संपैंदीकय *
तीन वर्षाचा वायदा!
उद्योगमंत्री आणि सिधुदुर्गचे पालकमंत्री नारायण राणे यांनी येत्या तीन वर्षात सिधुदुर्गचा कायपालट करु अशी जाहीर घोषणा केल्याचे वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाले आहे. राणे मंत्रिपदावर आरुढ झाल्यापासून ही घोषणा सिधुदुर्गवासीय ऐकत आले आहेत. शिवसेनेत असतांना युतीच्या मंत्रिमंडळात राणे पहिल्यापासून कॅबिनेट दर्जाचे मंत्री होते. शेवटचे सहा महिने तर त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री-पदही भूषविले. नंतर काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात विरोधी पक्षनेते असतांनाच त्यांनी शिवसेना सोडून काँग्रेस पक्षाची टोपी चढविली. मंत्रिमंडळात अत्यंत महत्त्वाचे असलेले महसूलमंत्रीपद त्यांनी दीर्घकाळ सांभाळले. आता येत्या तीन वर्षात सिधुदुर्गचा कायापालट घडवू असे ते सांगत आहेत. म्हणजे एवढ्या दीर्घकाळ सत्तेत असतांनाही सिधुदुर्गचा अपेक्षित कायापालट होऊ शकलेला नाही याची ते एकप्रकारे कबुलीच देत आहेत.
मंत्रीपदावरुन राणेंनी धडाडीने निर्णय घेतले खरे पण त्यांची तत्परतेने अंमलबजावणी करण्यात सरकारी यंत्रणा कमी पडली. प्रत्येक जिल्ह्याच्या विकास योजनांसाठी राज्याचे अर्थखाते, लोकसंख्या व जिल्ह्याच्या आकारमाना -प्रमाणे काही ठराविक निधी जिल्हा नियोजन आणि विकास मंडळाला देत असते. गेल्या आर्थिक वर्षात त्या रकमेत दुपटीने वाढ करण्यात आली तशी ती सिधुदुर्ग जिल्ह्यालाही मिळाली. पण त्या आधीच्या वर्षासाठी दिलेल्या निधीतील काही निधी अखर्चितच राहिला. मग यावर्षी दुप्पटीहून अधिक वाढीव मिळालेला निधी हीच सरकारी यंत्रणा येत्या तीन महिन्यात कशी काय खर्च करणार? हा प्रश्न नियोजन मंडळाच्या प्रत्येक सभेत चर्चिला जातो. राणे त्याबद्दल संबंधीत अधिका-यांना धारेवर धरतात. पण त्यातून निष्पन्न फारसे काही होत नाही. कागदोपत्री शक्य तेवढा निधी ‘‘खर्ची पाडला जातो‘‘ पण प्रत्यक्ष कामाची पूर्तता कुठेच दिसत नाही. होतात ती कामे अपुरी किवा निकृष्ट म्हणजे त्या कामांवर मंजूर असलेला निधी पुरेसा खर्च होत नाही. मग निधी जाते कुठे?
विकासाकरिता मिळणा-या निधीला कशा वाटा फुटतात हे संबंधीत सर्वांना ठावूक असते. विधीमंडळातही त्यावर चर्चा होते. विरोधी पक्षाचे तर या मुद्यावर सतत टीका करीत असतात. पण ‘सरकार‘ आपल्या गतीने चाललेले आहे.
एखादे सरकारी काम तत्परतेने, प्रामाणिकपणे, भ्रष्ट आचारापासून दूर राहून करणे हा अलिकडे गुन्हाच झालेला आहे. त्या गुन्ह्याबद्दल संबंधीत कर्मचारी किवा अधिका-याला तात्काळ ‘शिक्षा‘ होते. मग कोण कशाला कार्य तत्परता आणि प्रामाणिकपणा दाखविल? म्हणूनच नारायण राणे यांच्यासारख्या धडाडीने निर्णय घेणा-या कार्यक्षम मंत्र्याला सरकारी यंत्रणेच्या या नाकर्तेपणापायी हात टेकावे लागतात आणि विकासाची आश्वासने देत रहावे लागते.
सिधुदुर्ग जिल्हा हा आकाराने छोटा, भौगोलिक-दृट्या अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत खूपच सुसह्य. ब-या पैकी नैसर्गिक जंगलसंपत्ती राखून असलेला, पर्यटन विकासासाठी अत्यंत अनुकूल. असे असले तरी सर्वसामान्य कष्टकरी, गरीब, शेतमजूर, मच्छिमार यांच्या समस्या कायमच आहेत. शेती व अन्य रोजंदारीसाठी मजूर मिळत नसले, आहेत त्यांची मजुरी परवडत नसली तरी जिल्ह्यात बेकारांची, सुशिक्षित बेरोजगारांची संख्याही खूप मोठी आहे.
जिल्ह्यात सर्वात मोठा प्रश्न उन्हाळ्यात निर्माण होणा-या पाणी टंचाईचा. त्यासाठी जलस्वराज्य योजना आणली. पण काही अपवाद वगळता त्याचा उपयोग शून्य! लघुपाटबंधारे, धरणे यांची कामे अनेक कारणांनी गेली कित्येक दशके रखडलेली आहेत. धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न, वनसंज्ञे -खालील जमिनीचा प्रश्न, उपलब्ध निधी असे अनेक प्रश्न राणे महसुल मंत्री असतांनाही प्रलंबित राहिलेले आहेत. पाणीटंचाईमुळे शेती, बागायती, दुग्धव्यवसाय यांना या जिल्ह्यात उर्जितावस्था येऊ शकलेली नाही.
विधानसभेच्या निवडणुकांना तीन वर्षाहून थोडा अधिक वेळ आहे. राणे यांच्याकडे सध्या उद्योगमंत्रीपद आहे. त्यांनी कुडाळ एम.आय.डी. सी. व अन्य तालुक्यांत असलेल्या उद्यमनगरीत कायमस्वरुपी टिकणारे उद्योग-व्यवसाय आणले आणि त्यातून दोन-चार हजार तरुणांना नोक-या मिळाल्या तरी त्यांनी तीन वर्षात जिल्ह्याचा कायापालट करण्याचा केलेला वायदा पूर्ण झाला असे म्हणता येईल!
अधोरेखीत-
सोन्याची माती?
सिधुदुर्ग आणि उत्तर गोव्यातून उत्खनन केल्या जाणा-या खनिजामध्ये सोन्याचा अंश तसेच प्लॅटिनम वर्गातील किमती धातू असल्याचा अहवाल शास्त्रज्ञ आर. एस. हजारे आणि त्यांच्या सहका-यांनी सरकारच्या खनिकर्म संचनालयाला पूर्वीच दिला आहे. तसेच सध्या ओरोस येथे असलेले डॉ. एस. के. प्रभू यांच्यासारख्या भूगर्भ शास्त्रज्ञांनीही जिल्ह्यातील खनिज मातीमध्ये सोन्याचा अंश असल्याचा अहवाल सरकारला सादर केलेला आहे. तसेच इतर अनेक शास्त्रज्ञांनी सोने व तत्सम धातूंच्या उपलब्धी संबंधीचा अहवाल केंद्र सरकारला सादर करुनही सरकारी यंत्रणेने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचा आरोपच या शास्त्रज्ञांनी केला आहे.
यामध्ये सरकारी यंत्रणेचे अज्ञान आहे? अनास्था आहे? की खनिज कंपन्यांकडून मिळणारा मलिदा आहे? असा प्रश्न कोणालाही पडेल.
भूपृष्ठाखालील ठराविक अंतराच्या खालील खनिज संपत्तीवर सरकारची मालकी असते. ते खनिज (अगदी मातीसुद्धा) सरकारी दराप्रमाणे सरकारला रॉयल्टी भरुन घेऊन काढण्यास सरकार परवानगी देते.
घरबांधणीसाठी लागणा-या चि-यांपासून ते धातू बनविता येणा-या किमती खनिजापर्यंत खनिज उत्खनन करणा-या कंपन्यांकडून सरकार रॉयल्टी वसूल करीत असते. यामुळे खनिज मातीमध्ये सोन्यासारख्या किमती धातूचे अंश मिळत असताना त्याचा तसा अहवाल शास्त्रज्ञांकडून मिळालेला असतांना सरकारी यंत्रणा हात बांधून स्वस्त राहते. यामागे कोणते गौडबंगाल आहे?
सध्या गोवा आणि सिधुदुर्ग जिल्ह्यात देशातील अनेक मोठ्या खनिज उत्पादक कंपन्यांनी आणि काही राजकारण्यांनीही खनिज काढण्यासाठी जमिनदारांकडून लीजवर जमिनी घेतल्या आहेत. काहींनी तर खरेदीही केल्या आहेत. महसूल खात्याच्या सहकार्यानेच त्यांना हे सहज शक्य झाले आहे.
परंतु जंगल संपत्तीने समृद्ध असलेल्या आणि पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झालेल्या सिधुदुर्गात जंगल संपत्ती नष्ट करुन जमिनी उजाड बनविणा-या खाण कंपन्या येऊ नयेत यासाठी स्थानिक लोकांच्या मदतीने पर्यावरणवाद्यांनी लढा उभारलेला आहे. स्थानिक लोकांचा हा रास्त लढा मोडून काढण्यासाठी खनिज कंपन्यांना सरकारचीच मदत मिळत आहे. त्यामुळे खनिज कंपन्यांना सिधुदुर्गातील मातीमध्ये असणा-या सोन्याच्या अंशातील काही अंश कोणाकोणाकडे जातो? याचा तपास लागला तर सरकारने हा अहवाल का गुलदस्त्यात ठेवला याचा उलगडा होऊ शकेल!
सध्याच्या विरोधी पक्षांना या प्रश्नांतून सरकारला अडचणीत आणण्याची सुवर्णसंधीच मिळू शकणार आहे. सिधुदुर्गात काही गावात सरकारच्या मदतीने खनिज कंपन्यांनी स्थानिकांना ‘भागवून‘ आणि पर्यावरणवाद्यांचे दोष दुर्लक्षित करुन खनिज जमिनीतून काढून निर्यातही सुरु केली आहे. त्याच कंपन्यांनी जर खनिज निर्यात करण्याऐवजी त्यातील सोने किवा अन्य किमती धातू वेगळे काढण्याची यंत्रणा शास्त्रज्ञांच्या मदतीने संघटीतरित्या उभारली तर फायदा कोणाचा होईल?
-अॅड.शशांक मराठे
विशेष *
परस्परांच्या सुखासाठी....
लग्नानंतर लैंगिक संबंधाविषयीच्या अनेक समज-गैरसमजांमुळे वैवाहीक आयुष्यात ताण निर्माण होतात. या प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन या लेखाने नक्कीच बदलू शकेल....
‘‘आम्ही दोघंही त्या बाबतीत अगदीच अनभिज्ञ आहोत. स्पष्ट शब्दात सांगायचं तर कुठं काय असतं याची आम्हाला स्पष्ट कल्पना नाही. आम्ही अंदाजाने काही करायचा प्रयत्न केला. पण काही जमलं तर नाहीच, उलट भलतंच काहीतरी होऊन बसलं. आता पुढे काय? असा प्रश्न आहे! डॉक्टर, एक सांगा, लग्नानंतर सुरुवातीच्या काळात पत्नीबरोबर कितीवेळा संबंध करणं आवश्यक असतं. मित्रांनी सांगितलेल्या गोष्टी मला काही जमण्यासारख्या नाहीत. माझ्या पत्नीनेही आपल्या मैत्रिणींशी चर्चा केली तेव्हा तिलाही आपल्याला काही जमणार नाही असं वाटलं.‘‘
ती दोघं अगदी नव्या नवलाईची, नवपरिणीत वधु-वर दिसत होती. मुलीला तर येव्हाना रडू येऊ लागलं होतं. आपण इतरांच्या मानाने मैलोन मैल मागे आहोत असं त्यांना वाटत होतं.
‘‘तुम्हाला माहितीच आहे डॉक्टर, की आपल्यासारख्या मराठी मध्यमवर्गीय कुटुंबात लैंगिक जीवनाविषयी फारशी कुणी चर्चा करीत नाही. आम्ही दोघंही त्याच संस्कारात वाढलेलो. त्यामुळे सगळाच गुंता होऊन बसला. मला तर असं वाटतंय की, आमचं एकदाही झालं नाही आणि पुढे होण्याची शक्यताच मिटली आहे.‘‘
‘‘म्हणजे नक्की काय झालं?‘‘ मी विचारतो.
‘‘म्हणजे माझ्यातलं पुरुषत्वच संपलंय. संबंध करण्यासाठी पुरुषत्व जागृत व्हावं लागतं ते होतच नाही. मी कितीही प्रयत्न केला तरी काही परिणाम होत नाही. मी नुसता बर्फासारखा थंड आणि निपचीत. डॉक्टर, तुम्हाला असं वाटेल मी वाईट चालीने वागलो असेन. पण तसं नाही. हा माझा पहिलावहिला अनुभव. त्यातच असं झालं.‘‘
‘‘हे बघा. नेमकी सुरुवात कशी झाली ते नीट सांगा.‘‘
‘‘काय घडायचं ते पहिल्या रात्रीच घडलं पाहिजे असं माझं ठाम मत. म्हणून त्या तयारीनंच मी आलो. पहिल्या अनुभवातच पत्नीला समाधान दिलं की तिची नजर इकडे तिकडे जात नाही हे मला माहिती होतं आणि ते मला मिळवायचंच होतं. मला सिद्ध करुन दाखवायचं होतं की मी एक मर्द आहे आणि माझ्यात स्त्रीला समाधान देण्याची ताकद आहे. आणि.... आणि.... ते सिद्ध होऊ शकले नाही. आय हॅव फेल्ड अॅज ए मॅन.‘‘
‘‘याबद्दल तुमच्या पत्नीचं काय मत आहे?‘‘ मी विचारतो.
त्याच्या पत्नीनं सुस्कारा सोडला. तिला काहीतरी सांगायचं होतं. आपल्या नव-याबद्दल अजूनही पुरेसा विश्वास तिला वाटत नव्हता. आपल्या बोलण्याचा तो काहीतरी विपर्यस्त अर्थ करुन घेईल असं तिला वाटलं असावं. लग्न नुकतंच झाल्यामुळे तेही समजण्यासारखं होतं. परस्परांविषयी विश्वास सहवासानं निर्माण होतो, असा विश्वास गृहीत धरून चालत नाही. तो निर्माण करावा लागतो, व्हावा लागतो आणि त्यावरती एकच उपाय, तो म्हणजे वेळ. तिची अडचण समजून घेऊन मी तिच्याशी स्वतंत्रपणे बोलण्याची इच्छा व्यक्त केली.
प्रस्तुत केसशी हा प्रश्न निगडीत आहे, तो असा की या जोडप्यानं आपल्या नेहमीच्या डॉक्टरांचा सल्ला घेतला होता. एका स्त्रीरोग तज्ञाची भेट घेतली होती.
या मुलीला अडचण अशी होती की तिला कोणतंच लैंगिक सुख मिळालं नाही. तिच्या मते सगळीच घिसाडघाई आणि झटापट. तिच्या डोळ्यापुढे नेमकं काय होतं आणि तिच्या पदरी काय पडलं ते पाहू या. म्हणजे हा अनुभव कसा सार्वत्रिक असतो ते कळेल.
तिच्या मते लग्नानंतरची तिची पहिली रात्र म्हणजे, ‘आली हासत पहिली रात्र‘ अशा पद्धतीची. मराठी किवा हिदी चित्रपटात असते त्याप्रमाणे. म्हणजे स्त्रीने घुंघट ओढून बसणे आणि आलिशान खोली, फुलांची पखरण इ. त्यामुळे तिची अपेक्षा अशी की नव-यानं (सिनेमातले हिरो म्हणतात तसे) काही संवाद बोलावेत आणि आपल्याला खुलवावं.
अर्थात तिच्या नशिबी इतका आलिशानपणाही नव्हता आणि उत्साह असण्याऐवजी नुसतीच दिवसभराच्या उठबशीची दमछाक होती. आणि अशा अवस्थेत काही घडेल असं तिला वाटत नव्हतं. तिच्या डोळ्यासमोरची फिल्मी पहिली रात्र आणि प्रत्यक्षातली रात्र यात फारच तफावत पडली.
त्याच्या बाबतीतही अपेक्षाभंगच होता. कारण त्याच्या मित्रांनी त्याच्यापुढे या सर्व प्रसंगाचे इतके गुलाबी चित्र रंगवले होते की त्यालाही काही सुख मिळू शकले नाही. त्यानं मला या चित्राविषयी सांगितलं तेव्हा काय लक्षात आलं असेल तर ते असं की हे संबंध जणू काही फक्त पुरुषाच्या सुखाकरताच निर्माण झालेले आहेत.
स्त्रीला यात सुख मिळण्यापेक्षा स्त्रीवर विजय मिळवायचा असतो. तिला नामोहरम करुन आपलं आधिपत्य सिद्ध करायचं असतं. तिचा सहभाग तसा शून्यच असतो आणि म्हणूनच त्याच्या लेखी हा अनुभव फक्त शारीरिकच ठरत होता. त्या अनुभवातल्या मानसिक सुखाचा पोत त्याला कळलाच नव्हता. म्हणूनच त्याने पत्नीशी संबंध करण्यापेक्षा पत्नीवर हल्ला केला असं म्हणणंच योग्य ठरेल आणि त्यामुळेच या संबंधांना झटापटीचं स्वरुप आलं.
आपलं शरीर आणि मन हे परस्पर पूरक असतं. ज्याप्रमाणे ज्या ठिकाणी भीती वाटते त्या ठिकाणी जावंच लागलं तर आपल्या पायात गोळे येतात आणि पोटात अस्वस्थ वाटतं, हा सामान्य अनुभव झाला. तसंच काहीसं त्याचं झालं.
या संबंधाची त्यांनी इतकी भीती घेतली की त्याकरता लागणारी कमीत कमी पूर्वतयारी (लैंगिक उत्तेजन) तो करु शकला नाही. आणि त्यामुळेच त्याला वाटलं की आपण आपला पुरुषार्थ गमावून बसलो.
आणि तो माझ्याकडे आला तेव्हा त्याची व्याकुळता पुरुषार्थ पुन्हा मिळवून घेण्यामुळे निर्माण झाली होती. त्याचं मूळ हे भीतीमध्ये होतं.
मला समजणारं त्याच्या संबंधातलं हे स्पष्टीकरण मी त्याच्यासमोर मांडलं. तो किचित निराश झाला.
‘‘मला वाटलं तुम्ही काहीतरी टॉनिकबिनिक द्याल, ज्यायोगे माझा पुरुषार्थ जागृत होईल. आता हे मानसिकच म्हणता तर त्यावर उपाय कसा असणार?‘‘
‘‘हे बघा, आपण सुरुवातीला तुमच्या मनावरचं हे टेन्शन तर कमी करु या. एकदा मनाची पाटी कोरी झाली की मी त्यावर काहीतरी नवे संस्कार करु शकेन आणि या नव्या संस्कारांच्या सहाय्यानं तुम्ही तुमचं गमावलेलं चैतन्य मिळवू शकाल. हाच मार्ग शास्त्रीय आहे हे लक्षात घ्या.‘‘
‘‘का?‘‘ तो म्हणाला.
मी म्हटलं, ‘‘अहो, पुरुषांच्या या व्याकुळतेचा आणि तथाकथित असाहाय्यतेचा फायदा उठवण्यासाठी अनेक ठिकाणी जाहिराती येतात. त्यात अमुक एक पद्धतीच्या ‘एनर्जी‘ टॅब्लेटमुळे कशी शक्ती प्राप्त होते याची सवंग चर्चा असते. त्यांच्या वाटेला जाऊ नका. आपली अडचण शास्त्रीय मार्गाने सोडवा.‘‘
‘‘सॉरी, डॉक्टर. पम माझ्या एका मित्राला अशा गोळ्यांचा चांगला अनुभव आहे त्याचं कारण काय?‘‘ तो विचारतो.
‘‘मग तुमच्या मित्राला साधी ‘बी कॉम्प्लेक्स‘ची गोळी दिली असती तरी चाललं असतं एवढाच त्याचा अर्थ!‘‘ मी म्हटलं.
‘‘बरं, पण आमचं काय?‘‘ तो.
‘‘तुमचं म्हणाल तर तुम्ही चुकीच्या पद्धतीनं संबंध करताय असं मला वाटतं. या संबंधाच्या बाबतीतही भिन्न भिन्न अॅप्रोच असतात. ते तुम्ही समजून घेतले पाहिजेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असेल, तर तुम्ही या संबंधाकडे आपल्या पुरुषत्वाची परीक्षा म्हणून पाहाताय ते चूक आहे. तुम्ही पुरुष आहात हे काही परीक्षा देऊन सिद्ध करायची गरज नाही. ते स्वयंसिद्ध आहे. पहिली रात्र म्हणजे आपला मर्दपणा सिद्ध करायचं घोडामैदान नाही. पती-पत्नीचे संबंध हे आनंदाकरीता असतात. ही लढाई नव्हे. परस्परांना सुखावण्याचा एक मार्ग आहे. या संबंधात सुख जितकं घेण्यात असतं तितकं देण्यातही असतं. तुम्ही सुख वाढवण्याकरिता प्रयत्न करायचे आहेत. स्वतःला पुरुष म्हणून सिद्ध करण्याचा प्रयत्नच करु नका. या संबंधातल्या आनंदाला प्राधान्य द्या, मग पहा तुमचा प्रश्न सुटतो की नाही ते!‘‘
त्यांच्या मनात प्रत्यक्ष संबंधातल्या तंत्राविषयी काही अडचणी होत्या. त्यांचं निराकरण केलं आणि त्यांचा त्यांनाच विश्वास वाटू लागला. त्यांना पुरुषत्वाची परीक्षा द्यायची गरज नव्हती. त्यातला आनंद घ्यायचा होता आणि असा आनंद घेण्यात दडपण कसं येणार?
डॉ. राजेंद्र बर्वे, मनोविकारतज्ञ-मुंबई
विशेष बैंतम्या *
सा. किरातचा ८८ वा वर्धापनदिन उत्साहात
संगीतकार अशोक पत्की यांच्या हस्ते ‘स्वरमाया‘ पुस्तकाचे प्रकाशन
गायक आणि वादकांना कै. भाऊ आंबर्डेकर यांनी संगीताचा खजिनाच ‘स्वरमाया‘ या पुस्तकरुपाने उपलब्ध करुन दिला आहे, असे उद्गार ख्यातनाम संगीतकार अशोक पत्की यांनी ‘स्वरमाया‘ या पुस्तक प्रकाशनाच्या समारंभात काढले.
सा. किरातच्या ८८ व्या वर्दापनदिनाचे औचित्य साधून कै. द. रा. तथा भाऊ आंबर्डेकर यांनी लिहीलेल्या ‘स्वरमाया‘ या संगीताचा इतिहास, राग, बंदिशी यांची माहिती सांगणा-या पुस्तकाचे प्रकाशन संगीतकार अशोक पत्की यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कोल्हापूर माहिती विभागाचे उपसंचालक श्री. वसंतराव शिर्के, ज्येष्ठ गायक व अभिनेते अरविद पिळगावकर, सामाजिक कार्यकर्ते रघवीर मंत्री, आमदार दीपक केसरकर, भाऊंच्या पत्नी श्रीमती उषाताई आंबर्डेकर, भाऊंचे चिरंजीव बाळ आंबर्डेकर, ज्यांच्या प्रेरणेतून हे पुस्तक संगीतप्रेमींसमोर आले अशा भाऊंच्या कन्या मायाताई आंबर्डेकर, स्वरसाधनाचे अध्यक्ष शशिकांत कर्पे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
भाऊंनीच रचलेल्या आणि संगीतबद्ध केलेल्या स्वागतगीताने आंबर्डेकर कुटुंबियांनी उपस्थितांचे स्वागत केले. किरातचे संपादक श्रीधर मराठे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना किरातच्या वर्धापनदिन उपक्रमांची, किरात प्रकाशनाची आणि प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तकांविषयी माहिती सांगितली. यानंतर माहिती विभागाचे उपसंचालक वसंतराव शिर्के यांच्या हस्ते सा. किरातच्या ८८ व्या वर्षाच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले. संगीतकार अशोक पत्की आणि गायक अरविद पिळगावकर यांचा आंबर्डेकर कुटुंबियांतर्फे सत्कार करण्यात आला. वसंतराव शिर्के, सामाजिक कार्यकर्ते रघुवीर मंत्री यांनी साप्ताहिक किरातने काळानुसार बदलते स्वरुप स्वीकारल्याने जनमानसामध्ये लोकप्रिय झाल्याचे सांगत किरात प्रकाशनाने कोकणातील लेखकांना हक्काचे व्यासपीठ दिल्याचे सांगितले. यावेळी किरातचे स्तंभलेखक श्री. बाळ खानोलकर, डॉ. मधुकर घारपुरे, पत्रकार विजय पालकर, किशोर बुटाला यांचा संगीतकार अशोक पत्कींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमानंतर बाळ आंबर्डेकर, पं. अरविद पिळगावकर यांचे गायन, भाऊंचे शिष्य दत्तप्रभू तेंडोलकर, अशोक पत्की आणि त्यांच्या सहका-यांचा बहारदार संगीत संध्येचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाला भाऊंचे संगीत शिष्य, किरातचे बहुसंख्य वाचक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. शशांक मराठे यांनी केले. आभार स्वरसाधनाचे अध्यक्ष शशिकांत कर्पे यांनी मानले.
(फोटो ओळी- किरातच्या ८८ व्या वर्धापनदिनी किरात प्रकाशनाच्या ‘स्वरमाया‘ या पुस्तकाचे प्रकाशन करताना संगीतकार अशोक पत्की, पं. अरविद पिळगावकर, माहिती उपसंचालक वसंत शिर्के, किरातचे संपादक श्रीधर मराठे, बाळ आंबर्डेकर आणि श्रीमती उषाताई आंबर्डेकर)
किरातच्या ८८व्या वर्धापनदिनी ‘संगीत संध्या‘ ठरली यादगार!

सा. किरातच्या ८८व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून कै. भाऊ आंबर्डेकरांच्या ‘स्वरमाया‘ या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमानंतर सादर झालेली संगीत संध्या रसिकांसाठी यादगार ठरली. भाऊंचे सुपूत्र बाळ आंबर्डेकर, ज्येष्ठ गायक पं. अरविद पिळगांवकर यांचे गायन, भाऊंचे शिष्य दत्तप्रभू तेंडोलकर यांचे सरोदवादन आणि संगीतकार अशोक पत्की आणि त्यांच्या सहका-यांनी सादर केलेल्या एकापेक्षा एक सरस गीतांनी ही मैफल संस्मरणीय केली.
सुरुवातीला बाळ आंबर्डेकर यांनी यमन रागाच्या बंदिशीने कार्यक्रमाला सुरुवात केली. पं. जितेंद्र अभिषेकींनी गायलेले ‘माझे जीवन गाणे‘ या गीताने बाळने रसिकांची वाहवा मिळविली.
ज्येष्ठ गायक अभिनेते पं. अरविद पिळगांवकर यांनी पुरीया धनाश्री या रागातील ‘मान मान गुरुही कोण तुज सम सांग गुरुराया‘ हे प्रसंगाला अनुरुप नाट्यगीत म्हटले.
यानंतर भाऊंचे शिष्य, प्रसिद्ध सरोदवादक दत्तप्रभू तेंडोलकर यांनी भाऊंनी ६२ वर्षापूर्वी शिकविलेली बागेश्री रागातील बंदीश सरोदवादनातून सादर करुन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. नंतर मैफीलीचा ताबा वेंगुर्ल्याचे जावई ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्कींनी घेतला. भावगीते, मराठी मालिकांची टायटल साँग (शीर्षक गीत), जाहीरातींच्या जिगल्स सादर करुन रसिकांना मंत्रमुग्ध केले.
१९७२ साली बाजारात अशोक पत्कींनी संगीतबद्ध केलेल्या गीतांची कॅसेट आली होती. त्यानंतर लोकांना ‘संगीतकार अशोक पत्की‘ अशी ओळख झाली. त्या अल्बममधील ‘केतकीच्या बनी तिथे नाचला मोर..‘ या गीताने गायिका सायली जोशीने पत्कींच्या मैफीलीची सुरुवात केली.
अवघ्या ३ तासांत पत्कींनी स्वतः सुरेश वाडकरांसाठी लिहिलेले आणि संगीतबद्द केले ‘तू सप्तसूर माझे..‘ हे गीत गायक मंदार आपटे याने सादर केले.
जुन्या गाण्यांबरोबरच ‘आभाळमाया, पिपळपान, वादळवाट या गोजिरवाण्या घरात‘ अशा लोकप्रिय मालिकांची शीर्षकगीते, ‘झंडू बाम, धारा..धारा शुद्ध धारा‘ अशा जाहीरातींच्या जिगल्स, राष्ट्रीय एकात्मेच प्रतिक असलेले ‘मिले सूर मेरा तुम्हारा‘ हे गीत अशी बहारदार गीते या मैफिलीत सादर झाली. सगळ्यांना अशोक पत्कींनीच संगीत दिले आहे.
अशोक पत्कींनी या कार्यक्रमात आपलं वेंगुर्ल्यातल्या गाडेकरांच्या मुलींशी लग्न शिवाजी पार्कच्या कट्टयावर कसं ठरलं इथपासून ते राष्ट्रीय पुरस्कार वितरणापर्यंतच्या गप्पा अगदी दिलखुलासपणे मारल्या. मंदार आपटेंनी ‘राधा ही बावरी‘ या गीताने संध्येची सांगता केली. यासाठी निषाद करळगीकर, प्रशांत लळीत, प्रमोद सुतार यांनी संगीत साथ दिली होती.