा स्वयंपूर्ण-तेचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल.
(साप्ताहिक विवेकच्या सौजन्याने.)
- मनोज अणावकर, ९८६९१०७५७३

संपादकीय *
रामदेवबाबांचे आंदोलन
योग गुरु रामदेवबाबांनी भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाच्या विरोधात दिल्लीत उभारलेले आंदोलन केंद्रातील लोकशाही सरकारने हुकूमशाही पद्धतीने चिरडले. त्याचे पडसाद सर्वत्र उमटू लागले आहेत. सत्ताधा-यांशी लागेबांधे असणा-या वृत्तपत्रांनी आणि दूरदर्शन वाहिन्यांनी या आंदोलनाची यथेच्छ कुचेष्ठा केली. तरी देशातील सर्वसामान्य जनतेचा पाठिबा मात्र या आंदोलनास असल्याचे दिसून आले.
रामदेवबाबांची कार्यपद्धती, विचार कोणाला मान्य असोत अगर नसोत, त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर कोणतेच मतभेद होणार नाहीत. राजकीय पक्ष आणि भ्रष्टाचारात आकंठ बुडालेल्यांनाही भ्रष्टाचाराच्या विरोधात निषेधाचा सूर काढावाच लागत आहे. केंद्र सरकार किवा काँग्रेस पक्षाच्या विरोधातील सर्वच राजकीय पक्षांनी (त्यात भाजपसारखे हिदुत्ववादी आणि समाजवादी, साम्यवादी पक्षही आले) रामदेवबाबांच्या या आंदोलनाला पाठिबा दिला.
सत्ताधारी काँग्रेस पक्षाने हा विषय सबुरीने घेण्याचा त्यावर विचार विनिमय करण्याचा सल्ला दिला. पण रामदेवबाबांनी उपोषण आंदोलनाची तारीख व स्थळ जाहीर केल्याने त्यांना माघार देता येणे शक्य नव्हते आणि सरकारलाही त्यांचे म्हणणे विनाशर्त मान्य करुन शरणांगती पत्करणे परवडणारे नव्हते. काँग्रेसने स्वतःच सबुरीचे धोरण घेतले असते तर आंदोलन पोलीसी बळाने चिरडून हुकूमशाहीवृत्तीचे प्रदर्शन करावे लागले नसते आणि दिग्विजयसिगासारख्या वावदूक लोकांना रामदेवबाबांच्या विरोधात भुंकण्यासाठी सोडावे लागले नसते.
रामदेवबाबांचे हे दिल्लीतील आंदोलन आता त्यांच्या हरिद्वार येथील योगपीठातून सुरु झाले असले तरी देशभर तालुका, ग्रामपातळीवर पतंजली योगपिठाचे साधक आणि काँग्रेस विरोधक, भाजप, रा.स्व.संघाचे कार्यकर्ते, हिदुत्ववादी संघटना यांनी हे आंदोलन दत्तक घेतले आहे. या आंदोलनाचा राजकीय फायदा घेण्याचा भाजपचा स्पष्ट उद्देश असला तरी सर्वसामान्य लोकांचे तसे नाही पण ते या राजकीय रणधुमाळीत बाजूलाच पडण्याची शक्यता आहे.

बदल्या होणारच
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांनी जि.प.चे कर्मचारी आणि प्राथमिक शिक्षक बदल्या शासनाच्या निर्देशानुसार करुन यामध्ये नेहमीच चालणा-या सौदेबाजीला वावच न ठेवल्याने सत्ताधारी काँग्रेस समर्थक आणि पदाधिका-यांची तसेच शिक्षक संघटना नेत्यांनी मोठीच पंचाईत झाली. योग्य जागी बदल्यांसाठी किवा बदलीच टाळण्यासाठी चालणारी लाखो रुपयांची सौदेबाजी थांबल्याने संबंधितांचे ‘उत्पन्न‘ बुडाले. राज्यात आणि जिल्हा परिषदेतही सत्तेत असलेल्या काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीपैकी सिधुदुर्गातील राष्ट्रवादी पक्षाने शिक्षक - कर्मचारी बदल्यांचे समर्थन केले आहे. गेली दहा वर्षे,सत्ताधारी काँग्रेसचे पदाधिकारी व जिल्हा पातळीवरील नेते जि.प.कर्मचारी, शिक्षक बदली प्रकरणांमध्ये मोठीच सौदेबाजी करीत आहेत. त्यापूर्वी शिवसेनेत असतांना जि.प.च्या सत्तेत असलेले आजचे काँग्रेसमधील राणे समर्थक हेच करीत आले आहेत असा जाहीर आरोप राष्ट्रवादीचे सिधुदुर्ग जिल्हाध्यक्ष भिसे यांनी केला आहे. काँग्रेस पदाधिकारी आणि शिक्षकांच्या संघटनांचे नेतेही प्रशासनाने केलेल्या या बदल्या अन्यायकारक असल्याची हाकाटी करीत आहेत.
सरकारी नोकरीमधील नियम व अटींनुसार तीन किवा अधिक वर्षे एकाच जागी नोकरी करणा-या कर्मचा-यांची बदली केली जाते. ती त्यांनी स्विकारलीच पाहिजे. तरीही कोणाची आत्यंतिक गैरसोय होत असेल तर त्याला पर्यायही ठेवलेला असतो. आताही कर्मचारी-शिक्षकांच्या बदल्यांमधून अशा काही अपवादात्मक प्रकरणी बदलीबाबत सहानुभूतीपूर्वक विचार होऊन पर्याय काढला जाईल. पण इथे कोणालाच धीर नाही. मुख्य कार्यकारी अधिका-यांनी शिक्षण खात्यातील अधिका-यांचा बदली प्रकरणातील अहवाल घेऊन संगणकावरील नदीनुसार नियमा -प्रमाणे या बदल्या केलेल्या आहेत.
यात सोयी-गैरसोयीचा (अर्थात अपवादात्मक) विचार हा तालुका व जिल्हास्तरावरील संबंधीत अधिकारी वर्गाने करणे आवश्यक होते. पण तसे काहीही झालेले नसणार! कारण त्यांची मानसिकता सकारात्मक नाही. बदल्यांमुळे ‘अत्यंत त्रस्त‘ झालेल्यांनी मुख्य कार्यकारी अधिका-यांना त्यांना होता होईल तेवढा प्रशासकीय त्रास व बदनामीचे प्रयत्न करुन त्यांची तीन वर्षाच्या आतच बदली व्हावी असे प्रयत्न चालविलेले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री नारायण यानाच त्यांनी साकडे घातले. परंतू राणे यांनाही या सर्वांचे ‘गुण‘ माहिती असल्याने त्यांनी तोंडी आदेशवजा सूचना देऊन वेळ मारुन नेली असावी. आता यातून काय निष्पन्न होते याकडे सर्वांचेच डोळे लागलेले आहेत.

विशेष *
भोजनाचा अतिरेक
अनुभवाने सिद्ध होणा-या गोष्टी नेहमी म्हणींच्या स्वरुपात प्रसिद्ध होतात. त्यामधील कमीत कमी शब्द महत्वाचा संदेश अतिशय प्रभावीपणे आपल्या पर्यंत पोहचवतात. ‘अति तेथे माती‘ ही एक अशीच अनुभव सिद्ध म्हण आपणा सर्वांना माहितच आहे. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला की त्याची माती होते असा या म्हणीचा अर्थ आहे.
आपल्या आहार सेवनाच्या बाबतीत ही म्हण अगदी तंतोतंत लागू पडते. कारण, आहार सेवनाचा अतिरेक करुन आपण आपल्या आरोग्याची अक्षरशः माती करुन घेत असतो आणि त्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण देत असतो. आपण आवश्यकतेपेक्षा जास्त आहार घेत आहोत हे कोणी मानायला तयार नसते किवा काही वेळा अज्ञानामुळे ते लक्षात येत नाही.
लहानपणापासूनच अति भोजनालाच आपण सर्वसाधारण आहार मानत असतो. ही अतिभोजनाची चुकीची सवय रोगांसहीत एका पिढीकडून पुढील पिढीकडे वाटचाल करीत राहते. अशाप्रकारे खाण्या -पिण्याच्या चुकीच्या सवयींचे संक्रमण होते जे अनेक रोगांचे कारण बनते. स्वादिष्ट भोजन हा आपल्या सर्वांचाच अत्यंत आवडीचा विषय आहे. सर्वसाधारपणे सण किवा एखादा विशेष प्रसंग साजरा करुन आपण पुन्हा आपल्या दैनंदिन कार्यात गुंततो तेव्हा, ‘‘काय मग, कसा काय होता मेजवानीचा बेत?‘‘ हाच एकमेकांना विचारलेला पहिला प्रश्न असतो. जन्मापासून मृत्यूपर्यंत भोजनावर सर्वांत जास्त लक्ष दिले जाते. वाढदिवस असो, सण असो अथवा लग्नसोहळा, अशा अनेक प्रसंगी मेजवानीचा बेत असणे ही समाजात प्रतिष्ठा मिळविण्या -साठीची मान्यता पावलेली गोष्ट आहे. एवढेच कशाला, माणसाच्या मृत्यूनंतरही श्राद्धाच्या स्वरुपाने आपण लोकांना एकप्रकारे मेजवानीच देत असतो. तात्पर्य काय, तर आनंद असो वा दुःख, अतिभोजनाच्या व्यतिरिक्त काही नाही.
अशाप्रकारे भोजनातिरेकाचे संस्कार आपल्या मनावर लहानपणापासूनच बिबविले जातात. ज्या वयात आयुष्य -भराच्या सवयी संस्कारानेच निर्माण होतात. लहान मूल जेव्हा अर्धीच पोळी खाते (जी त्याच्या वयासाठी योग्य आहे.) तेव्हा आई वेगवेगळी प्रलोभने देऊन त्याला पूर्ण पोळी खाण्यास प्रवृत्त करते.
अशाप्रसंगी सर्वसाधारपणे आई काळजीने त्याला डॉक्टरांकडे घेऊन जाते आणि मुलाची भूक वाढविण्यासाठी औषधे देण्याची विनंती करते. एवढ्यावरच गप्प न बसता ती अनेक प्रकारचे स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ बनविते. अशाप्रकारे लहानपणापासूनच अतिभोजनाचा पहिला धडा त्या मुलाला मिळतो आणि मुलावर अतिभोजनाचा मारा चालू राहतो व त्यामुळे अस्वस्थता वाढून आजारपणात वाढ होते. अस्वस्थ असल्यावर प्राणीसुद्धा आपल्या नैसर्गिक उपजत बुद्धीने अन्नपाणी सोडून उपवास करतात. अशावेळी त्यांना त्यांच्या कितीही आवडीची वस्तू खाण्यास दिली, तरी ते त्या पदार्थाकडे ढुंकूनही पाहत नाहीत. परिणामी ते लवकर स्वस्थ होतात.
भोजनाच्या अतिरेकाचा परिणाम आपल्या शरीरावर कसा होतो?
मानवी शरीर अनेक प्रकारच्या पेशींपासून बनलेले असते व त्या पेशींमध्ये पंचमहाभूतांच्या तत्वांचा नैसर्गिकपणे समतोलपणा राखला जात असतो. या पेशींचे मुख्यतः दोन प्रकारचे कार्य असते. प्रथम म्हणजे अन्नातून मिळणा-या पोषणमुल्यांपासून शरीराचे पोषण करणे आणि दुसरे म्हणजे शरीरातील वेगवेगळ्या क्रिया चालू असताना जे रासायनिक परिवर्तन होत असते. त्यातून निर्माण होणारे विषमय टाकावू पदार्थ शरीराबाहेर टाकणे. प्रत्येक व्यक्तीच्या शरीराच्या पेशींच्या या कार्याचा संतुलनाच्या मर्यादा आणि क्षमता ठरलेल्या असतात. त्या मर्यादांचे व्यवस्थितरित्या पालन होऊन त्या दोन्ही क्रिया व्यवस्थित कार्यरत राहिल्या तरच स्वास्थ्य उत्तमरित्या टिकून राहते. पेशींच्या या कार्यात अडथळा निर्माण होऊन कार्यांचे संतुलन बिघडले की व्यक्तीस अस्वास्थ्यास सामोरे जावे लागते.
-डॉ. पल्लवी रविद्र वाडेकर,
निसर्गोपचार केंद्र, यज्ञनगर,तळवडे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी,
फोन - (०२३५३) २२३४८६/५८६, मोबा. ९४२३ ८५५ ८१५/८३५

मध्वानुभव
मांजर हा प्राणी ‘वास्तुप्रिय‘ असतो. जुन्या घरातून चुलीच्या उबेला बसलेले मांजर किवा मांजरे हमखास दिसत असत. सरकारी निवासस्थानात, नोकरीच्या काळात असतांना मात्र मांजराच्या संदर्भात एक वेगळाचा अनुभव आला. आम्हाला बदलीच्या ठिकाणी शासकीय निवासस्थान असल्यामुळे तेथे आम्ही दाखल झालो. एके दिवशी माझ्या मुलाला दाराबाहेर मांजराच्या पिल्लाच्या ओरडण्याचा आवाज आला. त्याने त्याला घरात आणले. छोटेसे, पांढ-या रंगाचे ते पिल्लू हळूहळू घरात रुळले. आमचे विशेषतः मुलांचे मित्र झाले. मुले अभ्यासाला बसली की, तेवढा सर्व वेळ ते मुलांसमोर बसून राही. मांजराच्या जातीला शोभतील असे खेळ चालू असत. मुलांबरोबर ‘लपालपी‘चा खेळ चाले, क्वचित प्रसंगी एखादे पाखरुं, सरडा याची शिकार करीत असे पण जास्त भर शाकाहारावर म्हणजे दूधावर! पण विशेष म्हणजे चोरटे नव्हते. या मार्जार पिलाचे नामकरण मुलांनी ‘नान्या‘ असे केले. सकाळी मुले रिक्षाने शाळेत निघाली की, नान्या ‘टाटा‘ करायला रिक्षापर्यंत जात असे. तसेच सायंकाळी मुले परतून येण्याच्या वेळीही स्वागताला हजर असे. नान्याला आमच्या मुलांचा व मुलांना नान्याचा लळाच लागला होता.
यथावकाश २/३ वर्षांनी आमची बदली झाली. टेम्पो वगैरे बघून घरसामान टेम्पोत भरले. टेम्पोत सामान भरताना मुलांच्या प्रत्येक फेरीबरोबर नान्याचीही ये-जा चालू होती. संपूर्ण घर रिकामे झाल्यावर मुलांसह आम्ही टेम्पोत बसलो आणि गंमत म्हणजे नान्याही टुणकण उडी मारुन केबीनमध्ये मुलांच्या मांडीवर बसला.
रात्री किचित उशीरा आम्ही सावंतवाडीला घरी दाखल झालो. मुले जवळ जवळ झोपेला आली होती. मुलांबरोबरच नान्याला घरात ठेवले. नव्या घरात नान्या रुळणार नाही अशी अटकळ होती. पण नान्याने हा अंदाज खोटा ठरवला. दुस-या दिवसापासून हक्काच्या घरात आल्यासारखा नान्याचा वावर सुरु झाला. पूर्वीच्या घरी (सरकारी-निवासस्थानात) ज्याप्रमाणे नान्या व मुले रहात होती त्याप्रमाणे त्यांचा जीवनक्रम सुरु झाला. यात किचित बदल म्हणजे आता नान्या ‘बाप्या‘ झाल्याने अधूनमधून एखाद दोन दिवस नाहीसा होत असे. दोन दिवसांनी परत येत असे. केव्हा-केव्हा ‘प्रेम युद्धातील‘ खुणा नान्याच्या अंगावर दिसत असत. तशी या एरियात नान्याची एंट्री नवीन असल्याने प्रस्थापितांना ते रुचत नसावे. एकदा मात्र नान्या ४ दिवस झाले तरी घरी परतलाच नाही. मुले विशेषतः मुलगा खूप अस्वस्थ झाला होता. दोन-चार दिवसापूर्वी रात्रौ मार्जार प्रेम-युद्धाचे आवाज मी ऐकले होते. परंतू त्यामध्ये नान्याचा सहभाग होता किवा नाही हे समजणे अवघड होते. सुट्टीच्या दिवशी मुलांची नान्या शोध मोहिम सुरु होती आणि नान्याचे कलेवर घरा मागच्या शेतात मुलांना दिसले. रडवेली मुले घरी आली. शेतात नान्याचा छिन्नविछिन्न देह पहावत नव्हता. मी जड अंतःकरणाने नान्याला मुठमाती दिली. घरी परतत असतांना ‘केवढे हे क्रौर्य‘ कवितेतले शेवटचे कडवे आठवले ‘मातीत ते पसरले....कले वरी उदर पांडूर निष्कलंक, चंचू तशी उघडी पद लांबविले, निष्प्राण देह पडला...‘

विशेष बातम्या-
वेंगुर्ला एज्युकेशन सोसायटीची सभा
वेंगुर्ला एज्युकेशन सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा २९ मे रोजी संस्थेचे अध्यक्ष अॅड.गो.रा.रेगे यांच्या अध्यक्षतेखाली स्वामिनी मंगल कार्यालय येथे पार पडली. संस्थेचे कार्याध्यक्ष सदानंद कुळकर यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचले ते मंजूर करण्यात आले. संस्थेचे मेंबर सेक्रेटरी पां. अ. केसरकर यांनी आजारपणामुळे दिलेला राजीनामा मंजूर करुन डॉ. श्री. रावजी परब यांची मेंबर सेक्रेटरी म्हणून एकमताने निवड करण्यात आली.
विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण देण्यासाठी संस्थेच्या एक हितचितक डॉ. उषा भिसे यांनी ५ लाख रुपये देणगी जाहीर केली आहे. या संगणक प्रशिक्षण वर्गासाठी तसेच संगणावकर आधारीत एक व्यवसायाभिमुख नवा अभ्यासक्रम या पाटकर हायस्कूलमध्ये सुरु करण्याबाबत एक प्रस्ताव आलेला आहे. त्याबाबत कार्यकारी मंडळाने आवश्यक त्या गोष्टींची पूर्तता करुन हा अभ्यासक्रम सुरु करावा असे अध्यक्षांनी सुचित केले. अनेक सदस्यांनी काही प्रश्न, शंका विचारले त्याबाबत कार्याध्यक्ष कुळकर व उपाध्यक्ष मोहनराव केळुसकर यांनी उत्तरे देऊन शंका समाधान केले.

पाऊस जोरदार
मोसमी पाऊस जूनच्या प्रारंभीच जोरदार सुरु होईल असा कुठलाही अंदाज हवामान खात्याने वर्तविला नसतांना पावसाची जोरदार वृष्टी होऊन कोकणातील पाणी टंचाई संपुष्टात आली. नद्यानाले वाहू लागले. हा पाऊस आता राज्यात सर्वत्र पसरला असून कोकणात अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. पण हवामान खात्याच्या अंदाजानुसार तसे घडतेच असा अनुभव नसल्याने लोक निर्धास्त आहेत. तरीही प्रशासनाला आपत्कालीन व्यवस्थेची तयारी ठेवावी लागते. तशी ती सुरु आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे पडून वाहतूक खोळंबली तसेच काही ठिकाणी घरांची किरकोळ पडझडही झाली. आतापर्यंत सुमारे १५० मी.मी. पावसाची नोंद झाली आहे.
आंबा, काजू हंगाम यंदा पीक कमीच असल्याने मे अखेरीसच संपुष्टात आला. कोकमाचेही उत्पन्न लोक घेऊ शकले. फळधारणा कमी असली तरी आंबा काजू आणि कोकमाला चांगला दर मिळाला. कॅनिग आंब्याचा दर ३० रुपये किलो झाला होता. अखेरीस तो १५ रुपयांवर आला. काजू बी किलोला ९० रुपयेपर्यंत पोहोचला. तो सुमारे ७५ रुपयांवर आला आहे.
रासायनिक खते कीटकनाशके यांच्या जास्त वापरामुळे पिकांवर दुष्परिणाम होतो. रोग कीडींचा प्रादुर्भाव दरवर्षी वाढताच राहतो आणि पिकाचे नुकसान होते. हा अनुभव सातत्याने येत असल्याने आता बरेचसे बागायतदार नैसर्गिक, वनस्पतीजन्य सेंद्रीय खते, कीटकनाशकांकडे वळू लागले आहेत.

वेंगुर्ले शाळा नं. २ च्या माजी विद्यार्थ्यांना आवाहन
वेंगुर्ले शहरातील शाळा नं. २ ही १८८८ साली उर्दु शाळा म्हणून सुरु झाली. कालांतराने परिवर्तन होत ही शाळा तालुक्यातील एक सर्वोत्कृष्ट पूर्ण प्राथमिक शाळा म्हणून नावारुपास आली. १ ते ७ वर्गाच्या या शाळेत ३५० ते ४०० पटसंख्या असायची. सध्या वार्धक्याने आजारी असलेले केळूस येथील राष्ट्रपती पदक विजेते आदर्श शिक्षक श्री.वि.रा.प्रभू यांच्या कारकिर्दीत ही शाळा यशोशिखरावर होती. या शाळेस त्यांनी ज्ञानमंदिराबरोबरच संस्कार मंदिराचे स्वरुप दिले. त्यांचे सहकारी शिक्षकही विद्यार्थ्यांसाठी जबरदस्त मेहनत घेत होते. या शाळेतून घडलेले विद्यार्थी समाजाच्या विविध क्षेत्रात ठिकठिकाणी नेतृत्व करतांना दिसतात.
सुप्रसिद्ध माईनओनर व सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर गावडे, पुष्कराज कोले यांचे वडील रामकृष्ण कोले, जागतिक किर्तीचे रांगोळीकार गुणवंत मांजरेकर, डॉ.नंदन सामंत, डॉ.अमोल पावसकर, डॉ. संजय सामंत, नगराध्यक्ष संदेश निकम, सेवानिवृत्त मुख्याध्यापक रमण किनळेकर, मुख्यमंत्र्यांचे स्वीय सचिव उल्हास मांजरेकर, गोव्याचे शिक्षणाधिकारी शरद रेडकर, उद्योगपती आनाजी भगत हे या शाळेचे विद्यार्थी. अशी किती नावे घ्यावी!
अलिकडेच सर्व शिक्षा अभियान अंतर्गत या शाळेस सुंदर दुमजली इमारत बांधण्यात आली आहे. तसेच जुनी इमारत पाडून तेथे मुलांसाठी खेळाचे मैदान तयार केले आहे. शाळेस कंपाऊंड वॉल, अंतर्गत क्रीडा साहित्य, संगणक अशा भौतिक सुविधा प्राप्त केलेल्या आहेत. त्यामुळे शहरातील विद्यार्थी या शाळेकडे आकृष्ट होत आहेत. पूर्वी या शाळेत नवाबाग, दाभोसवाडा, विठ्ठलवाडी, गिरपवाडी, गावडेवाडी, मधलीवाडी, भुजनाकवाडी येथील मुले शिक्षणासाठी येत होती. आता वाडी-वस्तीवर शाळा झाल्या. माध्यमिक शाळांना ५वी ते ७वी वर्ग जोडले तसेच इंग्रजी माध्यमाच्या शाळा झाल्या. यामुळे शाळेची पटसंख्या कमी झालेली असली तरी शैक्षणिक दर्जा उत्तम आहे.
अलिकडेच या शाळेच्या मुख्याध्यापकपदी या शाळेचेच माजी विद्यार्थी कैवल्य पवार हे रुजू झाले. आदर्श शिक्षक म्हणून ओळखल्या जाणा-या पवारगुरुजींनी शाळेस गतवैभव प्राप्त करुन देण्याचे ठरविले आहे. त्यांच्या मदतीला या शाळेचे माजी विद्यार्थी -पत्रकार शेखर सामंत, उद्योजक विलास गावडे, सामाजिक कार्यकर्ते शरद मेस्त्री व संजय तानावडे, नितीन नांदोस्कर, जॉन्सन फर्नांडीस, वैभव गावडे यासारखे माजी विद्यार्थी पुढे सरसावले आहेत. विलास गावडे यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ शाळेचे मैदानास सपाटीकरण व कार्यक्रमांसाठी कायमस्वरुपी हॉल (शेड) बांधून देण्याचा संकल्प केला आहे. पुष्कराज कोले यांनी भरघोस मदतीचे आश्वासन दिने आहे.
या शाळेसाठी अत्याधुनिक संगणक कक्ष, प्रयोगशाळा, सर्व विद्यार्थ्यांना डेस्क बेंच, शुद्ध पाण्याची व्यवस्था यांसारख्या गरजांसाठी माजी विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणावर सहकार्याची व मदतीची गरज आहे. यासाठी या शाळेत शिकलेल्या विद्यार्थ्यांनी सहकार्याचा हात पुढे करावा असे माजी विद्यार्थ्यांनी आवाहन केले आहे. ज्यांना मदत करावयाची आहे त्यांनी सारस्वत बँक शाखा वेंगुर्ले येथील बचत खाते क्र. ०३९२००१०००१७४८४ या क्रमांकाच्या खात्यावर पैसे भरावेत. अधिक माहितीसाठी संफ -९४२२५९६३८९

Thursday, 2 June 2011

अंक २०वा, २ जून २०११

अधोरेखीत

पर्यटनवृद्धीची आश्वासने प्रत्यक्षात येणार काय?

सिधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर होऊन तब्बल १४ वर्षे होत आली आहेत. स्वच्छ आणि रमणीय समुद्रकिनारे, वैशिष्ट्यपूर्ण मंदिरसंस्कृती, अस्सल कोकणी जेवण, लोकसंस्कृती, एकाच जिल्ह्यात समुद्र किनारा आणि आंबोलीसारखे हिलस्टेशन सिधुदुर्गातच आढळते. पर्यटनासाठी अनुकूल अशा सर्व गोष्टी असूनही एक-दोन हंगामी अपवाद वगळता सिधुदुर्ग जिल्हा पर्यटनदृष्ट्या मागेच राहिला आहे.

वेळागर, आरवली, वेंगुर्ले, निवती, परुळे-भोगवे, तारकर्ली, मालवण, देवगड येथे स्थानिकांच्या पुढाकाराने अलिकडच्या ५-६ वर्षात चांगल्या दर्जाच्या निवास न्याहारीच्या सोयी उपलब्ध झाल्या आहेत. महाराष्ट्र पर्यटन महामंडळाने अशा सुविधा उपलब्ध करुन देणा-यांना काही प्रमाणात करांमध्ये सवलत देऊन निवास न्याहारीच्या योजनेत सामावून घेतले आहे. पण सिधुदुर्गसाठी कोणताही ठोस, धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही. पर्यटन महामंडळाच्या वतीने पर्यटन वाढीसाठी घेण्यात येणा-या पर्यटन महोत्सवातून दोन वर्षापूर्वीच फतवा काढून महामंडळाने आपला सहभाग काढून घेतला आहे. त्यामुळे पर्यटन वाढीला प्रोत्साहन देण्याच्या महत्वाच्या उपक्रमामध्ये शासनाच्या या महामंडळाने आपली उदासीनता दाखविली आहे. तुलनेने पर्यटनात कितीतरी पुढे असणा-या आपल्या शेजारच्या गोवा आणि केरळ राज्यात त्यांची पर्यटन महामंडळे देशभर जाहिरातीसाठी आणि निरनिराळ्या विषयाला वाहिलेले महोत्सव स्थानिकांच्या मदतीने आयोजित करीत असतात. त्या राज्यांमधल्या पर्यटन महामंडळांना संपूर्ण स्वायत्तता असून एम.टी.डी.सी.सारखा त्यांचा कारभार अजूनतरी सरकारीछापझालेला नाही.

अलिकडेच केंद्रीय कृषिमंत्री ना. शरद पवार, राज्याचे पर्यटन आणि बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांचे सिधुदुर्ग दौरे झाले. या दौ-यांच्या निमित्ताने उखडलेल्या रस्त्यांना एक-दोन दिवसात झळाळी आली. समुद्रकिना-यालगतची विश्रामगृहे अंतर्बाह्य बदलली आणि येत्या काही वर्षात पर्यटनाने सिधुदुर्गचा चेहरा-मोहरा पालटणार अशी आश्वासने देण्यात आली. यामध्ये आंबा संशोधन केंद्रालगत कृषि पर्यटन केंद्र, वेंगुर्ले-नवाबाग येथे फिशरमेन व्हिलेज, नवाबाग येथील धूपप्रतिबंधक बंधारा, मांडवी येथील झुलता पूल, आरवली, वेळागर येथील पंचतारांकित हॉटेल्सचे रखडलेले प्रकल्प, मालवण येथे स्नॉर्कलिग, नवीन स्कुबा डायव्हिग केंद्र, खाड्यांमध्ये हाऊसबोट असे प्रकल्प लवकरच साकारले जातील अशी ग्वाही मंत्रीमहोदयांनी दिली. या सर्व आश्वासनांची पूर्तता सरकारी यंत्रणा जी मंत्र्यांच्या आदेशाबरहुकूम आणि प्रशासकीय नियम आणि धोरणांनी चालत असते, तिच्याकडून होणा-या अंमलबजावणीवरच अवलंबून आहे.

पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी तर पर्यटन विकासासाठी असलेले दोन वर्षापूर्वी मंजूर झालेले कोकण पॅकेजमधील २२५ कोटी रुपये खर्चच झाले नसल्याचे मान्य केले. ते कोणामुळे अखर्चित राहिले हे सांगायला त्यांनी नकार दिला असला तरी भविष्यात सर्व खात्यांशी समन्वय साधून पर्यटन विकास साधला जाईल हे सांगायला ते विसरले नाहीत.

तब्बल १४ वर्षांनंतर पनवेल पासून ते गोव्यापर्यंत महामार्गालगत असणा-या पर्यटनस्थळांकडे जाणा-या रस्त्यांचे दिशादर्शक फलक, पर्यटनस्थळे जोडणारे चांगले रस्ते, महत्वाच्या पर्यटन स्थळांवर स्वच्छतागृहे आता एम.टी.डी.सी., सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहकार्याने उभारणार असल्याची माहिती पर्यटन महामंडळाचे मॅनेजिग डायरेक्टर किरण कुरुंदकर यांनी दिली.

या नुसत्या आश्वासनांची सवय आता कोकणवासियांना झाली आहे. हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच पर्यटनस्थळे आज सिधुदुर्गात विकसीत झाली आहेत. तीसुद्धा स्थानिकांच्या पुढाकाराने आणि ऐतिहासीक वारशांमुळे. भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून काही विशेष तरतुदी, पर्यटनामध्ये गुंतवणुक करणा-या स्थानिकांना काही वर्षांसाठी कर सवलत (जी गोवा राज्यामध्ये दिली जाते), २४ तास वीज, पाण्याची मुबलक उपलब्धता आणि चांगले रस्ते या मुलभूत सुविधा तरी सरकारनेच द्याव्या लागतात. १४ वर्षांनंतरही पायाभूत सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध झालेल्या नाहीत. हॉटेल उद्योजकांसमोर सरकारी अधिकारी नियम आणि अडथळ्यांची शर्यतच लावून देतात. यामध्ये सुवर्णमध्य काढून काही मार्ग काढता येईल का अशी अपेक्षा करणे चुकीचे ठरु लागले आहे.

कोकणातील लोक नेहमी नव्या उद्योगांना-प्रकल्पांना विरोध करतात असा समज पसरवला गेला आहे. पण आजपर्यंत एकाही सकारात्मक प्रकल्पाला कोकणवासियांनी विरोध केलेला नाही. कोकणरेल्वे, सिधुदुर्गचे विमानतळ यासाठी लोकांनी जमिनी दिल्या आहेत. विमानतळाच्या बाबतीत फक्त सातबा-यावरील पेन्सिल नोंदी आणि अतिरिक्त जमिन संपादनाला विरोध होत आहे.

पारदर्शकता असणा-या चांगल्या प्रदूषणविरहीत प्रकल्पांचे इथल्या लोकांनी स्वागतच केले आहे. सर्वात आधी गरज आहे ती सरकारी अधिकारी वर्गाची मानसिकता बदलण्याची. एम.टी.डी.सी.ची नावापुरती असणारी स्वायत्तता ख-या अर्थाने बहाल होण्याची. हे सर्व प्रत्यक्षात येण्यासाठी खंबीर नेतृत्व कोकणच्या मागे उभे राहिले पाहिजे. विधिमंडळात कोकणातील १७ आमदार प्रतिनिधीत्व करतात. आपापसातील हेवेदावे विसरुन ते कोकणच्या विकासासाठी एकत्र आले पाहिजेत. तर आणि तरच कोकण आणि सिधुदुर्गच्या पर्यटन विकासाची हवेतली आश्वासने प्रत्यक्षात उतरतील.

अॅड. शशांक मराठे, ९६८९९०३३७९


संपादकीय *

राष्ट्रवादीला पक्षवाढीचा ध्यास

आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कोकणातील सिधुदुर्ग जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे ठरविलेले दिसते. त्यामुळेचा यंदाच्या पर्यटन हंगामात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक मंत्र्यांनी या जिल्ह्यात पायधूळ झाडली. केंद्रीय कृषीमंत्री असलेल्या शरद पवार यांनी तर मे महिन्यात दोन वेळा जिल्ह्याला भेट दिली आणि पक्ष कार्याबरोबरच शेती शास्त्रज्ञांची बैठक घेऊन आंबा पिकाच्या दरवर्षी होणा-या नुकसानीची दखल गांभीर्याने घेतली. शेती शास्त्रज्ञांना नवीन उपाययोजना शोधण्यास सांगितले. परवाच्या दौ-यात ना. शरद पवार यांनी आंबोली - नांगरतास येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट या उसांवर संशोधन करणा-या संस्थेस भेट देऊन जलद वाढणा-या, अधिक साखर देणा-या, कोणत्याही हवामानात टिकणा-या उसाचे संशोधन करण्यात येत असल्याचे सांगितले. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा दौरा म्हटल्यावर राष्ट्रवादीचे झाडून सारे पदाधिकारी आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी या दौ-यात सहभागी होणार हे ओघाने आले. त्यामुळे केंद्रीय कृषिमंत्र्यांनी पिकांच्या मशागतीबरोबरच राष्ट्रवादी पक्षाची वाढ होण्यासाठीही राजकीय मशागत केली असणार!

जिल्ह्यातील सावंतवाडी (दोडामार्ग-वेंगुर्लेसह) विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपक केसरकर यांच्यावरच पक्षाध्यक्षांनी पक्षवाढीचीही जबाबदारी सोपविली आहे. त्यानुसार त्यांनी सावंतवाडी मतदार संघातून सलग दोन वेळा निवडून आलेले शिवसेनेचे माजी आमदार शिवराम दळवींनाच राष्ट्रवादीत दाखल करुन घेऊन धडाकेबाज सुरुवात केली आहे. त्यानंतर आता आणखी एक माजी आमदार आणि अनेक संस्था, संघटनांचे पदाधिकारी राष्ट्रवादीत दाखल होण्याच्या बातम्या पसरल्या आहेत.

केंद्रीय कृषिमंत्र्यांनी या प्रकारे शेतीची आणि पक्षाची मशागत चालविलेली असली तरी त्यांनी कोकणातील रखडत पडलेल्या सिचनाच्या योजनांबाबत काही ठोस कार्यवाही जाहीर करणे अपेक्षित होते. कारण त्यांच्या कृषी खात्याचे कार्य तर पाण्यावरच अवलंबून असते. राज्याचे पाणीपुरवठा खातेही त्यांचेच पुतणे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आहे. शेती-बागायती आणि पिण्याचे पाणी पुरवण्याची जबाबदारी असलेल्या या खात्याची नावे जरी बदलली तरी त्यातील झारीतील शुक्राचार्याची भूमिका काही बदलली गेली नाही.

सिचन प्रकल्पांतून पाणीच न देणारा झारीतील शुक्राचार्य हा भ्रष्टाचारच आहे. पण झारीच्या नळीत काडी घालून त्या भ्रष्टाचाररुपी शुक्राचार्यांचा डोळा फोडून पाणी वाहते करण्याचे काम कोणीच करीत नाही. त्यामुळेच कोट्यावधी रुपये खर्च होऊनही ग्रामीण जनतेचे पाण्यासाठीचे हाल संपत नाहीत. शहरात तर पिण्याचे पाणी एक दोन दिवसाआड लोकांना मिळते. कारण, जलसंपदेचे नीट नियोजन नाही. लहान मोठ्या पाटबंधा-यांच्या योजना मंजूर होतात पण पाण्याचा थेंबही न अडविता बहुतांश निधी कर्मचा-यांचे पगार, त्यांच्यासाठी निवासस्थाने बांधणे, यंत्रसामुग्रीची खरेदी यातच संपून जातो. त्यातून ठेकेदार पुरवठादार आणि लोकप्रतिनिधी यांचे खिसे भरतात. असे सरकारी समितीचा अहवालच सांगतो. त्यामुळे केंद्रीय कृषीमंत्र्यांनी पाणी पुरवठ्याच्या समस्येवर भाष्य केले असते. संबंधीत सरकारी यंत्रणेला खडसावले असते. आपल्या पक्षाच्या नेत्या - कार्यकर्त्यांना या कामांच्या पूर्ततेची खबरदारी घेण्यास बजावले असते तर सध्याच्या पाणी टंचाईच्या काळात लोकांना तेवढा तरी दिलासा मिळाला असता. पण यातले काही घडले नाही. मंत्र्यांच्या दौ-यात असलेल्या गाड्यांच्या ताफ्यांनी रस्त्यावरचा धुरळा तेवढा उडाला. यामुळे पक्ष कसा वाढणार याची चिता कोणालाच असल्याचे जाणवले नाही.

विशेष *

जैतीर उत्सव

वैशाख महिन्यात दर्श भावुका अमावास्येला वेंगुर्ले तालुक्यातील तुळस येथे जैतिर उत्सव होतो. यंदा १ जून पासून सुरु झाला आहे. भाविकांचे अढळ श्रद्धास्थान असलेल्या या देवस्थानाविषयी -

संस्थानकाळात पूर्वी तुळस गावात जैते परब नावाचे थोर लढवय्ये, परोपकारी, न्यायी पुरुष होऊन गेले. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या रांगणागडावर त्यांची सुभेदार म्हणून नेमणूक झाली. एकदा कामावरुन परत येतांना वाटेत नारुर गावी मुलीच्या सासरी तिला आपल्यासोबत आणण्यासाठी गेले. सोबत कुळंबीण स्त्री असावी असे तिच्या सासरच्यांनी सांगितल्यावरुन ते तुळस गावी आले. परत सोबत कुळंबीण स्त्री, नागन महार अ तिघेजण नारुर गावी जात असतांना भिल्लांच्या एका टोळक्याने या तिघांवर हल्ला केला. या हल्ल्यात जैतोबांनी अनेक भिल्लांना कंठस्नान घातले. घनघोर चकमक झाली. लपून मारलेला एक तीर जैतोबांना वर्मी लागला. त्यांचे पार्थिव नागन महाराने तुळस गावी आणले. विधीपूर्वक अंत्यसंस्कार झाले. त्या जागीच छोटेसे जैतिर मंदिर बांधण्यात आले. हा जैतोबा उर्फ जैतिर गावचा रक्षणकर्ता मानला जातो.

या मंदिरात प्रतिवर्षी दर्श भावुका अमावास्येला वैशाख महिन्यात जत्रा भरते. हा उत्सव जेवढा दिमाखदार तेवढाच अतक्र्य, गुढ परंपरांनी भरलेला, भक्तांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करणारा ठरत आहे. आदल्या दिवशी जोगीनी, भोगीनी हे धार्मिक कार्यक्रम होतात. त्या दिवसापासून अकराव्या दिवशी कवळास उत्सव होतो. पाचव्या दिवसापासून जैतिर मुखवटाधारी देवपुरुष गावात सवाद्य फिरुन घरोघरी दर्शन देतो. सोबत मानकरी, सेवकवर्ग असतो. रात्री देवालयासमोरील मांडावर भाविकांची गा-हाणी (पडस्थळे) घेतली जातात. त्यांना मार्ग सांगितला जातो. अडीअडचणीत जैतीर देवाला हाक दिल्यास कामे होतात. यश येते अशी श्रद्धा आहे. जैतिर देवस्थान भाविकांचे अढळ श्रद्धास्थान आहे.

यंदा १ जून पासून जैतिर उत्सव यात्रा तर १० जूनला कवळास उत्सावाने जैतिर उत्सवाची सांगता होणार आहे. उत्सवाला मोठी गदी असते. पावसाळ्यापूर्वी भरणा-या या उत्सवातील बाजारात शेती अवजारांची मोठी उलाढाल होते. गोवा, कोल्हापूर, मुंबईपासून महाराष्ट्र, कर्नाटक प्रांतात भाविकवर्ग पसरला आहे.

या उत्सवामधली लक्षवेधी अशी प्रथा असते ती कातरची. गावतील सुतार बांधव या प्रथेत चक्क तलवारीखाली मान ठेवतात. त्या व्यक्तीवर बारा हरिजन झोपतात. यानंतर गावात जैतिरच्या आयुधांच्या पेटा-याची पूजा करणारी राऊळ मंडळी पुढे येतात आणि ते खंजिर उगारतात. यावेळी जैतिराचे तरंग या मंडळींभोवती प्रदक्षिणा घालून या व्यक्तींना शापमुक्त करतात आणि कारत सुटते. सुतार बांधवांमध्येही या तलवारीखाली मान कोणी ठेवावी याचा मान ठरलेला असतो. प्रत्येक वर्षाची वर्सल ठरलेली असते.

जैतिर देवालय परिसरात अन्य मंदिर आहेत. गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी मुख्य रस्त्याला लागूनच असलेला हा परिसर पर्यटन स्थळ म्हणून जिल्हा पर्यटन आराखड्यात नमूद झालेला आहे. तुळस जैतिराश्रीत संस्था, मुंबई व स्थानिक समिती यांनी श्री देव जैतिराच्या आशीर्वादाने गावात अनेक सुधारणा घडवून आणल्या आहेत. जैतिर मंदिराचा व परिसरातील मंदिरांचा जीर्णोद्धार या मंडळीने लोकांच्या सहकार्याने केला आहे.

निसर्गरम्य वेंगुर्ले शहरापासून ८ किलोमीटरवर वेंगुर्ले - सावंतवाडी रस्त्यावर तुळस गाव आहे.

विशेष *

मुंबई गोवा दीड वर्षात रुंद

मुंबई-गोवा महामार्गावरील वाढत्या अपघातांची दखल घेऊन या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात येणार असून त्यासाठी ३ हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. झाराप ते पत्रादेवी या नवीन रस्त्याचे काम पूर्ण झाले असून पनवेल ते झाराप रस्त्याचे काम ४ टप्प्यात पूर्ण करण्यात येईल असे पर्यटन व सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सिधुदुर्ग जिल्ह्याच्या दौ-यात दिले. पर्यटनासाठी कोकण पॅकेजमधून २२५ कोटी रुपये मंजूर करुनही दोन वर्षात अपेक्षित कामे झाली नसल्याची कबुली देत मंजूर कामे वर्षभरात पूर्ण झालीच पाहिजेत असेही त्यांनी संबंधीत अधिका-यांना बजावले. भुजबळ यांनी आरोंदा, शिरोडा-वेळागर, आरवली, वेंगुर्ले, कुणकेश्वर येथील पर्यटन योजनांची पाहणी केली. त्यांचे समवेत आमदार दीपक केसरकर, खासदार समीर भुजबळ, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, जिल्हाधिकारी आणि पर्यटन, बांधकाम खात्यांचे अधिकारी होते.

सागरी महामार्गावरील आरोंदा-किरणपाणी पूल येत्या ऑगस्ट महिन्यात वाहतुकीस खुला होईल. पर्यटन विकासासाठी सिधुदुर्ग जिल्ह्याला ८३ कोटींचा निधी दिला जाईल. शिरोडा - वेळागरचा वादग्रस्त भाग वगळून तेथे ताज ग्रुपचा पंचतारांकित प्रकल्प होईल. वेंगुर्ले-नवाबाग येथे फिशरमेन्स व्हिलेज, मिठबांव येथे २० कोटींचा तारकर्लीप्रमाणे रिसॉर्ट, सिधुदुर्ग आणि विजयदूर्ग किल्ल्यांसाठी ७ कोटी रुपये मंजूर अशी कोट्यावधी रुपयांची आश्वासने देऊन आणि योजना जाहीर करुन पर्यटन मंत्र्यांनी हा दोन दिवसांचा धावता पर्यटन दौरा आटोपता घेतला.

आजोळचे उद्घाटन

कुडाळ तालुक्यातील नेरुर गावात इंगेश हॉस्पीटलच्या परिसरात ज्येष्ठ नागरीकांचे आजोळ२९ मे पासून सुरु झाले. तेथे पन्नाशी ओलांडलेल्या व्यक्तींना कोणताही दुर्धर आजार होऊ नये यादृष्टीने सल्ला-मार्गदर्शन उपचार केले जाणार आहेत. त्यासाठी कुडाळ येथील सिधुदुर्ग रेडिओलॉजी सेंटर, रेडी येथील कार्डिओलॉजी सेंटर,मालवण येथील रेडकर हॉस्पीटल यांच्या मदतीने नेरुर येथील या आजोळीरुग्णांची काळजी घेतली जाणार आहे. पर्यटन केंद्राप्रमाणे येथे निवासी सोयी असून जिल्ह्यातील अन्य तज्ञ डॉक्टारांचीही या आजोळला मदत मिळणार आहे. अशी माहिती या प्रकल्पाचे प्रवर्तक डॉ.विवेक रेडकर यांनी दिली.

हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब, मोतिबिदू, दंत उपचार, सांध्याचे विकार यावर अॅलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, योग, निसर्गोपचार या उपचार पद्धतींचा मेळ घालून आजोळी येणा-या रुग्णांचे स्वास्थ्य चांगले राखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सर्व सुखसोयींसह १४ सदनिका असलेले हे एक वैद्यकीय पर्यटन केंद्रच असून त्यातून मिळणा-या उत्पनातून अल्प उत्पन्न गटातील लोकांना अल्पदरात उत्तम दर्जाची वैद्यकीय सेवा देण्यात येणार आहे.

शेखर सामंत, स्वाती वालावलकर यांना श्रीकांत लाड पुरस्कार

मूळचे वेंगुर्ल्याचे मुंबईच्या कामगार चळवळीत एकेकाळी अग्रणी नेते असलेले कॉम्रेड श्रीकांत लाड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ कॉ. श्रीकांत लाड स्मृती समितीतर्फे वेंगुर्ले तालुक्यातील विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावणा-या दरवर्षी एका व्यक्तीला पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यावर्षी पत्रकारितेत उत्कृष्ट कामगिरी करणारे वेंगुर्ल्याचे श्री. शेखर सामंत यांना २०१० सालचा तर राष्ट्रीय विज्ञान जत्रेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविणा-या सौ. स्वाती वालावलकर यांना २०११ सालचा पुरस्कार नेरुर येथील आजोळप्रकल्पाच्या उद्घाटन समारंभात देण्यात आले.

शेखर सामंत हे दै. तरुण भारतचे जिल्हा प्रमुख असून त्यांनी आतापर्यंत विविध वार्तांकनाद्वारे क्रीडा, कला, सांस्कृतिक, नवीन संशोधन आणि गुन्हेगारी विषयक लेखन केले आहे. यापूर्वीही त्यांना पत्रकारितेतील अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.

सौ.स्वाती वालावलकर या वेतोरे येथील सातेरी हायस्कूलच्या गणित विषयाच्या अध्यापक असून त्यांनीही तालुका, जिल्हा-स्तरावर विज्ञान जत्रेत अनेकवेळा पुरस्कार मिळविलेले आहेत.

शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि रोख एक हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप असून श्रीकांत लाड स्मृति समितीचे कार्याध्यक्ष सुभाष भांडारकर यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले.

रेडीत अद्ययावत वैद्यकीय सेवा केंद्र सुरु

रेडी येथे मालवणचे प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ. विवेक रेडकर यांनी रेडकर हॉस्पीटल रिसर्च सेंटर ट्रस्टच्या माध्यमातून तेथे २४ तास अतिदक्षता विभाग, अर्धांग व संधीवातावर उपचार, फिजिओथेरपी सेंटर, नेत्रविकार शस्त्रक्रिया, फुफ्फुसाचे आजार तपासणी यंत्रणा, सोनोग्राफी, इकोकॉर्डिओग्राफी, एक्सरे आदी उपचार केले जाणार आहेत. तेथेच २४ तास खुला राहणारा मेडिकल स्टोअर्सही आहे. या सेंटरच्या पहिल्या मजल्यावर आरवली-टांक येथील शेटये ट्रस्टने कॉन्फरन्स हॉल बांधून दिला असून त्यांचा वापर वैद्यकीय प्रशिक्षणासाठी केला जाणार आहे. श्री.आबा शेटये यांच्या हस्ते ट्रस्टच्या या नवीन वास्तूचे उद्घाटन ३० मे रोजी झाले.

या ठिकाणी दारिद्रयरेषेखालील लोकांना स्मार्टकार्ड दिले जाणार असून त्यांना औषध योजना मोफत राहणार आहे अशी माहिती डॉ. विवेक रेडकर यांनी दिली आहे.

सहवेदना *

प्रा. मोहन पवार

खर्डेकर महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक मोहन पवार यांचे पणजी - गोवा येथे त्यांचे बंधू प्रकाश यांच्या घरी अल्प आजाराने निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. वेंगुर्ले येथे ते मराठी विषयाचे एक विद्यार्थीप्रिय प्राध्यापक होते. नोकरी सांभाळून त्यांनी फोटोग्राफीचा छंद जोपासला होता. त्याशिवाय वेंगुर्ल्यातील सर्व सांस्कृतिक चळवळीत त्यांचा सक्रीय सहभाग असे. वेंगुर्ले येथून त्यांची बदली कोल्हापूरच्या गोखले महाविद्यालयात झाली. तेथूनच ते सेवानिवृत्त झाले. संस्थेचे सचिव व संस्कृत पंडित प्राचार्य एम. आर.देसाई यांनी अनेक इंग्रजी ग्रंथ लिहिले आहेत. त्यांच्या महाभारतावरील व अन्य ग्रंथांचे मराठी अनुवाद प्रा. पवार यांनी केले आहेत.

किरातशी त्यांचे खूप जवळचे नाते होते. अनेक विषयांवर त्यांनी किरातमधून सातत्याने लेखन केले आहे. ‘किरातच्या हिरकमहोत्सवी (६०व्या) वर्षारंभ अंकात त्यांनी किरातचा पूर्व इतिहास आणि एकूण कोकणातील वृत्तपत्रसृष्टी विषयी लिहिलेला अभ्यासपूर्ण लेख आजही संदर्भासाठी वाचला जातो. किरातचे संवर्धक कै. बाबा मराठे यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.

अनेक दैनिक वृत्तपत्रात ते साहित्यिक, मासिके यांमधूनही विविध विषयांवर प्रत्यक्ष माहिती घेऊन त्यांचे लेख प्रसिद्ध होत असत. फोटोग्राफीच्या छंदासाठी त्यांची कोकणची खूप भटकंती केली होती. एक अभ्यासू प्राध्यापक म्हणून त्यांचा लौकीक होता.

कोल्हापूर सोडल्यानंतर ते आपले धाकटे बंधू सी.ए. प्रकाश पवार यांच्याकडे पणजी-गोवा येथे वास्तव्यास होते. काही वर्षापूर्वी त्यांना पक्षाघाताचा झटका आला होता पण, त्यातून ते सावरले होते व लेखनही करु लागले होते. त्यांच्या पत्नी व दोन मुलगे पुणे येथे स्थायीक आहेत. किरातपरिवाराचे एक सदस्य असलेले प्रा. मोहन पवार यांच्या निधनाने किरातपरिवाराला अतीव दुःख होत आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

गोविद नांदोसकर

मुळचे भटवाडी येथील मीरा-रोड निवासी श्री. गोविद गणेश उर्फ आबा नांदोसकर (७०) यांचे १६ मे रोजी निवासस्थानी अल्प आजाराने निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी, २ मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

अक्षता भोगटेची आत्महत्या

वेंगुर्ले- दाभोलीनाका येथील अक्षता दिगंबर भोगटे (१८) हिने बारावी परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याने नैराश्येपोटी घरात मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. ती खर्डेकर महाविद्यालयात विज्ञान विभागत शिकत होती. तिचे मागे आई-वडील, दोन बहिणी आहेत.