Saturday, 28 May 2011

अंक २० वा, २८ मे २०११, १२वी निकाल विशेष

राज्याच्या ८ विभागातून परीक्षार्थी- ११,५९,३६९,
उत्तीर्ण - ८,१९,५०२ (७०.६९ टक्के)
कोल्हापूर विभाग- परीक्षार्थी- १,२७,३९२
उत्तीर्ण - १,०५,१६३ (८२.५५ टक्के)
सिधुदुर्ग जिल्हा- परीक्षार्थी - ९,५३२
उत्तीर्ण - ८,७४९ (८८.९३ टक्के)
वेंगुर्ले तालुका - परीक्षार्थी - ८५५,
उत्तीर्ण- ७९३ (९०.२३ टक्के)

सिधुदुर्ग जिल्ह्यातील तालुका निहाय टक्केवारी
देवगड- ८ ज्यु. कॉलेज ११०५ पैकी ९८४ उत्तीर्ण (८४.८८)
दोडामार्ग- ३ ज्यु. कॉलेज ३९० पैकी ३६६ उत्तीर्ण (९०.१०)
कणकवली- १० ज्यु. कॉलेज १९०२ पैकी १७५२ उत्तीर्ण (८९.८३)
कुडाळ- ११ ज्यु. कॉलेज २१३६ पैकी १९४४ उत्तीर्ण (८९.०१)
मालवण- ७ ज्यु. कॉलेज ८९९ पैकी ८१९ उत्तीर्ण (८६.८९)
सावंतवाडी- ११ ज्यु. कॉलेज १९५१ पैकी १८०७ उत्तीर्ण (९०.८६)
वैभववाडी- ४ ज्यु. कॉलेज २९४ पैकी २८४ उत्तीर्ण (८७.२८)
वेंगुर्ला- ४ ज्यु. कॉलेज ८५५ पैकी ७९३ उत्तीर्ण (९०.२३)

वेंगुर्ले तालुक्यातील कनिष्ट महाविद्यालयांचा निकाल
बॅ. खर्डेकर महाविद्यालय- ३१७ पैकी २८२ उत्तीर्ण (८६.७१)
गोगटे ज्युनि. कॉलेज, शिरोडा- ३३२ पैकी ३१९ उत्तीर्ण (९४.२४)
रा.सी.रेगे ज्युनि. कॉलेज- १७० पैकी १५६ उत्तीर्ण (८७.१७)
श्री देवी सातेरी हायस्कूल, वेतोरे- ३६ पैकी ३६ उत्तीर्ण (१००)

वेंगुर्ले तालुक्यातील पहिले तीन
१) मिहीर प्रदिप कुलकर्णी - ५०६ (वाणिज्य)
बॅ. खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ले
२) चैतन्य विलास दळवी - ४९८ (विज्ञान)
बॅ. खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ले
३) विनायकी नामदेव परब - ४९३ (विज्ञान)
गोगटे ज्युनि. कॉलेज,, शिरोडा

बारावी परीक्षा निकाल -वगुर्ला केंद्र
सायन्स
कोचरेकर अक्षय भरत * २८०, साळगांवकर दिपक र. * ३३१, नायर अदिती गणेश * ३५३, चिदरकर मंदार मंगेश * ३१४, नाईक पराग विठ्ठल * २८९, पालव स्मिता चंद्रकांत * ४०९, राव गृहिता हर्षद * ४५५, भाटकर राहूल शंकर * ३५१, तानावडे जाई दिनेश * ३५१, गावडे मेनका मनोहर * ३८५, यंदे प्राजक्ता प्रमोद * ४६८, जोशी शितल विष्णू * ४४३, चव्हाण योगाली संतोष * २६२, पेडणेकर समृद्धी अमृत * ३६४, नाईक नारायण दत्ताराम -३२८, गावडे नयना दत्ताराम - ४२७, तांडेल गजानन यशवंत * ३७१, गावडे जगन्नाथ अनिल * ३२२, परब सत्यप्रसाद यशवंत * ३७०, चेंदवणकर स्वप्नाली सु.-३४१, सावंत तुकाराम गुंडू - ३४३, परब दत्ताराम मनोहर * ३८०, भगत सुहास अशोक * ३२८, बांदेकर काशिनाथ गु.- ३५५, पालव धनश्री विलास * ३४८, शेटकर प्रतिक बाळकृष्ण -२६२, वनकुद्रे अभिजित प्रदिप * ४०५, तांडेल रामचंद्र नारायण -२४३, नारोजी मंदार मदन -३१३, गावडे गीतेश गोपाल * ३३२, शिरोडकर गजानन सु.- २६५, राजाध्यक्ष हरीश महेश * २६८, परब हर्षदा लाडू - ३४८, गावडे स्नेहल उत्तम * ३६०, पिगुळकर हर्षद विद्याधर-२९४, जाधव मिथून बोंबडो * २८०, तोरसकर दिगंबर नं * ३८९, गोगटे अभिजित विजय * ३८१, सावंत सारीका प्रकाश * ३७५, तोरसकर रीमा गोपाल * ३४६, पालव सचिन चंद्रकांत * ३२१, राऊळ नविना नारायण * २७८, डिसोजा मिलीता नेल्सन * ३६८, गिरप जागृती केशव * ३०८, कुबल संजीवनी नयन * २९४, वेर्णेकर अजिक्य किशोर- ३१४, राऊत शितल बाबू * ३२६, गवंडे अतुल भास्कर * ३४३, कदम सोनल मादू * ३४८, ठाकूर भालचंद्र प्रमोद * ३२४, परेरा सिल्वीस्टर मोतेस- २५८, पालकर सीमा ज्ञानदेव -३४८, गवंडे लक्ष्मण देवेंद्र * ३९५, शेटकर ममता मंगेश * ४१७, मयेकर नम्रता विलास * ३८६, ठाकूर पुनम गुरुनाथ * ३१२, मराठे मंदार नंदकिशोर * ४६३, मसुरकर अनिता सि. -३९५, प्रभूखानोलकर शैलेश -३३३, करंगुटकर आरती भा.-४४६, वेंगुर्लेकर हेमांगी मंगल- २८१, मोचेमाडकर हेमंत दि.-३३६, होडावडेकर मयुरी प्रदिप-३७३, बांबार्डेकर रुपाली अशोक-२७७, देसाई मयुर शामसुंदर * ३६९, पेडणेकर प्राजक्ता भरत -४२७, मांम्बायील प्राजक्ता रा.- ३६७, कुडव बाळकृष्ण रामचंद्र- २८७, वराडकर अस्मिता अरुण-३३२, परब सुमिता वैभव * ३८२, पिगुळकर तनुजा अशोक -२६५, दळवी चैतन्य विलास * ४९६, तांडेल दत्ताराम सुरेश- २६५, तेंडोलकर तृप्ती भास्कर - २८८, शिरसाट सौरभ जीवन * ३२९, रेडकर मयुरेश रमेश * ३८१, खडपकर वासुदेव सुहास -२४७, गिरप विनय नारायण * ३६८, हळदणकर योगिता शरद -३५०, मोर्डेकर ज्योती अभय - ३४६
बहिस्थ - जाधव अस्मिता गणपत, पवार गौरव गोपाळ

कॉमर्स
दळवी अमित बाबली * ३८०, चिदरकर दशरथ वा.-३१८, शिरोडकर देवदत्त दे.- २९२
मांजरेकर कविता अनिल- ४०४, होडावडेकर नारायण अ.- ३२८, साळगांवकर नेहा विवेक- ३६०, मांजरेकर निकिता विजय-३८१, मांजरेकर नितेश सुरेश-२७२, बागायतकर प्रशांत नरेंद्र * २६८, साळगांवकर प्रियांका वा.- २९८, साळगांवकर राजाराम -३४७, सातार्डेकर राजेश प्रदिप -४३२, मांजरेकर शोभा गजानन*४०८, नाईक योगिता चंद्रकांत * ४०७, पोयरेकर बाबुराव विलास- २४९, चौगुले सचिन रुपाजी - ४६१ , गावडे महादेव प्रकाश * ३५६, कावले सहदेव सुधाकर-३२२, पेडणेकर मधुकर दिलीप- २२२, मुणनकर वैशाली विजय- ३२१, जाधव सुरज सुरेश * ३६०, मसुरकर राजाराम गो.- ३६०, गवंडे भक्ती वासुदेव * ३५१, गावडे मिनल गुंडू - ४४१, ठाकूर निहाल तुकाराम * ३७८, सामंत काजल वासुदेव * ३४०, मेस्त्री सोनाली दत्ताराम - ३७१
माळकर सोनाली स.-३६१, राऊळ सायली सुदर्शन- ३७८, परब पुनम महादेव - २५७
पेडणेकर स्मिता भगवान * ३४८, आडेलकर प्रमोदिनी म.- ३१३, परब प्रेमानंद मंगेश * ३२८, केळुसकर संगिता स.- ३७१, नांदोस्कर अनिकेत अर्जुन-२५७ , आरोलकर शंकर आ.- ३१७, माळकर जगन्नाथ कृष्णा- २४७, गावडे जगन्नाथ विजय * ३८०, बांदेकर संस्कृती अशोक * ३६२, परब सुशांत मोहन * २८७, ठाकूर सागर गुंडू - ३८५
नवार तुषार राजन * ३३७, ठाकूर राजाराम हेमंत * ३२४, पेडणेकर वर्षा विजय - २७४
तोरसकर हर्षदा घ.- ४०६, गोलतकर दर्शना रा. * ३९०, गावडे विकास सत्यवान- ३८२
गांवकर प्रशांत सुहास *३२७, जुवलेकर रसिका दि.- २८१, राऊळ संभाजी प्रताप - ३०७
चव्हाण कांचन क्री.- २७८, फर्नांडीस क्लेरीसा रु.- ३२५, आजगांवकर दत्ताराम पां.-२६०
राऊळ सिद्धेश सुधाकर- ३१४, खरात संध्या विठू * ३६०, सामंत प्रज्ञा रघुनाथ - ४३५
मयेकर स्नेहा बाबुराव * २९९, फर्नांडीस एलिझाबेत आं.- २९४, फर्नांडीस एल्वीरा फिलीप-३१७, कडुलकर हेमांगी विजय- ३६७, महाले श्रेयस शांताराम * २८१, शेटकर सागर घनःश्याम- २८८, शेटकर मेघःश्याम गु.-३४५, कासले संगिता यशवंत - ३३२
खानोलकर गितेश रा.-३६०, तारी रमेश एकनाथ * ४६४, राजाध्यक्ष अमोल शि.- ४०७
कुलकर्णी भाग्यश्री वसंत*४३३, कदम रामचंद्र रविद्र*३३८, गावडे सुशांती शंकर - ३०६
मालवणकर हरेश श्रीकृष्ण-२५५, किनळेकर हर्षदा रमेश-३३५, चव्हाण सचिन सुनिल -३३२, गावडे सुधिर वामन * २७३, परब कृष्णा शंकर * ४१३, राऊळ विष्णू हरिश्चंद्र ३६२, रेडकर अवधूत नारायण * २६७. धोंड संध्या मंगेश * ३३६, नाईक सोनाली का.- ३२५, परब किर्तीदा शां.- ३६७, कुलकर्णी मिहीर प्रदिप * ५०६, राऊळ रसिका कृष्णा- २९३, गावडे रसिका रमेश * २६६, परब निखिल रमेश * ३२२, तोरसकर विनायक रा.- ३०४, किनळेकर निशा सुरेश- ३०५, सावंत करीष्मा धोंडू - ३६६, गवळी कविता दिलीप * ४३७, गावडे अंकिता कृष्णाजी * २८२, गावडे समीता पुरुषोत्तम * ३९५, राऊळ चैताली बाजीराव- ३८२, गावडे चेतन विलास * ३१६, गवंडे अदिती अशोक - ३४८
मोर्जे जागृती तुळशीदास- ३८९, मठकर शिवाली मनोहर- ३४५, फर्नांडीस जेनिफ रुजाय- ३४०, फर्नांडीस जॉकी इजामेल- २५७, माधव पंकज प्रकाश- ३३९, घोगळे अंकिता जयराम- ३८९, चुडनाईक अक्षय जयवंत- ३२५, कावले शलाका शरद- ३२५, गवंडे दिलीप शशिकांत- ३६४, नाईक पुनम गुंडू- ३६५, ठाकूर सीमा भदू * ३८१, सरमळकर मंदा नं. * ३०५, फर्नांडीस मेरी रुजारिओ-२६३, आरोलकर समीर सा.-३०६. पेडणेकर अमोल ज्ञानदेव-२९४, लोबो ब्रायन व.- ३५३, ब्रिटो एलिना आगोस्तिन-३०४, परब अर्पणा महादेव- ४२१, केरकर रिना जनार्दन- ३८२, मोहिते धनश्री महादेव- ४०४, नाईक प्रियांका प्रमोद- २८२, गावडे शंकर सुभाष * ४०२, धर्णे अजिक्य अशोक- ३०३, तेंडोलकर नुतन पुं.- २८०, जाधव मनोज मारुती- ३९२, फर्नांडीस वोज्वाल्ड ए.-२७१, प्रभूखानोलकर अक्षय गो.-३७७, पेडणेकर कोमल सदानंद-३३५, गावडे दिपा श्रीधर -३७५, सागवेकर पल्लवी प्रदिप -३४०, फर्नांडीस फिलीप्स लॉ.-३९३, तेंडोलकर पुनम मधुकर-३९८, खानोलकर प्रथमेश प्र.-३१५, गोवेकर दिप्ती दत्तप्रसाद-४६९, होडावडेकर काजल सू.-३७३, होडावडेकर लाडू सं.-३९१, आरोंदेकर प्राची भरत-४४६, होडावडेकर प्रतिक्षा रा.-२६५, सुकळवाडकर पुंडलिक द.-३९०, बांदवलकर श्रीकृष्ण रा.-२९५, तळावडेकर सोनाली बा.-४१४, वेंगुर्लेकर योगिता विलास-३२७, मेस्त्री प्रेरणा प्रेमानंद-३०१, रेवणकर प्रणाली रा.-२६७, वराडकर कृष्णा धों.- २६९, सारंग जागृती दिपक-२५२, मसुरकर प्रियांका शरद-२६३, राऊळ प्रसाद भिवा-२६७, खानोलकर संदेश संजय-३१७, मयेकर वसंत दिलीप-२८९, इकनगुट्टी संतोष भि.-३३२, परब अंकुश भरत -३३७, धुरी रितेश रविद्र -३१३, राऊळ हर्षदा सुरेश -३०४, राऊळ वृषाल जयंत-३९४, गावडे वृषाली विनायक-३८५, गावडे कौशिक सुहास-३६०, फर्नांडीस सिथिया फ्रा.-३६०, गावडे भास्कर महादेव-३२०, फर्नांडीस सोफिया फ्रा.-३३४, शेर्लेकर सोनाली कृष्णा-४४१, म्हापणकर सौरभ र.-३४०, परब अंकिता आनंद-३११, परब स्मिता श्यामसुंदर-४०९, धुरी विनिता उत्तम-३२६, धुरी अस्मिता वासुदेव-४०५, सावंत दत्तराज अशोक-२३९, खरात विठ्ठल जानू-४१४, केरकर दिप्ती बाळकृष्ण-३७९, धुरी चैत्राती मु.-३४७, रेडकर ज्योत्स्ना हुनमंत-३७८, चोपडेकर तुकाराम गो.-२७७, गावडे बाबु विजय -३५३, कासकर वासुदेव अलीस सागर हनुमान -२७२, जाधव तनुजा गुंडू -३१८, खोब्रेकर वंदना उदय -२८१, परुळेकर विनया सुनील-३७९, गोवेकर सविता सत्यवान-३९१, शिरोडकर विठोबा स.-३५२, तेंडोलकर व्यंकटेश र.-४०१, झांटये अश्विनी दत्तात्रय-४५०, गावडे अजय अशोक -३७२, घाडी विनायक रमेश * २७४, परब विनायक रमेश -२७८, राऊळ सूर्यकांत कानू- ३०२, वेर्णेकर जयश्री ल.- ३७४, खानोलकर यशवंती र.- २७९, राऊळ सत्यवान सहदेव- ३१७, मठकर सायली श.- ४२६, कांडरकर योगेश यशवंत- ५०७, शेटकर मयुर भगवान - ३०९
बहिस्थ - राऊळ योगिता एकनाथ, पालव सागर सहदेव

आर्टस -
माळगांवकर दर्शना स.-२६५, म्हाळुंगकर फहीम हनिफ-२९१, गोक्रणकर कुसाजी ल.-२६३, मांजरेकर विजया अर्जुन-२८९, जाधव नेहा दिपक-२७६, राणे वर्षा धोंडू -२९४, घोलेकर मधुवंती मिलिद-२४४, गवंडे भाग्यश्री नारायण-२३१, पंडित केतकी अशोक-३६५, परब स्नेहल प्रताप-३१२, धुरी प्रणाली दशरथ-२९३, सावंत रुपाली दत्ताराम-२९६, ठुंबरे रामचंद्र लक्ष्मण-२८१, पालकर ज्ञानेश्वर चं.-३९२, ठाकूर गितांजली ना.-३९६, कामत प्रियांका साबाजी-३३५, सावंत वसंत अरुण-२९१, कदम मंदार प्रकाश -३१८, फटनाईक अर्पणा सं.-२८८, परब यशश्री बाबू * २६४, गावडे सुमती गंगाराम- २८६, कदम पल्लवी प्रकाश-३७६, परब पल्लवी तानाजी- ३०१, कांबळे विजय गुणाजी -३५२, खरात छाया बाबू * ३४४, काळसेकर सायली स.-३४७, कुबल सोमदत्त गणपत-३०४, फर्नांडीस देवदित वि.-२९४, राऊळ दिलेस अर्जुन -२९५, जाधव राजेश रामचंद्र * ३००, बोडके राजेश शामराव-३०५, फडतरे रेश्मा सिद्धार्थ-२७०, जाधव प्रफुल्ल प्रकाश-३४६, राऊळ संगिता कांता-२८४, मोडक उमेश चंद्रकांत-३५४, माडये रामचंद्र महादेव-२३९, परब प्रशांत भिकाजी -३०७, कावले सखाराम रमेश-३१४, सावंत अक्षय अशोक -२४९, राऊळ सचिन शरद- ३०५, तांडेल लिखीता पांडुरंग-४२५, गावडे रेश्मा अरुण -३८८, तुळसकर शुभांगी दत्तगुरु-३६९, घोंगे संध्या हरिश्चंद्र-३७९, धुरी आरती भिकाजी -३६२, कांबळी रविकिरण सा.-३०८, गोळम प्रतिक्षा प्रकाश-३२८, माधव शैला शांताराम-३१४, मुणनकर निलेश प.-३३६, डिसोजा लविना घाब्रीयल-२६७, केळुसकर मिनाक्षी स.-२६४, राऊळ गोविद सहदेव-३०५, सुतार अश्विनी शिवाजी -३९४, परब अश्विनी सुभाष -३८७, कावले कविता केशव-३११, शेणवी शितल विनायक-२५०, परब जागृती गोविद * ३२२, देसाई सुप्रिया रघुनंदन -२७२, राणे पंकज रमेश -३३९, कांबळी प्राजक्ता रामचंद्र-३४०, कुंभार तेजस्वी दशरथ -२३७, माळकर प्राजक्ता सुरेश-३३०, राणे दिपक राजाराम-३५६, मठकर राकेश सुरेश-३१२, आईर मंगल अर्जुन-३४९, म्हापणकर माया भिसाजी-३४०, कांदे मिलन बाळकृष्ण-३२३, परब किरण मुकुंद -३७८, साटम नयना जयराम-४४४, पाटकर प्रणाली गुंडू -४३४, परब गोविद महादेव -२९८, परुळेकर निलेश बा.-३८४, मुणनकर अंकिता देऊ-३१३, सावंत मनोहर भालचंद्र-२६३, प्रभूखानोलकर गितांजली -३८६, प्रभूतेंडोलकर प्रियांका म.-३०३, पालयेकर सोनाली ज.-३१३, मलबारी पुनम रविद्र-२३७, मेस्त्री संपदा भास्कर- २८८, कांबळी दिपक मधुकर- ४२१, वारंग स्वप्नाली प्रकाश-२५२, गावडे स्वप्नाली सत्यवान-३२६, नेवरेकर प्राची विलास-२७६, आरेकर तृप्ती कृष्णाजी-२९१, वजराटकर दिपाली रा.-३०३, होडावडेकर रामा सुधीर-३६५, बागायतकर राजेश नरेंद्र-२५३, आमडोसकर प्रणिता का.-२४१, जाधव नम्रता दाजी- ३१४, कुलकर्णी श्रीकांत आनंद-२४८, केळुसकर प्रिया भरत-३८५, गावडे अपर्णा वासुदेव -४०२, वशालकर अमृता विजय -२९८, चिपकर अमृता विजय -२९०, पेडणेकर अश्विनी लक्ष्मण-२६८, परब रोहीत बाळकृष्ण -३४३, पाटील ममता यशवंत- ३६२, खरात संतोष गंगाराम-२८६, आरमारकर सुगंधा अनिल-२६९, ब्रिटो स्टिव्हन्स मिनीन-२३०, धुरी नारायण तुकाराम- २४१
बहिस्थ - राऊत आरती बाबू, केळजी केतन नारायण, मेस्त्री सुरेखा बाळकृष्ण, नाईक गणेश वसंत, धर्णे कार्तिकेश महादेव, परब धनश्री वासुदेव

एम.सी.व्ही.सी.
आंदुर्लेकर अंकिता आ.-४२७, नाईक प्रिया गंगाराम-३०१, साळगावकर गुरुनाथ श्या.-४०४, कोचरेकर जितेंद्र र.-४१३, आंगचेकर कुलदिपक कृ.-३५२, साळगावकर महानंदा नं.-४०९, मांजरेकर मिलिद ग.-३४९, नाईक अनंत परशुराम * २८९, बागायतकर प्रसाद प्रविण -३७३, कोरगावकर रुपेश रविद्र * ३१८, घाडी सोनू सदानंद -३५४, बांदवलकर सागर चं. * ३१७, नाईक अनंत सावळाराम * २७६, नाईक सागर उत्तम * ३१८, माने तेजस विष्णू * २९८, करलकर सचिन शंकर * ३४२, गावडे श्रद्धा यशवंत * ३७४, मोबारकर सागर दिगंबर * ३७८, तुळसकर श्रीराम लवू * ४०२, सावंत सायली अनिल * ४२२, बोवलेकर समिर दिगंबर * ३३२, सावंत रोहन भरत * ३४६, केळुसकर गणेश अनंत *३५३, काळसेकर गणेश तु.-३६५, कुडपकर ताराबाई दि.*३६९, गावडे सिताराम गोपाळ*२७५, राऊळ सुवर्णा पंढरीनाथ -३६०, तुळसकर दर्शन सुनिल * २८१, तुळसकर वत्सला कृष्णा *४४१, रेडकर नारायण दिनेश * ३६५, वेळकर मंदार शिवराम * २९४, घाटकर सद्गुरु सि. * २६४, नाईक जितेंद्र दिलीप -३२४, वराडकर सीमा मधुकर -३७६, भगत योगेश भिवा * ३७५, वारंग योगेश प्रभाकर * ३६९, गावडे संदेश सुरेश * ३३८, चव्हाण योगेश विकास * ३१०, पाटील संकेत दिनेश - २८७, गिरप संकेत राजन -३१७, मुणगेकर गजानन बाबू * ४००, धुरी सिद्धाली शंकर * ३९०, मिशाळे रोहन दत्ताराम * ३२५, परवार विधान रमेश * २७१, मुणनकर शांताराम शा.- ३९०, परब सिद्धेश कृष्णा * २८८, चव्हाण राधिका रविद्र * ५०८, कासले सुचिता रमेश * ३६९, कांदळकर श्रीकृष्ण रा.-३१९, कोकरे सिधू रामा * ४३५, मुणनकर सिद्धेश यशवंत-३२४, वराडकर निलेश रा.-३११, रेडकर रोहित आनंद * ३३०, पेडणेकर नितिन निळकंठ-४१९, घोणे मनोज सुर्यकांत-३२८, गडेकर तेजस गुरुनाथ * ३५०, धावडे राजेश गोविद * ३१६, जुवलेकर किरण अशोक * ३५०, लटम मिनाक्षी जनार्दन * ३२२, गावडे अनिल बाबुराव * ३८६, धुरी सोनाली भास्कर * ३७८, पिगुळकर ममता बाळ * ३८३, शेख सलमान शब्बिर * ३६१, तेंडोलकर मनिष विनायक-३९४, आरोलकर सुमिलन कृ.-३८९, मसुरकर अमोल सखाराम-३१७, परब नितिन ज्ञानेश्वर-३५४, परब किरण वसंत * ३१६, दिपनाईक निनाद कि.- २८५, धुरी स्वप्नाली नारायण * ३६३, परब देवेंद्र लक्ष्मण * ३०५, रेवणकर अंकिता नारायण-४१०, गावडे जगन्नाथ अण्णाजी-२६९, देशमुख योगेश्विनी रा.-३७२, शिवलकर प्रतिक्षा पांडुरंग-३७२, करंगुटकर सागर र.-३९५, होडावडेकर सोनाली म.-३७३, करलकर प्रफुल्ल क.-३२६, पिगुळकर राज सत्यवान-३९६, तेंडोलकर रसिका देवू-३४३, नागवेकर प्रतिक्षा तु.-३५६, सावंत गौरेश गोपाळ * ३९०, परब बाळकृष्ण गजानन * २७६, गावडे धर्माजी सीताराम * २९३, तेंडोलकर रुपेश रविद्र * ३४५, म्हापसेकर सचिन ना.-३६०, तेंडोलकर सागर रघुनाथ- ३३३, श्रुंगारे संदेश शरद * ३१६, टेमकर वैशाली शिवराम * ४२८, सावंत भुषण अर्जुन * २९८, पालकर प्रशांत रघुनाथ * ३५३, घोगळे अक्षय प्रभाकर * ३३३, हळदणकर सिद्धेश म.-३३६, सोनसुरकर स्नेहलता शं.-३७९, डिसोजा लारसन कामिल-३००, सावंत प्रथमेश प्रकाश * ३६०, धर्णे चित्रलेखा जगन्नाथ-४३२, खरात तानू गंगाराम-३६०, भगत वासुदेव मधुसुदन * ३४५, चव्हाण सगुण गणपत * ३३७, वराडकर तुशार चंद्रकांत- ३९१, शिरोडकर उत्तम मधुकर-३९४, पिगुळकर विकास रमेश * ३६०, गावडे प्रविण मधुकर * २९१, मेस्त्री प्रविण पांडुरंग * २८३, गावडे प्रविण प्रभाकर * ३०२, हळदणकर विश्वनाथ म.-३४०, गडेकर सविता अशोक * ३९२, भोवर अश्विनी चंद्रकांत * ४११, कासले उदय गुरुनाथ * २६४
बहिस्थ - सावंत राजेश मदन, परब विवेकानंद रमाकांत

शिरोडा केंद्र
परब विनायकी नामदेव * ४९३
शाहू श्रुती यशोबंत * ४७५
पाटील भक्ती मधुकर * ४६८
मळगांवकर आकांक्षा दि.-३३२
राणे कोमल दिगंबर -४३३
तारी अमिता एकनाथ-३३४
वालावलकर गौरी गो.- ३६४
सातार्डेकर जगन्नाथ तु.-३४२
वालावलकर जयेश ना.-३१२
कोचरेकर काजल श.-३२१
बागायतकर लिखिता न.-३३८
नाईक वामन मनोहर -३४९
बागायतकर सायली रविद्र-३७७
सातार्डेकर सुखदा आनंद-३३०
गावडे महादेव गुंडू -३१०
पिळवणकर यज्ञेश बाळा-३७४
दाभोलकर अक्षय आनंद-३५१
कांबळी सोनाली चंद्रकांत-३१२
नाईक वृषाली गुरुनाथ-४४७
मोरजकर समीर गोपाळ-२८१
कावळे वामन सावळाराम-३१३
कांबळी मदन सुरेंद्र -४०४
अन्सारी अफसानाखतून-३८७
गावडे ज्ञानेश्वरी विजयानंद-२८३
विर्नोडकर अंकिता आपा-२९०
गोस्वामी भारत भवरपुरी-३२६
आसोलकर प्रसाद अ.-४००
मयेकर प्रथमेश प्रदिप-३५२
आसोलकर प्रथमेश विष्णू-४२८
सावंत गायत्री सुहास-२७२
घोगळे अजय अनंत -३३३
चव्हाण नारायण विठ्ठल-२८९
अणावकर सिद्धेश प्रकाश-४२२
केरकर संदेश सुभाष -४४६
परब चंद्रशेखर स.-४०४
सौदागर तेजस्वी प्रफुल्ल-४५१
केळुसकर हेमांगी रंगनाथ-३६०
रेडकर दिनेश विजय-३०९
जुवलेकर गजानन दिलीप-३३७
तांडेल भगवान गोविद-३७९
डिसोजा दियोग फि.-४३३
आर्य योगेश प्रेमपाल -४०१
रगजी स्नेहल गजानन-३८६
मुळीक प्रशांत सुधाकर-३३६
मुळीक सिद्धेश मनोहर-३६३
रेडकर सचिन हेमंत -३३५
मराठे अभिषेक दत्तगुरु-३१४
परब किर्ती प्रसाद -३१३
मुळीक कृतिका उल्हास-३०८
चव्हाण अंकिता अशोक-३५०
गावडे अंकिता दिनकर-३४२
मयेकर शितल सुरेश-३७६
सावंत पूजा नंदकुमार-३६०
कांबळी प्राजक्ता प्रकाश-३०७
रॉड्रिक्स जेरोसेन फ्रान्सीस-३२३
मेस्त्री मंजीरी राजन -२२६
मुळीक सारिका गुणाजी-३१४
पॉल वेलांकिनी जुवाव-३४३
गिरप समिक्षा रमाकांत-३३८
परब तेजल जयवंत- ३७१
नाईक निखिल नरहरी-४०९
नवार दिपाली अरविद-३३५
टोपले लक्ष्मण गणपत-३४६
चमणकर मिलिद वि.-३६०
टेमकर नमिता सूर्यकांत-३२९
स्नेहा सलिमकुमार रो.-३७४
परब नुतन नारायण -३६०
आडारकर पांडुरंग अशोक-३७६
प्रभू यज्ञेश्वर नरेंद्र -३१७
राऊळ अनंत अशोक -४०१
गवाणकर योगराज स.-३९८
मसुरकर सोनाली शंकर-३२७
कवठणकर पूजा बाबली -३२४
वारखंडकर पूजा प्रल्हाद -३९१
मालवणकर रचिता र.-३८९
पाटलेकर प्रज्ञा प्रकाश -३५०
गवंडे सुरज महेश्वर -३४९
केदार तुकाराम विठ्ठल -४३५
चौगुले प्रशांत बसवंत -३८०
नवार बाळकृष्ण तातो -२२९
सावंत सुप्रिया सुरेश -३०७
रेडकर धर्मानंद गोविद -३८२
चिपकर एकसष्ठी यदुनाथ -३१८
फर्नांडीस शेरेपीन लॉरेन्स-३२७
पाटील योगेश बळवंत -३१५
घाडी गिरीष भिवा -३१३
जोशी आशिष पुरुषोत्तम-३४८
राजाध्यक्ष श्रीकांत रघुनाथ-३११
शिरोडकर सुहीता संजय-३२४
देसाई रोनीत गुरुदास-३८७
नाईक अक्षता गुंडू -३३५
भगत चेतन निळकंठ -३८३
अन्नदाचे तनुजा परशुराम-२८६
बागकर प्रथमेश जगन्नाथ -३९९
पाटील भक्ती मधुकर -४६८
साहू श्रृती यसोबंत -४७५
रेडकर प्रतिक्षा बाळकृष्ण -३३९
डिसोजा मार्टीना सेबेस्तिन -२७३
जाधव राहुल गोविद -३३७
कामत रघुनाथ मारुती -३१९
परब मंजुश्री प्रकाश -३४९
आल्मेडा एरविना इग्गने -३२०
धाकोरकर विनय अर्जुन -३९२
चव्हाण अश्विनी विजय -३५१
परब सोनिया नारायण-३९६
आसोलकर माया रविचंद्र -३३४
परब विनायक नामदेव -४९३
बहिस्थ-गावडे विकास शंकर
कॉमर्स-
१) रगजी स्वप्नील वि.- ४३४
२) राळकर लवू संजय - ४१६
३) धुरी सायली संजय - ४१२
खवणेकर मकरंद रा.-३२५
नाईक मयुरी मिलींद-२७५
भेरे पुजा ज्ञानेश्वर-२७८
नाईक निलिमा गजानन-२५८
मराठे प्रज्ञा रामदास-३३५
रगजी सुरज वासुदेव- २५५
गावडे अंबाजी प्रकाश- ३६०
गावेकर भक्ती अरुण- २२९
राणे पुष्पलता पुरुषोत्तम-३१०
गावडे मनाली विजय- ३०६
केरकर सोनम अनिल- ३२८
धुरी रोशन दत्ताराम- ३१५
पेडणेकर मंजिरी प्रकाश-३२०
धुरी प्रियांका सुधाकर- २८१
विर्नोडकर अंकिता दि.-३२८
कावले जगन्नाथ ज्ञानेश्वर-३९०
देऊलकर प्रार्थना निवृत्ती-३७३
गावडे विकास विश्वनाथ-२९१
मेस्त्री ममता धोंडू- ३४४
धुरी अक्षय सुंदर- ३५२
आरोसकर सायली शरद- ४०८
मातोंडकर गौरी हरिश्चंद्र-२९०
पडवळ स्नेहल सुरेश- २५२
शिवलकर हंसा सद्गुरु- ३८२
कोठावळे हरेश हरिश्चंद्र- ३२१
बागकर अक्षय विठ्ठल- ३९२
गावडे सुशिल सुभाष- २९१
सावंत अर्शिया हेमचंद्र- ३०३
गावडे रेश्मा दत्तात्रय- ३२०
सावंत विश्राम प्रकाश- २९१
गवंडे अश्विनी अजित- ३५६
धुरी राखी गोविद- ३६८
गावडे रसिका बाळकृष्ण- ३२५
राऊळ सुमित सिताराम- २२८
गावडे अंकिता आत्माराम- ३१८
खान मैनाज हैदर- २८३
गाडेकर तेजश्री रामचंद्र- २६१
शेगले अंकिता रामचंद्र- ३४४
नाईक प्राजक्ता प्रमोद- २९५
बागकर अतुल दयानंद- ३८८
परब कमला प्रभाकर- ३३६
वाडकर शलाका कृ.-३४५
नागवेकर लतेश दशरथ- २८७
नाईक पूनम उत्तम-२५२
सांगळे नर्मदा उदय- ३२५
मठकर कुणाल दिलीप- २८३
शेटये प्रणाली गुरुनाथ- ३६४
शेटये पुनम हरिश्चंद्र- २७३
रेडकर धनश्री यशवंत- ३०९
नाईक रधुनाथ भिकाजी- ३३१
आरोलकर सुनिल सु.-३९६
नाईक सृजनिका सुधीर- ४००
परब सुकन्या विजय- ३७७
पांढरे पूजा भिकाजी - ३९२
आजगावकर पूनम अ.-२९६
सावंत भारती कमलाकर-२६७
रगजी गौरी अशोक- ३०९
रेडकर सुप्रिया भास्कर- ३४२
पांढरे मृणाली अनिरुद्ध- ३२९
मयेकर वासंती राजाराम- २९७
मुळीक राकेश विजय- ३७७
गवंडी निशा राधाकृष्ण- ३७२
नाईक मिनाक्षी भालचंद्र- ३२४
चोपडेकर श्रुतिका राजन-३६०
सावळ ममता रघुनाथ- ३५६
परब सुजाता वासुदेव- ३४३
शेटये स्वाती मंगेश- ३२३
कांबळी स्वाती सुधाकर- ३८६
माळकर लवू अनंत- ४१६
शेगडे नवनाथ नामदेव- ३९८
नाईक पल्लवी विकास- ३००
गवंडी रविना रविद्र- ३०८
मंत्री अमेय अशोक- ३२७
राऊळ अजय दाजी- ३३३
बहिस्त
नाईक अलिशा विलास
आटर्स -
१) कुडव विणा विठ्ठल - ४६६
२)काकतकर अश्विनी श- ४६५
३) गांवकर विजया तु. - ४५४
राऊळ सुजित जगन्नाथ - २६७
कोचरेकर नितेश शिवाजी-२२५
आंबवडेकर योगिता सु.-३७७
शेटये दिपा बाबलो - ३५५
शेटये सुरज सूर्यकांत - ३२५
राऊत वैशाली अनंत - ३९०
गोवेकर धनश्री सुनिल - ३८५
कदम कल्याणी आप्पा-२९३
कृष्णाजी अंकिता अनंत-३६९
नाणोसकर सरीता रविद्र-२२४
शेटकर स्वाती मधुकर - ३१६
कुडव पल्लवी प्रकाश - ३२०
करुडेकर दर्शना प्रल्हाद-३४२
रेडकर श्रद्धा देविदास-२५०
शिरसाट सिद्धेश दिलीप - ४३३
म्हाकले सुदेश उत्तम - ३०६
जाधव सुमेध शिवाजी - २६६
आसोलकर सीमा मोहन-३६२
राऊळ देवेंद्र दिलीप - ३३१
मोंतेरो शेरोना मिनीन- २८३
पुलासकर छाया कृष्णा - ३५१
जाधव सचिन बाबुराव - ३६५
रगजी माधुरी बाबुराव - ३८२
धुरत दाजी विष्णू - ३७६
राऊळ श्रीकांत चंद्रकांत - २७४
राऊळ रोहीत भिकाजी - ३३२
केरकर ललीता रमाकांत-३३५
पेडणेकर गितांजली ह.-३००
परब बिदिया पांडुरंग - ३४२
कुडव सुप्रिया शिवराम-३४४
गोसावी संजना रविद्र- ३४६
नाईक प्रतिक्षा प्रभाकर-३२६
मुळीक दिपीक्षा रामचंद्र-४०५
तेली शेफाली बाबुराव - ३०२
करवडे कोमल कृष्णाजी-३६८
तोरसकर पूजा राजाराम-३७२
सातोसकर अपर्णा वसंत- ३५०
खानोलकर प्रिया गुंडू - २७७
मोचेमाडकर रेशा स.-३०३
केसरकर प्रणाती सि.-२७५
ख्वाजा हजरतअली इ.-२५५
बांदेकर प्रथमेश गोविद - २८३
केरकर गौरी वासुदेव - ३४५
मेस्त्री सुप्रिया नारायण - ३२५
फर्नांडीस रोजीता का.-३०६
टांककर सुकृती सुभाष-४२०
कामुलकर इंफ्रान्स मि.-३१८
लोणे संतोषिनी श्रीकृष्ण-३०५
आरोलकर विष्णू दिलीप-४४६
नाईक मधुसुदन बाबाजी-२७७
नाईक संकेत शशिकांत - ४७४
नाईक साईनाथ दिगंबर-२९९
म्हाकले नितीन अरुण - ३११
शेटकर दत्ताराम दि.-३१७
गोवेकर विठ्ठल रमेश - २५८
कांबळी शुभम विठ्ठल - २९०
हत्तारकी सुधीर सुभाष - ३८१
गडेकर तृप्ती अनिल - ३२९
चव्हाण उज्वला प्रकाश - ४३४
बहिस्थ
शेटकर विनय विश्वजीत
नाईक आनंद दिलीप
साळगांवकर प्राची प्रमोद
बागकर विजया उल्हास
कांबळी विष्णू नारायण
एम.सी.व्ही.सी.
१)केरकर पूजा विद्याधर-४४५
२)मेस्त्री माधुरी सुमंत - ४३६
३) गावडे अनिल गायश्री - ४४३
सातार्डेकर अर्जुन सुरेश- ३०४
सातार्डेकर बाबू भानुदास- ३१२
मांजरेकर मंगेश अरुण- ३२६
परब साजे निळू- २८६
साळगावकर सिद्धेश उ.- ३५०
भांडवनकर वैभव वसंत-३४४
माडये पराग शशिकांत- ३६०
पार्सेकर राहुल बाबुराव- ४०५
परब मंगल श्रीकांत- ३८८
मेस्त्री सोनाली अनिल- ३७५
परब लक्ष्मण गणपत- ३२२
धुरी चेतन रविद्र- ४००
सावंत गितांजली शंकर- ४११
धवन सागर विजय- २९१
परब दत्ताराम बापू- ३४६
कांबळी तेजश्री विजय- ३८४
पालयेकर दत्ताराम ज.- ३००
नार्वेकर पुर्णिमा द.- ३९८
तिरोडकर नवनाथ गु.- ३६५
कुडव यशवंत गुणाजी- २९४
गावडे वैभव उदय- ३५३
नाईक प्रमोद श्याम- ३०७
शिरोडकर धनंजड ना.- ३२१
आचरेकर दिनेश दिगंबर- ३६०
गावडे महेश कृष्णा- ३७७
तारी मयुरेश शिवा- ३२२
हरमलकर गौरेश राजेंद्र- ३१६
आडारकर योगेंद्र दि.- ३६६
नाईक मनिषा लक्ष्मण-३७०
आडारकर सहदेव बा.-३४०
तुळसकर भाग्यश्री द.- ४०४
बागकर केशव भिकाजी- २७४
पांढरे मिलिद शशिकांत- ३६०
रेडकर रविना रमेश- ४२८
परब अश्विनी अनंत- ४०७
रेडकर समिर प्रकाश- ३१७
रेडकर गिरीष विलास- ४१५
रेडकर रोहित झिलू- ३३९
गावडे चैताली सुरेश- ३७४
मेस्त्री प्राजक्ता चंद्रकांत-३९०
गावडे राजेश तुकाराम- २८७
कांबळी लाडक्या यशवंत- ४००
धुरी राहुल रमेश- २८४
राणे निखिल सुरेश- ३८२
मणियार रमजान खलिदर-३०५
कुलकर्णी ओंकार चेतन- ३५१
खोत चेतन श्रीकृष्ण- ३२१
घाडी स्वप्नाली सहदेव- ४१२
सावंत शंकर रमाकांत- ३५२
मयेकर संकेत अनंत- ३२५
भोसले मानसिग शिवाजी-३३७
राऊत सुशांती सुनिल- ३४०
द्राक्षी तन्वीर इंम्तियाज- ३३९
नागोळकर सौरभ चं.-३८५
सातोसकर प्रथमेश रविद्र-३१६
मोचेमाडकर अपर्णा गो.-३८२
पंतोजी पराग जयानंद- ३११
कुबल राजाराम नामदेव- ३३९
मयेकर श्रीहरी नामदेव- ३२६
पडते गणेश महाबळेश्वर-३२१
सुतार मुकेश मल्लापा-३१५
गडेकर अक्षय भिकाजी- ३२५
मेस्त्री भास्कर दामोदर-३२३
भुते तेजस्विनी सगुण- ४३१
सुर्याजी लतेश लक्ष्मण- ३१८
केरकर प्रतिक प्रविण- ३१६
आरेकर संतोष अर्जुन- ३०१
गोडकर आदित्य मदन-३२१
कांबळी शुभांगी गंगाराम-४२७
केरकर मुकुंद शंकर- २४२
फर्नांडीस वेलेरिन फ्रा.-३५२
फेंद्रे शिवानंद सखाराम-३८८
आडारकर युवराज विजय-४०७
जोशी भगवान रामा- ४१७


Thursday, 26 May 2011

अंक १९वा, २६ मे २०११

अधोरेखित *
शब्द* जरा जपून!
शब्द हे दुधारी शस्त्र असल्यानं खूप जपून वापरावेत, शब्दांनी होणारी जखम कधी भरुन निघत नाही हे आपण नुसतंच ऐकतो. प्रत्यक्ष आचरणात कधीच आणत नाही. एका थपडेनं माणूस जितका दुखावला जाईल त्याच्या हजारपटींनी दुखावला जातो कटू शब्दांनी.
पती-पत्नीचं नातं सर्वात जवळच. या नात्याच्या आधारावरच घरातली इतर नाती अवलंबून असतात. पण होत काय की हे नातं नको इतकं ‘गृहीत‘ धरलं जातं. भांडणं क्षुल्लक कारणांनी सुरु होतात. ती पटकन मिटूही शकतात. पण तसं होत नाही.
पतीपत्नीचं नातं परस्पर विश्वासाचं असतं. लग्नाआधी वा नंतर या विश्वासापोटीच सगळ्या लहानमोठ्या गोष्टी, कच्चे दुवे एकमेकांजवळ बोलले जातात. एकमेकांची मर्मस्थानं माहीत झाल्यावर त्यांना जपण्याऐवजी संधी मिळताच त्यावर शब्दांचा शस्त्रासारखा वापर करुन घाव घालणं फारच वाईट. पती-पत्नी नात्यामधल्या विश्वासाचाच हा अवमान.
जेव्हा एखादी चूक घडते, आगळीक होते तेव्हा घरातली, जवळच्या नात्यातली माणसं सहजपणे एकमेकांजवळ कबुलीजबाब देऊन आधाराची अपेक्षा करतात. तेच नैसर्गिक असंत. पण मग अशा वेळी मूर्ख, बावळट, बेअक्कल या शब्दांचा वापर झाला तर हाही नात्यामधल्या जवळिकीचा अवमानच.
अगदी सभ्य, सुसंस्कृत घरांमध्येही अनेकदा अशा भावनिक थपडा परस्परांना मारल्या जात असतात. यालाच ‘शाब्दिक हिसाचार‘ म्हणतात. मानसशास्त्रज्ञांच्या मते शाब्दिक हिसाचार, अवमानकारक बोलण्याची सवय अगदी लहान वयापासूनच असू शकते. कारण त्याचा उगम घरातून होतो आणि ही शिकवण आपल्या रोजच्या वागणुकीतून सकाळ-संध्याकाळ देणारे मुलांचे आई-वडीलच असतात. छोटे छोटे वाद, विपर्यास, भांडणामध्ये परस्परांविषयी जी अपमानास्पद भाषा, कधी शिव्या वापरल्या जातात तीच भाषा, वागणूक मुलं आत्मसात करतात. लहान मुलं शाळेत किवा इतरत्र एकमेकांसोबत खेळताना मग सहजपणे तशीच भाषा, वागणूक दाखवतात.
शाळांमध्ये समुपदेशक म्हणून काम करणारा एक समुपदेशक म्हणाला की, काही वेळा अगदी निष्पाप वाटणारी मुलं आपल्या वर्गातल्याच एखाद्या मुलाला वा मुलीला ज्या पद्धतीनं ‘लक्ष्य‘ करुन चिडवाचिडनी करतात, त्यासाठी जो शब्दांचा दुखावणारा वापर करतात, तो पाहिला की थक्क व्हायला होतं. शाळकरी वयात सवंगड्यांकडून मिळालेला असा शब्दांचा मार मुलं मोठेपणीही विसरु शकत नाहीत. शारिरीक व्यंग, स्वच्छतेच्या सवयी, डब्यामधला खाऊ, हुशारी, आईवडील, अगदी कुठल्याही बाबतीत मुलं एकमेकांचा अवमान करु शकतात. जसं ते घरी शिकले असतील अगदी तसंच!
हीच मुलं मोठी होतात. जबाबदार व्यक्ती बनतात. पती-पत्नी, भाऊ-बहीण, आई-वडील, मित्र-मैत्रिणी, प्रियकर-प्रेयसी अशा विविध नात्यांनी परस्परांशी बद्ध होतात. पण त्यांच्या मनामधलं हे इतरांना शब्दांनी दुखावू शकणारं मूल मात्र वाढत नाही. त्याच वयाचं राहतं. शब्दांनी दुखावण्याच्या बाबतीतला शस्त्रांपेक्षा तीव्र ताकदीचा त्याचा अनुभव आणि ती ताकद इतरांवर अजमावून बघण्याचा त्याचा शौक मात्र वाढत गेलेला असतो.
पती-पत्नी नात्यात पत्नी बरेचदा खूप बोलणारी, तक्रारी करणारी, टोमणे मारणारी म्हणून ओळखली जाते. प्रसारमाध्यमातून तशीच प्रतिमाही सतत सामोरी येते. दूरचित्रवाणीवरच्या मालिकांमध्ये तर एकमेकींचा, घरच्या इतरांचा सतत अवमान करणा-या सासवा, सूना, वहिनीसाहेब वगैरे दररोज भेटतच असतात. पण मानसशास्त्रज्ञांच्या मते बोलून अवमान करण्याच्या बाबतीत पुरुष हा बाईला सहजपणे मागे टाकू शकतो. पत्नीच्या हजार शब्दांनीही पतीला फरक पडत नाही. पण पतीचा एखादा शब्द, उद्गार पत्नीला मर्मावर घाव घालणारा वाटू शकतो. नव्हे तो असतोही तसाच. विशेषतः जेव्हा तो पत्नीचे लग्नाआधीचे वा नंतरचे मित्र, माहेरचे लोक, जिवाभावाच्या मैत्रिणी यांना उद्देशून काढलेला असतो. पती हा पत्नीबद्दल शारिरीक-मानसिक अशा दोन्ही पातळ्यांवर मालकी हक्क मनात बाळगून असतो. अशा वेळी मग पत्नी ज्या गोष्टी-व्यक्तींबाबत तिच्या मनात जास्त आपुलकी, जिव्हाळा बाळगते त्यावर शाब्दिक हल्ला पतीकडून चढवला जातो तो मानसिक असुरक्षिततेपोटीच.
बोलणारा प्राणी ही माणसाची व्याख्या असेल तर फटकळपणे बोलणारा प्राणी ही मराठी माणसाची व्याख्या सहज बनू शकते. आम्ही फटकळ, स्पष्टवक्ते असं अभिमानानं (!) म्हणता म्हणता त्याच्या जीभेचं वळण अवमानकारक शब्दांकडे कधी झुकतं कळत नाही. दुकानदाराचं वय न बघता ‘ए, वो दिखाव‘ किवा नोकरांना ‘फुकट पगार द्यायचा का तुला?‘ वगैरे आपण अगदी सहज बोलतोच. परंतु ऑफिसात बॉसही ‘झोपा काढत काम करता का रे?‘ वगैरे बोलतो, तेव्हा ही अशी बोलणी दुस-याचा अवमान करणारी ठरु शकतात हे ध्यानातही येत नाही.
खूपदा असं दिसतं की लोक फणसासारखे किवा नारळासारखे वागतात. वरुन काटेरी, खडबडीत, कठीण परंतु आतून रसाळ, मधुर. अशा व्यक्तींना शब्दांचा गोड वापर जमतच नाही. ‘गोड बोलून मन जिकणं‘ वगैरे वाक्यांवर त्यांचा विश्वासच नसतो. प्रत्यक्ष कृतीद्वारे या व्यक्ती खूप जिव्हाळा, आपुलकी, सेवाभाव, प्रेमळपणा दाखवतात. पण तोंडच्या कडू, तुटक शब्दांनी, अवमानकारक स्वरांनी, वसवस ओरडण्यानं त्यांच्या सहृदय कृत्यांवर पाणी पडतं. या व्यक्ती आयुष्यात नाती जोडू वा टिकवू शकत नाहीत हेच खरं.
अवमानकारक बोलणं मग ते वैयक्तिक पातळीवर असो वा कौटुंबिक, सार्वजनिक असो वा आंतरराष्ट्रीय, कुठल्याही पातळीवर कायमच संबंध सुधारण्या पलीकडं बिघडवण्यास कारणीभूत ठरू शकतं.
दुस-याला नावं ठेवणं, कमी लेखणं किवा अगदी अनुल्लेखानं मारणं हेही एकप्रकारे अवमानकारक बोलणंच असतं.
दोन भिन्न मातांची माणसं एकत्र आली की मतभेद होणं अगदी नैसर्गिकच असतं. निरोगी नात्यामध्ये सर्व वाद, मतभेद, नात्याला कुठलीही हानी न पोचवता मिटतात. समुपदेशक तर म्हणतात की, वादाचा का होईना, पण नात्यात संवाद हवा. तरच ते नातं प्रवाही राहतं. नाहीतर त्याला साचलेपणा येतो. अर्थात यात परस्पर सन्मानाला कधीही ठेच पोचणार नाही, याचप्रकारे संवाद असावेत. तो नीट नसेल तर कटुता मनात साठत जाते आणि मग कधीतरी कोंडलेल्या वाफेसारखी बाहेर पडते. आपलेच कटू शब्द, आपलेच अवमानकारक शब्द आज ना उद्या कधी कधी तर दीर्घ कालावधीनंतरही बूमरँगसारखे आपल्यावरच उलटू शकतात याचं भान ते शब्दांचे बाण आपल्या भात्यातून बाहेर पडण्याआधीच मनाशी बाळगायला हवं.

संपादकीय *
वेळ आहे कुणाला?
सिधुदुर्ग जिल्हा नियोजन विकास मंडळाकडून आपल्या मतदार संघातील विकास कामांकरिता पुरेसा निधी दिला जात नसल्याची तक्रार सावंतवाडी मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर आणि कणकवली मतदार संघाचे भाजपाचे आमदार प्रमोद जठार यांनी केली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्रीपद काँग्रेस पक्षाचे कुडाळ मतदार संघाचे आमदार नारायण राणे यांच्याकडे आहे. ते सध्या राज्याचे उद्योग मंत्रीही आहेत. भाजपचे आमदार प्रमोद जठार हे विरोधी पक्षाचेच असल्याने त्यांच्या मतदार संघात पुरेसा विकास निधी दिला जात नाही, हे पक्षीय राजकारणात एकवेळ समजू शकते. पण आघाडी सरकारमध्ये असलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांनाही अशी तक्रार करावी लागणे हे जिल्हा नियोजन मंडळाला निश्चितच शोभादायक नाही. खरेतर सिधुदुर्गनगरीत मंत्रिमंडळाची बैठक घेऊन कोकणासाठी ५ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर झाल्यानंतर कोकणातील कोणत्याही विधानसभा मतदार संघातून पुरेसा विकास निधी न मिळण्याची तक्रार यावयास नको होती. पण कसे काय? त्या ५ हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा सर्वजण विसरुनच गेले असावेत! तीच गोष्ट जिल्हा नियोजन मंडळाला मिळणा-या विकास निधीची. राज्याच्या अर्थमंत्र्यांनी सर्व जिल्ह्यांच्या नियोजन मंडळाला दिल्या जाणा-या निधीमध्ये दुप्पटीने वाढ केली. त्यानुसार सिधुदुर्ग जिल्ह्यातील वार्षिक विकास कामांसाठी वीस ऐवजी चाळीस कोटी रुपयांचा निधी जाहीर झाला. त्यातही विशेष बाब म्हणून नारायण राणे यांच्या आग्रहाखातर आणखी वाढ करण्यात आल्याचे वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाले.
जिल्हा नियोजन मंडळाला राज्य सरकारकडून मिळणा-या या निधीचे वाटप जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासाठी सरकारी निकषांनुसार जिल्हा नियोजन अधिका-यांनी करावयाचे असते. त्याबाबत जिल्हा नियोजन आणि विकास मंडळाच्या सभेत मंडळाचे शासकीय, अशासकीय सदस्य प्रस्ताव देत असतात. त्यात डावे, उजवे ठरविण्याचे काम अर्थातच सत्ताधारी पक्षाकडे म्हणजेच पालकमंत्र्यांकडे असते. तसे करुनही कोणत्याच मतदार संघाच्या आमदारांकडून तक्रार येऊ नये. एवढा निधी जिल्ह्याला मिळालेला आहे. पण बराचसा निधी खर्च न होता. शासनाकडे परत जातो आहे. याला काय म्हणावे?
जिल्ह्यातील विकास कामे अपुरी असतांना किवा मंजूर कामे सुरुच झाली नसतांना निधी खर्च न होता परत जातो यामध्ये काय गोलमाल आहे. या विषयी याच संपादकीय सदरात पूर्वी आम्ही लिहिलेले आहे. या जिल्ह्यात काम करण्यासाठी नेमलेले पर जिल्ह्यातील सक्षम अधिकारी विकास कामे दप्तर दिरंगाईत रखडत ठेऊन निधी खर्चच करीत नाहीत. तो निधी ‘आपल्या‘ जिल्ह्यातील मंत्री, आमदारांकरवी आपल्या जिल्ह्याकडे वळविण्याचे काम मात्र इमाने - इतबारे करीत असतात. अर्थात याला काही कागदोपत्री पुरावे नसतात. सर्वजण पद्धतशीरपणे जिल्ह्याचा हा निधी वरीष्ठ स्तरावरुन पळवीत असतात हे सर्वांनाच माहिती आहे, मग आमचे लोकप्रतिनिधी किवा जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य काय करीत असतात?
सर्व स्तरांवरचे लोकप्रतिनिधी एकमेकांच्या राजकीय उखाळ्या -पाखाळ्या वृत्तपत्रांतून जाहीरपणे काढण्यात मग्न असतात. सौंदर्यस्पर्धा, नाच गाण्यांचे कार्यक्रम, क्रिकेटच्या गावगन्ना स्पर्धा, स्थानिक पातळीवरच्या चिल्लर कामांची भूमीपूजने असल्या कार्यक्रमांमध्ये मश्गुल असतात. त्यांना आपल्या जिल्ह्यात मिळणारा सरकारी विकास निधी खर्चच होत नाही याचे काहीच वाटत नाही किवा ते माहितीही नसते. अगदीच कोणी जाहीरपणे जाब विचारला तर ते संबंधीत सरकारी अधिका-यांनाच जबाबदार ठरवितात. असा हा सगळा जिल्हा नियोजनाचा घोळ वर्षानुवर्षे सुरुच आहे. म्हणूनच सरकारच्या चांगल्या योजना सर्वसामान्य गरजू लोकांपर्यंत पोचत नाहीत. पाणी टंचाई तीव्र होऊनही विहिरींची दुरुस्ती होत नाही. नळ योजना बंद पडतात. पावसाळा तोंडावर आला तरी जिल्ह्यात पावणे दोनशे साकव नादुरुस्त राहतात. रस्ते, इमारती दुरुस्तीची कामे सुरुच होत नाहीत. ही कामे वेळेवर पूर्ण व्हावीत यासाठीच जनतेने लोकप्रतिनिधी अगदी ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदेपर्यंत निवडून दिलेले आहेत. त्यांनी फक्त आपापल्या गांवातील विकास कामांचा पाठपुरावा केला तरीही बरीच कामे मार्गी लागतील. पण तंटामुक्ती, निर्मलग्राम यासारख्या भंपक दिखावू कार्यक्रमापुढे आणि प्रत्येक गोष्टीत राजकारण करीत बसण्यापलिकडे वेळ आहे कुणाला?

विशेष *
पुरस्कारालाच प्रतिष्ठा देणारे श्री. एकनाथ ठाकूर
सारस्वत बँकेचे अध्यक्ष व सिधुदुर्गाचे सुपुत्र श्री. एकनाथ केशव ठाकूर यांना बँक-विमा-अर्थशास्त्र-सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल मानाचा व प्रतिष्ठेचा वा. ग. चिरमुले पुरस्कार दि.२५ मे रोजी मुंबई येथे समारंभपूर्वक देण्यात आला. श्री.ठाकूर यांच्या सन्मानाप्रित्यर्थ त्यांच्या सुहृदाने लिहिलेला हा लेख *
आजच्या घडीला देशात सर्वात मोठी व अव्वल दर्जाची सहकारी बँक म्हणून सारस्वत बँक ओळखली जाते. ९३ वर्षापूर्वी कोकणातील विशेषतः सिधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांनी स्थापन केलेल्या या बँकेने देशातील १७५० नागरी सहकारी बँकांमध्ये अग्रगण्य स्थान मिळविले हे निश्चितच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद सुद्धा. बँकेच्या सर्वांगिण कार्याची दखल घेऊन रिझर्व्ह बँकेने सारस्वत बँकेला अखिल भारतीय बँकेचा दर्जा दिला त्यामुळे संपूर्ण देशात बँकेचा विस्तार होणार हे निश्चित. अशी ही सारस्वत बँक बलशाली होण्यासाठी बँकेचे अध्यक्ष एकनाथ केशव ठाकूर आणि त्यांचे सहकारी जी अपार मेहनत घेत आहेत ती आदर्शवत अशीच आहे.
श्री.ठाकूर यांनी बँकेच्या अध्यक्षपदाची जेव्हा सूत्रे हाती घेतली तेव्हा ३१ मार्च २०११ पर्यंत रु. २५ हजार कोटींच्या व्यवसायाचे लक्ष निर्धारीत केले होते. परंतू बँकेने ते ऑक्टोबर २०१० मध्येच पूर्ण करुन मार्च २०११ पर्यंत बँकेचा व्यवसाय २७ हजार कोटींच्याही पुढे नेला.
एकनाथ ठाकूर यांचे जीवन चरित्रही प्रेरणादायी आहे. त्यांचा जन्म वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण या गावी झाला. लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपले. घरच्या गरिबीमुळे अनेक नोक-या करुन शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. पुणे विद्यापिठातून उच्च श्रेणीत बी.अे.ची. पदवी मिळविली. इंग्रजी विषयांत विशेष प्राविण्य मिळविले. नंतर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अखिल भारतीय स्तरावरील प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवून १९६६ साली थेट अधिकारी पदावर नियुक्त झाले. ठाकूर हे स्टेट बँक ऑफिसर्स ऑर्गनायझेशनचे पहिले अध्यक्ष होते. तसेच राष्ट्रीयकरणानंतर देशातील सर्व बँक अधिका-यांचा जो महासंघ स्थापन झाला त्याचे ते संस्थापक - उपाध्यक्ष व नंतर अध्यक्ष होते. १९७७ साली युनो अंतर्गत आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने पहिली जागतिक अधिकारी परिषद जिनेव्हा येथे घेतली. त्या परिषदेला भारतातील सुमारे २५ लाख अधिका-यांचा एकमेव प्रतिनिधी म्हणून त्यावेळच्या जनता पक्षाच्या सरकारने ठाकूर यांना पाठविले होते.
आणिबाणीच्या काळांत सर्व स्तरांवर होत असलेल्या अन्यायाने श्री. ठाकूर व्यथित झाले आणि स्टेट बँकेतील अधिकारी पदाचा राजीनामा दिला. परंतू नंतर २५ वर्षांनी त्यांची स्टेट बँकेचे केंद्रीय संचालक म्हणून केंद्र सरकारने निवड केली. ही नियतीचीच इच्छा!
स्टेट बँकेची नोकरी सोडल्यानंतर अनेक सन्मानाच्या नोक-यांच्या आलेल्या संधी नाकारुन त्यांनी आज संपूर्ण देशात विस्तार पावलेली आणि प्रसिद्ध असलेली ‘नॅशनल स्कूल ऑफ बँकींग‘ ही संस्था स्थापन करुन विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांची दारे उघडली व देशातील हजारो तरुण-तरुणींना बँका / विमा कंपन्या / केंद्र व राज्य सरकारी आस्थापना इ. मधून नोक-या मिळाल्या आहेत.
श्री. ठाकूर यांचे इंग्रजी, मराठी भाषेवर जबरदस्त प्रभुत्व आहे. त्यांनी इंग्रजी, मराठी भाषेतील विविध विषयावरील उत्तमोत्तम पुस्तके वाचून काढली आहेत व अजूनही त्यांचे वाचन चालूच असते. जेव्हा ते राज्य सभेत खासदार म्हणून कार्यरत होते तेव्हा त्यांचे कसदार वक्तृत्व ऐकण्यासाठी ज्येष्ठ मंत्री आणि खासदार आवर्जून उपस्थित राहत असत. त्यांच्या वक्तृत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे नेमके शब्द आणि नेमकी वाक्यरचना योजून मौलिक विवेचन करणे, त्यांची स्मरणशक्ती हे त्यांना मिळालेले दैवी वरदानच होय.
श्री. ठाकूर यांचे कोकणच्या मातीशी घट्ट नातं आहे. या मातीचे ऋण फेडण्यासाठी सामाजिक बांधिलकीतून आज कोकणातील आणि महाराष्ट्रातील अनेक नामांकित सामाजिक संस्थांमध्ये ते पदाधिकारी आहेत. सिधुदुर्गातील अनेक शैक्षणिक आणि वैद्यकीय संस्थांमध्ये त्यांचा सहभाग आहे. ग्लोबल कोकण महोत्सवाचे आयोजन करण्यात त्यांचे भरीव योगदान होते. आज श्री. एकनाथ केशव ठाकूर हे नांव केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशातही सर्वदूर पसरले आहे. ते सारस्वत बँकेच्या माध्यमातून. बँकेने व्यवसायात जी गरुड भरारी घेतली आहे त्याचे सर्व श्रेय मात्र श्री. ठाकूर, बँकेचे संचालक मंडळ, कर्मचारी आणि ग्राहक यांना देतात आणि त्यामुळेच नकळत स्नेहबंध निर्माण करतात व ते जपण्याचा सदैच प्रयत्न करतात. सारस्वत बँकेचा विस्तार महाराष्ट्राव्यतिरिक्त कर्नाटक, दिल्ली, गुजरात, मध्यप्रदेश आदी राज्यात करुन हा अश्वमेध असाच चालू रहावा यासाठी सर्व थरांतून सदिच्छा आणि सद्भावना श्री. ठाकूर व त्यांच्या सहका-यांबरोबर निश्चितच आहेत.
श्री. ठाकूर यांनी केवळ बँकेची आर्थिक बाजूच पाहिली नाही तर सामाजिक जबाबदारीचे एक नवं भान दिलं आहे. कै. बाबा आमटे यांच्या आनंदवन प्रकल्पाला केलेली मदत, ‘ताज‘वर झालेल्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना दिलेला मदतीचा हात, ग्रंथालयाच्या वाचन चळवळीला केलेले सहाय्य, आर्थिक दुर्बल घटकांना धंद्यासाठी केलेले कमी व्याजदराने केलेले अर्थसहाय्य, कै.अण्णाभाऊ साठे यांच्या कुटुंबियांना दिलेला आधार इ. अनेक बाबींमधून बँकेची सामाजिक बांधिलकी अधोरेखीत करता येईल.
श्री. ठाकूर ज्या ज्या क्षेत्रात गेले त्या त्या क्षेत्रांत ते यशस्वी झाले. कारण जे काही करायचे ते सर्वस्व झोकून, पूर्ण निष्ठेने व श्रद्धेने हे त्यांचे जीवन सूत्र असावे. म्हणूनच एक कुशल प्रशासक व अधिकारी, उत्तम वक्ता, यशस्वी संस्था चालक, उत्कृष्ट सामाजिक व राजकीय भान असलेला संघटक, दातृत्व जपणारा दाता, अर्थशास्त्र आणि बँकिग क्षेत्रातील मुरब्बी व्यक्तिमत्व आहे. असे हे बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेल्या श्री. ठाकूर यांना बँक - विमा - अर्थशास्त्र - उद्योग तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्यामुळे अत्यंत मानाचा आणि प्रतिष्ठेचा सन २०१० सालचा वा.ग.चिरमुले पुरस्कार देऊन २५ मे २०११ रोजी मुंबई येथे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गौरविले जाणार आहे. यापूर्वी हा मानाचा पुरस्कार पंतप्रधान मनमोहन सिग, न्या. वाय. व्ही. चंद्रचुड, दत्तोपंत ठेंगडी, विजय भटकर, रघुनाथ माशेलकर, पी. डब्ल्यू. रेगे आदी दिग्गजांना प्रदान करण्यात आला आहे. त्यामध्ये आता एकनाथ ठाकूर यांचा समावेश होणे ही आम्हा कोकणवासीयांसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. समस्त कोकणवासीयांच्या श्री. ठाकूर यांना हार्दिक शुभेच्छा. त्यांना पुढील काळात मानाचे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त होवोत ही प्रार्थना.
- बाळ खानोलकर
निवृत्त स्टेट बँक अधिकारी, गोरेगांव (मुंबई)

मध्वानुभव *
आज ‘मध्वानुभव‘ लिहिण्यापूर्वी वाचनात आलेली एक गोष्ट प्रथम लिहिली पाहिजे. गोष्ट अशी - एक शेतकरी आपल्या मुलाला ‘शेती कॉलेजमध्ये‘ (पदवीसाठी) पाठवतो. शेतीमधील अद्ययावत ज्ञान त्याने मिळवावे. मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग घरच्या शेतीसाठी करावा असा हेतू असतो. चिरंजीव कॉलेजमध्ये जातात. कॉलेजकुमार म्हणून मजा करीत थोडाफार अभ्यास करीत तिस-या वर्षापर्यंत मजल मारतात. एकदा हे चिरंजीव सुटीमध्ये घराकडे येतात. बापाला खूप आनंद होतो. एके सायंकाळी बाप-लेक शेताच्या बांधावर उभे असतात. समोरच असलेल्या हिरव्यागार शेताकडे बघत ‘शेती शिक्षण‘ घेतलेला लेक बापाला म्हणतो, ‘अण्णा, तुम्ही आता जुन्या पद्धतीने शेती करायच सोडून द्या. नवीन बियाणे, भरपूर खतं, किटकनाशक वापरुन सध्यापेक्षा दुप्पटीन उत्पन्न काढू शकाल. आता हेच पहा ना समोर असलेल्या भूईमूगाच्या शेतीसाठी तुम्ही नवीन जातीचे संकरीत वाण वापरुन एन. पी. के. चा पुरेसा डोस दिला असता तर पिक तिपटीनं आलं असतं. तुम्ही किटकनाशकाचाही वापर केलेला दिसत नाही. मी भविष्यात जर शेतीसाठी गावाकडे आलोच तर ह्या ओल्ड सिस्टीमने शेती करणं मला नाही जमणार.‘
पोरगं शेताच्या बांधावर उभ्या असलेल्या, मुंडासं घातलेल्या आपल्या बापाला ‘शेती शास्त्रातील क्रांतीकारी बदल‘ ऐकवत असतं. खेडूत बाप ‘मुकाटपणे‘ सर्व ऐकून घेतो आणि शेवटी म्हणतो, ‘पोरा, तू म्हणतोस ते सर्व खरं असेल, पण तुला एक सांगू का, तू मगापासून ज्याला भूईमुगाचं शेत म्हणतो आहेस, तो भूईमूग नसून वाटाणा आहे!!‘
सारांश, पुस्तकी शिक्षण हे जगाच्या बाजारात जगायला उपयोगी पडत नाही. जगाच्या बाजारात अनुभव खूप काही शिकवतो व हाच ‘महागुरु‘ जीवनाला ‘अर्थ‘ देतो. ही गोष्ट आज आठवण्याचं कारण म्हणजे, गेल्यावर्षी आमच्या एका स्नेह्याने शोभेचे वेल दिले. पोपटी रंगाची पाने, निळसर फुले असलेले हे वेल अंगणभर छान विस्तारले होते. एकदा एक-दोन ठिकाणचे वेल किचित सुकलेले दिसले. कुतूहुल म्हणून जवळ जाऊन पाहिले तर त्या वेलांच्या मुळ्यापासची जमीन किचित भेगाळली होती. रताळ्यासारखा दिसणारा कंद दिसला. उत्साहाने हे कंद बाहेर काढले. एकदम रताळ्यासारखेच दिसणारे हे कंद होते. पण आम्ही तर ‘शोभेचे वेल‘ लावले होते. मग त्याला रताळी कशी येतील? हा (पुस्तकी) प्रश्न सतावू लागला. बाजारात रताळी पाहिली होती, पण भूईतून नुकतीच आलेली रताळी आयुष्यात प्रथम पाहत होतो. रताळी घरात घेऊन आलो. कसले विषारी कंद असले तर काय घ्या? या विचाराने जाणकाराकडे चौकशी केली. त्यांनीही ‘रताळ्या‘बाबत अधिकृत मत प्रदर्शन केले नाही. शेवटी ४/८ दिवसांनी दारावर भाजी घेऊन येणा-या धनगरणीला समस्या सांगितली. तिने ही रताळीच असल्याचे ठामपणे सांगितले. (तिच्या डोळ्यात एवढे शिकलेले - डॉक्टर वगैरे-असून साधी रताळी ओळखता येत नाहीत हा भाव होता!) धनगरणीने ग्वाही दिल्यावर या रताळ्याचा ‘किस‘ करुन खाल्ला हे सांगणे नलगे!

हेडलीचा ‘हेडेक‘ रेगेंना!
शिकागो येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात २६/११ च्या मुंबईवरील हल्ल्यातील सूत्रधार डेव्हीड हेडलीच्या कबुली जबाबामध्ये आपण मुंबई येथील राजाराम गोविद रेगे यांना भेटलो असल्याचे त्याने सांगितल्यामुळे सा-या मिडीयाच्या नजरा राजाराम रेगे यांचा शोध घेऊ लागल्या. सध्या राजाराम रेगे आपल्या कुटुंबियांसमवेत सुट्टीसाठी वेंगुर्ले इथल्या मूळ घरी आले असल्यामुळे चॅनलवाल्यांना त्यांना शोधायला आणि त्यांचा बाईट घ्यायला वेंगुर्ल्यात याव लागलं.
शांतादुर्गा कन्स्ट्रक्शन या नावाने माहिम मुंबई येथे लॅन्ड डेव्हलपमेंट आणि कन्सल्टन्सीचा व्यवसाय करणा-या राजाराम रेगेंनी आंतरराष्ट्रीय दहशतवादी डेव्हीड हेडली आणि त्याचा जीम इन्स्ट्रक्टर विलास वरक याच्या सोबत शिवसेना भवनच्या बाहेर आपली भेट झाल्याचे मान्य केले. दोन वर्षापूर्वी हेडली आणि विलास वरक यांनी रेगेंना आपल्याला शिवसेना भवन आतून पहायचे आहे आणि बाळासाहेब ठाकरेंची भेट घ्यायची आहे असे सांगितले. तेव्हा सेना भवन हे पर्यटन स्थळ नाही, त्यामुळे आतून बघता येणार नाही आणि सेनाप्रमुखांची भेट मिळणे मुश्कील असल्याचे रेगेंनी त्यांना सांगितले. त्यानंतर फोनवरुनही त्याचा संफ झाला. जवळीक वाढविण्यासाठी हेडलीने आपल्याला मुंबईत पायाभूत प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करायची आहे त्यासाठी रेगेंची मदत मागितली. रेगेंनी त्याला त्याच्या कंपनीची प्रोफाईल, त्याने अगोदर केलेले प्रोजेक्ट यांची माहिती कळवायला सांगितली. पण तसे प्रोजेक्टच हेडलीजवळ नसल्याने पुन्हा संफ झाला नाही. जेव्हा अमेरिकन पोलीसांनी हेडली या आंतरराष्ट्रीय दहशतवाद्याला अटक केली तेव्हा आपल्याला भेटलेला माणूस हाच आहे हे कळल्यावर आपल्याला धक्काच बसल्याचे रेगेंनी सांगितले. दुस-याच दिवशी एन.आय.ए (नॅशनल इनव्हेस्टीगेशन एजन्सी, नवी दिल्ली) या सर्वोच्च संस्थेने त्यांची चौकशी केली. त्यास रेगेंनी संपूर्ण सहकार्य केले होते.
सेनाभवनाच्या बाहेर हेडलीची भेट झाल्याचे रेगेंनी कबुल केले असले तरी आपण शिवसेनेचा कार्यकर्ता नाही, आपल्याकडे कोणतेही पद नाही. आपण फक्त समाजसेवेसाठी शिवसेनाभवनमध्ये जात होतो असे सांगितले. या हेडलीच्या कबुली जबाबामुळे राजाराम रेगे एका दिवसात ‘मिडिया स्टार‘ झाले तरी त्यांची सुट्टी खराब झाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले आहे.

बातम्या *
एस. टी. ६३ वर्षांची झाली!
महाराष्ट्राची एस.टी. ३१ मे रोजी ६३ वर्षे पूर्ण करीत आहे. देशातील सार्वजनिक परिवहन क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर असलेले एस.टी.महामंडळ खासगी वाहतूकदारांच्या स्पर्धेमुळे आज चौथ्या क्रमांकावर गेले आहे. (कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि गुजरात पहिल्या क्रमांकावर आहेत.) १ जून १९४८ रोजी निरनिराळ्या १५० मार्गावर एसटीची वाहतूक सुरु झाली आणि हळूहळू विस्तार होऊन १९७४-७५मध्ये राज्यात प्रवासी वाहतुकीचे संपूर्णपणे राष्ट्रीयीकरण झाले. प्रवासी सेवेची गुणवत्ता, रस्ता तेथे एसटी या उद्दिष्टपूर्तीसाठी सेवेचा विस्तार महामंडळाने केला.
१९८८च्या सुधारित मोटार वाहन अधिनियमानुसार पर्यटन बस परवाने मुक्तपणे देण्यात येऊ लागल्याने खासजी बसच्या संख्येत वाढ होत गेली. तसेच जीप, मॅटाडोर, सुमो, टेम्पो, ट्रॅक्स आणि मॅक्सीकॅब, तीन आसनी, सहा आसनी रिक्षा ही वाहतुकीची साधने छोट्या अंतरासाठी वापरली जातात. शिवाय स्वतःची दुचाकी वाहने असणा-यांची संख्याही प्रचंड वाढली. त्याचा परिणाम एसटीच्या उत्पन्नावर झाला. महामंडळ दररोज एक कोटी प्रवाशांची वाहतूक करु शकते. मात्र आज ५८ लाख प्रवासीच रोज एसटीचा लाभ घेत आहेत.
अवैध प्रवासी वाहतुकीमुळे बुडणारे उत्पन्न, डिझेल आणि अन्य सामानाच्या खरेदीमूल्यात होणारी वाढ, सामाजिक बांधिलकी -मुळे दुर्गम तसेच किफायतशीर नसलेल्या मार्गावर चालवाव्या लागणा-या बंधनकारक वाहतुकीमुळे होणारा तोटा, शहरी वाहतुकी -मुळे होणारा तोटा, अन्य राज्यांच्या तुलनेत प्रवासी कराचा अधिक दर या प्रमुख कारणांमुळे एसटीच्या तोट्यात वाढ होत गेली.
एस.टी. वार्षिक ६० कोटी रुपये टोल भरते. त्याचप्रमाणे शासनही एसटीच्या तिकिटातून प्रवाशांकडून १७.५० टक्के कर वसूल करते. विविध सवलतींचे १ हजार कोटी रुपये शासन एसटीला देणे आहे. ती मिळाल्यास एसटीची आर्थिक स्थिती सुधारेल,असे कामगार संघटनेचे मत आहे. सध्या कर्मचा-यांची सहनशीलता आणि प्रवाशांचे सौजन्य या भांडवलावरच एसटीचा कारभार सुरु आहे. राज्यात खासगी वाहतूकदारांकडे ९९ हजार बसेस आहेत. ४५ हजार जीप, ट्रॅक्सी दररोज प्रवाशांची वाहतूक करतात. याउलट एसटी महामंडळाकडे १६ हजार बसगाड्या वापरात आहेत.
एसटी महामंडळ १९८८ पर्यंत देशात आघाडीवर होते. राज्यांतर्गत एसटीने प्रवासाचे प्रमाण ८५ टक्के होते. तिकिट व्यवस्थेचे संगणकीकरण, नवीन आरामदायी गाड्यांचा वापर इत्यादी सुधारणा केल्या आहेत. पण खाजगी करणा-या वाटेने चाललेल्या एसटीला हे उपाय तारतील काय?

नगरपरिषद निवडणूक डिसेंबरमध्ये
नगरपरिषदांच्या पंचवार्षिक निवडणुका डिसेंबर २०११मध्ये होणार असून त्याच्या पूर्वतयारीला सुरुवात झाली आहे. या निवडणुकांबरोबरच एप्रिल २०१२ पर्यंत मुदत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्याही निवडणुका होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत ५० टक्के जागा महिलांसाठी आरक्षित असल्याने बहुसंख्य पुरुष उमेदवारांचे निवडणुकीत उतरण्याचे मनसुबे धुळीस मिळणार आहेत.
आरक्षणाचाी सोडत येत्या जूनमध्ये काढण्यात येणार असून त्यानंतरच उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी सुरु होईल. सभागृहात लोकप्रतिनिधींच्या निम्मे संख्या महिलांची राहणार असल्याने सध्या महिला उमेदवारांचा शोध सुरु झाला आहे. बहुसंख्य राजकारणी आपली, पत्नी, भावजय, बहीण, मुलगी यांपैकी कोणाला तरी उमेदवारी मिळावी यासाठी व्युहरचना करु लागले आहेत.

निधन वृत्त *
डॉ.शामसुंदर परुळेकर
कुडाळ-उद्यमनगर येथील रहिवासी जुनेजाणते डॉ. शामसुंदर कृष्णाजी परुळेकर (७२) यांचे १८ मे रोजी अल्प आजाराने त्यांच्या निवासस्थानी निधन झाले.
मूळ वेंगुर्ले तालुक्यातील परुळे येथील रहिवासी असलेले डॉ. परुळेकर यांनी १९६५ मध्ये कुडाळ शहरात जुन्या बसस्थानकानजिक आपल्या वैद्यकीय सेवेला प्रारंभ केला. गेली ४५ वर्षे त्यांनी रुग्णांची सेवा केली. ग्रामीण भागात रुग्णांच्या घरी जाऊनही ते सेवा द्यायचे. विविध सामाजिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. सांस्कृतिक व सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असे. आयुर्वेदिक अभ्यासक्रमा -नंतरच्या पदवीमध्ये त्यांना अॅवॉर्ड मिळाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे आर्किटेक्ट मंदार परुळेकर व अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. मकरंद परुळेकर, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

सुधा कुर्ले

वेंगुर्ले-माणिक चौक येथील सौ.सुधा वासुदेव कुर्ले (७१) यांचे १७ मे रोजी मुंबई येथे ह्रदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुलगे, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सेवानिवृत्त शिक्षक वासुदेव कुर्ले यांच्या त्या पत्नी होत.

Saturday, 21 May 2011

१ मे २०११, उद्योग विशेष- भाग ३

दाभोळकर एटरप्रायझेस

सौ. अस्मिता विश्वजीत दाभोळकर यांनी जे. जे. स्कूल ऑफ अल्पाईड आर्टमधून बी. एफ. ए. ची पदवी घेल्यानंतर काही काळ नोकरी केली. स्वतंत्र व्यवसाय करायच्या निर्णयाला घरातून प्रोत्साहन मिळालं आणि दृष्टी इझायनर्सचा जन्म झाला. काळा घोडा फेस्टीव्हल, वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये प्रदर्शन भरवून या व्यवसायाची सुरुवात झाली. फायबर, सिपोरेक्स, लाकूड ह्या माध्यमातून ग्राहकांच्या मागणीप्रमाणे ह्या पद्धतीत म्यूरलकरुन व्यवसायाच्या माध्यमातून अस्मिता आपला छंद जोपासत होत्या.

परंतु त्यापलीकडे लघुउद्योगाविषयी मनात कुतूहल असल्याने कॅनरा बँकेने आयोजित केलेल्या खास महिला उद्योजकांच्या कार्यशाळेत सहभाग घेतला. डिहायड्रेशन तंत्रज्ञानाचा वापर करुन आंत्रप्रिनरशीप कोर्समध्ये केसरी मिल्क मसाला सादर केला आणि त्याला बेस्ट डेब्युटन्ट आंत्रप्रिनरचा पुरस्कारही पहिल्या पदार्पणात मिळाला यामुळे स्वतःचा या क्षेत्रात काही वेगळ करण्याचा उत्साह निर्माण झाला.

एखादा उद्योग सुरु करण्याचा संकल्प करण आणि प्रत्यक्ष कार्यान्वीत होणं ह्यात बरच अंतर आहे. मधुमिताच्र्ग् या नावाने आपलं प्रॉडक्ट बाजारात आणायचं असं ठरवून मे २००९ ला मधुमिताहा ट्रेडमार्क रजिस्टर केला. दाभोळकर एंटरप्राइझेस ही कंपनी स्थापन केली.

सुमारे २ लाख रुपयांची गुंतवणूक करुन डिहायड्रेटर, आटा चक्की, सिलिग मशिन, फूड प्रोसेसर, इलेक्ट्रीकल वजन काटा, इलेक्ट्रीकल गॅस शेगडी या नव्या व्यवसायासाठी लागणा-या आवश्यक वस्तूंची खरेदी केली.

एवढी गुंतवणूक करुन प्रॉडक्ट बाजारात आणायचे तर हमखास बाजारपेठ हवीच म्हणून मराठी व्यापारी मित्रमंडळाची सभासद होऊन महाराष्ट्र व्यापारी पेठेच्या डिसिल्व्हा पटांगण, दादर येथे ६५ दिवस चालणा-या प्रदर्शनात सहभाग घेतला. यामध्ये केसरी मिल्क मसाला, वेलची पावडर, रेडी टू कूक - पराठा पीठ, मेथी, पालक, टॉमेटो, भजी पीठ, पालक मेथी, इन्सटन्ट चटण्यांमध्ये, कैरी, आवळा, पुदिना अशी व्हरायटी दिली. इन्सटन्ट टोमॅटो सूप, इन्सटन्ट शेवई खीर अशी गृहिणींचा स्वयंपाकघरातील वेळ वाचवणारी उत्पादने असल्याने गृहिणींच्या ह्या उत्पादनांवर अक्षरशः उड्या पडल्या. ६५ दिवसात एक लाख अठ्ठेचाळीस हजारांची उलाढाल झाली. नवकाळ, ई टी. व्ही. अशा प्रसार माध्यमांनी या वेगळ्या उत्पादनांची दखल घेतल्याने ग्राहक व कंपनी यांच्यात विश्वास निर्माण व्हायला मदत झाली.

त्यानंतर ठाणे, विलेपार्ले येथे होणा-या ग्राहक पेठामध्ये सहभाग घेतला. डिहायड्रेशन पद्धतीने होणारी पदार्थ निर्मिती, पदार्थ चांगले ८ ते १० महिने टिकतात, कोणत्याही प्रकारची रासायनिक द्रव्ये आणि रंगविरहीतता, पौष्टीक आणि प्रथिनयुक्त पदार्थ असल्यामुळे सर्व प्रदर्शनांतून आमची प्रॉडक्टस् झटपट संपत असत.

सुरुवातीला घरामधून सुरु झालेला व्यवसाय आता समतानगर, कांदिवली (पू.) इथल्या गाळ्यामध्ये स्थिरावलाय. सध्या आमच्याकडे २ महिला कामगार, १ डिलिव्हरी बॉय, प्रदर्शन, शॉपिग डिस्प्ले प्रमोशनसाठी १ मुलगी असा ४ जणांचा स्टाफ कार्यरत आहे.

व्यवसायात पदार्पण करतांना काही हटके आणि नाविन्यपूर्ण करायचं असं ठरवलं असल्यामुळे अल्पावधीतच ग्राहकांचा विश्वास आणि पाठिब्यामुळे एवढा विस्तार शक्य झाल्याचं त्या सांगतात.

खास मधुमेहींसाठी नऊ धान्य वापरुन तयार केलेले नवरत्न पीठ, शतावरी युक्त नाचणी सत्व, ब्राह्मीयुक्त नाचणी सत्व, शक्तीवर्धक सत्तू पीठ, धान्य व कडधान्य यांना मोड आणून त्यांचे निर्जलीकरण करुन त्यांच्या मिश्रणातून बनविलेले प्रथिनयुक्त पीठ, सोयाबीन, नाचणी लाडू, मेथीयुक्त लाडू अशा आरोग्यवर्धक उत्पादनांची रेंज ही दाभोळकर एंटरप्रायझेसकडे उपलब्ध आहे.

दाभोळकर एंटरप्रायझेसचे सर्व खाद्यपदार्थ दादर-छेडा, न्यू बेबी मार्ट, बेडेकर, पार्ल्यामध्ये विजय स्टोअर्स चॅम्पियन, ठाण्यामध्ये वैशाली गृहउद्योग, बोरिवली, गोरेगांव कट्टा इ. ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यांच्या काहीशा हटके उपक्रमांना शुभेच्छा!

उत्कृष्ट चविची ८५ वर्षे - के. टी. कुबल आणि कंपनी

महाराष्ट्रात अनेक धाडसी मराठी उद्योजकांनी उद्योग-व्यापार क्षेत्रात पाऊल टाकले आहे. अनेक महाराष्ट्रीयन कंपन्या चांगल्या नावारुपाला आल्या आहेत. अशाच एका कंपनीने स्वातंत्र्यपूर्व काळात महाराष्ट्रात उद्योगक्षेत्रात धाडसी पाऊल टाकले. ती कंपनी म्हणजे मसाला, लोणची, पापड उद्योगात आता नावारुपाल आलेली ७५ वर्षांपेक्षा जास्त यशस्वी परंपरा असलेली सिधुदुर्ग जिल्ह्याचे सुपूत्र कृष्णाजी तुकाराम कुबल यांची के.टी. कुबल आणि कंपनी.

सिधुदुर्गाने देशाला प्रत्येक क्षेत्रात नावारुपाला आलेली अनेक नररत्ने दिली. मग ते क्षेत्र राजकीय असो, सांस्कृतिक, सामाजिक, कला-क्रीडा असो नाही तर औद्योगिक असो. या जिल्ह्याची अनेक अष्टपैलू व्यक्तिमत्वे सर्वच क्षेत्रात नावारुपाला आलेली आहेत. उद्योग क्षेत्रातील के.टी. कुबल हे त्यापैकी एक नाव. मूळ वेंगुर्ल्याचे असलेले के.टी. कुबल यांची के. टी. कुबल कंपनी म्हणजे लोणची मसाल्याच्या दुनियेतील विश्वसनीय नाव.

आजच्या धावपळीच्या जीवनात झणझणीत, चटकदार मसाले, लोणची, पापड तयार करणे गृहिणींना शक्य होत नाही. तेव्हा त्यांना दर्जेदार, झणझणीत, चटकदार अगदी घरगुती पद्धतीचे मसाले, लोणची, पापड पुरविणार्‍या एखाद्या कंपनीचा आधार घ्यावा लागतो आणि मग पहिला नंबर गृहिणीचा, दुसरा आमचा! असे ब्रीदवाक्य असलेली मसाले, लोणच्याच्या दुनियेतली विश्वसनीय के. टी. कुबल कंपनी चोखंदळ गृहिणींच्या सहजच डोळ्यासमोर येते.

सध्या ही कंपनी विजयराव कुबल म्हणजे कंपनीचे संस्थापक के. टी. कुबलांचे सुपूत्र चालवतात. के. टी. कुबल आणि कं. प्रा. लि. मसाल्याबरोबर लोणची, पापडही तयार करतात. ७९ वर्षे यशस्वी वाटचाल पूर्ण करणारा हा उद्योग आता लोणच्याप्रमाणे चांगलाच मुरलाय.

विजयराव कुबल यांच्या मुंबई सेंट्रल येथे असलेल्या मध्यवर्ती कार्यालयात गेल्यावर कार्यालयाला लागूनच मागच्या बाजूचा पत्र्याचे ड्रम तयार करण्याचा कारखाना पाहून कोणीही आश्चर्यचकीत होईल. खाद्यपदार्थ बनविणार्‍-या कंपनीच्या कार्यालयात हार्डवेअरचा कारखाना ?

परंतु इथूनच खरी के.टी.कुबल घराण्याची खरी कहाणी सुरु होते. विजयराव कुबल सांगतात, हा कारखाना म्हणजे माझ्या वडिलांची के.टीं.ची आठवण आहे. त्यांनी मसाले-लोणच्याच्या व्यवसायाला सुरुवात केली. वडिलांची आठवण म्हणून आम्ही हा ड्रमचा व्यवसाय अजूनही चालू ठेवलाय, कारण तेच आमच्या सर्व धंद्याचे बीज आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे शेती व्यवसाय करीत असतानाच स्वतंत्र उद्योग-व्यवसाय करण्याची फार इच्छा होती. त्यांनी मुंबईला जाऊन सुरुवातीला एका गॅलव्हनायिज्ड बादली तयार करण्याच्या कारखान्यात नोकरी पत्करली. काही वर्षांनी थोडासा अनुभव गाठीला बांधून, स्वतःचा स्वतंत्र पत्र्याच्या बादल्या तयार करण्याचा कारखाना सुरु केला. त्यांना धंद्याचे उत्कृष्ट ज्ञान होते. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे त्यावेळी (१९२६ साली) हिदुस्थानात घोडा छाप बादल्या फार प्रसिद्ध होत्या. त्याला कॉम्पिटीशन म्हणून के.टी. कुबलांनी आपल्या गाय छाप ब्रँडच्या बादल्या बाजारात आणल्या आणि त्या अतिशय प्रसिद्ध झाल्या. त्यांना कन्याकुमारीपासून लाहोरपर्यंत प्रचंड मागणी होती. दुसर्‍-या महायुद्धाच्या काळात त्यांनी पत्र्याचे ड्रम बनवायला सुरुवात केली. त्यातून त्यांना मोठा नफा झाला आणि १९३५ साली त्यांनी मसाल्याचा व्यवसाय सुरु केला.

पूर्वी लोक मसाला, लोणची घरीच तयार करीत असत. म्हणावी तशी त्याला बाजारपेठही नव्हती. त्यावेळी के. टी. कुबल यांनी आपल्या मसाल्याची आणि लोणच्याची चव गृहिणींपर्यंत पोहोचविण्यासाठी मुंबईत स्वतःची दहा विक्री केंद्रे (दुकाने) सुरु केली आणि घराघरात के.टी. कुबल कंपनीची चव पोहोचवली. अथक परिश्रम, चिकाटी, तसेच धंद्याचे उत्कृष्ट ज्ञान असलेले के.टी. कुबल या धंद्यातही यशस्वी झाले. त्यानंतर त्यांची यशस्वी कारकीर्द त्यांचे सुपूत्र विजयराव कुबल सांभाळीत आहेत. १९६० साली पोतदार कॉलेजमध्ये बी.कॉम झाल्यानंतर विजयरावांनी व्यवसायात लक्ष घातले.

विजयरावांनी अथक परिश्रम आणि उत्कृष्ट व्यवस्थापनातून के.टी. कुबल कंपनीच्या यशात भर टाकली आहे. त्यांनाही अनेक चढउतारांशी सामना करावा लागला. १९८० मध्ये झालेल्या कामगारांच्या संपामध्ये त्यांना बराच त्रास झाला. कंपनी बंद करायची वेळ आली पण त्यांनी १०-१५ माणसं हाताशी ठेवून काम सुरु ठेवलं. वर्षभरानंतर गाडं परत रुळावर आलं. आपल्या वडिलांच्यानंतर या व्यवसायात टिकून राहण्यासाठी आणि तो वाढविण्यासाठी उच्च प्रतीचा माल देणे या पूर्वीपासूनच्या ध्येयाबरोबरच अत्याधुनिक उपकरणे,यंत्रणा, सुसज्ज प्रयोगशाळा, नवीन बाजारपेठ यावर त्यांनी आपले लक्ष केंद्रित केले .

विजयराव कुबलांना हा व्यवसाय अजून फार वाढवायचाय, त्यासाठी अजून त्यांनी देशातील स्थानिक बाजारपेठेबरोबरच मसाले, लोणची यांची युरोप, ऑस्ट्रेलिया, दुबई, मस्कत इत्यादी देशातून निर्यात सुरु केलेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत के. टी. कुबल कंपनी चांगलीच नावारुपाला आली आहे. देशांतर्गंतही त्यांना मार्केटिगचे जाळे पसरवायचे आहे. के.टी. कुबल कंपनीचा अत्याधुनिक मशिनरी व उपकरणांनी तसेच अनुभवी कर्मचार्‍-यांनी सज्ज असलेला कारखाना नव्या मुंबईतल्या सरकारच्या 'मॅफ्कोड यार्ड' मध्ये मसाले, लोणची यांची आधुनिक तंत्रज्ञानाने निर्मिती करीत आहे. लालबाग येथील कारखान्यातही मसाले, पापड यांची जोरदार निर्मिती सुरु असते.

मसाला, लोणची, पापड हे अन्नपदार्थ झणझणीत, चटकदार असले तरीही ते नाजूक खाद्यपदार्थ आहेत. ते तयार करताना तितकीच काळजी घ्यावी लागते. उत्पादनांच्या निर्मितीवर विजयराव स्वतः जातीने लक्ष ठेवतात. क्वालिटी राखणार्‍-या कुबल कंपनीच्या उत्पादनांची दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. हल्ली स्त्रियांना वाटणे, कुटणे कठीण होऊ लागले आहे. तयार मसाल्यांना वाढती मागणी हे आजचं चित्र आहे. के.टी. कुबल कंपनीने १९३५ साली जरी मसाले बनवायला सुरुवात के ली असली तरी ख्र्‍ा-या अर्थाने १९५० सालापासून खप वाढला व अद्याप वाढतच आहे. यातच कंपनीचे यश लक्षात येते.

वैशिष्टपूर्ण मालवणी चवीची छाप असलेली के.टी. कुबल कंपनी मिरची पूड, हळद पूड, धणे पूड, जिरा पूड, काळी मिरी पूड इत्यादी मसाल्यांबरोबरच संडे मसाला, मिक्स मसाला, मटण-चिकन मसाला बिर्याणी, पाणीपुरी, पावभाजी, चना, चहा इत्यादी अनेक इस्टंट मसालेही बनवते. सारस्वत, सी.के.पी. दैवज्ञ या ज्ञातींना लागणा-या मसाल्याबरोबरच मालवणी मिक्स मसाला हे कुबल यांचे वैशिष्ठय आहे.

मसाल्यांची चव आणि प्रत कायम राखण्यासाठी घेतल्या जाणा-या विशेष काळजीबाबत बोलताना म्हणाले, मसाल्यांची चव कायम ठेवणे म्हणजे कसरतच असते. त्यासाठी लागणारा कच्चा माल मुंबईत खरेदी केला जातो तर लोणच्यासाठी कैरी वलसाड (गुजरात)हून मागविली जाते. मसाल्यात व लोणच्यात वापरली जाणारी प्रत्येक वस्तू चांगल्या प्रकारची व उच्च दर्जाची असली पाहिजे असा विजयराव कुबल यांचा आग्रह असतो. कुबलांची आंबा, लिबू, मिरची, मिक्स इत्यादी लोणची नावारुपाला आली आहेत. ती ग्राहकांची चव सांभाळत आहेत. जोडीला चवदार डिशेससाठी विविध मसाले आहेतच. कुबलांच्या पापडांना तर इतकी मागणी आहे की मार्केटमध्ये त्यांची कमतरता भासते, मसाले, लोणची, पापड याबरोबरच मालवणी कोकम सोले, तसेच आंंबा पावडर (आमचूर) व कोकम सरबतही कुबल कंपनीने बाजारात आणले आहे.

नव्या खुल्या आर्थिक व उद्योग धोरणाचे आव्हान स्वीकारुन विजयराव कुबल आधुनिक संशोधनातून उच्च दर्जाच्या उत्पादनांच्या निर्मितीकडे भर देत आहेत. आता तर पॅकिग सुधारुन मसाले कसे टिकविले जातील यातही कुबल एक पाऊल पुढे टाकताहेत म्हणून स्पर्धेच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कुबल यांचे नाव झळकतेय.

उद्योग व्यवसाय म्हटला की, अडचणी या नेहमी येतातच. चढउतारांच्या या चक्रातून विजयरावही सुटले नाहीत. दंगलीच्या काळात कुबलांचा कारखाना कामगारांअभावी तीन महिने बंद होता. त्यात त्यांना १५ ते २० लाख रुपयांचे नुकसान झाले. एकेकदा तर मिरचीचे भाव १०० रु. च्या वर वाढतात, परंतु मसाल्यात उच्च प्रतीची मिरची वापरुन ग्राहकांना रास्त भावात ते दिले जातात. नुकसानीची पर्वा न करता विजयराव कुबल आपल्या कंपनीचा दर्जा टिकविण्याच्या प्रयत्नात असतात.

मसाले, लोणची, पापड ही आता भारतीय कुटुंबाची अन्नपदार्थातील प्राथमिक गरज झालेली आहे. शेतीमालावर आधारित या उद्योगाला अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या बाजारपेठेत उच्च परंपरा असलेल्या या भारतीय उद्योगाला टिकून राहण्यासाठी ऑक्ट्राॅय, सेल्स टॅक्स सारख्या करातून तरी सूट हवी असे विजयराव कुबल यांचे आग्रही मत आहे.

सध्या विजयरावांसमोर मार्केटिग आणि चांगल्या विश्वासू माणसांची कमतरता ही आव्हाने आहेत. त्यांच्या मते बेरोजगारी ही मानसिक आहे. मेहनत आणि प्रामाणिकपणे काम करण्याची इच्छा असणा-याला काम कुठेही मिळतेच, आम्ही तर प्राधान्याने मराठी आणि कोकणातल्या माणसांना पसंती देतो.

सामाजिक कार्याविषयी विचारल असता मुंबई आणि परिसरातील जेष्ठ नागरीक संस्था घेत असलेल्या कार्यक्रमांना आमची नेहमीच मदत असते. सामाजिक काम कोण करतय यापेक्षा त्याचा उद्देश आणि समाजातील घटकांना होणारा फायदा बघून आम्ही मदत करतो. पण या हाताची त्या हाताला कळत नाही. सतत ७५ वर्षे चवीची परंपरा कायम राखणार्‍-या के.टी. कुबल या महाराष्ट्रीयन कंपनीची घोडदौड विजयराव कुबल यांच्या मार्गदर्शनाखाली आज यशस्वीपणे सुरु आहे.विजयराव आपल्या यशाचे मोठेपण स्वतःकडे न घेता ते म्हणतात, आज आम्ही जे आहोत ते वडील कृष्णाजी तुकाराम कुबल यांच्यामुळेच. व्यवसाय वाढीचे श्रेय ते चोखंदळ गृहिणींना देतात. ते म्हणतात,जर मसाला तयार करण्यात कोणी दोन नंबर ठेवले तर पहिला नंबर गृहिणींचा, दुसरा आमचा. कारण, कुबल उत्पादनांना घरचीच चव आहे म्हणूनच आजही घरोघरी के.टी. कुबल हे नाव चवीने, विश्वासाने घेतले जाते.

पाउले चालती

अनेक भाषा ह्या अनेक गुरु असल्यासारख्या आहेत. गुरुंमुळे ज्ञान वाढते व इतर भाषा अवगत असल्या की, धंदा - व्यवसाय वाढतो. त्या त्या भागांत जावून व्यवसाय वाढविता येतो.

रेडीच्या जारमाव प्रसाद प्रॉडक्सचे निर्माते डॉ. रविद्र भगत सांगत होते, ‘‘स्वतः हिदी, मराठी, कोकणी, कन्नड, गुजराती, मल्ल्याळम यांचे ज्ञान असल्याने त्या त्या लोकांत प्रॉडक्टचा प्रचार करता आला.‘‘ व्यवसायवाढीच्या दृष्टीने ही गरजेची गोष्ट आहे.

डॉ. रविद्र संस्कृतचे विद्यार्थी, आयुर्वेद पदवी परीक्षा त्यांनी संस्कृतमध्ये दिली. संस्कृत चांगले येत असल्याने आयुर्वेद औषध निर्मितीत निरनिराळे ग्रंथ अवलोकन करण्याची त्यांची क्षमता चांगली आहे. वडील कै. घनःशाम हे वैद्य होते. रानांत जावून औषधी व वनस्पती शोधणे व आलेल्या रुग्णांच्या आजाराचे निदान करुन त्यानुसार योग्य अशी औषध निर्मिती करणे हा त्यांचा आवडीचा व्यासंग होता. त्या व्यासंगाचा वारसा डॉ. रविद्र यांनी उचलला. आज त्यांच्याबरोबर त्यांचे मुलगे वासुदेव आणि सिद्धेश त्यांच्या या कार्यात हातभार लावत आहेत. उत्कृष्ट, शास्त्रशुद्ध, ग्रंथोक्त औषधनिर्मिती करण्याची वडिलांची परंपरा नातवांपर्यंत तशीच चालू आहे.

१९७५ च्या दरम्यान दवाखाना जोरात चालला असता वैद्य वडील घनःशाम भगत म्हणाले, ‘माझ्या मागून माझी औषधे फुकट जाणार.वडिलांची औषध निर्मितीसाठी होणारी धावपळ व त्यांची औषधनिर्मितीची ओढ पाहून व जनतेच्या आरोग्य रक्षणांत खरोखरच मदत करणारी, रोग दूर करणारी अत्यंत गुणकारी औषधे याचा अनुभव स्वतः डॉ.रविद्र व त्यांच्या डॉ.मित्रांनी घेतला होता. त्यावरुन वडिलांच्या कळकळीच्या विधानाला डॉ. रविद्रनी उत्तर दिले की, ‘मग मूर्त स्वरुपांत तुमची औषधे मिळण्यासाठी रीतसर सरकारमान्य आयुर्वेद औषध निर्मिती करुया, मग तुमची औषधे फुकट जाणार नाहीत.डॉ. रविद्र यांनी वडिलांना सांगितलेले अत्यंत परिश्रमपूर्वक खरे करुन दाखविले!

डॉ. रविद्र याची निर्णय क्षमता दांडगी. कुठल्याही समस्येचा अभ्यास करुन त्यांवर सखोल विचार करुन तोडगे काढणे डॉ. भगत यांना आवडते. घेतलेला निर्णय राबविण्यांत ते इतरांनाही मार्गदर्शन करुन जनतेच्या आरोग्य हितासाठी तो निर्णय राबवितात. सुरुवातीच्या काळात डॉ.रविद्र व त्यांचे वडिल वैद्य घनःशाम पुंडलिक भगत यांना कारखान्याचा व्याप थोडासा त्रासदायक ठरला. त्याचे महत्त्वाचे कारण, औषधनिर्मिती सोपी व ज्ञानपूर्ण होती. पण मार्केटिग कसे करावे याचे ज्ञान नव्हते. मग मित्र श्री. चंद्रकांत केदार यांच्या सहकार्याने त्यांनी चांगली माणसे विक्री करीता नेमली. डॉ.रविद्रंनी स्वतः कॉमर्स विषयाचा अभ्यास केला. त्यांतून त्यांना धंदा वाढविण्याचे आणि मार्केटिगचे तंत्र मिळत गेले. वाचनाचा व्यासंग, डॉक्टर्सशी संफ, इतरांशी चर्चा करणे व स्वतः औषधनिर्मितीची पराकाष्ठा करुन डॉ. रविद्रनी त्यांच्या देवांच्या आद्याक्षराचे नाव दिले. जागबाई, रवळनाथ, माऊली, वस ह्या चार आद्यक्षरांनी जारमावझाले व भावना धरली की, मी औषधे देईन ती ह्या देवतांचा प्रसाद असेल म्हणजे त्यांना गुणवत्ता असेल व आजतागायत ती गुणवत्ता त्यांनी जोपासली आहे.

औषध निर्मितीचा उद्देशच आपल्याला माहिती असलेली औषधे जनतेसाठीनिर्माण करणे व ती लोकांना पुरविणे. याचे सर्व डॉ. रविद्र जनतेलाच देतात. त्यांनी या जाहिरातीत म्हटले आहे, ‘लोक रत्नपारखी आहेत म्हणून आमची उत्पादने चालतात.

डॉक्टर मित्र गायकवाड, डॉ.सरीता कांबळी, डॉ. विवेक रेडकर, डॉ. सुविनय दामले, श्री.शशी रेडकर आदी वैद्यकीय व आयुर्वेद क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन - सल्ले व चर्चासत्रे त्यांना फारच उपयोगी ठरले.

डॉ. रविद्र यांनी आज वयाच्या ६६व्या वर्षी तीच जिद्द धरुन औषधे निर्मिती चालविली आहे. महाराष्ट्रातील एका कोप-यात असलेल्या रेडी सारख्या गावांत त्यांनी हा आयुर्वेद औषधी निर्मितीचा कारखाना यशस्वीरित्या चालविला आहे. महाराष्ट्र सरकारचा लघु उद्योगांतील उल्लेखनीय लघु उद्योजक म्हणून १९९१ साली प्रथम पुरस्कारही त्यांना प्राप्त झालेला आहे. लोकांना सेवा देण्यास व तत्पर ऑर्डस पुरविण्यात जारमाव आज अग्रस्थानी आहे.

या वाटचालीत आपले गुरु कै. श्री. भावे, वडील वैद्य कै. घनःशाम भगत, वैद्या आई वत्सला व घरातील कुटुंबिय यांच्या सहकार्याने, मित्रमंडळींच्या पाठिब्याने, डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने हे यश मिळाले असे डॉ. रविद्र भगत कृतज्ञतापूर्वक म्हणतात.

सरकारची बदलती धोरणे, जागतिक दर्जाची औषध निर्मिती हे सगळे बदल व्यवसायीकांनी पचविलेपाहिजेत. जीवनात चढ-उतार असतातच. पण शेवटी उद्दिष्ट गाठायचे असेल तर ही वाट करावी लागतेच. फक्त तोंडाने म्हणायचे पाऊले चालती...पंढरीची वाट!

मुलाखतकार - श्री. दत्ताराम पांडजी,

सौ. पद्मश्री पांडजी (डॉ. रविंद्र यांची कन्या)

आंबा कॅनिग व हॉटेल दुर्वांकूरचे जनक श्री. बंडोपंत केळकर

माणसानं सहजपणे आणि मनापासून नम्र असावं. देह चांगल्या कार्यासाठी कष्टवावा. हा आईवडिलांचा संस्काररुपी वारसा विनायक उर्फ बंडोपंत केळकरांना मिळाला आणि त्याच भांडवलावर आज ते यशस्वी उद्योजक म्हणून मान्यता पावले आहेत.

आजोबा गोविदराव (दादा), वडील सदाशिवराव (तात्या) व आई श्रीमती उमाबाई अशी पिढीजात व्यावसायिक संपन्नता असलेल्या केळकर घराण्यात २७ सप्टेंबर १९४२ रोजी मालगुंड येथे विनायकरावांचा जन्म झाला. ज्येष्ठ कवी केशवसुतांची ती जन्मभूमी आणि निसर्गसंपन्न जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणपतीपुळे जवळचं मालगुंड हे छोटंसं गावं. म्हणूनच त्यांची देवावर नितांत श्रद्धा.

बंडोपंतांचे आजोबा, काका आणि वडील यांचा किराणा मालाचा प्रस्थापित व्यवसाय ६०-७० वर्षे व्यवस्थित चालला होता. परंतु कोणाची दृष्ट लागली न कळे! परंतु १९५० सालापासून या एकत्र कुटुंबात भाऊबंदकीचे विष कालवले गेले. घरात सदैव वादावादी, भांडणं यांमुळे घरपणच नाहीसं झाले. विनायक तसे वयाने लहानच पण भावंडांत मोठे. त्यांना समजू लागल्यावर वाटायचं, एकाएकी या सर्वांनाचं काय झालं? त्या बालवयातच त्यांनी निर्धार केला की, भावांमध्ये मी मोठा आहे. मोठा झाल्यावर सर्व भावांना एकत्रच ठेवीन. आज त्यांचा हा निर्धार पूर्णत्वास गेला आहे. १५-१६ जणांच्या एकत्र कुटुंबासहित सदाशिव संकुलया प्रशस्त बंगल्यामध्ये हे एकत्र कुटुंब रहात आहे आणि केळकर उद्योग समूहाची कुटुंबातील सर्वांच्या सहकार्यानं प्रगतीची घोडदौड सुरु आहे.

मॅट्रीकपर्यंत शिक्षण झाल्यानंतर बंडोपंतांना कौटुंबिक जबाबदारीमुळे व्यवसायाकडे लक्ष देणे गरजेचे होते. शालेय शिक्षणाची विशेष आवड नव्हती. प्रयत्नांच्या आणि प्रत्यक्ष कृतीच्या शाळेत त्यांनी स्वतःला झोकून दिलं. काही होकारात्मक निश्चय त्यामागे होता. कितीही कष्ट करण्याची तयारी होती. बाजारपेठेमध्ये केळकरआडनावाला प्रामाणिकपणा आणि सचोटी या गुणांची कोंदणं होती. त्यामुळे केळकर कुटुंबाचा दबदबा होता, विश्वास होता. याच भांडवलाच्या बळावर बंडोपंतांच्या वडिलांनी आपले मोठे बंधू शंकरराव यांच्या आशीर्वादाने व त्यांच्याच हस्ते नवीन किराणा दुकान सुरु केले.

वडील व मामा किराणा दुकान पाहू लागले आणि बंडोपंत दुकानात काम करतानाच सवड मिळेल त्याप्रमाणे छोटेछोटे उद्योग करु लागले. सुरुवातीलाच त्यांनी गुरांची हाडे विकण्याचा व्यवसाय केला आणि समाजाचा रोषही पत्करला, परंतु त्या व्यवसायात बंडोपंतांना ब-यापैकी पैसे मिळाले. त्यावेळी होणा-या सामाजिक टीकेकडे त्यांनी दुर्लक्ष केलं हीच त्यांच्या उद्योजकतेती यशस्वी पायरी ठरली. नंतर लाकूड, चिरे, बांबू यांची खरेदी-विक्री आणि प्रसंगी बैलगाडी हाकूनही पैसा मिळवला. छोटीछोटी घरं बांधण्याचा व्यवसाय केला. मुंबईतील बंडोपंतांच्या वडिलांचे एक मित्र श्री.अनंतराव परुळेकर (बापू) यांनी खूप आर्थिक मदत केली. शिवाय व्यावसायिक मार्गदर्शनही दिलं. त्यामुळे आजही बंडोपंतांच्या मनात त्यांच्याविषयी आदरयुक्त प्रेम आहे.

संसार दुःखमय आहे हे खरं पण उगीच त्याविषयी कल्पना करीत राहणं मात्र सोडून द्यावे. हा समर्थ रामदासांचा उपदेश बंडोपंतांनी अंगिकारला! कधी उगीच बढाया मारल्या नाहीत किवा खोटी वचनं दिली नाहीत. अंथरुण पाहून पाय पसरले. त्यामुळेच त्यांच्या प्रत्येक कृतीत त्यांना यश मिळालं.

हापूस आंबा हे कोकणचं खास वैशिष्ट्य. हा आंबा इतर जातींपेक्षा अधिक टिकाऊ आहे. त्याचा गडद केशरी रंग, त्याचा स्वाद तसंच त्याची आंबटगोड चव, त्यामध्ये असणारे फायबर्स, प्रोटीन्स, आम्ल इत्यादी पोषणमूल्यं जास्त. हापूस आंब्याची बागायत केवळ रत्नागिरी आणि सिधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येच एकवटलेली दिसते. यामध्ये बंडोपंतांनी आपल्या व्यवसायाचा श्रीगणेशा करण्याचं ठरविले. जन्मभूमी असलेलं मालगुंड हेच कर्मभूमी करण्याचं निश्चित केलं. कौटुंबिक वाटण्यांमध्ये ३०० कलमं आली होती. त्याशिवाय एक बाग ८० हजार रुपये किमतीत १ वर्षाच्या करारानं आंबे काढण्यासाठी घेतली. त्यात २५ हजार रुपये फायदा झाला. त्याबरोबरच व्यवसायाची सर्व सूत्रं बंडोपंतांना कळली. ते साल होते १९७५.

त्यानंतर कोकण कृषी विद्यापिठाच्या बागा, गुहागर-चिपळूण परिसरातील बागा अशाच वर्षाच्या कराराने घेतल्या. कष्टांमागून आत्मविश्वास- आत्मविश्वासामागून यश आणि यशामागून पैसा हे प्रस्थापित सूत्र बंडोपंतांना चांगल्यापैकी जमू लागलं. आज स्वतःच्या ८-१० बागा मिळून ३-४ हजार आंब्याची कलमे आहेत. या सर्व बागा त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या कठोर परिश्रमांतून निर्माण झाल्या आहेत. बंडोपंतांचे भाऊ, मुलगे, पुतणे आज व्यवसायात तेवढ्याच तन्मयतेनं काम करीत आहेत.

खादी-ग्रामोद्योग बोर्डानं फळप्रक्रिया क्षेत्रासाठी दरमहा ४० रुपये विद्यावेतन देऊन फळप्रक्रिया अभ्यासक्रम सुरु केला होता. बंडोपंत त्या अभ्यासक्रमास दाखल झाले. त्यांच्या मनाला नवीन चालना मिळाली. त्यातून आंबा कॅनिगच्या व्यवसायाची स्फूर्ती मिळाली. घरी लहान प्रमाणात कोकम सरबत, कोकम जेली, काजू सरबत, आंबा पोळी, फणस पोळी इत्यादी वस्तूंची निर्मिती आणि विक्री चालू होती. खात्रीचा माल आणि चोख व्यवहार यामुळे त्यांच्या नावाला प्रतिष्ठा आणि विश्वास प्राप्त झाला होता. याच जोरावर आंबा कॅनिगची यंत्रसामुग्री आणून कारखाना सुरु केला. यामध्ये त्यांचे मित्र प्रभाकर मेहेंदळे यांचं उत्तम प्रकारे सहकार्य लाभलं. मोटरसायकलवरुन सर्व जिल्ह्यांतच नव्हे तर गोवा, बेळगावपर्यंतही कामाकरिता अनेक वेळा प्रवास करावा लागला. प्रत्यक्ष कॅनिगच्या कामामध्येही त्यांचा सहभाग महत्वाचा होता. याच काळात श्री. सुर्वे काका व अशोक ओक यांचं सहकार्य महत्वाचं मानावं लागेल. सौ. प्रभा वहिनींचा सहभाग महत्वाचा होता. १९७६ मध्ये खादी ग्रामोद्योग मंडळाकडून ३५ हजार रुपये कर्ज घेऊन कॅनिग प्रक्रियेची माहिती आणि घरचाच आंबा असल्यामुळे रसांचे ५००० डबे तयार केले. कुठेही भेसळ नाही. प्रिझर्व्हेटीव्ह नाही. त्यामुळे रसाची गोडी आणि रंग नैसर्गिक राहिला. त्यामुळे डब्यांची मागणी वाढू लागली. दुस-या वर्षी १० हजार डबे तयार केले. २ रुपये भाव जास्त असूनही मागणी वाढत होती. ही वाढती मागणी लक्षात घेऊन २०-२५ हजार डब्यांची निर्मिती झाली. माल वितरणाची व्यवस्था होणं गरजेचं होतं. त्यांनी नाशिक ते नागपूर हा सर्व प्रदेश अक्षरशः पिजून काढला. ज्यूस सेंटरवाल्यांना रसाची चव दाखवली. नवीन व्यावसायिकांशी ओळखी झाल्या. सर्व माल विकला. त्या वेळचे ग्राहक आज २८ वर्षांनंतरही कायम टिकून आहेत. २८ वर्षांच्या कालावधीत बंडोपंतांनी कॅनिगच्या क्षेत्रात प्रगतीचा मोठा टप्पा गाठला आहे. औरंगाबाद, बीड, जालना, धुळे, नंदुरबार यांसह गुजरात, कर्नाटक, गोवा राज्यांतही त्यांचा माल जातो. या व्यवसायात बंधू अशोक आणि विनोद हेही समर्थपणे लक्ष देत आहेत.

१९९४ साली मे. केळकर ट्रेडर्सही संस्था बंडोपंतांच्या पत्नी सौ. सविता केळकर यांच्या नावानं सुरु केली. या कंपनीकडेच नर्मदा सिमेंटची एजन्सी आहे. मालगुंड-गणपतीपुळे परिसरातील लोकांना जवळच्या जवळ सिमेंट उपलब्ध करुन देणं आणि नर्मदा सिमेंट सारख्या स्वदेशी उत्पादनाला एक भक्कम पाठिबा ही दोन्ही उद्दिष्टं या एजन्सीनं साध्य केली.

श्री. अरविद केळकर हे पुणे येथे कॅनरा बँकेत अधिकारी म्हणून काम करीत असतानाच पुणे येथील मेसर्स स. गो. केळकर सेल्स कॉर्पोरेशनया भागिदारी संस्थेचं काम पाहत असत. नंतरच्या काळात स्वेच्छानिवृत्ती घेऊन या संस्थेची पूर्ण जबाबदारी त्यांनी पेलली आहे. या भागिदारी संस्थेतर्फे किराणा सामान व कोकणी मेव्याचे विक्रीकेंद्र असे दोन्ही उपक्रम चालू आहेत. कोकणातील बायका जी दर्जेदार उत्पादनं बनवीत त्यांना शहरात बाजारपेठ मिळावी या दृष्टीनं आयडीयल कॉलनी, कोथरुड पुणे येथे वरील संस्था स्थापन केली.

१९७८ साली महाराष्ट्र सरकारने पर्यटन विषयक धोरण जाहीर केलं आणि कोकणातील पर्यटन व्यवसायानं उभारी धरली. पर्यटनहा एक प्रमुख व्यवसाय कोकणात आकाराला येवू लागला.

गणपतीपुळे हे लक्षावधी गणेशभक्तांचे भक्तिस्थान आणि आराध्य दैवत. रत्नागिरीपासून ५० कि.मी. व किना-यानं ३५ कि.मी. अंतरावर हे गाव समुद्राकाठी वसलेलं आहे. पर्यटनाच्या हंगामात रोजचे २००० ते २५०० पर्यटक गणपतीपुळे येथे वस्तीला असतात. साहजिकच पर्यटनाशी संबंधित अनेक सोयीसुविधा व आकर्षण केंद्र निर्माण होऊ लागली. कोकण रेल्वे सुरु झाल्यापासून तर कोकणातील पर्यटन व्यवसाय अधिकच तेजीला आला.

बंडोपंतांचे द्रष्टेपण जागे झाले. सर्व भावंडांची बैठक घेतली. त्यांच्यापुढे पर्याय मांडला की, आपल्या कुटुंबातील पुढील पिढीमध्ये सातजण आहेत. त्यांनी नोकरी करता कामा नये. असं जर सर्वांच एकमत असेल तर आपला हा आजचा व्यवसाय सांभाळून ह्या तरुण पिढीच्या बुद्धिमत्तेला आणि कर्तृत्वाला वाव मिळेल असे नवे उद्योग उभारणं आवश्यक आहे. नवीन उद्योग म्हटला म्हणजे धोका आला. पण एकदा आलेली संधी पुन्हा दुस-यांदा दार ठोठावित नाही. येणारी दुसरी संधी चांगली किवा वाईट असू शकेत, पण ती पूर्वीसारखी कधीच नसते. म्हणून योग्य वेळी योग्य निर्णय घेणं.या गोष्टीला अत्यंत महत्व आहे.

बंडोपंतांचं म्हणणं सर्वांना पटलं. त्यातून आकाराला आलं हॉटेल दुर्वांकुर, शिवनंदन रेस्टॉरंट आणि सुपर मार्केटजवळजवळ दीड-दोन कोटींचा प्रकल्प. त्यावर लिहायचं तर एक स्वतंत्र लेख होईल.

बंडोपंत केळकरांच्या व्यावसायीक जीवनात अनेक संकटे आली. पण नकारात्मक विचाराला जराही थारा न देता नविन उमेद धरुन ते आणि त्यांचे कुटुंबिय सदैव यशाच्या शिखराकडे वाटचाल करीत आहेत. हॉटेल दुर्वांकूर, शिवनंदन रेस्टॉरंट, सुपर मार्केट हा प्रकल्प गणपतीपुळे येथे देवस्थानपासून ५ मिनिटाच्या अंतरावर साकारला आहे. शिवनंदन रेस्टॉरंट हे पूर्णतः शाकाहारी आहे. हॉटेल दुर्वांकूर मध्ये साध्या रुम पासून ते वातानुकुलीत डिलक्स रुमही आहेत. सुपर मार्केटमध्ये कोकणातील सर्व पारंपारीक वस्तू, कोकणचा मेवा, किराणा माल मिळतो. बंडोपंत, अरविद, अशोक, विनोद हे चारही भाऊ सपत्नीक या प्रकल्पामध्ये लक्ष घालत आहेत.

केळकर कॅनिग व हॉटेल दुर्वांकूर

मालगुंड, गणपतीपुळे, जिल्हा - रत्नागिरी ४१५६१५

दूरध्वनी (०२३५७) २३५२२७, २३५१२७.

दमदार तपपूर्ती - श्री इंडस्ट्रीज इचलकरंजी

अन्न आणि फळप्रक्रिया या उद्योगात केवळ मनुष्यबळच नाही तर उत्तम दर्जाच्या मशिनरीचीही आवश्यकता असते ही गरज ओळखून इचलकरंजी येथील श्री गणेशप्रसाद भांबे यांनी या क्षेत्राला आवश्यक असणार्‍या मशिन्सचं दर्जेदार उत्पादन करुन या क्षेत्रात यशाची गरुडझेप घेतली आहे. श्री इंडस्ट्रीजची स्थापना १९९७ साली झाली. सुरुवातीला गणेशप्रसाद भांबेनी डिप्लोमा इन मॅकेनिकल इंजिनिअरिग पूर्ण केल्यानंतर २ वर्षे अनुभवासाठी खाजगी कंपनीत नोकरी केली. त्यानंतर डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट हा कोर्स पूर्ण करायचा होता. पण कोर्स आणि नोकरीची वेळ याचे गणित जमेना. त्यामुळे नोकरी सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्याचवेळी मनात स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचे विचार घोळत होते. या व्यवसायाच्या सुरवातीची प्रेरणा मिळाली, ती आई श्रीमती सुरेखा यांच्याकडून डिकाचे लाडू बनवित असताना सुके खोबरे किसण्याची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर भासायची. त्याकरिता मशीन बनविता येईल का ? असे आईने सुचविले. तेव्हा सुके खोबरे किसण्याचे मशीन प्रोजेक्ट म्हणून बनविले. तेव्हा असं लक्षात आलं की, अन्न व फळप्रक्रिया मशिनरी बनविणारे उत्पादक खूपच कमी आहेत. तेव्हा व्यवसायाला सुरवात करताना अशाच प्रकारच्या मशिनरीचे उत्पादन करायचे असे ठरले.

सर्वप्रथम बटाटा वेफर्स तयार करण्याचे मशीन बनवायला घेतले. मशीन बनवताना बाजारामध्ये उपलब्ध असणा-या मशीन्समधील कमतरता लक्षात घेऊन त्याचा अभ्यास करुन त्या दूर करुन नवीन प्रकारचे मशीन बनविले. मशीनचे सर्व स्पेअर पार्टस् दुस-या कारखान्यातून बनवून घेतले.त्यांची जोडणी बहिण स्वातीच्या मदतीने घरीच केली. त्याची विक्री इचलकरंजीमधीलच एका ग्राहकाला केली. पण पहिल्याच विक्रीमध्ये ५० टक्के रक्कम ग्राहकाने बुडविली. यातली जमेची बाजू म्हणजे या वेगळया प्रकारच्या मशीनला दै. सकाळ मधून चांगली प्रसिद्धी मिळाल्याने ग्राहकांकडून चौकशी होऊ लागली.

दरम्यानच्या काळात वडीलांना अपघात झाल्याने पुन्हा नोकरी करावी की व्यवसाय हा प्रश्न उभा राहिला. यावेळी आईने आहे हाच व्यवसाय सुरु ठेव असे सांगून धीर दिला. उद्योगाला घरातील पाठिब्यावरच भांडवलाची कमतरता असतानाही श्री इंडस्ट्रीजची वाटचाल पुन्हा जोमाने सुरु झाली. आर्थिक समस्या असल्याने व्यवसायच असा निवडला की ग्राहक ५० टक्के रक्कम अॅडव्हान्स देईल आणि मशीन मागणीप्रमाणे बनवायचे असे धोरण ठेवल्याने आर्थिक भांडवलाचा प्रश्न तात्पुरता सुटला होता. दरम्यानच्या काळात फरसाण बनविणे, पापड मशीन, पाणी तापविण्याचा बंब या प्रकारच्या मशीन्सची मागणी ग्राहकांकडून होऊ लागली. म्हणून याही प्रकारच्या मशीन्स बनवायला सुरुवात केली. अल्पावधीतच १० प्रकारच्या मशीन्स बनविल्या. परंतु स्वतःचा कारखाना उभा करणे व तो चालविण्याचा किमान खर्च पूर्ण होईल इतक्या विक्रिची खात्री नसल्याने कामाचे आऊटसोर्सिग म्हणजेच काम बाहेरुन करुन घेणे चालू ठेवले.

नंतरच्या टप्यात पुणे, नाशिक, नगर या महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील मशीनरी विक्रेत्यांशी संफ साधून त्यांना मशीन्स पुरवायला सुरवात केली. यामध्ये अस लक्षात आल की मशीनची किमत ही श्री इंडस्ट्रीजमध्ये जास्त आणि विक्रेत्यांकडे कमी. कारण मशीन विक्रेते कंपनीकडून जास्त मशीन्स खरेदी करीत असल्यामुळे त्यांना डिस्कांउंट जास्त द्यावा लागायचा. मशीन विक्रेते कमी नफा ठेऊन मशीन्स विकत असल्याने ग्राहकांना किमतीची तफावत जाणवायची हा प्रकार लक्षात आल्यावर विक्रेत्यांशी असलेला व्यवहार बंद करुन पुणे, नाशिक उथे भरणा-या कृषी प्रदर्शनांमध्ये भाग घेऊन ग्राहकांना थेट विक्रीसाठी सर्व मशीन्स उपलब्ध करुन दिली. पण या प्रदर्शनामधील स्टॉल्सच भाड जास्त असल्यामुळे दुस-या क्षेत्रातील मशीन उत्पादकाला सोबत घेऊन प्रदर्शनात भाग घेतला यामुळे थेट ग्राहकांशी विक्री वाढली.

नवनिर्मितीचा प्रयत्न - आवळा किसण्याचे मशीन - कृषी प्रदर्शनामध्ये आवळा उत्पादक शेतकरी गणेश लक्ष्मणराव मात्रे यांनी आमची भेट घेवून १२० एकर जागेतील आवळा उत्पादनासाठी प्रक्रिया मशीन्स बनवा असा आग्रह धरला. प्रायोगिक तत्वावर प्रथम आवळा किसण्याचे मशीन बनविले व ते यशस्वीही झाले. विदर्भ, मराठवाडा, आंध्रप्रदेश या भागात भरपूर मशीन्सची विक्री झाली. त्यानंतर आवळा प्रक्रियेत आवश्यक असणारे आवळा फोडण्याचे मशीन, आवळा पंचीग मशीन अशी आवळा प्रक्रियेतील पूर्ण रेंज बनविण्यात श्री इंडस्ट्री यशस्वी झाली. ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेता तासाला एक हजार किलो आवळे किसण्याचे मशीनही २ वर्षापूर्वी बनविण्यात आले. सर्व प्रकारची आवळा मशीन्सची आंध्रप्रदेश, तामिळनाडू महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगड, गुजरात, राजस्थान, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा इ. राज्यात विक्री झाली आहे.

फणस गरा कटिग मशीन - कोकणात मोठ्या प्रमाणावर घराघरातून फणसाचे चिप्स बनविण्याचा व्यवसाय चालतो. वेंगुर्ल्यातील उद्योजिका सौ. शुभदा मराठे यांच्या मागणीनुसार काप्या फणसापासून बनणा-या फणस ग-यांकरिता कटिग मशीन प्रायोगिक तत्वावर बनविले. पुढीलवर्षी काही सुधारणा करुन या मशीनचा यशस्वीपणे वापर होऊ लागला. एकाच आकारात, समान जाडीचे, लांबीचे गरे ग्राहकांना मिळत असल्याने ग्राहकही खूष होता. वेळेची बचत आणि अकुशल कामगारही गरा कटिग मशीन चालवू शकत असल्याने मशीन्स कोकण, गोवा, कारवार, इथे चांगली विकली गेली, आजही जात आहेत.

स्वतःच्या कारखान्याची उभारणी -

२००६ पासून मशीनरीच्या मागणीमध्ये वाढ झाल्याने आणि स्थानिक कारखानदारांकडून वेळेत पार्ट बनवून देणे मुश्कील झाल्याने स्वतःचा कारखाना सुरु करण्याची गरज भासू लागली. यावेळीही भांडवलाची कमतरता जाणवल्याने सुरवातीला कारखाना भाड्याने घेतला. सहा महिन्यांमध्येच वाढणारा व्यवसाय बघून जागा मालकाने भाडे वाढवा अगर कारखाना सोडा असा तगादा लावला. त्यावेळी दुस-यांच्या जागेत स्वतःची शेड उभी करुन कारखाना चालू ठेवला. दीड वर्षामध्ये स्वतःच्या कारखान्यासाठी १२०० स्क्वे. फुटांची जागा घेतली. ही जागा घेत असतानाच बँकेच्या मॅनेजर्सनी तयार बांधकामाला कर्ज देता येत नाही अशी तांत्रिक सबब पुढे केली. पण इचलकरंजीतील सेंट्रल बॅकेचे श्री. स्वामी यांनी एका प्रामाणिक मराठी उद्योजकावर विश्वास ठेवून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन घेवून कर्ज मंजूर केले. त्यामुळे स्वतःचा कारखाना उभारण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले. आणि अल्पावधीतच कर्ज फेडता आले.

परदेशात मशीनची निर्यात - २००९ साली श्री इंडस्ट्रीजमध्ये तयार होणा-या मशीन्सकरिता अभिनव मशीन्स हा ब्रँड तयार केला. कृषी प्रदर्शनामधला ग्राहकांमध्ये तोच तोच पणा आल्यावर प्रदर्शनांमधला सहभाग कमी करुन अन्न व फळप्रक्रिये संदर्भातील मासिके, कृषी क्षेत्रातली आघाडीची मासिके यामध्ये जाहिरात सुरु केली. त्याला चांगलाच प्रतिसाद मिळाला २००९ मध्येच ध्र्ध्र्ध्र्.ठ्ठथ्र्थ्ठ्ठथ्र्ठ्ठडण्त्दड्ढद्म.डदृथ्र् ही स्वतंत्र वेबसाईट ही सुरु केली. त्यामुळे परदेशात मशीन देणे शक्य झाले. आफ्रिकेच्या घाना रिपब्लीकमध्ये काजू, बोंडूच्या फळांचा रस काढण्याची २० मशिन्स निर्यात केली.

या सर्व गोष्टी करताना निर्यातीचे लायसन्स मिळविणे ग्राहकांशी पत्रव्यवहार ठेवणे, जनसंफ ठेवणे यामध्ये वडीलांची मोलाची मदत असे. आजची श्री इंडस्ट्रीजची झालेली प्रगती पहायला दुर्दैवाने आज ते हयात नाहीत ही सल कायमस्वरुपी मनात राहिल. उद्योगाच्या सुरवातीला कठिण प्रसंगी आईने दिलेले प्रोत्साहन, घरातील सर्वांचा पाठिबा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे श्री इंडस्ट्रीने ठेवलेला सचोटीचा व्यवहार यामुळे झालेली प्रगती सावकाश पण शाश्वत आहे असं गणेशप्रसाद आवर्जून सांगतात.

मराठी उद्योजक आणि इतर उद्योजक यामध्ये फरक जाणवतो का ? अस विचारल्यावर गणेशप्रसाद सांगतात मराठी उद्योजकांना आर्थिक पाठबळ कमी असत. नोकरीची मानसिकता असल्याने सभोवतालचं वातावरण पोषक नसतं. राष्ट्रीयकृत बँकांची बहुतांश धोरणे ही नवउद्योजकांना उमेद करणारी असतात. आज बँकामध्ये सुमारे ९० ठेवी या मराठी नोकरदार माणसाने ठेवलेल्या असतात. पण मराठी उद्योजकाला कर्ज देताना मात्र बँका आपला हात आखडता घेतात. दुर्दैवाने असं करणारे बँकांचे अधिकारी हे मराठीच असतात. हा स्वानुभव आहे. पेपरवर्कमध्ये आपली माणस कमी पडतात. हे कबूल आहे पण आवश्यक पेपरवर्क पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन करायला जिल्हा उद्योग केंद्र किवा तत्सम सरकारी यंत्रणेतले अधिकारी अजिबात उत्सुक असत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. हे टाळण्यासाठी उद्योजकानेच प्रचंड मेहनतीची तयारी, पाठपुरावा या गोष्टींचा आळस करुन चालणार नाही.

श्री इंडस्ट्रीजच्या उद्योगातून एक प्रकारच सामाजिक कार्यच घडते. अनेक लघु उद्योजक, महिला उद्योजक आज श्री इंडस्ट्रीजने बनविलेल्या मशीन्स वापरुन स्वयंपूर्ण बनले आहेत. यावेळी ग्राहकांना प्रक्रिया उद्योगाच्या निवडीसाठी लागणारी माहिती श्री इंडस्ट्री विनामोबदला उपलब्ध करुन देते.

नवउद्योजकांनी आपल्या व्यवसायाची सुरवात करताना आापल्याला कोणता व्यवसाय करायचा आहे हे आधी निश्चितच करावे. त्यानंतर व्यवसायाला मार्केटमध्ये असणारे भवितव्य, आपले स्पर्धक, ग्राहकांची गरज याचा मार्केट सर्व्हे करुन मगच सुरवात करावी. आपल्या व्यवसायाबद्दल पूर्ण विश्वास, आपुलकी, अपयश आले तरी त्रुटी दूर करुन जोमाने वाटचाल करायची तयारी असेल तर अशा प्रकारच्या कार्यप्रणालीतच आपले यश दडले आहे याची खात्री बाळगा!

श्री इंडस्ट्रीजच्या बाबतीत ही गरज ही शोधाची जननी आहे. या उक्तीप्रमाणे सातत्याने नवनवीन मशीन्स विकसित केल्याने मार्केटमध्ये श्री. इंडस्ट्रीजचे नाव टिकून आहे. सध्या २५ प्रकारची मशीन्स बनविली असून ताशी १००० किलो आवळा किसण्याच्या मशीनच पेटंट क्लेम केल आहे.

मेहनत, सतत नवनिर्मितीचा ध्यास, सर्वोत्तम गुणवत्तेच्या जोरावर श्री इंडस्ट्रीजने दमदार तपपूर्ती केली आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा !